माझी ऑफीसची डायरी -२

Submitted by भूत on 9 June, 2010 - 06:09

मागील पान :५ जुन २०१० शनिवार

७ जुन २०१० सोमवार

सीनीयर मॅनेज्मेंट बरोबरची मीटींग , प्रेझेन्टेशन्स संपवुन ऑफीसातुन बाहेर पडलो तेव्हा जवळपास साडेसहा सात वाजले होते . ऑफीस अवर्सच्या गर्दीत चर्चगेट ते अंधेरी म्हंणजे परत छळ ! चर्चगेट च्या मेन ऑफीसला मीटींग असली की मी गाडी अन्धेरीला पार्क करतो का तर ट्रॅफीक मधे अडकुन उशीर व्हायला नको म्हणुन !
पण प्रत्येक वेळी मीटींग संपवुन घरी जाताना पहिल्यांदा पश्चाताप होतो आणि नंतर सवय होते ...पश्चातापाची !

पण आज रीमा माझ्या बरोबर होती त्यामुळे लोकलचा प्रयोग करण्यात शहाणपणा नव्हता .
( अशा वेळी कधी कधी वाटतं की मॅनेज्मेंट्ने हे लोढणं का अडकवलयं माझा गळ्यात ? चांगली प्रेझेन्टेशन्स करतायेत नाहीत , अ‍ॅडवान्सड अ‍ॅनालीसीस समजावतायेत नाही , याची येवढी मोठी शिक्षा ?? छ्या:
असा विचार डोक्यात चाललेला असतो , मी असा वैतागलेला पाहुन रीमा का हसते देव जाणे अन ती अशी हसली की हे सगळे विचार झटकन मनातुन बाजुला होतात .)
रीमा सहाय . ४-५ महीन्यांपुर्वी जोइन झालेली .कंप्लीट कॉर्पोरेट प्रॉडक्ट . बी.ई. एम.बी.ए मार्केटींग ... ज्यॅक ऑफ ऑल ...ती अस्खलील इंग्रजीत, त त प प न करता , जराही न घाबरता, सीनीयर लोकांपुढे प्रेझेन्टेशन द्यायला लागली की न्युनगंड की काय तो येतो थोडासा .

"प्रसाद सर ,व्हॉटस द प्लॅन नेक्स्ट ? " रीमाच्या प्रश्नाने मी विचार शृंखलेतउन बाहेर पडलो . ' जन्मापासुन मुम्बैत राहीली असल्याने अस्खलीत मराठी येत असताना ही मुलगी माझ्याशी बर्‍याचदा इंग्रजीत का बोलते हाही मला न सुटलेला एक प्रश्न आहे . माझी इंग्रजीची परिक्षा घेत असते की काय देव जाणे !
" प्रसाद सर ??? "
" हो हो , हां बोल . आणि मला नुसत प्रसाद म्हण सर नको "
" लोकल वुड बी क्राउडेड , अन्ड ह्यु़ज ट्रेफीक ओन हाय वे ... व्हॉट्स द प्लॅन ? एक तास बोअर होणार Sad "
" माझ्या कडे प्लॅन नाही , व्हॉट एव्हर यु से ."
"मरीन ड्राइव ?? "

नॅचरल्स मधुन आईसक्रीम घेवुन जेव्हा नरीमन पॉईंटच्या दिशेने चालायला लागलो, ..... आभाळ ढगाळुन आले होते , पाउस आत्ता पडेल की नंतर अशी अवस्था होती , शेजारची ती गगनचुंबी होटेल बघुन माझं मलाच हसु आलं . अन मी पुन्हा १० वर्षां मागे जावुन पोहोचलो ....
" असंच ...इथेच कुठेतरी ....५०-१०० व्या मजल्यावर माझे घर असेल " मी आपलं सहज निरागस पणे बोलुन गेलो होतो अन निशा १५- २० मिनीट मनसोक्त हसली होती माझ्यावर !
" वेडा रे वेडा ... कसली अशक्य स्वप्न बघतोस रे ... " निशा हसत हसत म्हणाली होती ... आम्ही हातात हात घेवुन , नरीमन पॉईंट वर जाउन बसलो होतो ...
" निशा , स्वप्न बघताना मोठ्ठीच बघावीत , नाही पुर्ण झालीतर काही खास दु:ख होत नाही , छोट्याश्या घरात , बायको मुलांबरोबर साधी भाजी भाकरी मिळाली तरी चालेल असं छोट्ट्स स्वप्न बघीतल अन पुर्ण नाही झाल तर मी मोडुन जाईन "
निशा अचानक स्तब्ध होवुन माझ्या जवळ सरकली माझ्या डोळ्यात डोळे घालुन म्हणाली - " असा अचानक सीरीयस कारे होतोस तू ? मी तुला कधी ही सोडुन नाही जाणार , छोट्टीशी पण जमतील अशी स्वप्न बघु , एकत्र जमुन पुर्ण करु ! "
" आता फिलॉसोफीकल बोलायला सुरुवात केलीच आहे म्हणुन बोलतो - निशा , हे सगळं आयुष्य या पावसासारखं आहे अगदी अनिश्चीत . येवढी स्वप्नं बघतो आपण पण सगळ अनिश्चीत , पुर्ण होईल न होईल देव जाणे , त्या तीथे दुर अमेरीकेत जायच हे स्वप्न घेउन शिकत होतो , गणीताची SPM schlorship ही मिळवली होती , प्रिन्स्टन मधे अ‍ॅडमिशन ही मिळाली होती पण ..... ...."

"अरे कदाचित आपल्याला भेटवायच होतं देवाला ! "

मी खिन्नसा हसलो " हे सगळं या पावसा सारख आहे अगदी अनिश्चित ... बघ ना आत्ता इतकी ढगांची दाटी झालीये पण पाउस पडेल की नाही अनिश्चीत ...आज आपण प्रेमाच्या इतक्या आणा भाका घेतोय पण ..." निशा एकदम दचकली माझ्या डोळ्यात डोळे घालुन बघायला लागली ...." हो निशा , काय सांगता , तु सीनीयर आहेस तुला कदाचित एखादी खूप छान संधी मिळेल अन तु पुढे निघुन जाशील ... मला सोडुन .... अगदी जसे हे ढग निघुन जातील पाउस न पाडता "

मी येवढं का बोलुन गेलो देव जाणे . निशाचे डोळे पाणावले होते ... मी तिला नकळत दुखाउन गेलो होतो कदाचित .....मी तिच्या नजरेतुन नजर काढुन घेतली ....मला स्वतःचाच राग यायला लागला ....
तितक्यात अचानकपणे एक पावसाची सर आली मी चमकुन निशा कडे पाहीले .....तिने निमिषार्धात मला घट्ट मिठी मारली.... रडवेल्या सुरात म्हणाली " प्रसाद , मी तुला कधी ही सोडुन जाणार नाही ...कधीही नाही " .....अन माझ्या ओठात ओठ गुंतवले .........

पाउस अगधी संथपणे पडत होता .... आणि मी चिंब भिजुन गेलो होतो .....

" प्रसाद सर " रीमाच्या हाकेने मला परत भुतकाळातुन बाहेर काढले . मी तिचा कडे पाहिले . अन पटकन नजर काढुन घेतली , माझे पाणावलेले रीमाच्या पटकन लक्षात आले असते ... व मला परत त्या सगळ्या जुन्या वेदनांची मैफील मांडायला लागली असती .....

" ओके ओके ...प्रसाद , इट्स रेनींग !! वॉव !!! "
" रीमा , लेट्स फाईड सम शेल्टर , माझा ब्लेझर खराब होतोय "
" सर ....??? प्रसाद , ???

.
.
मी ब्लेझर काढुन डाव्या खांद्यावर टाकला, पुन्हा एकदा चिंब भिजुन ....निमुटपणाने...... नरीमन पॉईटच्या दिशेने चालायला लागलो , अचानक माझ्या लक्षात आले ....

रीमाने माझा हात हातात घेतला होता !!

( क्रमशः)

८ जुन २०१० मंगळवार

गुलमोहर: 

अकु, आडनांव गडबोले हाय त्येंच. निस्ता हात धरलाय तर जल्ला रात्री ताप भरला आसल गडबोल्याला.. Proud Wink

निम्बे , खरं सांगु का , मला ललित या शब्दाचा अर्थ नीटसा माहीत नाहीये .

कथा आहे की सत्य आहे ???? >>>> मिक्श्चर आहे .......

हे खरंच घडलं आहे का रे गडबोले??? तसं असेल तर तुझ्याबद्दल कुतुहल निर्माण करण्यात यशस्वी होतोयस तू

अकु, आडनांव गडबोले हाय त्येंच. निस्ता हात धरलाय तर जल्ला रात्री ताप भरला आसल गडबोल्याला >>>

पर्‍या , डायरीचे पहीले पान वाच ,

अरे मी तिचा बॉस आहे , ती १० वर्ष लहान आहे माझ्या पेक्षा !!

.
.
मधल्या १० वर्षांची डायरी लिहायला घेतली तर महेश भट मला पुढच्या पिक्चरचे कथानक लिहायला बोलावेल !!

" ज्युली की जिस्म का मर्डर "

Proud

.

ज्युली की जिस्म का मर्डर>>>>> आरे बाप रे, म्हणजे डायरीत पुढे ज्युली, जिस्म आणि मर्डर आहे तर! फिदीफिदी >>>

अगं मी ते गेल्या १० वर्षांतील डायरी बाबत लिहिलं होत !!

हे सगळं आयुष्य या पावसासारखं आहे अगदी अनिश्चीत . येवढी स्वप्नं बघतो आपण पण सगळ अनिश्चीत >>>>>>> बरोबर लिहीलयंस प्रसाद ....... डायरीचं पुढचं पानं लिहा लवकर ..... Happy

१० वर्षाने लहान आहे... १० वर्षाची नाहिये>>>येकझ्यॅक्ट्ली पर्‍या !! Happy

पण हे नातं शब्दात पकडायला अवघड जातय ! Sad

आणि एक ट्विस्ट आहे ( सहह गेस्स ही करशील तु !!) तो कसा मांडायचा प्रॉब्लेमच आहे .

प्र.गो. चांगलं चाल्लय..? निशाला कशी खपवणार ते सांग बघू लवकर! Wink

पर्‍या, अरे त्याने सत्य आणि कल्पिताच मिक्स्चर म्हटलयं, जरा १० वर्षांचे बंपर जपून.. प्र.गो. च्या सत्याची गुगली जायची! Proud

माझी ऑफीसची डायरी - १ - ५ जुन २०१० शनिवार http://www.maayboli.com/node/16803
माझी ऑफीसची डायरी - २ - ७ जुन २०१० सोमवार http://www.maayboli.com/node/16841
माझी ऑफीसची डायरी - ३ - ८ जुन २०१० मंगळवार http://www.maayboli.com/node/16868
माझी ऑफीसची डायरी - ४ - ११ जुन २०१० शुक्रवार http://www.maayboli.com/node/16974
माझी ऑफीसची डायरी - ५ - १२ जुन २०१० शनिवार http://www.maayboli.com/node/17010
माझी ऑफीसची डायरी - ६ - १३ जुन २०१० रविवार http://www.maayboli.com/node/17041
माझी ऑफीसची डायरी - ७ ( अंतिम )१३ जुन २०१० रविवार http://www.maayboli.com/node/17076