माझी ऑफीसची डायरी - ७ ( अंतिम )

Submitted by भूत on 17 June, 2010 - 08:00

माझी ऑफीसची डायरी - १ - ५ जुन २०१० शनिवार http://www.maayboli.com/node/16803
माझी ऑफीसची डायरी - २ - ७ जुन २०१० सोमवार http://www.maayboli.com/node/16841
माझी ऑफीसची डायरी - ३ - ८ जुन २०१० मंगळवार http://www.maayboli.com/node/16868
माझी ऑफीसची डायरी - ४ - ११ जुन २०१० शुक्रवार http://www.maayboli.com/node/16974
माझी ऑफीसची डायरी - ५ - १२ जुन २०१० शनिवार http://www.maayboli.com/node/17010
माझी ऑफीसची डायरी - ६ - १३ जुन २०१० रविवार http://www.maayboli.com/node/17041

मी शांत पणे उठुन बाहेर गेलो चिंटुला कडेवर घेतले , अन आत यायला लागलो ...सीसीडीच्या त्या काचेच्या दरवाज्या मागुन माझे लक्ष आमच्या टेबल वर गेले
" रीमा , निशा , सई .... "
" रीमा डोळे पुसत होती , निशा बोलत होती , अन सई .... सई गोखले ...जी एम ... १० वर्षांपुर्वीची माझी प्रेयसी ... आताची माझी बॉस ....ते सारं शांतपणे ऐकत होती !!!

मी चिंटुला घेवुन आत टेबलपाशी आलो , सईने माझ्या कडे वळुन पाहिले , रीमा निशा दोघींचेही डोळे पाणावले होते ... सई उठुन उभी राहीली अन अचानक तिने मला घट्ट मिठी मारली ..... " ओह्ह प्रसाद , आय ऑलवेज लव्ह यु ...ऑलवेज ...तु कसा ही असलास तरी माझं तुझ्यावर प्रेम आहे ...निरपेक्ष ...निर्व्याज्य ...अगदी तु म्हणतोस तसच ....आनंद ....केवळ आनंद !!"

रीमा ,निशा , 'येवढं सगळं कळुनही ही कशी काय प्रेम करते याच्यावर' ह्या विचारत गुंगुन गेल्या होत्या ... हेच का ते खरं प्रेम ...प्रसाद म्हणतो ते .... आनंद... केवळ आनंद... हाच का तो ? निशाच्या चेहर्‍यावर अनेक प्रश्नांची दाटी झाली होती .....रीमा तर जणु पुर्ण हरवुनच गेली होती कदाचित काल मी जे काही सांगितलं ते प्रेम हेच की काय याचा विचार करत होती .

त्या सार्‍या शांततेचा भंग करुन मी म्हणालो ...
" रीमा , निशा , ओळख करुन देतो ... ही माझी "ही" ................. Mrs. प्रसाद !!!

*****************************************************************************************************************

२३:५५
डायरी लिहुन झाली तेव्हा बराच उशीर झाला होता , ही अन चिंटु प्रवासाने थकल्याने कधीच झोपले होते ...

मी बाहेर ग्यॅलरीत आलो...पाउस नुकताच थांबला होता ...मंद वारा वाहत होता ... नेहमी प्रमाणे एक मार्लबोरो शिलगावली अन माझ्या आय पॉड वरची जुनी क्लासिकल मराठी अगदी मंद आवाजात लावुन ऐकत शांत उभा होतो ........

" सांगा मुकुंद कुणी हा पाहिला ?
सांगा मुकुंद कुणी हा पाहिला ?
.
.
रासक्रिडा करी सावनमाळी हो...
रासक्रिडा करी सावनमाळी हो.SSSSSSSS
.
सखे होतो आम्ही विषय विकारी ...होतो आम्ही विषय विकारी .
टाकुन गेला तो गिरिधारी ...टाकुन गेला तो गिरीधारी
.
.
कुठे गुंतुन बाई हा राहिला
सांगा मुकुंद कुणी हा पाहिला ?

संपुर्ण .

(डिस्क्लेमर :
१ ) ह्या लेखातील सर्व विचार लेखकाचे वैयक्तिक अनुभव नसुन केवळ कल्पनाविलास आहे .
२) ऑफीस मधील अनुभवांवर आधी एक लेख वाचला होता , त्याचा याच्याशी कण मात्र संबन्ध नाही ( तो ऑफीसमधल्या कामाला वैतागलेल्या एका कामचुकाराचा लेख होता , ही ऑफीस मधील वर्कोहोलीक मानसाची डायरी आहे .
३) कोणाला यालेखातील काही वर्णनांचे त्याच्या ऑफीसशी सार्धम्य वाटले तर तो एक निवाळ योगायोग असुन लेखातील वर्णनाच्या सार्वजनीनतेचा पुरावा असे म्हणता येइल !)

******************************************!!इतिश्रीकृष्णार्पणमस्तु !! ******************************************

गुलमोहर: 

.

अरे मोरा, किती लान्डोरी फिरवल्यास.....!

प्रसाद, मस्त रे......छान आहे डायरी........! ह्याची एक विस्तारीत कथा पण होउ शकते, कारण गर्भितार्थ महत्वाचा आहे......!

जाजु,

रुक्मिणी माझी सौन्दर्याची प्रकटे जणू प्रतीमा,
किन्चित हट्टि तरिही लोभस असे सत्यभामा,
तरीही वरीतो सहस्त्रसोळा, कन्या मी अमला
पराधिन ना समर्थ घेण्या वार कलन्काचा.....

"भोगी म्हणुनी उपहासा मी योगी कर्माचा.........!

प्रगो काहिसे असे आहे...............लगे रहो प्रगो............मस्तच.....

सईचे कॅरॅक्टर आवडले...........एक्दम मनस्वी...........!

भ्रमा.. मला ना एक कळत नाही. जर कृष्ण एवढा प्रभावशाली होता तर आपण त्या १६००० ल्या एकीशी लग्न करून इतरांना का नाही प्रवृत्त केलं? १६००० स्त्रियांच्या केवळ कुंकवाचा धनी झाला पण इतर गरजांचे काय? अशी नाती स्विकारू नयेत, ज्यांना पूर्णपणे न्याय देता येणार नाही.

मला कृष्णही रूचत नाही नि रामही..!

प्रगो विषयांतराबद्दल क्षमस्व!

जाजु,

हा विषय पण चान्गला आहे..... एक धागा सूरु कर ना यावर.... चान्गली चर्चा रन्गेल......!

प्रगो, तुझ्या डायरीतुन काय काय बाहेर पडतेय रे...... "सई"च्.....आय मिन सहिच.....!

सई ची सुद्धा अशीच ४ प्रेम प्रकरणे असतील आणि प्रसाद ला ती माहित असुनही फरक पडत नसेल , ( नाही फरक सोडाच पण सई ला त्याने अशा इतर प्रेमप्रकरणात उत्तेजन दिले पाहिजे नाही का. तरच ती प्रेमाचा सागर बनु शकेल. ) तरच त्याचे तत्त्वज्ञान तो मनापासुन जगतोय असे म्हणता येईल. Happy

प्रसाद, मला अर्धवट संपल्यासारखी वाटली डायरी...... ठीक आहे, एवढ्या सगळ्या स्त्रिया आहेत त्याच्या आयुष्यात पण मानाचे स्थान, पट्टराणी, धरमपत्नी, समाजमान्यता असलेलं नातं या सगळ्या बिरुदांना मिरवणारी ती 'सौ.प्रसाद' फारच मौन बाळगून आहे असं नाही का वाटत?
आणि शेवटी CCD मधला प्रसंग सर्वच स्त्रियांनी फारच मवाळपणे घेतला असं आपलं माझ्यासारख्या जहाल मतवादी स्त्री ला वाटलं बरं का!

मृदुला, मझ्याही डोक्यात हाच विचार आला. जाईजुई ला ही अनुमोदन..
btw प्रसाद , माझ्या एका मित्राचं पण हेच तत्वज्ञान आहे, त्यामुळे व्यक्तीरेखा पटली तुमची Happy
हा लेख वाचताना अतुल कुलकर्णींचा, लोकसत्तामधला, गेल्या शनीवारचा लेख आठवला. काहीसा अशाच विषयावर आहे..

http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=771...

मृदुला , ४ प्रेम प्रकरणे कशी ३ च !! रीमा , निशा अन सई (सौ.प्रसाद) !!!

राधेला नि रुक्मिणीला हा अर्थ कळला असेल की समजावून घ्यायला लागला असेल >>> माझ्या मते कळला असेल !

मला कृष्णही रूचत नाही नि रामही.. >>>> हे जबरदस्त आहे जाजु !! Proud
माझ्या माहीती नुसार संपुर्ण आर्य तत्वज्ञानात कोठेही " सन्यास" अथवा एकपत्नि/पति व्रत असा उल्लेख नाहीये ! एकपत्निव्रताचा पहिला उल्लेख रामायणात येतो अन तो अत्त्युच्च कोटीचा आदर्श म्हणुन !
सन्यास हा शब्द गीतेत येतो ...तोही कर्माचा त्याग याअर्थाने नव्हे तर कर्मफलाचा त्याग या अर्थाने !!

सई मौन बाळगून आहे असं नाही का वाटत? >>> अगं ज्या एका " आनंदा" मुळे ते एक आहेत तो सईने परत कशाला सांगयला पाहिजे ? शिवाय प्रसादने सांगुनही रीमा निशाला तो कळला नाहीयेच !!!

शेवटी CCD मधला प्रसंग सर्वच स्त्रियांनी फारच मवाळपणे घेतला असं आपलं माझ्यासारख्या जहाल मतवादी स्त्री ला वाटलं बरं का! >>>

येक्झ्यॅक्टली !! कथेचा नायक वारंवार जे सांगतोय " की प्रेम म्हणजे पेटंट नव्हे " हे मान्य नसल्याने असे होत असावे Proud

बाकी नायकाला जे बोलायचं होतं ते शेवटच्या गाण्यात आले आहेच
" सांगा मुकुंद कुणी हा पाहिला ?
सांगा मुकुंद कुणी हा पाहिला ?
रासक्रिडा करी सावनमाळी हो...
रासक्रिडा करी सावनमाळी हो.SSSSSSSS.
सखे होतो आम्ही विषय विकारी ...होतो आम्ही विषय विकारी .
टाकुन गेला तो गिरिधारी ...टाकुन गेला तो गिरीधारी.
कुठे गुंतुन बाई हा राहिला
सांगा मुकुंद कुणी हा पाहिला ?

जो कोठेच गुंतुन राहिला नाही , तोच प्रेमाचा सागर होवु शकतो ! मग त्याला १ प्रेमप्रकरण काय किंव्वा ४ काय सारेच सेम आहे .!!!

इथे अजुन एक गाणे आठवते

" मागे उभा मंगेश , पुढे उभा मंगेश ...माझ्या कडे देव माझा पाहतो आहे रे "
" ------ जन्म जन्माचा हा ...योगी संसारी आंनंद भोगी ... विरागी की म्हणु भोगी शैलसुता संगे गंगा मस्तकी वाहे "

जो कशातही गुंतुन पडला नाही तोच खरा धन्य !!

असो . खालील पॅरा कडे दुर्लक्ष करु नये ही विशेष विनंती .
(डिस्क्लेमर :
१ ) ह्या लेखातील सर्व विचार लेखकाचे वैयक्तिक अनुभव नसुन केवळ कल्पनाविलास आहे .
२) ऑफीस मधील अनुभवांवर आधी एक लेख वाचला होता , त्याचा याच्याशी कण मात्र संबन्ध नाही ( तो ऑफीसमधल्या कामाला वैतागलेल्या एका कामचुकाराचा लेख होता , ही ऑफीस मधील वर्कोहोलीक मानसाची डायरी आहे .
३) कोणाला यालेखातील काही वर्णनांचे त्याच्या ऑफीसशी सार्धम्य वाटले तर तो एक निवाळ योगायोग असुन लेखातील वर्णनाच्या सार्वजनीनतेचा पुरावा असे म्हणता येइल !)

<<मृदुला , ४ प्रेम प्रकरणे कशी ३ च !! रीमा , निशा अन सई (सौ.प्रसाद) !!!>>
त्या हीरो ची नाही हो. हीरविणीची ( सई (सौ.प्रसाद) ) ४ प्रकरणे म्हणते आहे मी Happy
ती पण टाका. म्हण्जे फीटंफाट होईल ना. आणि हीरो हिप्पोक्रॅट का काय म्हणतात ना तसा वाटणार नाही. स्वतः प्रेमाचा सागर बनतोय तर बायकोला पण बनु देत की.

कथेचा नायक वारंवार जे सांगतोय " की प्रेम म्हणजे पेटंट नव्हे " हे मान्य नसल्याने असे होत असावे>>>>>> हा सरळ सरळ स्वैराचार झाला मग...... आवडली व्यक्ती, पड प्रेमात, घे आनंद, रहा नामानिराळा..... परत पुढे जा, पुढच्या वळणावर उभी आहेच परत कुणीतरी...... आणि यात प्रेम म्हणजे नक्की काय काय include केलं आहे??? आणि नितिमत्तेला कुठल्या वळणावर खड्ड्यात ढकलून दिलंय मग???

तुम्ही ' की प्रेम म्हणजे पेटंट नव्हे'' हे जे सारखे ठासुन सांगताय ते हीरवणीला पण लागु होते ना !!! मग एव्हढ्या महान हीरोने स्वतःची विचारसरणी तिला आंदण द्यायला नको का ?
तिचे पण २-४ प्रियकर नकोत का ? ते पण टाका ना कथेत , मग मजा येईल वाचायला Happy
हे अत्ता फक्त त्याची प्रकरणे वाचुन बोर झालेय . पुरुषांची अशी विवाह्बाह्य प्रकरणे अनादी अनंत काळापासुन अनेक लेखकांनी रंगवलीत हो , जरा चेंज आणा काहीतरी.

<<कथेचा नायक वारंवार जे सांगतोय " की प्रेम म्हणजे पेटंट नव्हे " हे मान्य नसल्याने असे होत असावे >>
नाही हो , हे अगदी पटलेय बघा. पण नायिका कशाला सती सावित्री दाखवलेय. तिच्या प्रेमाला काहो पेटंट मधे बांधलेय. तिच्या प्रेमाला ही मुक्त संचार करु द्या ना. नाहीतर तुम्हालाच तुमचाच मुद्दा पटला नाहीये असे वाटतेय.

हा सरळ सरळ स्वैराचार झाला मग...... आवडली व्यक्ती, पड प्रेमात, घे आनंद, रहा नामानिराळा..... परत पुढे जा, पुढच्या वळणावर उभी आहेच परत कुणीतरी...... आणि यात प्रेम म्हणजे नक्की काय काय include केलं आहे??? आणि नितिमत्तेला कुठल्या वळणावर खड्ड्यात ढकलून दिलंय मग???

>>> हाच जर सार्‍या समाजाचा अ‍ॅटीट्युड असेल तर कृष्णाला देव कसे काय मानतात?आश्चर्यच आहे बुवा!!
{ अन लग्नात मुलीला बाळक्रुष्ण कसा काय देतात ?... मुलगा म्हणुन कृष्ण हवा , पति म्हणुन राम असे काही आहे काय ? मग हिप्पोक्रॅट कोण ?}

असो . मी फक्त एक दुसरा गिरीधारी - श्रीकृष्ण उभारायचा प्रयत्न केलाय ... पटला तर घ्या ....तोच जर हैद्राबादचा निजाम वाटला तर.......... टाकुन द्या ....

मी स्वतः हा लेख " टाकुन "गेलोय हे तुम्हाला कळाले असेलच खालील वाक्यावरुन
******************************************!!इतिश्रीकृष्णार्पणमस्तु !! ******************************************

अहो प्रसाद,
अजुन तुम्ही माझ्या मनातील शन्का दुर नाही केलीत. नायिकेची अशी प्रेमप्रकरणे पचविण्याची ताकद तुमच्या नायकात आहे का ? आणि तुमचे ते पेटंट्चे तत्वज्ञान नायिकेलाही लागु आहे का नाही सांगा की राव!!!! का हे सर्व तत्त्वज्ञान केवळ पुरुषांसाठीच आहे ? तसे असेल तर तेही स्पष्ट लिहा ना तिथे. घाबरु नका Proud प्रत्येकाला आपले व्यक्तिगत मत मोकळेपणाने मांडण्याची परवानगी आहे इथे. मग ते काहीही असो. Proud

अहो प्रसाद,
अजुन तुम्ही माझ्या मनातील शन्का दुर नाही केलीत. नायिकेची अशी प्रेमप्रकरणे पचविण्याची ताकद तुमच्या नायकात आहे का ? आणि तुमचे ते पेटंट्चे तत्वज्ञान नायिकेलाही लागु आहे का नाही सांगा की राव!!

>>> मृदुला , नकीच आहे !नकीच लागु आहे !!
ही कथा नायिकेला मेन क्यॅरॅक्टर घेवुनही तितकीच छान लिहिता येइल !
फक्त ......स्त्रीया सहसा नात्यांच्या घोळात भावनिकली गुंतुन पडतात , त्यांना असे सहज टाकुन जाता येत नाही असे काहीसे मला वाटते म्हणुन नायकाला मध्यवर्ती ठेवुन लिहिली आहे !!

जसा श्रीकृष्णाला आपण पुराणपुरुषोत्तम मानतो तसेच द्रौपदीलाही ५ पतिव्रतात स्थान आहे !!

( आता ह्यावर वाद नको -- की द्रौपदीला फोर्स केलं ५ जणांशी लग्न करायला वगैरे वगैरे :फिदी:)

बाकी >>>>का हे सर्व तत्त्वज्ञान केवळ पुरुषांसाठीच आहे ? तसे असेल तर तेही स्पष्ट लिहा ना तिथे. घाबरु नका फिदीफिदी प्रत्येकाला आपले व्यक्तिगत मत मोकळेपणाने मांडण्याची परवानगी आहे इथे. मग ते काहीही असो. फिदीफिदी >>>> ह्याचा रोख कळाला नाही . Uhoh

हाच जर सार्‍या समाजाचा अ‍ॅटीट्युड असेल तर कृष्णाला देव कसे काय मानतात?आश्चर्यच आहे बुवा!!>>>>> कृष्णाने फक्त आनंद/मजा घेण्यासाठी अशी प्रेमप्रकरणं केली असं म्हणताय की राव तुम्ही! तुम्ही कृष्णाशी साधर्म्य शोधताय तर मग शेवटी सगळ्या यादव कुळाचा त्याच्या डोळ्यादेखत नाश होतो हे ही विसरू नका... आणि कृष्ण हे कॅरॅक्टर फक्त एवढ्याच कारणासाठी लक्षात ठेऊ नका.

तुम्ही कृष्णाशी साधर्म्य शोधताय तर मग शेवटी सगळ्या यादव कुळाचा त्याच्या डोळ्यादेखत नाश होतो हे ही विसरू नका... आणि कृष्ण हे कॅरॅक्टर फक्त एवढ्याच कारणासाठी लक्षात ठेऊ नका. >>>

हे ही मान्यच आहे ! गीतेत कृष्णाने क्लीयर केलेच होते " कालोSहं लोकक्षय प्रवृत्तो " ...लोकांच्या नाशाला प्रवृत्त झालेला मी "काळ" आहे !!!

कृष्ण हे कॅरॅक्टर मला सर्व प्रकारे मान्य आणि प्रिय आहे !!

प्रश्न स्त्रिया प्रकरणे करतात की नाही हा नसुन अशी प्रकरणे चालु आहेत हे माहित असुनही त्या स्रीचा स्वीकार पुरुष पत्नी म्हणुन बिनातक्रार करेल का हा आहे. शिवाय लग्नानंतरही ती तिच्या इतर प्रियकरांबरोबर फिरतेय,संबंध ठेवुन आहे हे पण नवरा आनंदाने स्वीकारेल काय . आणि दोघांचीही अशीच प्रेमप्रकरणे चालु राहिली तर त्यांचा संसार सुखाचा होईल काय.
नैतिकतेचे अवडंबर इथे कोणी करत नाहीये. पण ज्याला अशा प्रकारे एका बंधनात बांधुन घ्यायचेच नाहीये त्याने ते बंधन स्वीकारावे कशाला ? मुक्तपणे मनसोक्त हवे तसे आयुष्य जगावे की. लग्नाचे बंधन कशासाठी ? तर कायदेशीर पोरे जन्माला घालण्यासाठी आणि इतर सगळ्या (प्रेमाच्या) जेव्हा लाथाडुन जातील तेव्हा हक्काची एक तरी असावी म्हणुन काय.

श्रद्धा आर्टिकल करता धन्यवाद!

प्रसाद, 'प्रेम म्हणजे आनंद' ही कल्पना जरी चांगली असली तरी, कथेच्या नायकाद्वारे ती तितकी सशक्त उतरत नाही - म्हणून स्री लंपटपणाचा आरोप वर आलेला आहे (असं मला वाटतं).

मला वाटलेले कच्चे दुवे:
१. सईला त्याच्या प्रेमाची व्याख्या कळली म्हणजे काय झालं नक्की?
कुठल्या प्रसंगातून, नायकाच्या कुठल्या वागण्यातून ती कळली?
२. निशा आणि रीमा ह्यांच्याबरोबर फिरण्याशिवाय त्यानं त्या नात्यांना काय दिलं?
३. नायक जर प्रांजळ दाखवायचा आहे, तर तो जेव्हा निशाबरोबर फिरायला जाण्याआधीच सईबरोबर गेलेला, तर ते त्यानं निशाला तेव्हाच का नाही सांगितलं?
-- अर्थात खर्‍या आयुष्यात माणसं वीक असतात - हे स्वतःशी अ‍ॅक्सेप्ट करण्याचं धाडसही नसतं.. धाडस असेल पण माणूस सांगत नसेल तर नालायकपणा असतो. तुम्हाला जो नायक उभा करायचाय त्याला हे पटलेलं आहे - त्याचा तो आयुष्यभर जाहीर पणे पुरस्कारही करतो - मग त्यानं निशाला तेव्हाच सांगायला काय हरकत होती?
४. नायक एकीकडे 'लग्न म्हणजे गॅरंटी समजू नये, अशा अर्थाचं बोलतो' तर दुसरीकडे तो म्हणतो की 'निशानंतर महिन्याभरानं सईचं लग्न झालं - पण तिला प्रेमाचा खरा अर्थ कळलेला - त्यामुळे ती लग्नातही खूष होती' - त्याच्या सोबतीची लाईफ टाईम गॅरंटी असल्यानं ती खूष नसेल कशावरून?
५. समजा निशा निघून गेली नसती, तर त्यानं कुणाशी लग्न केलं केलं असतं?
मुळात ही व्याख्या ज्याला कळली आहे, त्याला लग्नाची गरज आहेच का? असेल तर त्यामागची मनोभूमिका कुठली.
६. जेव्हा 'प्रेम म्हणजे आनंद' ही संकल्पना असते आणि निष्काम कर्मयोगी कृष्णाचा दाखला आपण देतो तेव्हा, तेव्हा निशा गेली म्हणून दु:ख तरी का व्हावं?
तिच्या आठवणींनी डोळ्यात पाणी नको यायला - ओठांवर हसूच आलं पाहिजे!
७. मुळात प्रेम म्हणजे काय? भेटून होणारा आनंद हा एक भाग, पण मग त्याबरोबर गरजेच्या वेळी मदत करणं, दुसर्‍याची मनोभूमिका समजून घेऊन कधी अ‍ॅक्सेप्ट करत, कधी टीका करत - एकमेकांना माणूस म्हणून grow व्हायला मदत करणं - ह्या गोष्टीही यायला पाहिजेत ना त्यात? बंधन म्हणून नाही - सहजतेनं! नात्याबरोबर आपणही समृद्ध व्हायला पाहिजे - तरच त्या प्रेमाला आणि 'स्त्री लंपट पणाला' वेगवेगळ्या तराजूत तोलता येईल..

ह्या डायरीत जर ह्या ७ मुद्द्यांना कुठे ना कुठे तरी बसवता आलं - तर कथा वेगळ्या स्तरावर जाईल (असं मला वाटतं)

कृष्ण हे कॅरॅक्टर मला सर्व प्रकारे मान्य आणि प्रिय आहे !!>>>>> पहिल्यांदा तुझ्याशी सहमत झालीये रे प्रसादा Happy

जाजु ला कृष्ण का बरं रुचत नसावा??? Uhoh

हो, आणि वर मृदुलानं म्हटल्याप्रमाणे नायिकेच्या अशाच परिस्थितल्या वागण्यावरची नायकाची मतं लेखकाच्या प्रतिसादात न येता जर कथेत आली तर जास्त चांगलं..

(लेखकाचे कृपया कसलेही गैरसमज नसावेत! कथेमागच्या त्यांच्या संकल्पनेला, त्यांच्या कथेला वा प्रत्यक्षात त्यांना कसलाही विरोध नाही. कथा वाचून जे वाटलं ते लिहिलय!)

गडबोल्या तुझी कथा/ डायरी वाचले तेव्हाच बरीच राळ उडणार हे वाटलच होतं. मुर्ख कल्पनाविलास करुन परत त्याचं योग्य स्थल-काल सापेक्ष समर्थन तसेच संबंधातली अपरिहार्यता , सहजता ( अगदी कथा म्हणुन मान्य केल तरी ) तु कुठेही दिल्याच, अधोरेखीत केल्याचं दिसत नाही. दिसली बरी मुलगी की पड प्रेमात अस चाललय नायकाचं. याला काय म्हणायच ? नुस्ते गितेतले आणी इतर श्लोक देउन काही साध्य होत नाही. मृदुला, मंजीरी, जाजु ला पडलेले प्रश्न मलाही वाचताक्षणी पडले होते. लिहिल नाही इतकच. तुला तर सगळ्यांचच सगळ पटतय . असं कुंपणावर किती दिवस बसुन राहाणार सरड्यासारखा ?

असो..

ह्य विशयावरुन कुठल्याही चर्चेतुन काहिही निश्पन्न होउ शकत नाही. हे अनादीकालापासुन चालत आलय. ईगो, स्वामित्वभावना आणी निसर्गसुलभ आकर्षण यांची ही गुंतागुंत अंतापर्यंत अशीच चालत रहाणार. उगाच तात्विक, मुलभुत, मुल्याधिष्ठीत चर्चेचा आव आणुन वैचारीक प्रगल्भतेची शेखी मिरवत फिरण्यात काय अर्थ आहे. वेळ आली की बहुतांश लोक फक्त नर आणी मादी असल्यासरखेच वागताना दिसुन येतात.

परेश , कृष्णाचा एक पैलु मांडायचा जसा मला समजला तसा मांदायचा प्रयत्न केला , बाकी काही खास नाही .

एकी कडे कृष्णाला देव म्हणायचं , अन दुसरी कडे त्याच्या आयुष्यातं तत्वज्ञानत कोणी सर्व्सामान्य माणसाने मांडलं की त्याला व्ह्यभिचार म्हणायचं हे तर कित्येक वर्शे चालत आले आहेच ,
मग सांग हिप्पोक्रसी कोण करतयं ? कुंपणावर कोण बसलंय ? तळ्यात मळ्यात कोण करतय ?

बाकी कृष्णाच्या आयुष्यातील या गोष्टी , राधा , १६००० बायका , महाभारतीय युध्दातील संहार , नंतर यादवांचा संहार ...हे सारं जर मान्य नसेल तर लोक त्याला देव कसे काय मानतात हा मला पडलेला जेन्युईन प्रश्न आहे . मला ह्यावर काही भाष्य करायची इछा नाही , . आणि समाजाच्या कोणत्याही धारणांवर मला टीका करायची नाहीये मला फक्त या गोष्टी कळत नाहीत इतकेच म्हणायचे आहे .

ह्य विशयावरुन कुठल्याही चर्चेतुन काहिही निश्पन्न होउ शकत नाही. हे अनादीकालापासुन चालत आलय. ईगो, स्वामित्वभावना आणी निसर्गसुलभ आकर्षण यांची ही गुंतागुंत अंतापर्यंत अशीच चालत रहाणार. उगाच तात्विक, मुलभुत, मुल्याधिष्ठीत चर्चेचा आव आणुन वैचारीक प्रगल्भतेची शेखी मिरवत फिरण्यात काय अर्थ आहे. वेळ आली की बहुतांश लोक फक्त नर आणी मादी असल्यासरखेच वागताना दिसुन येतात.

सहमत . हे असं च आहेच , त्याला कोणी काही करु शकत नाही .

असो , बरेच विषयांतर झाले .

आता आभार प्रदर्शन :
धन्यवाद .
माझा लेखनाचा हा पहिलाच प्रयथ होता ...( आधी लिहायचो इतरत्र पण ते प्रकाशित करायचो नाही , तिथे ही एकवार नजर टाकुन या :रिक्षा: Proud )

नानबा >>ह्या डायरीत जर ह्या ७ मुद्द्यांना कुठे ना कुठे तरी बसवता आलं - तर कथा वेगळ्या स्तरावर जाईल >>> धन्यवाद ! पुढील वेळेस नकीच प्रयन करेन लेखन अजुन सकस करण्याचा .

सर्वा सर्वांचे पुनः एकदा आभार !!

बाकी माझ्या डोक्यात एक ३ भागांची science fiction लिहायचे होते पण ती गणितावर आधारित आहे , अन माझ्या एका संख्या शास्त्रज्ञ मित्राला ऐकवली तर तो म्हणाला ," ही समजायला मला ४-५ तास जालवरुन माहीती गोळा करुन अभ्यास करावा लागेल "
म्हणुन लिहिण्याचे डेरींग होत नाहीये ...
बाकी बघु पुढे लिहावेसे वाटले तर .... जशी देवाची इच्छा !!

******************************************!!इतिश्रीकृष्णार्पणमस्तु !! ******************************************

बाप्रे सई = प्रसादची बायको हा बोध मला झालाच नाही... कोणत्या वक्यावरून कळतंय हे??? Uhoh

मला नाही आवडलं प्रसाद चं कॅरॅक्टर आणि एकूण स्टोरीच Happy (:प्रांजळ मत व्यक्त करणारी बाहुली:)

पहिले ३ भाग मस्त होते. उत्कंठावर्धक. नंतर सगळ फुस्स्स्स् वाटलं. कदाचित नेहेमी गुडी गुडी कथा वाचायचे सरधोपट सवय असेल म्हणूनही असे झाले असेल. नायक असा निघेल अशी त्यामुळे कल्पना केली नव्हती. may be म्हणून कथेने असा अचानक twist घेतल्याने पचली नाही नीट.

माझं appetite वाढवलं पाहिजे Uhoh

मला राम आवडत नाही कारण -
१. पत्नीने सर्व सुख त्यागून त्याच्याबरोबरीने वनवास पत्करला. तेंव्हा वनवासात "मी" तिचे सहज रक्षण करेन असा समज होता का त्याचा? तेंव्हाच वनवासातल्या संभाव्य धोक्यांचा विचार करून तु तुझ्या माहेरी जा किंवा इथेच रहा अस सांगायचं की त्याने. लक्ष्मणाने नाही का सांगितलं?
२. आपली पत्नी राक्षसांकडे कैदेत होती ह्याचा शोध लावून तिला सोडवे पर्यंत त्याला जो वेळ लागला त्या वेळात जर समजा सीतेवर कोणी अतिप्रसंग केला असेल तर त्यात तिचा काय दोष? त्यामुळे ती अपिवित्र झाली हा जावईशोध कसा बरं लागला?
(खरे तर ह्या मानसिकतेतुनच आजही बलात्कारीत स्त्रीला मानहानी सहन करावी लागते)
३. ती जेंव्हा लंकेत होती त्या काळात राम सडाच राहिला का? हा प्रश्ण सीतेने विचारला नव्हता; त्याच्यावर पूर्ण विश्वास दाखवला ना? मग राम का नाही दाखवू शकला? आपले पौरुष सिद्ध करण्यासाठी सीतेला २ - २ वेळा मनस्ताप का बरं दिला त्याने?
४. ही माझी पत्नी आहे नि जशी आहे मला मान्य आहे हे का नाही ठणकावून सांगितले त्याने?
५. स्त्रीच्या दृष्टीने सगळ्यात कठीण काळ म्हणजे तिचे मातृत्व आणि अपत्यजन्म. तेंव्हा राम कुठे होता?
६. लव/कुशाला त्याने कुठचेही प्रश्ण न विचारता किंवा परिक्षा न देता कसे काय मान्य केले? मग सीतेला का बरं वेगळा नियम?

मला कृष्ण रुचत नाही कारण -
१. राधा व इतर गोपींशी असलेलं त्याच नातं मला आकळलेलं नाही.
२. मी स्वतः एका विवाहितेच्या एवढ्या जवळ गेले नसते. त्याच्या रुक्मिणीने केवळ भयंकर आवडतो म्हणून अनंगाबरोबर रासलीला केल्या असत्या तर चालल्या असत्या का?
३. १६००० स्त्रियांचा पति म्हणून स्विकार करणे आवश्यक नाही ना? एखादीशी प्रतिकात्मक विवाह करून इतरांना तो प्रवृत्त करू शकला असताच की ?(प्रभावशाली होता ना तो?) १६००० स्त्रियांचा भाऊ होऊ शकला असताच की!
४. कर्ण कोण हे जर त्याला माहित होते तर सुरूवातीपासूनच त्याने का नाही सांगितले? (कुंतीदेखिल महादोषी ह्या बाबतीत) किंवा त्याचा कुठच्या नात्याने स्विकार का नाही केला?
५. कर्णाने बाजू बदलावी म्हणून द्रौपदीच अमीष दाखवणे किंवा कुंतीच्या मायेचा आसरा घेणं अयोग्य आहे. (माझे मत)
६. द्रौपदीचे वस्त्रहरण होताना जर तो आला आणि त्याने वाचवले, इ. तर मूळात तिला पटावर लावतानाच का नाही आला? की तो पण होप्स वर होता की द्रौपदीच्या बदल्यात पांडवांनी हरलेलं राज्य मिळेल कदाचीत!
७. आदिवासी स्त्री आणि तिच्या पाची मुलांना लक्षागारात जाळताना कुठे होती त्याची योग्य/अयोग्याची समज?

Pages