प्रवेशिका - २० ( vaibhav_joshi - कुठून आला ठराव... )

कुठून आला ठराव की दर्वळलोसुध्दा नाही?
अरे इथे तर अजून मी सळसळलोसुध्दा नाही!

उगा भिडवली नजर जगाच्या अथांग डोळ्यांशी मी
असा हरवलो पुन्हा मला आढळलोसुध्दा नाही

मला तरी शांत वाटले फुंकरीत एका विझलो
तुलाच हळहळ उरेल की तळमळलोसुध्दा नाही

किती ठिकाणी तरी सुखाचे वळण लागले होते
निघून गेलो पुढे सरळ, अडखळलोसुध्दा नाही

हजार घावांतुनी तुझा घाव ओळखीचा दिसला
वठून गेलो उभ्या उभ्या , कोसळलोसुध्दा नाही

भलेबुरे अर्थ केवढे सांगतेस सार्‍यांपाशी
तरी बरे मी तुला पुरेसा कळलोसुध्दा नाही

कधीतरी समजले मला हा प्रवाह माझा नाही
निमूट वाहून लोपलो , खळखळलोसुध्दा नाही

तुला कशा एवढ्यात दिसल्या हजार पापी प्रतिमा
अजून अश्रू बनून मी ओघळलोसुध्दा नाही


व्वा!!!
मला तरी शांत वाटले फुंकरीत एका विझलो
तुलाच हळहळ उरेल की तळमळलोसुध्दा नाही

किती ठिकाणी तरी सुखाचे वळण लागले होते
निघून गेलो पुढे सरळ, अडखळलोसुध्दा नाही

हजार घावांतुनी तुझा घाव ओळखीचा दिसला
वठून गेलो उभ्या उभ्या , कोसळलोसुध्दा नाही>>>> उच्च!!!!!!!!!!!!!



दर्वळलोसुध्दा >>दरवळलोसुद्धा -- असे हवे होते ना!

चांगली आहे गजल. वेदना व्यक्त करण्याची ढब निराळी आहे आणि म्हणूनच भावली.

९ गुण



क्या बात है!!.... विशेष म्हणजे- आढळलो, सळसळलो असे शब्द वापरूनही गझल अगदी सहजपणे बांधल्यासारखी आहे..
ये कोई "पुराना आशिक" है!! स्मित
शेवटचा शेर तर अगदी थेट भिडणारा..



अलग अलग... ५ गुण.



छान झाली आहे. माझ्याकडून ८ गुण.



छान आहे

५ गुण



वा!!! संपूर्ण गझल आवडली.
माझे गुणः ८



व्वाह! खासच!
तुलाच हळहळ उरेल की तळमळलोसुध्दा नाही... आह! थेट आर पार अगदी!

गजल खासच अगदी. पूर्णपणे वेगळी.



मस्त गझल
माझे ८ गुण



खल्लास....
पुरते खल्लास....
माझे गुण ९
*********************
वयाबरोबर वाढत जावी तुझी नि माझी मैत्री
मनाबरोबर वयात यावी तुझी नि माझी मैत्री ||



खासच !!! जियो !!



केवढा मोठा रदीफ! स्मित जबरदस्त शब्द आहेत.. सगळे शेर आवडले, शेवटचे चार जास्त आवडले..
९ गुण
--------------------------------
जलो, मगर दीप जैसे!



मला तरी शांत वाटले फुंकरीत एका विझलो
तुलाच हळहळ उरेल की तळमळलोसुध्दा नाही

किती ठिकाणी तरी सुखाचे वळण लागले होते
निघून गेलो पुढे सरळ, अडखळलोसुध्दा नाही

हजार घावांतुनी तुझा घाव ओळखीचा दिसला
वठून गेलो उभ्या उभ्या , कोसळलोसुध्दा नाही

हे शेर मस्त आले आहेत.

माझ्या मते ६ गुण.
-सतीश



छान आहे गझल. ८ गुण.

>>उगा भिडवली नजर जगाच्या अथांग डोळ्यांशी मी
असा हरवलो पुन्हा मला आढळलोसुध्दा नाही

मस्तच!

>>मला तरी शांत वाटले फुंकरीत एका विझलो
तुलाच हळहळ उरेल की तळमळलोसुध्दा नाही

उला मिसर्‍यात 'वाटले' ऐवजी 'वाटेल' हवे होते वाट्टं.



वा! मस्त गझल!
अश्रू आणि सुख हे शेर विशेष आवडले. माझे गुण - ७.



घायाळ करणारे शेर....

१० पैकी १० गुण...



अजून अश्रू बनून मी ओघळलोसुध्दा नाही...

सुंदर कल्पना. पूर्ण गझलच छान. सर्व गुण बहाल!



प्रत्येक शेरातला punch तितकाच आतपर्यंत घुसणारा! पुन्हा पुन्हा वाचली! खूप आवडली! अर्थ आणि आशयासाठी माझे १० गुण. ही गझल ह्याहून सुंदर अजून कशी असू शकेल?



छान आहे गझल. शब्द उत्तम..

७ गुण..



मस्त!! एकसे एक शेर आहेत!



आय हाय!
प्रत्येक शेर वेध घेणारा आहे.... अगदी कुर्बान व्हाव असा!!
माझे १० (दहापैकी बारा देता येतील काय. काशा? स्मित )!!
-----------------------------------------------------
वह सुबह का अहसान हो या मेरी कशिश हो
डूबा हुआ खुर्शीद सर्-ए-बाम तो आया



मलाही खूप आवडली.. सगळे शब्द सुंदर !
माझे १० पैकी १० मार्क्स !!



जबरदस्त गझल!!!!!!!!व्वा!!!!मजा आली वाचुन
९ गुण



मला तरी शांत वाटले फुंकरीत एका विझलो
तुलाच हळहळ उरेल की तळमळलोसुध्दा नाही

हजार घावांतुनी तुझा घाव ओळखीचा दिसला
वठून गेलो उभ्या उभ्या , कोसळलोसुध्दा नाही

भलेबुरे अर्थ केवढे सांगतेस सार्‍यांपाशी
तरी बरे मी तुला पुरेसा कळलोसुध्दा नाही

ह्या तीन शेरांमधे र्‍हीदम अडखळतो बाकी सगळे मस्त तालात ठेक्यात अलगद पदन्यास करतात.

७गुण



ग्रेट....खरंच ग्रेट... माझे अगदी १० गुण.



पहीले २ सोडले तर बाकीची छान आहे

६ गुण



अगदी कातील्...माझे १० गुण..



सुरेख.. ९ गुण
- अनिलभाई



मस्तच गझल आहे.. पुन्हा वाचली!
मतल्याचा अर्थ मात्र मला नीट लागत नाहिये अरेरे



वाह! अजुन एक छान गझल कार्यशाळेतली.
मस्तच...आवडली !! स्मित
--------------
2b || !(2b)



मला तरी शांत वाटले फुंकरीत एका विझलो
तुलाच हळहळ उरेल की तळमळलोसुध्दा नाही

भलेबुरे अर्थ केवढे सांगतेस सार्‍यांपाशी
तरी बरे मी तुला पुरेसा कळलोसुध्दा नाही

अहाहा.. क्या बात है...म़जा आया.. ९ गुण..



मला तरी शांत वाटले फुंकरीत एका विझलो
तुलाच हळहळ उरेल की तळमळलोसुध्दा नाही
वाव्वाव्वा..

किती ठिकाणी तरी सुखाचे वळण लागले होते
निघून गेलो पुढे सरळ, अडखळलोसुध्दा नाही
वावाव्वा... अगदी सहज...

हजार घावांतुनी तुझा घाव ओळखीचा दिसला
वठून गेलो उभ्या उभ्या , कोसळलोसुध्दा नाही
वाव्वाव्वा..

भलेबुरे अर्थ केवढे सांगतेस सार्‍यांपाशी
तरी बरे मी तुला पुरेसा कळलोसुध्दा नाही
वाव्वा..

माझ्यामते सगळेच शेर छान आहेत. पण वरील चारही शेर सुरेख झाले आहेत. गझल एकंदर भरघोस आणि चांगली झाली आहे.



मस्त. पण मलाही मतला नीटसा कळला नाही.
६ गुण.