माझी ऑफीसची डायरी - ३

Submitted by भूत on 10 June, 2010 - 05:14

५ जुन २०१० शनिवार

७ जुन २०१० सोमवार

८ जुन २०१० मंगळवार

आज सकाळी थोडा उशीराच आलो ऑफीसमध्ये . कालच प्रे़झेंटेशन झाल्याने आज काही विशेष काम ही नव्हते .
मेल्बॉक्स चेक केला , सीनीयर मॅनेज्मेंट्चे काही प्रश्न होते कालच्या प्रेझेंटेशन वर ते क्लीअर केले , त्यांच्याशी २-४ कॉन्कॉल झाले . नेहमीच्या रुटीन नुसार रामु ने कॉफी आणुन दिली ....
माझी नजर वारंवार काचेच्या बाहेर जात होती अन त्या क्युबीकलच्या पोकळीला धडकुन परत येत होती , रीमा तशी उशीरा येत नाही कधी मग आज इतका उशीर ?

मी परत कॉम्प्युटर मधे डोकं घातलं ....
मींट पेपर वाचुन झाला, गूगल न्युज पाहुन झाले , मार्केट उपडेट्स झाले , लीमीट ऑर्डर बूक केल्या .....तरी रीमा अजुन दिसत नव्हती ...... माझी नजर न राहुन तिच्या क्युबीकलपाशी जात होती ......, काल ती आपल्या बरोबर हातात हात घेवुन मरीन ड्राईववर भिजत होती .. या आठवणीने माझे मलाच हसु येत होते .

अचानक गूगल वर सर्फींग करता करता लक्षात आलं ' अरे बरेच दिवस जीमेल चेक केला नाही ' . मी प्रॉक्झी तुन जी मेल ओपन केलं, त्यात तब्बल ११७ अनरीड मॅसेजेस ... ते बघुन च मला डीलीट करायचाही कंटाळा आला होता , विंडो क्लोज करणार तितक्यात एक मेल चटकन माझ्या नजरेत आला ..........निशाचा मेल !!

" हे प्रसाद , कसा आहेस ? काही कॉन्टॅक्टच नाही रे गेली कित्येक वर्षे ! DGM झालास असं कळंलं तेही फक्त १० वर्षात !!, अभिनंदन !
मी इकडं US ला आल्यानंतर पुढं काही जमलच नाही बघ , नंतर लगेच विक्रमशी भेट झाली , तो आमच्याच कंपनीत होता मला ३ वर्षे सीनीयर ... ... त्यानंतर भारतात आले तेव्हा आई बाबांनी हट्ट धरला लग्नाचा ..... नाही म्हणताच आलं नाही रे ....तु म्हणशील आज इतक्या दिवसांनी मेल करुन ही माझ्या जुन्या जखमा का जाग्या करत आहे ? पण प्रसाद खर सांगते मला तुला फसवायच नव्हतं रे , बाबांची स्थितीच अशी होती की मला थांबण शक्यच नव्हतं . लग्नानंतर महिन्याने बाबा गेले मग आई ला इकडे घेउन येण , घर संसार बसवणं , मग प्रणव झाला ....या सगळ्यात कुठे हरवुन गेले कळालच नाही बघ .

सोड , तु कसा आहेस ? लग्न केलसं ना रे ? आणि घर घेतलस कारे नरीमन पॉईट वर घेणार होतास ना तु ?
हा हा हा ...

रेप्लाय कर ... मी वाट पहात आहे ...
बाकी परवा आम्ही मायामी बीच वर गेलो होतो त्याचेच फोटो जोडत आहे जरुर बघ प्रणवचे ही फोटो आहेत त्यात !
"

, असाच अ‍ॅबरप्टली संपवला होता मेल , पुढे " तुझीच निशा " असे काही लिहिले नव्हते , अशा प्रसंगी आता डोळ्यात पाणी यायच्या ऐवजी चेहर्‍यावर खिन्न हसु का येते हे मला आजही उमगत नाही .

तिचे बीचवरचे फोटो पहात बसलो होतो , ती , प्रणव , विक्रम आन त्यांनी बनवलेला तो रेतीचा किल्ला .....माझ्याचेहर्‍या वरचे खिन्न हसु जरासे अजुन गडद झाले .... काही जुन्या आठवणी जाग्या झाल्या ....

आम्ही दोघे अक्सा बीच्वर गेलो होतो एकदा ऑफीस ला खोटी सीक लीव्ह टाकुन ! वीक डे असल्याने गर्दी नव्हतीच ......जवळपास तासभर राबुन मी मस्त रेतीचा किल्ला बनवला होता ,

" हा माझा किल्ला समुद्र किनार्‍यावरचा ! मी राजा तु राणी अन आपलं पिल्लु ! बस्स , आता हे एक छोट्ट्स स्वप्न आहे !

मी एका कागदाची छोटीशी होडी केली " हां , ही आपली होडी ! मस्त यात बसुन आपण जाउ फिरायला "

ती हसायला लागली होती " प्रसाद , तु वेडा आहेस "

मी " आणि हो हा आपल्या किल्ल्याचा झेंडा ! " असं म्हणुन मी एक साधा कागदी झेंडा तयार करुन किल्ल्यावर खोचला , " अन याच्या अगदी खाली राजा राणी ची बेडरुम अन तिथे ...." मी आवाजात जमेल तितका चावटपणा आणुन म्हणालो होतो ......

ती जोरात हसायला लागली " प्रसाद तु खरच वेडा आहेस ठार वेडा आहेस !! किती स्वप्नात हरवुन जातोस रे ... हे बघ तुझा किल्ला अन ही तुझी बोट ..." तीने ती कागदाची बोट चुरगाळुन टाकली , माझा किल्ला पाडला .
मला ' हे काय चालु आहे' हे कळायच्या आत ती उठुन पळायला लागली !
मी तिचा पाठलाग करायला लागलो , बर्‍यापैकी दुर गेल्यावर , मी तीला पकडले , तोल जाउन नकळत मी रेतीत पडलो , ती ही पडली माझ्या छातीवर ...

आम्हा दोघांना ही दम लागला होता ...दोघांनाही एकामेकाच्या श्वासाची लय जाणवत होती ... तीचे लांबसडक केस माझ्या चेहर्‍यावर विस्कटले होते .... त्यातुन दिसणारी मावळतीच्या सुर्याची किरणे मला अनामिक गुदगुल्या करत होती .... मी तिच्या नजरेत नजर मिळवुन हरवुन गेलो होतो ..

" वेड्या , किती स्वप्नाळु आहेस रे ... हे सगळं घर... बंगला ...गाडी ...ऐषोआराम नसलं तरी चालेल रे ...मी फक्त तुझीच आहे ..
अन आपल्याला एक व्हायला ती तुझ्या किल्ल्यातली बेडरूमच असली पाहीजे का ??? ......."

अचानक मोबाईल वाजला ..एसेमेस एसेमेस ..मी त्या आठवणीतुन बाहेर पडलो , रीमा चा एसेमेस होता , ' या मुलीने मला भुतकाळातुन बाहेर ओढायची प्रतिज्ञाच केली आहे की काय ' असे मला एक क्षण वाटुन गेले
" Prasad / Sir , I have got cold so i will not be able to come to Office today . Sorry ~ Rima'
.
.
.
.
बरेच झाले म्हणा , त्याआठवणीतुन बाहेर पडलो , कॉफी मशीन मधुन एक कॅपेचीनो घेवुन आलो , काचेचा पडदा बाजुला केला ...टेबल वर बसुन कॉफी प्यायला लागलो .. बाहेर पुन्हा रिमझिम पाउस सुरु झाला होता अन उन पावसाच्या खेळात एक छानसं इन्द्रधनुष्य दिसत होतं..

परत फोन वाजला
" अहो , लक्षात आहे ना , आज तीन वाजता आमची ट्रेन आहे , पाउस पडायला लागला , आता तुम्ही ऑफीस मधुन निघा अन येता येता चिंटुला शाळेतुन घेवुन या ..... ,,,,,,,......." पुढे मी ऐकलं नाही
लॅपटॉप बॅग पॅक केली , गाडीची चावी घेतली , निशाचा मेल क्लोज करतान तो रेतीचा किल्ला बघुन पुन्हा एक खिन्न हसु माझ्या चेहर्‍यावर पसरलं .

मी कॉम्पुटर बंद करुन बाहेर पडलो .

क्रमशः

गुलमोहर: 

.

शेवट ???

पुर्ण विराम ???

असं काही नाहीये , मी क्रमशः लिहायला विसरलो होतो , शिवाय १० जुन २०१० च्या पानावर आजची रीमा बरोबरची बातचीत लिहावी की नको असा विचार करतोय ....

क्रमशः

मस्त Happy

Happy

अस झाल का?

प्रगो, मार्गी लागल म्हणायचं! Happy

अरे निदान प्रसादला चिंटी दाखवायचीस म्हणजे अजून २० वर्षांनंतरची पण डायरी लिहिता आली असती. Wink

अरे निदान प्रसादला चिंटी दाखवायचीस म्हणजे अजून २० वर्षांनंतरची पण डायरी लिहिता आली असती >>>

अगं डायरी लिहितोत .... कथा नाही !!

शिवाय हा काय करन जोहर टाईप पिक्चर आहे की काय ???

प्रगो, KANK मधल्या सारखं पुढे त्या विक्रम आणि रिमा चं तर जमत नाही ना??? Wink म्हणजे मग प्रसाद आणि निशाचा मार्ग मोकळा Proud

प्रगो, KANK मधल्या सारखं पुढे त्या विक्रम आणि रिमा चं तर जमत नाही ना??? डोळा मारा म्हणजे मग प्रसाद आणि निशाचा मार्ग मोकळा फिदीफिदी >>>>

अन मग बायको अन चिंटु च काय ????

१० जुन २०१० च्या पानावर आजची रीमा बरोबरची बातचीत लिहावी की नको असा विचार करतोय ...

विचार करणे ठिक आहे, पण जास्त विचार करणे ठिक नाही.

लवकरपुढचे भाग टाका Please!!!

माझी ऑफीसची डायरी - १ - ५ जुन २०१० शनिवार http://www.maayboli.com/node/16803
माझी ऑफीसची डायरी - २ - ७ जुन २०१० सोमवार http://www.maayboli.com/node/16841
माझी ऑफीसची डायरी - ३ - ८ जुन २०१० मंगळवार http://www.maayboli.com/node/16868
माझी ऑफीसची डायरी - ४ - ११ जुन २०१० शुक्रवार http://www.maayboli.com/node/16974
माझी ऑफीसची डायरी - ५ - १२ जुन २०१० शनिवार http://www.maayboli.com/node/17010
माझी ऑफीसची डायरी - ६ - १३ जुन २०१० रविवार http://www.maayboli.com/node/17041
माझी ऑफीसची डायरी - ७ ( अंतिम )१३ जुन २०१० रविवार http://www.maayboli.com/node/17076