अंबाडीची भाजी

Submitted by अमृता on 15 June, 2010 - 16:24
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१० अंबाडीच्या जुडीतल्या काड्या (इथे भारी मोठा गठ्ठा मिळतो इं ग्रो मधे) चिरल्यावर साधारण २ वाट्या
१/२ वाटी तांदुळ,
५,६ लसूण पाकळ्या,
३,४ लाल मिरच्या

क्रमवार पाककृती: 

अंबाडीची भाजी मला अतिशय आवडते. आणि मीच त्याची झटपट होइल अशी माझ्यासाठीची पाकृ तयार केलीये. Proud
अंबाडीची पाने खुडुन घ्यावीत. व्यवस्थित धुवुन बारिक चिरावीत.
१ वाटी तांदुळ घेउन ते धुवावेत त्यात २.५ वाट्या पाणी टाकुन वर चिरलेली आंबाडी टाकावी (हा माझा शॉर्ट्कट Wink )
भांडं कुकरला लावावं. भाताबरोबरच अंबाडी मस्त शिजते.
कुकर झाल्यावर भात व अंबाडी नीट घोटुन घ्यावी. लसूण ठेचुन घ्यावा.
कढईत मोहरी, हिंग, हळदीची फोडणी करुन लसूण टाकवा. लसूण थोडा लाल झाला की मिरच्या टाकाव्यात, थोडं तिखट टाकावं. घोटलेल भात, अंबाडीचं मिश्रण टाकावं. चवीनुसार मीठ टाकुन चांगलं परतुन एक वाफ द्यावी.
भाजी भाकरी किंवा पोळीबरोबर चापावी. माझी लेक तर नुसतीच खाते.

(खालिल फोटोतल्या भाजीत मी तिखट घातलं नाहीये.)
aambadi.jpg

वाढणी/प्रमाण: 
अंदाजे ३ नगांसाठी ;)
अधिक टिपा: 

१. नॉर्मली भाताबरोबर अंबाडी शिजवत नाहीत. निराळी शिजवुन पण भात मिक्स करु शकता.
२. फोडणी कमी वाटली तर अजुन लसणी घालुन वर फोडणी ओतावी.
३. दुसर्‍यादिवशी पुन्हा खाणार असाल तर फोडणी अतिआवश्यक
४. भाजी पानात वाढुन मधे खळगा करुन त्यात कच्च तेल ओतावं. Proud स्वर्ग गाठला जातो.

माहितीचा स्रोत: 
केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भाजी पानात वाढुन मधे खळगा करुन त्यात कच्च तेल ओतावं. फिदीफिदी स्वर्ग गाठला जातो.

>>> मी नाही करणार मग ही भाजी .. मला इतक्यात स्वर्गात जायची इच्छा नाही .. :p

असो, तुरीची डाळ पण घालते भाताबरोबर .. आणि भाजीत कच्चं तेल न घालता सुद्धा मला स्वर्गसुख मिळाल्याचा भास होतो .. :p

पालेभाज्यांच्या बाबतीत माझं ज्ञान आगाध आहे Sad मला सांग अंबाडी म्हणजे इथे हिरवी छोटी पाने आणी मधे लालसर तीच भाजी ना? Uhoh

कंबख्त तुने पिही नही Proud

तूरडाळ घालुन मी नाही खाल्लीये कधी ही भाजी.

सायली, हो ग. अशी मस्त कत्री असतात पानं, आणि हो खाउन पहा एक पान, आंबट असतं.
gongurabranch2.jpg

फोटो गुगल वरुन साभार. Happy

पालेभाज्यांच्या बाबतीत माझं ज्ञान आगाध आहे अरेरे मला सांग अंबाडी म्हणजे इथे हिरवी छोटी पाने आणी मधे लालसर तीच भाजी ना? >>> नाही .. साधारण मेपल लीफ प्रमाणे दिसतात ती ..

ambaaDee.jpg

वा वा! मी आजच केली. पण कण्या घालून नाही.

अंबाडी चिरून त्यात थोडी चण्याची डाळ आणि शेंगदाणे घालून कुकरमधे शिजवून घ्यायची. शिजवलेलं पाणी टाकून द्यायचं. शिजली की थोडं डाळीचं पीठ लावून डावेने घोटून घ्यायचं. चवीप्रमाणे लाल तिखट, मीठ आणि गूळ घालायचा, आणि भरपूर लसूण आणि एखादी सुकी लाल मिरची घातलेली खमंग फोडणी द्यायची. थोडं पाणी घालून चांगले दोन कढ आणायचे.

जमल्यास भाकरीसोबत खायची. खाताना वरून पुन्हा लसणीची फोडणी घेतली तर बहार येते. जोडीला लसणीचं तिखट किंवा तिळकूट असेल तर बहार दुप्पट होते. Happy

मला पण अंबाडीची भाजी खूप आवडते.
थोडं विषयांतर, माझ्या बाबांना ऑफिसच्या कँटिनमध्ये भाजीत कधी केस आला तर ते घरी आल्यावर पीजे मारायचे, "आज अंबाडीची भाजी होती".

१० काड्या आंबाडीला १ वाटी तांदूळ? मला वाट्लेलं तांदूळ फक्त मिळून येण्यासाठी असावा. मी एवढ्या तांदूळाची कधी खाल्ली नैये, म्हणून असेल कदाचित, पण मला तरी आंबाडी पुलाव ची रेसेपी वाटतीये :p .
आणि फोटोत पण तसंच दिसतयं.

असू शकेल मधुरा Proud मी अंदाजपंचे असल्याने तो अंदाजच आहे. Wink
असो, मला फार आंबट आवडत नाही भाजी. वरच्या भाजीत एवढा तांदुळ घालुन पण आंबटपणा बराच आहे कारण अंबाडी शिजवुन त्याचं पाणी नाही काढलय मी. Happy

माझी रेसेपी पण स्वाती सारखीच सेम.कधी भाताच्या कण्या.पण आम्ही सुद्धा ईतका भात नाही घालत. वरून लसणाची फोडणी आणी कच्चा कांदा. अगदी अप्रतीम चव. पर्वाच देसी ग्रोसरीत होती. पण खराब होत्या जुड्या आतून. पार विरस झाला. खूप दिवसांत खाल्ली नाही. मला पण नुसती खायला आवडते.

माझी आई स्वातीच्या रेसीपीसारखीच करते. (आईच्या हातच्या पालेभाज्या!! तोंपासु!! फक्त पालेभाजीचे ६ कोर्स मील बनवूनही खायला तयार आहे मी! Happy )
मी इथे फारशी पाहिली नाहीये अंबाडी.. भ्यां....... Sad

पालेभाज्या कोणकोणत्या असतात अजुन? एक डेटाबेस बनवायचा का? मला फक्त पालक, मेथी, अंबाडी, माठ माहितीय. आणि कधीतरी चाकवत पाहिलाय घरी. चवळी पण असते म्हणे पालेभाजी..

हो अग चवळी असतेच. मला जाम आवडते चवळी सुद्धा. कांदा, लसूण घालुन अफलातुन होते भाजी.
त्याची आमटी पण मस्त लागते.

आमच्याकडेही भात घालूनच करतात ( खरं तर तांदुळाच्या कण्या ! ). पण भाजी जास्त, भात कमी आणि थोडं डाळीचं पीठही लावते मी. अंबाडी म्हणजे घोंगुरा लीव्हज का ?
बस्के, तुला प्रचंड अनुमोदन ! मलाही पालेभाज्या सॉलिड आवडतात. तू सांगितल्याव्यतिरिक्त करडई ही माहितीये मला आणि खूप आवडते. शेपू तर आहेच.
रच्याकने, सगळ्या पालेभाज्यांत पालक सगळ्यात कमी आवडतो आणि इथे तोच ढिगाने मिळतो ( की गेले चार्-पाच वर्षे तेवढा एकच खाऊन कंटाळा आलाय देव जाणे ! )

इथे मिळाणार्‍या अजुन काही भाज्या -
मुळ्याचा पाला
टर्निप ग्रीन्स
बीटचा पाला
बॉक चॉय
लाल भोपळ्याचा पाला
आळू
चार्ड
मायाळू
शेवग्याचा पाला

मुंबईत ज्याला चवळीची भाजी म्हणातात ती बहुदा तांदुळजाची भाजी असते. माठ लाल असतो बरेचदा. राजगिरा हा हिरवा/लाल मिक्स असतो.

चायनीज दुकांनांमधे खुप व्हरायटी असते भाज्यांची. वास सहन होत असेल तर जायला हरकत नाही.

मिनोती मला बरेचदा नुसत्या पाहून नाही ओळखता येत ह्या पालेभाज्या. म्हणजे फिरंग नावं लिहिलेली असतात दुकानात पण मराठीत काय म्हणायचं ह्याची बोंब असते. जमलं तर करशील का ईथे एक सिरीज. भाजीचा फोटो , फिरंग आणी मराठी नाव आणी कृती .

गुड आयडीया. मलाही इथल्या ग्रोसरी स्टोअर्स मधे मिळणार्‍या पालेभाज्या(मुळा, बीट, पालक सोडुन) कळत नाहीत.

नक्की ट्राय करेन Happy एक दीड महिन्यापुर्वी इथे मुळ्याच्या पाल्याची भजी लिहीलेली ... ती असेल कुठेतरी Happy

मी ही अंबाडी शिजवताना साधारण पाव वाटी प्रत्येकी तूरडाळ, भात आणि किंचित मेथी दाणे घालून कुकरला शिजवते. बाकी फोडणीत लसूण, लाल मिरच्या वगैरे तेच. गूळ मात्र जास्त हवा नाहीतर खूप आंबट लागते चवीला.

आम्ही पण तांदळाच्या कण्या घालून करतो. कण्या आणि भाजी नुसती शिजवून फ्रीजमध्ये ठेवायची. ऐनवेळी हवी तेवढी घेऊन तिखट, मीठ, गूळ, लसणाची फोडणी किंवा कच्चे तेल आणि कच्चा कांदा घालून मस्त लागते.

मस्त पाकृ. मला तांदळाच्या कण्या घालून केलेली अंबाडी माहीत होती.... आता ही झटपट शॉर्टकट्वालीपण करून बघेन! आणि स्वाती, तुझी रेसिपी तर अजूनच वेगळी आहे....ती पण बघायला हवी करून! ग्रेट! Happy

आम्ही तांदळाची किंवा ज्वारीची कणी , हरभर्‍याची डाळ आणि शिजवलेले शेंगदाणे घालुन करतो अंबाडीची भाजी.
मिनोती, तुला शेवग्याच्या पाल्याची भाजी येत असेल तर रेसीपी टाकणार का?. इथे बरेचवेळा दिसतो.

हो, मी विसरलेच सांगायला, अंबाडीच्या भाजीला भिजवून शिजवलेले शेंगदाणे, हरभराडाळ, भरपूर गूळ, लसूण हवाच.
अमॄता, गूळ न घालता कशी खातेस ही भाजी ? Uhoh

Pages