कार्यशाळेत गझल प्रवेशिका प्रकाशित व्हायला सुरुवात ....

Submitted by kaaryashaaLaa on 25 September, 2008 - 09:43

मित्रांनो,

मायबोली गझल कार्यशाळा २००८ मधे आजपासून प्रवेशिका प्रकाशित करायला सुरुवात करत आहोत.

आपण सर्वांनी ज्या पद्धतीने आजवर प्रतिसाद व प्रोत्साहन दिले आहे तसेच ह्या सर्व प्रवेशिकांच्या गझलकारांना द्यावे अशी आग्रहाची विनंती आहे.

गझलकाराचे नाव प्रकाशित होणार नाहीये हे आपल्याला माहीत आहेच.

गझलकारांनी त्यांच्या प्रकाशित झालेल्या गझलवर येणर्‍या प्रतिसादांना, निकाल जाहीर होईपर्यंत उत्तर देऊ नये. गझलकारांकडून (अनवधानानेसुद्धा) त्यांची ओळख उघड झाल्यास ती रचना स्पर्धेसाठी व संग्रहासाठी ग्राह्य धरली जाणार नाही ह्याची नोंद घ्यावी.

वाचकांनी आता फक्त एक दिलखुलास प्रतिसाद आणि तटस्थ गुणांकन करायचे आहे. गझलला १० पैकी गुण तुमच्या प्रतिसादातच नोंदवावेत. कृपया अपुर्णांकात गुण देऊ नयेत. Happy

तर आता सादर करत आहोत कार्यशाळेतील निर्दोष असलेल्या गझलः

प्रवेशिका - १ प्रवेशिका - १३
प्रवेशिका - २ प्रवेशिका - १४
प्रवेशिका - ३ प्रवेशिका - १५
प्रवेशिका - ४ प्रवेशिका - १६
प्रवेशिका - ५ प्रवेशिका - १७
प्रवेशिका - ६ प्रवेशिका - १८
प्रवेशिका - ७ प्रवेशिका - १९
प्रवेशिका - ८ प्रवेशिका - २०
प्रवेशिका - ९ प्रवेशिका - २१
प्रवेशिका - १० प्रवेशिका - २२
प्रवेशिका - ११ प्रवेशिका - २३
प्रवेशिका - १२ प्रवेशिका - २४

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सगळ्या गझलकारांना ही सुद्धा विनंती असावी, की आपापल्या आणि एकमेकांच्या विचारपुशीतही ह्या बद्दल मौन पाळा. इतकच काय पण ह्याबद्दलची चर्चा वैयक्तिक इमेल मध्येही नको.
आणि मक्त्याचं काय? तखल्लूस आला की भांडं फुटलच.
नुसता अभिप्रायाच्या ठिकाणी ते बंधन असून पुरेसं नाही (नाही का?).
का.शा. ह्यावर विचार करतीलच....

निकोप चर्चा आणि निर्भेळ स्पर्धा होऊद्या.....
गडे हो, निकाल महत्वाचा नाही.... ही कार्यशाळेतली शिकण्याची मैफिल महत्वाची!

.

दाद, खरं आहे.
कार्यशाळेत सहभागी झालेले सगळे मायबोलीकर हे प्रामाणिकपणे गझल शिकण्यासाठीच इथे आलेत यावर आमचा पूर्ण विश्वास आहे.
पण मागील कार्यशाळांच्या अनुभवांवरून नंतरचे अनावश्यक वाद / शंका टाळण्याच्या दृष्टीने काही नियम करणं भाग होतं.
इथलं शिक्षण, चर्चा आणि स्पर्धा निकोप व्हावी ही वैयक्तिक पातळीवर सगळ्यांचीच जबाबदारी आहे.

मक्ता न वापरण्याची तुमची सूचना चांगली आहे. अजूनपर्यंत आलेल्या प्रवेशिकांमधे हा प्रश्न आला नव्हता. ज्यांनी अजून आपली रचना पाठवलेली नाही, त्यांनीही मक्ता (तखल्लुस) वापरू नये अशी विनंती करत आहे.

==
एका जन्माच्या पाठी दुसर्‍या जन्माची धास्ती
असणेही नश्वर येथे, नसणेही अक्षय नाही

kaaryashaalaa08@maayboli.com

मक्ता म्हणजे काय?
अरे बापरे ! इथे पण वादविवाद होतात? Sad कोणत्या विषया वरून होतात (जरा कल्पना असलेली बरी). लोक एकमेकांना नावं ठेवतात का?

अगं आश्विनी वादविवाद होउ नयेत म्हणून ही आधीच घेतलेली काळजी आहे. Happy

अगं वादविवाद म्हटला की माझ्या पोटात गोळा उठतो. त्या भरात लोक एकमेकांना खूप व सहजपणे दुखावतात आणि माझा त्या गोष्टीशी संबंध नसला तरी माझे Sad असे होते.

प्रयत्न करायला अजून वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. एकही शेर हाताशी लागला नाही अजून. असो.

~~~~~~~~~
~~~~~~~~~
Happy

अश्विनि, निर्धास्त रहा. कार्यशाळा ही आनंदाची वाटचाल आहे. काय होईल तो 'संवाद' असेल.
आपण आपला कायम Happy चेहरा ठेवावा

मीनू << शेर हाताशी नाही लागला? >> शिकारीला बाहेर पडल्यासारखं म्हणतेयस. बाकी तेच खर बाई.... खूप रान उठवावं लागलं मलातरी Happy
-----------------------------------------------------
जान दी, दी हुई उसी की थी
हक तो यह है, के हक अदा न हुआ

बापरे मीनू वगैरेंना सुचत नाही म्हंटल्यावर माझं काय.. माझं देउळ तर अजून पाण्यातच आहे. फार फार फरफट होतं आहे.

संयोजक..

वेळ वाढ्वून दिल्याबद्दल मनःपुर्वक धन्यवाद..

दाद..
'संवादाशी' सहमत्...आपणचं तो 'वाद' होणार नाही याची काळजी घेऊ..आणि अश्विनी चेहेरा Happy चं ठेव....छान वाटतं..

बी..
पोहायला सुरवात केली ना..मग काय..पटकन बाहेर पड पाण्यातून..:)

रोज काहीतरी नवीनच कळ्तय!
जरा रदीफ, काफिया कसबस लक्षात आलं तर आता हे मक्ता आणि तखल्लुस कोण ?

धन्यवाद वेळ वाढवून दिल्या बद्दल.
अहो, पण मीटरमधे बसणारे शब्द शोधले तर शेराचा अर्थच बदलून जातो आहे आणि अर्थ ठेवायला गेलो तर मीटर कित्येक किलोमीटर दुर पळुन जातंय! पण अजुनही झटापट चालू आहे. हिंमत नाही सोडली अजुन, कारण.....

सदैव सैनिका, पुढेच जायचे
न मागुती तुवा, कधी फिरायचे

लगालगालगा लगालगालगा
लगालगालगा लगालगालगा............. Happy

मीनाताई,

मक्ता आणि तखल्लुस बद्दल http://www.maayboli.com/node/3625 इथे सांगितलं आहे पहा.

पूर्वी जेव्हा गझल छापल्या जात नव्हत्या तेव्हा एखादी गझल कोणाची आहे हे कळावं म्हणून शायर आपलं नाव वा टोपणनाव (तखल्लुस) शेवटच्या शेरात गुंफत असत.
(उदा : हैं और भी दुनिया में सुखन्वर बहुत अच्छे.. कहते हैं कि गालिब का है अंदाज-ए-बयां और')

अशा शेराला 'मक्ता' म्हणत असत. म्हणजे या गझलची 'जबाबदारी' माझी असं सांगणारा शेर.
('तू काय अमुक अमुक करण्याचा मक्ता घेतलायस का?' हे त्यावरूनच.) Happy

आता तशी गरज राहिलेली नाही. उलट त्यामुळे एका शब्दाची जागा वाया जाते असंही काही जाणकारांचं मत आहे.

अविकुमार, लगे रहो. Happy

==
एका जन्माच्या पाठी दुसर्‍या जन्माची धास्ती
असणेही नश्वर येथे, नसणेही अक्षय नाही

kaaryashaalaa08@maayboli.com

मक्ता इथे लिहिला तर ती गजल कुणाची हे लगेच कळेल आणि आपले असे ठरले आहे की गजल जेंव्हा मायबोलिवर सर्वांसाठी वाचायला खुली होईल त्यावेळी गजलकाराचे नाव जाहीर केले जाणार नाही. म्हणून मक्ता लिहायचा नाही. हा मुद्दा आहे.

माझ्या तोकड्या ज्ञानाला कार्यशाला समितीने दिलेल्या प्रतिसादामुळे ही त्यांना समर्पित..........
बघा शब्द माझा, पटाईत नाही
गझल सांगते... मी सराईत नाही
किती जोडले अन किती तोडले ते
सही काफिये या, छपाईत नाही
वॄत्त अडखळे ते, गडबडे अलामत
अशी मांडणी..जी सफाईत नाही
असे पिळले हे, तसे घासले मी
तरी शेर खासे, धुलाईत नाही
अरे वैभवा हे, नसे काम सोपे
जमीनी मुळी या, जिराईत नाही

वैभव गुरूजींचा उल्लेख समितीचे प्रतिनीधी म्हणून करण्याचे धाडस केले आहे. कुणालाही दुखवण्याचा हेतू नाही. यात काही चुकलं असल्यास सुधारून पुन्हा समर्पित करूया.

अरे हे मक्त्याच काय नविनच...? असो. (आधीचे मेसेज सर्व गायब झालेत..उडवले का..?)
का.शा.: आधीच मेल मधे म्हटल्याप्रमाणे माझी गझल स्पर्धेसाठी घेतली जावू नये... मग तरिही आधी लिहीलेला मक्ता पुन्हा revise करावा लागेल का..? का मक्त्या जागी xx घालून आहे तसा घेता येईल..?

एक नम्र सूचना: मायबोलीकर जाणकार आहेत मग त्यांच्या बर्‍या वाईट सर्व प्रतिक्रीया मा़झ्या (कुठल्याही) गझलेसाठी पुरेशा आहेत. उगाच गुणांकनाची काय गरज? मला वाटत याने "वाद" अधिक होतील. Happy हे म्हणजे तुम्ही महागुरू (का.शा.) ना बोलावून वरून लोकान्चे sms मागवून निवड केल्यासारखे होईल.. अगदी गुणांकनासाठी देखिल तक्ता/नियम बनवून दिलेत तरी मला वाटत त्यातून गोन्धळ अधिक होईल.
गुणांकन हे स्पर्धेसाठी आवश्यक असेल तर ते का.शा. ने केलेलेच अधिक योग्य ठरणार नाही का..?(जसे पहिल्या कार्यशाळेतही केवळ "गुरूजनान्नी" निवड केली होती तसे.)
असो. कुठलाही नविन (सं)वाद निर्माण करायचा नाहीये.. तेव्हा तुम्हाला योग्य वाटेल ते करा.

मला एक वाटतं जर निवडक गझल दिवाळी अंकात घेतल्या जात असतील तर मग त्याला काय अर्थ उरतो कारण गझल इथे प्रत्येकानी वाचलेलीच असेल. अशी नविन आणि आधीच वाचलेली दिवाळी अंकात समाविष्ट करून काय साध्य होणार आहे. अशानी दिवाळी अंक चांगला होईल असे मला तरी नाही वाटतं. त्यापेक्षा सर्व गझल दिवाळी अंकात घेऊन तेंव्हाच त्या वाचायला मिळाल्यात तर दिवाळी अंकाचे आणि या कार्यशाळेचे दोन्हीचे उद्दीष्ट साध्य होईल. नाही का?

योग चे म्हणने मला ही पटले आहे. गझल ला गुण द्यावेत असे मुळीच करू नये. इथे सर्वांची समज, रुची निराळी आहे. किती जणांना गुण देताना आपण न्याय करतो आहे ही गोष्ट लक्षात राहीन? गुण देणे नकोच च च!!!!

बी, निवडक गझल दिवाळी अंकात घेण्याबद्दल तुम्ही कुठे वाचलंत?

७) ह्या कार्यशाळेतील काही निवडक गज़लांचा मायबोली प्रातिनिधिक गज़ल संग्रहात समावेश करण्यात येईल . हा संग्रह पीडीएफ स्वरुपात मायबोलीवर दिवाळी अंकासोबत उपलब्ध करून देण्यात येईल

अशी घोषणा http://www.maayboli.com/node/3608 या दुव्यावर करण्यात आली होती.

वाचकांच्या मतावर विश्वास नसेल तर तुम्हाला तुमची गझल कार्यशाळेत न पाठवता दिवाळी अंकासाठीच पाठवायचा पर्याय उपलब्ध आहेच.

==
मज आयुष्याचा माझ्या, कळलेला आशय नाही
जगतो हा तर्कच आहे, आलेला प्रत्यय नाही

kaaryashaalaa08@maayboli.com

योग,
>>> मायबोलीकर जाणकार आहेत मग त्यांच्या बर्‍या वाईट सर्व प्रतिक्रीया मा़झ्या (कुठल्याही) गझलेसाठी पुरेशा आहेत. उगाच गुणांकनाची काय गरज?

यात काही विरोधाभास आहे असं तुम्हाला वाटत नाही का?

कार्यशाळा घोषित करतानाच वाचकांचा कौल घेण्याबाबतचा नियम सांगितला गेला होता.
प्रत्येक गझलवरचे ५०% गुण हे कार्यशाळा समितीकडून ठरतील, आणि ५०% वाचकांकडून. अश्या प्रकारे दोन्ही मतांमधे योग्य समतोल साधला जाईल असं आमचं मत आहे. गझल गझलकाराच्या नावाशिवाय प्रकाशित होणार असल्यामुळे biased मतदान होण्याची शक्यताही कमी होते.
जर तुम्हाला तुमच्या रचनांवर वाचकांची मतं हवी असतात तर गुण का नकोत?

==
मज आयुष्याचा माझ्या, कळलेला आशय नाही
जगतो हा तर्कच आहे, आलेला प्रत्यय नाही

kaaryashaalaa08@maayboli.com

>>कार्यशाळा घोषित करतानाच वाचकांचा कौल घेण्याबाबतचा नियम सांगितला गेला होता.

बरं मग चालू देत तुम्ही ठरवलयत तस..

कार्यशाळा, मला असे म्हणायचे आहे, की जर ५० गझल इथे आल्यात, त्यापैकी गुणांकावरून, २५ गजल तुम्ही-आम्ही निवडल्यात, तर या निवडलेल्या गझलची PDF करून त्या गझल परत इथे वाचायला देऊन त्यातून आपण काय साध्य करणार आहोत? कारण त्या सर्व गजल आपण सर्वांनी आधीच इथे वाचलेल्या असतील. फक्त चांगल्या गजल एकत्रीत आणण्याचा तो एक प्रयत्न होईल. त्यापेक्षा या सर्व गजल दिवाळी अंकासाठी ठेवल्या असत्या तर त्याचे महत्त्व वाढल असते.

कार्यशाळा, गझला वाचायची उत्सुकताच लागली होती. धन्यवाद.
एक सूचना कराविशी वाटते आहे. गझलेच्या मथळ्यात क्रमांकाबरोबर गझलेची पहिली ओळ लिहिता येईल का?

अगदी चंगली सूचना.. आणि रोज निदान 10 तरी गझल येवू द्यात.. दोन चार ने कुणाचे पोट भरणार आहे..?:)

अजून एक सूचना करावि वाटतेय, ती गुण द्यायची पद्धत याबद्दल , गणेशोत्सव स्पर्धेत मतदान होतं, तस काही केलं तर बरं होइल.

संयोजक -

काही अनाहूत सूचना -
१. हे गुणांकन पर्सनल लेव्हल वर येऊ नये म्हणून काही करता येईल का? त्याने मला कमी गुण दिले म्हणून मीही त्याला कमी देणार, असे तर होणार नाही ना? असे होऊ नये हीच आशा...
२. गुणांकनासाठी काही बेसिस ठेवता येईल का? बी ने काही निकष वापरले आहेत, तसे काही?
३. प्रत्येक आयडी ला एकाच वेळी गुण देता येईल असे करून, गुणांकन गुप्त पद्धतीने करता येईल का? जसे गणेशोत्सव स्पर्धेसाठी केले गेले?
४. आणि सगळ्या गझल्स एकदम उपलब्ध करून देता येतील का? (हे जरा अवघड होईल)

धन्यवाद..

गुणांकन गणेशोत्सवात केले होते त्या पद्धतीने करता यावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. Happy

आफताब, त्यासाठीच गझलकाराचं नाव गुलदस्त्यात ठेवतो आहोत आपण. Happy

==
मज आयुष्याचा माझ्या, कळलेला आशय नाही
जगतो हा तर्कच आहे, आलेला प्रत्यय नाही

kaaryashaalaa08@maayboli.com

गुणांकन गणेशोत्सवात केले होते त्या पद्धतीने करता यावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. >>> good.. गुणाम्कन खूले होण्यापेक्षा गुप्त व्हावे.. फोटो स्पर्धेला जशी तारांकनाची पध्दत वापरली होती.. तशीच केली तर बरं होईल आणि वेगळे पान देण्या ऐवजी गझलेच्याच पानावर हे तारे टाकता आले तर बरं पडेल..

एक सूचना -
आम्हाला गझल कितपत कळली किंवा आवडली हे बघून आम्ही इथे गुण देतोय. हा गझल प्रकार इथल्या पुष्कळांना नवा असल्याने कदाचित आणखी काही पहायचं राहून जात असावं. इथले निकाल जाहीर झाल्यानंतर कार्यशाळेने गझलांना कशा प्रकारे गुण दिले, कसं रसग्रहण केलं, डावं-उजवं पाहिलं हे सांगितलं तर गझल कशी वाचायची हेसुद्धा कळेल आम्हाला.

चांगली सूचना आहे झेलम. जरूर प्रयत्न करू या विषयी लिहीण्याचा.