माझी ऑफीसची डायरी - ५

Submitted by भूत on 15 June, 2010 - 02:54

माझी ऑफीसची डायरी - १ - ५ जुन २०१० शनिवार http://www.maayboli.com/node/16803
माझी ऑफीसची डायरी - २ - ७ जुन २०१० सोमवार http://www.maayboli.com/node/16841
माझी ऑफीसची डायरी - ३ - ८ जुन २०१० मंगळवार http://www.maayboli.com/node/16868
माझी ऑफीसची डायरी - ४ - ११ जुन २०१० शुक्रवार http://www.maayboli.com/node/16974

१२ जुन २०१० शनिवार

आज लवकरच ऑफीसमध्ये आलो , काल रात्री जाताना जी शांतता भरुन राहिली होती ते जशीच्या तशीच होती . शनिवार असल्याने काही विशेष काम नव्हतेच ,मी माझा ब्लेझर नेहमीच्या सवयीं नुसार बसायच्या खुर्चीला अडकवला , नेहमी सारखा खिडकीचा पडदा बाजुला केला , समोरचे बोरीवलीच्या जंगलातले हिरवेगार डोंगर कालच्या पावसाने चिंब न्हावुन निघाले होते , निळेशार पवईलेक , ते हिरवेगार डोंगर ,वर निळंशार आकाश ....नजर ठरत नव्हती इतका मस्त नजारा होता, मी माझ्या टेबल वर बसुन मस्त वाफाळलेली कॉफी पित होतो .

" सर "
रीमा ची हाक ऐकु आली , मी मात्र त्या नजार्‍यात पार हरवुन गेलो होतो , तसाच मागे न वळता बोललो
"हां रीमा , बोल , तुझीच वाट पहात होतो , बर पहिल्यांदा सांग तुझी तब्येत तर ठीक आहे ना ? "
" सर ...मी ..."

"रीमा , एक मिनीट , परत एकदा सांगतो , मला माझे सगळे ज्युनियर आणि सिनियर ही प्रसाद म्हणतात , तु ही तसंच म्हणलस तर मला आवडेल ."

" प्रसाद , मी रेझीगनेशन देत आहे ."

" ह्म्म .मला वाटलंच होतं ... काय कारण ? असं अचानक काय झालं ? एनी प्रॉब्लेम्स विथ जॉब ? असलं काही मी विचारणार नाही . फक्त एवढच सांगतो 'मला वाटतं असा तडकाफडकी निर्णय घेण्या आधी आपण बोललं तर बरं होईल ."
" प्रसाद , तु हे बोलतोस त्या अर्थी तुला कारण कळंत असावं.. ... मला असं वाटतं की ..."
मी तिची वाक्य अर्ध्यातच तोडुन बोललो " रीमा , तुझीच अ‍ॅक्टीव्हा घेवु , फोर व्हीलर ट्रॅफीक मधे अडकेल उगाच वेळ जाईल "

*********************************************************************************

मी अ‍ॅक्टीव्हा आर. ए . कॉलनीतलीतल्या एका रस्त्यापासुन बाजुला पार्क केली . समोर गवताची हिरवी गार कुरणं , त्यामागची ती दाट हिरवी गर्द झाडी ...अधुन मधुन पावसाची एखादी रिमझिम सर येत होती गजबजलेल्या मुम्बैच्या गर्दीतुन बाहेर इथे आल्या वर अगदी गावी आल्या सारखं वाटतं .

" हां रीमा , बोल आता "
" प्रसाद , आय एम सॉरी "
" सॉरी फोर व्हॉट ?"
" प्रसाद व्ह्याय यु नेव्हर टोल्ड मी अबाउट युअर मॅरेज "
" व्हॉट ??? " ( इथे मला हसुच आलं होतं खरतर , पण मी ते लपवलं) " एक एक मिनिट रीमा , काही तरी गडबड होतेय , विषय भरकट आहे असं नाही का वाटत तुला ? स्पष्ट बोल ना , असं अचानक काय झालं रेझीगनेशन द्यायला ??? आणि हो मराठीत बोललीस तर मला कदाचित लवकर कळेल तुला काय म्हणायचय ते "

" प्रसाद , हा माझा पहिला जॉब . सगळं नवीन होतं . नवीन कंपनी ..नवीन कलीग्ज ..नवीन बॉस ... सगळे कलीग्ज निघुन गेल्यानंतरही तु रात्र रात्र ऑफीसात बसुन करत रहायचा ...नेहमी कुतुहल वाटायचं ... सगळे कलीग्जही बोलताना नेहमी तुझ्या हार्ड वर्क बद्दल , डेडीकेशन बद्दल बोलत रहायचे ...मी ही मग तेच डेडीकेशन हार्ड्वर्क माझ्या कामात आणायचा प्रयत्न करायला लागले , खरतर तुलाच कॉपी करायला लागले ... पूढे तुझ्याच बरोबर काम करायचा योग आला मग सतत मीटींग्ज ..प्रेझेंटेशन्स भेटीगाठी .. आणि आपली ती भेट मरीन ड्राईव वरची ....अन कळालंच नाही की ते कुतुहल प्रेमात कधी बदलंल ते ...."
" ह्म्म . "
" पण प्रसाद , हे योग्य नाही यु आर मॅरीड ..... मी जॉब सोडत आहे कारण तु सतत समोर असताना मला माझेच विचार छळत रहातात ...मला नाही जमणार आता तिथे काम करायला " " तिच्या डोळ्यात अश्रु तराळले होते , अन ति आटोकाट प्रयत्न करत होती ते आडवण्याचा .

" ह्म्म... रीमा ... मला वाटलंच होतं , पण तुला असं वाटत का की मला हे कळ्त नव्हतं ? तुला असं वाटत का की मला तुझ्या डोळ्यातले भाव कधी वाचताच आले नाहीत ? तुला असं वाटत का की तिथे मरीन ड्राईव वर भर पावसात चिंब भिजुन चालताना जेव्हा तु माझा हात हातात घेतलास तेव्हा मी अगदीच 'कोरडा' होतो ? तसं तुला वाटतं असेल तर तुला मी कळालोच नाही असं मला खिन्नतेने म्हणावं लागेल" मी स्वतःशीच खिन्न हसलो .

" ...म्हणजे ...प्रसाद ... "
" हम्म...हो .. रीमा , फरक फक्त इतकाच आहे की लहान पणापासुन भावना व्यक्त करायच्या नाहीत असं मला शिकवलं गेलय ना ....म्हणुन व्यक्त करु शकत नाही इतकच ."

" पण प्रसाद हे चुक आहे ...चुक आहे ..." तिच्या डोळ्यात अश्रु तराळले होते. " तु मला आधी का भेटला नाहीस प्रसाद ???"

परत एक तेच खिन्न स्मित ..." चुक ... रीमा चुक बरोबर कोण ठरवतं गं ? थोडसं फिलोसॉफिकल वाटेल बघ तुला पटंतय का ते ? चुक बरोबर ठरवणारे कोण गं ? समाज समाज आपण म्हणतो पण तो आपल्या सारख्या माणसांनीच बनलाय ना , मग दोन प्रेमी जीवांना तोडण्याचा काय गं अधिकार ? लोकांना प्रेम कळ्त नाही कळतात ते फक्त नियम . प्रेम लग्न सारख्या सुंदर गोष्टींना पेटंट सारखा रुप देवुन टाकलय . एकदा एकाचं झालं की आता प्रेम फक्त त्याचच , दुसर्‍या कोणावर प्रेम करायचं नाही , फक्त त्याचच अगदी पेटंट असल्या सारख .
आज अगदी राधा कृष्ण त्यांच्या प्रेमालाही हा समाज व्यभिचाराचं नाव देईल ....प्रेमाचा खरा अर्थ कधी उमगणारच नाही यांना....

प्रेम म्हणजे आनंद ...केवळ आनंद .... आनंदाव्यतिरिक्त तिथे दुसरं काही असेल तर तर ती केवळ आसक्ती आहे ... किळसवाणी आसक्ती ....

रीमा प्रेम अनंत आहे ह्या आनंदा सारखच , अन आपलं आयुष्य मात्र क्षणभंगुर ... किती जमेल तितकं हे प्रेम हा आनंद समेटुन घ्यायचं सोडुन लोकं ह्या पेटंटच्या विचारात अडकतात अन मग प्रेम प्रेम म्हणुन भलत्याच कशाला तरी कवटाळुन बसतात .
रीमा फार फार पुर्वी माझी एक मैत्रीण होती , तीला मी म्हणालो होतो " आयुष्य ह्या पावसासारखं आहे , अगदी अनिश्चीत ... कधी काय होईल कोणास ठावुक नाही .....मग आहे हा क्षण पुढे काय होईल कोण जाणे . हा क्षण आपला समजुन त्याचा आनंद घ्यायचा की योग्य अयोग्य नीती अनिती चुक बरोबर ह्याची काथ्याकुट करत तो क्षण व्यर्थ घालवायचा ज्याचं त्यानं ठरवावं ". रीमा , तुला सांगतो , बोलु नकोस कोणाला , माझ्या ह्या मैत्रीणीने जेव्हा सगळ्या आणाभाका विसरुन , मला सांगितले होते ना की - प्रसाद , गणितं कोठे तरी चुकलं ....आपले रस्ते एकत्र येण्या साठी नाहीत .....मी पार तुटुन गेलो होतो ... तेव्हा ....रात्र भर दारु पित होतो ..एकटाच ...भुता सारखा बसुन होतो बीचवर ... माझं काय चुकलं याचा विचार करत ...पण एक थेंब अश्रु गाळला नाही ... त्या रात्री ठरवलं ... की बस्स भरभरुन प्रेम करायचं फक्त ! कोणत्याही प्रतिसादाची , प्रतिप्रेमाची अपेक्षा न बाळगता ! त्या रात्री हे सगलं तत्वज्ञान सुचलं .
.
.
.
अन दुसरे दिवशी मी तिच्या घरच्यांना लग्नाच्या तयारीत मदत करत होतो !

बाकी तु मला आधी का भेटला नाहीस ? खरं सांगु का रीमा , या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाहीये , मला फक्त इतकं माहीत आहे की इतक्या उशीरा भेटल्याने आयुष्यातले जे आनंदाचे क्षण निसटुन गेले ते परत आणणे माझ्या हातात नाहिये पण जे क्षण आत्ता मिळालेत ते मनसोक्त जगणं , तेवढ्या क्षणात अगदी निरपेक्ष प्रेम करणं ... येवढच माझ्या हातात आहे . ..

या उपर मी काही बोलणार नाही ... अजुनही तुला रेझीगनेशन द्यायचं असेल तर तु मोकळी आहेस तुझा निर्णय घायला ....फक्त एक सांगतो - व्यक्ती डोळ्यासमोरुन दुर केली की खरं प्रेम इरेझ करता येतं असं तुला वाटत असेल तर तर तु चुकत आहेस .... मी माझ्या स्वानुभवावरुन सांगतोय ! "

मी एवढं सारं बोलुन गेलो , अन तिच्या नजरेतुन नजर काढुन घेतली ,

आता थोडासा वारा सुटला होता , समोरच्या हिरव्यागार गवतावर उनपावसाचा खेळ चालु होता , एक छानसं इंद्रधनुष्य त्या हिरव्यागार झाडी मागुन डोकावत होतं ....कुठुन तरी कोकिळेची शीळ ऐकु येत होती ...अधुन मधुन पावसाची हलकीशी सर चेहर्‍यावर पाणी शिंपडुन जात होती .........अन

अन
इथे आमच्या दोघात सुन्न शांतता .
मी नेहमी च्या सवयीने पाकिटातुन एक मार्लबोरो काढुन शिलगावली .
.
.
.

" प्रसाद , शो सम डीसेन्सी . आय हॅव ऑल्रेरेडी टोल्ड यु नो स्मोकिंग इन फ्रन्ट ऑफ मी " रीमा माझी मार्लबोरो फेकुन देत ती म्हणाली " आणि आता तर मुळीच नाही ."
अन येवढं बोलुन तिने मला घट्ट मिठी मारली

" सॉरी प्रसाद , मला आज पर्यंत तु पुर्ण कळालाच नव्हतास रे ..."

पाउस अगदी संथ पणे पडत होता अन मी 'परत एकदा' चिंब भिजुन गेलो होतो .....

( क्रमशः)

गुलमोहर: 

.

प्रसादच्या आयुष्यात नक्की स्त्रिया किती ??? फिदीफिदी कुतुहल वाढतंय......

>>>>

आरररर

दोन मिनिट मला अवघाची हा संसार मधला "प्रसाद " ओक झाल्यासारखं वाटलं

आयुष्यातले जे आनंदाचे क्षण निसटुन गेले ते परत आणणे माझ्या हातात नाहिये पण जे क्षण आत्ता मिळालेत ते मनसोक्त जगणं , तेवढ्या क्षणात अगदी निरपेक्ष प्रेम करणं ... येवढच माझ्या हातात आहे . .. >>>>>> Happy

प्रसाद, मनातलं बोललास मित्रा ! Happy

प्रगो... अरे काय हे? मी एवढा थरार सुचवला भाग ४ मध्ये.. तुला १३ भागांच्या वरती मालिका करायचीय का? हा भाग अगदीच KANK सारखा होतोय बर का!!!!

चिन्टूच्या आईवरही इरेज न करण्यासारखे प्रेम कर रे बाबा.. प्रसाद! अमर्याद प्रेमाचा साठा आहे ब्वा त्याच्याकडे!!! Proud

रच्याकने, शब्द छान गुंफलेयस.

व्यक्ती डोळ्यासमोरुन दुर केली की खरं प्रेम इरेझ करता येतं असं तुला वाटत असेल तर तर तु चुकत आहेस .... मी माझ्या स्वानुभवावरुन सांगतोय ! >>>

म्हणजे थोडक्यात नायक अजूनही निशावर प्रेम करतोय फक्त त्याच्या स्वभावानुसार कुणाला उघडपणे सांगत नाहिये इतकंच!!! मग हे खालचं कसं काय ??? Uhoh

<<< तुला असं वाटत का की तिथे मरीन ड्राईव वर भर पावसात चिंब भिजुन चालताना जेव्हा तु माझा हात हातात घेतलास तेव्हा मी अगदीच 'कोरडा' होतो ? >>>

म्हणजे एकाच वेळी २ दगडांवर पाय??? बाप्रे. पँट सांभाळा Wink Light 1 ह.घे. रे, प्रगो.
नाहीतर येशील धावून माझ्या अंगावर, 'नैतिक अधिकार काय चूक दाखवण्याचा' असं म्हणत. Happy

सॉरी, २ नव्हे ३ दगडांवर पाय ...

<<<< आज चिंटु मामा कडे जाउन ३ दिवस झाले .
तो( आणि ती ) नसला की कसं घर ओकं ओकं वाटतं ... घरी जावतं नाही >>>

इथे ती म्हणजे बायकोच ना?

प्रसाद, काहीतरी घोळ होतोय का? किंवा मला चूकिचं impression झालंय का? Sad

निंबु.. हैद्राबादच्या निझामानंतर प्रसादच..! Wink

अरे प्रगो.. लाल होऊ नकोस.. गोष्टीतला म्हणतेय मी! Proud

रच्याकने, तुला प्रसाद ओक चालतो ना असावरीचा.. मग हा नक्की कसा आहे ते कळेपर्यंत होल्ड युअर हॉर्सेस बरं! :चष्मा लावून प्रगोची बाजू घेणारी बाहुली:

इथे ती म्हणजे बायकोच ना? >>> निंबे बरोबर आहे .

प्रगो... अरे काय हे? मी एवढा थरार सुचवला भाग ४ मध्ये.. तुला १३ भागांच्या वरती मालिका करायचीय का? हा भाग अगदीच KANK सारखा होतोय बर का!!!! >>> करन जोहरने माझी ष्टोरी चोरली होती वाटतं Angry Proud

म्हणजे एकाच वेळी २ दगडांवर पाय??? बाप्रे. पँट सांभाळा डोळा मारा दिवा घ्या ह.घे. रे, प्रगो.
नाहीतर येशील धावून माझ्या अंगावर, 'नैतिक अधिकार काय चूक दाखवण्याचा' असं म्हणत. स्मित >>> हम्म मला कळतं यार कोण कोणत्या हेतुने प्रतिसाद देतय ! Happy

मला हे सगळं थेट 'नचिकेताचे उपाख्यान' सारखे वाटतेय
सॉरी, नॉट माय कप ऑफ टी!

>>>> आगाउ धन्यवाद . अशे प्रतिस्आद फार कमी पहायला मिळतात येथे ! कारण पटलं नाही की येथे " अश्लील अश्लील " म्हणणारे मॉपो महाभाग आहेत काही .

All said and done...कथा छान चाललीये, पुढच्या पानाची उत्कंठा लागलीये, आणि मी तरी हे नियमीत वाचणार Happy

कथा खुलवत कोठपर्यंत आणून सोडायची आणि क्रमशः टाकायचे हे तंत्र छान जमले आहे! त्यामुळे प्रत्येक भागाच्या शेवटच्या वाक्याशी अनेक शक्यता निर्माण होतात आणि त्यातील कोणती शक्यता खरी होते हे जाणून घ्यायची उत्कंठा लागून राहाते. कथा एक वेळ पटेल, न पटेल.... पण तंत्र मस्त आहे! Happy

कथा वाचायला मजा येतेय Happy
<<चिन्टूच्या आईवरही इरेज न करण्यासारखे प्रेम कर रे बाबा.. प्रसाद! अमर्याद प्रेमाचा साठा आहे ब्वा त्याच्याकडे!!<<>>
अरे तो प्रसाद चिन्टुच्या आईलाही प्रेमाचे हेच तत्वज्ञान शिकवत असेल ना. मग तीपण असे इरेज न करण्याजोगे अमर्याद प्रेम करत असेल कोणावर ते प्रसाद सांगेलच नाहीतर तुम्ही ओळखा पाहु Proud Light 1

आत्त्ता कळतेय, प्रसाद ला उशीरापर्यन्त कामाचे निमीत्त करत ऑफिस मध्ये का थांबावे लागते ते Wink

तू इथे प्रसाद हेच नाव का निवडलं आहेस?
>>>प्रसादे सर्वदु:खानाम हानिरस्योप जायते !!
अर्थात एकदा 'प्रसाद ' मिळाला की सर्व दु:ख आपोआप नष्ट होतात ,
जिथे प्रसाद असतो तिथे दु:ख असुच शकत नाही !! असा माझ्या नावाचा अर्थ आहे ! म्हणुन मला माझेच नाव प्रचंड आवडते , बाकी ह्या व्यतिरिक्त दुसरं एक नाव मला आवडत पण ते कथेच्या विषयात सुट होत नाही म्हणुन नायकाला ते नाव वापरलं नाहीये ,ते चिंटुचं नाव आहे - " श्रीराम"

जरी डायरी असेल तरी ती गोष्टीतली आहे ना?

>>> मौनं सर्वार्थ साधनं ! Proud Wink

आता डायरीचे एकच पान राहिले आहे (निशा अनेरिकेहुन येत आहे भारतात !!! ), पण मी ते दोन भागात लिहिणार आहे .
मिलते है एक छोटेसे कमर्शियल/ "ऑफीशियल" ब्रेक के बाद !

Pages