माझी ऑफीसची डायरी - १ - ५ जुन २०१० शनिवार http://www.maayboli.com/node/16803
माझी ऑफीसची डायरी - २ - ७ जुन २०१० सोमवार http://www.maayboli.com/node/16841
माझी ऑफीसची डायरी - ३ - ८ जुन २०१० मंगळवार http://www.maayboli.com/node/16868
माझी ऑफीसची डायरी - ४ - ११ जुन २०१० शुक्रवार http://www.maayboli.com/node/16974
माझी ऑफीसची डायरी - ५ - १२ जुन २०१० शनिवार http://www.maayboli.com/node/17010
१३ जुन २०१० २३:४५
आजचा दिवस ! आठवुन माझं मलाच खोटं वाटतंय ... अन थोडंसं हसुही येतय स्वतःचच ...
आज निशा येणार होती अमेरिकेहुन ! मी दुपारी जेव्हा गाडी काढुन सहार एयर्पोर्ट कडे निघालो तेव्हा आठवलं
' निशा बरोबरची ती भेट मरीन ड्राईव्ह वरची .... तिने मारलेली ती घट्ट मिठी ...अनपेक्षित पणे पडलेला तो पाउस ...अन चिंब भिजुन गेलेला मी !! ' दहा वर्षां पुर्वीच्या त्या घटना अगदी काल घडल्यासारख्या वाट्त होत्या ...
"काल ...." माझं मलाच हसु आलं .
"बरोबर .... कालची रीमा बरोबरची ती भेट ! तासभर रीमा बिलगुन होती ... नक्की काय रीअॅक्शन द्यायची बहुतेक तिचं तिलाच कळत नव्हतं . राहुन राहुन ' तु मला आधी का भेटला नाहीस प्रसाद ? ' हाप्रश्न तिच्या मनात येत असावा , अन मी जे उत्तर बोललो ते आठवुन हे ह्या प्रश्नाचं खरंच योग्य उत्तर आहे का ह्या विचारात ती अडकली असावी ." तिचे चिंब भेजलेले केस माझ्या मानेवर रेंगाळताना जशा गुदगुल्या करत होते , जणु तशाच कोणी तरी आत्ता करीत आहे असे वाटुन माझे मलाच हसु येत होते . पण काल मी बोलता बोलता चुकुन निशाचा उल्लेख करुन गेलो होतो अन रीमा मागेच लागली की मला भेटायचयं तिला आणि तुझ्या बायकोलाही . !
इथे " मी अजिबात घाबरलो नाही ". असं जर म्हणलो तर मी खोटं बोलतोय हे कोणाला ही कळालं असतं . पण नुसत्या भेटीला काहीच हरकत नव्हती , मी रीमाला एयर्पोर्ट वर घेवुन जायचं प्रॉमीस केलं .
मी गाडी रीमाच्या घराकडे वळवली . आज निशा येत होती अमेरिकेहुन अन 'ही अन चिंटु ' माहेरहुन !
***********************************************************************************************
"हे प्रसाद हाउ आर यु यार ? कुठे आहेस ? तु विसरलास राव आम्हाला " विक्रम म्हणाला . " काय यार मोठ्ठी माणसं आता तुम्ही तुझ्या लग्नाची पत्रिका दिलीस अन त्यानंतर साधा फोनही नाही ? मेलला कधी रीप्लाय पण नाहीस केलास .? "
विक्रमची माझी ओळख निशाच्या लग्नातच झाली होती नंतर अगदी चांगले मित्र असल्या सारखे आमचे मेल्स फोन्स वगैरे चालु होते ...नंतर नेहमी प्रमाणेच सगळ्या गोष्टी विस्मरणात गेल्या ... आज १० वर्षांनी भेटलो . एक नुसतं स्मित हास्य देवुन मी त्याच्या प्रश्नांची उत्तरे दिली , त्याला जेवायला बोलावले पण "घरचे वाट बघत असतील, मी पुढे होतो , निशा तु प्रणवला घेवुन ये " असे म्हणुन तो निघुन गेला .
निशा ....अजुनही तशीच ...तितकीच मोहक .......माझ्या कडे बघुन हसली तेव्हा तिचे ते स्मित बघुन मधे १० वर्षे गेलीच नाहीत असे वाटले .
" प्रसाद " तिला शब्द सुचत नव्हते " प्रसाद किति दिवसांनी भेटतो आहेस रे ! कसा आहेस ? "
" निशा ,मी मस्त . तु कशी आहेस ? अजिबात बदलली नाहीस , बायदवे इथे उभे राहुन गप्पा मारण्या पेक्षा आपण त्या शेजारच्या सीसीडी त बसुन एक एक कॉफी घेत गप्पा मारुयात का ? आज " चिंटु अन ही " सुध्दा येत आहे , तासाभरात त्यांची फ्लाईट येइल तोवर ..."
" हो चालेलना ... मला ही बरंच बोलायच आहे तुझ्याशी "
" बायदवे रीमा , ही निशा , निशा रीमा , माय कलीग "
" हाय रीमा . ओह्ह प्रसाद , तु ही अजुनही तसाच ...अगदी तसाच.. आहेस ... अजिबात बदलला नाहीस ...:) "
*************************************************************************************************************
" कसा आहेस प्रसाद ? "
" मी मस्त आहे निशा ,लग्न करुन तु निघुन गेलीस .... त्यानंतर महिन्याभरात माझे ही लग्न झालं इतक्या गडबडीत की काय सांगु ....तुला बोलावलं होतं पण ...असो , त्यानंतर कामात सीरीयस झालो नंतर डीजीएम झालो ... जबाबदार्या वाढल्यात ...काम वाढलंय ...ही रीमा माझ्याबरोबरच आहे बाकी इतर ...."
" प्रसाद , मला पुर्ण विसरलास कारे ?"
मी नेहमी सारखा खिन्नसा हसत म्हणालो "निशा तु असे अवघड प्रश्न विचारु नकोस गं ... मला खोटं बोलतायेत नाही तुला माहीत आहे ."
"ओके ओके प्रसाद , आणि ही रीमा ...यु अॅन्ड हर...
" निशा , प्लीझ अवघड प्रश्न विचारु नकोस " रीमा काही बोलत नव्हती ..पण तिचे डोळे पाणावले होते ...मला बघवत नव्हतं ते .
" प्रसाद तु असा कसा रे ? यु आर मॅरीड नाउ ! हाउ कॅन यु ? तुला कधी एकनिष्ठ प्रेम करताच येणार नाही का रे ?
बाय द वे , तुला आठवते कारे माझी ती कलीग , सई ...काय नाव होतं तिचं ते ...??"
इथे मला हसु आलं " - सई ... सई गोखले .. . का गं अचानक तिची का आठवण आली ? बायदवे तुझ्यानंतर महिन्या भराने तिचेही लग्न झालं ... आता जी एम आहे ...नरीमन पॉईटला घर घेतलय तिनं अन तिच्या नवर्याने . ...."
रीमा चकीत होवुन माझ्याकडे पहात होती " म्हणजे प्रसाद ... सई मॅम अॅड यु? सई मॅम ?? "
" येस रीमा , हा असाच आहे ...पहिल्या पासुन .... " निशा बोलत होती " प्रसाद तुला कधी खरं प्रेम करताच आलं नाही . आणि म्हणुनच तु असा आहेस अनेक प्रेमभंगाची दु:ख घेवुन ... इतका मोठा झालातरी एकाकी ...बायकोवर तरी खरं प्रेम करतोस कि नाही देव जाणे ?"
" निशा , तुला कळालं नाही म्हणजे मला प्रेम करता आलं नाही असं आहे का ? रीमा , तुला ही असंच वाटतय ???"
" अन्फोर्च्युनेटली , प्रसाद , मला तरी निशा म्हणत आहे तेच दिसतयं " रीमा चे डोळे पाणावले होते अन माझ्या चेहर्यावर ते नेहमी चे खिन्न हसु पसरलं होतं .
" निशा, रीमा , तुम्हाला कधी मी कळालोच नाही .... पण निशा , मला एक सांग सई विषयी तुला कसे ठावुक ?
निशाच्या चेहर्यावर एक हास्य पसरलं . त्याचा अर्थ मला लागत नव्हता " प्रसाद , आय ऑलवेज क्न्यु दॅट ...., वेडी होती रे ती . तुझ्यावर खरं खरं प्रेम करीत होती . बट आय ऑलवेज हेटेड हर , प्रसाद तुला काय वाटतं , मला ठावुक नव्हतं तुमच्या भेटींबाबत ? आपण पवई लेकवर भेटलो त्याचा आधी तु तिला भेटला तिथेच हे काय मला ठावुक नाही ? केवळ तिला छळायचं म्हणुन मी तुझ्या प्रेमात पडले ...अन कधी " खरी " प्रेमात पडले माझं मलाच कळालं नाही ... प्रसाद , तु अनिर्लिप्त सन्याश्या सारखा माझ्या लग्नात अक्षता घेवुन उभा होतास तेव्हा तिथे माझ्या मनात काय चाललं होतं तुला नाही कळणार रे ... त्या साठी खरं प्रेम कराव लागतं "
" हेच निशा , हेच ... मी ज्याला प्रेम म्हणतोय ते तुम्हाला कळालंच नाही , सईला कळालं ,मी सईच्या लग्नातही होतो , पण तिच्या मनात अशी काही खळबळ मला नाही दिसली , नंतर मी बोललो ही तिच्याशी , पण ती मात्र खुश होती , तीला एकटीलाच कळालं मला काय म्हणायचं होतं ... हे जे तु एकनिष्ठ प्रेम वगैरे म्हणतेस ना ते मला फक्त तिच्या बोलण्या वागण्यातुन जाणावलं , "
" पण प्रसाद , मी हरले असेनही पण तिचं ही लग्न झालं , ती हरली आहे , अन तु ... "
" हा हा हा निशा , तु माझ्या विषयी हे बोलु शकत नाहीस कारण मी प्रेमाच्या ज्या विश्वात जगतोय ना तिथे हार जीत नसते ...असतो तो फक्त आनंद !!"
रीमा , चकीत होवुन शांतपणे ऐकत होती , प्रणव निशाच्या खांद्यावर झोपला होता निरागसपणे ...ह्या सार्या पासुन पार अलिप्त
" पण प्रसाद , बास , धीस इस टू मच , आता हे थांबलं पाहिजे , प्रसाद यु आर मॅरीड नाउ ! "
"बघ निशा , तु अजुनही लग्नाला पेटंट समजत आहेस "
"प्रसाद इनफ . फॉर गॉड्स सेक प्रसाद , रीमाचा विचार कर , तिच्या आयुश्याशी का खेळतो आहेस ? तुज्या बायकोचा विचार कर , तीला पटेल का हे तुझं तत्वज्ञान ?. बास प्रसाद , टु डे इट एन्ड्स , आज मी हे सारं क्लीयर करणार आहे "
त्या नंतर २ मीनीट सुन्न शांतता होती . कोणी काहीच बोलत नव्हतं .
" रीमा, निशा , मला तिथे चिंटु अन ही दिसत आहे मी आलोच चिंटुला घेवुन . "
तितक्यात .....
" सई मॅम !!! " रीमा अचानक धक्का बसल्या सारखे ओरडली .
" वा प्रसाद , काय योग आहे , मी ,सई ,रीमा , अन आता तुझी बायको ही आली आहे ... टु डे इट एन्ड्स , आज तुझं हे प्रेमाचं तत्वज्ञान संपणार आहे " निशा म्हणाली .
मी शांत पणे उठुन बाहेर गेलो चिंटुला कडेवर घेतले , अन आत यायला लागलो ...सीसीडीच्या त्या काचेच्या दरवाज्या मागुन माझे लक्ष आमच्या टेबल वर गेले
" रीमा , निशा , सई .... "
" रीमा डोळे पुसत होती , निशा बोलत होती , अन सई .... सई गोखले ...जी एम ... १० वर्षांपुर्वीची माझी प्रेयसी ... आताची माझी बॉस ....ते सारं शांतपणे ऐकत होती !!!
( क्रमशः )
.
.
सस्पेन्स पुढच्या भागाची वाट
सस्पेन्स
पुढच्या भागाची वाट बघतेय..
बाप्रे, खरंच "अवघाची संसार"
बाप्रे, खरंच "अवघाची संसार" वाला प्रसाद ओक आहे की काय हा
डोक्यास कामाला लावले तुम्ही
डोक्यास कामाला लावले तुम्ही आमच्या...लवकर येऊदे शेवटचा भाग आता!!
माझी ऑफीसची डायरी - १ - ५ जुन
माझी ऑफीसची डायरी - १ - ५ जुन २०१० शनिवार http://www.maayboli.com/node/16803
माझी ऑफीसची डायरी - २ - ७ जुन २०१० सोमवार http://www.maayboli.com/node/16841
माझी ऑफीसची डायरी - ३ - ८ जुन २०१० मंगळवार http://www.maayboli.com/node/16868
माझी ऑफीसची डायरी - ४ - ११ जुन २०१० शुक्रवार http://www.maayboli.com/node/16974
माझी ऑफीसची डायरी - ५ - १२ जुन २०१० शनिवार http://www.maayboli.com/node/17010
माझी ऑफीसची डायरी - ६ - १३ जुन २०१० रविवार http://www.maayboli.com/node/17041
माझी ऑफीसची डायरी - ७ ( अंतिम )१३ जुन २०१० रविवार http://www.maayboli.com/node/17076
नाही निंबे, ह्याची मान सरळ
नाही निंबे, ह्याची मान सरळ आहे
!
अजून आहेच का पुढे .....
अजून आहेच का पुढे ..... तुम्ही ही लव स्टोरीवाली डायरी जपून ठेवा ..... ह्याच्यावर नक्की एखादी सिरीयल होऊ शकेल ....
अरे देवा किती बायका!
अरे देवा किती बायका!
अमल्या, तू तिन्ही त्रिकाळ
अमल्या, तू तिन्ही त्रिकाळ त्या सिरियलचा विचार कर....... पण पटलं मला, खरंच चांगलं खाद्य आहे सिरियल बनवण्यासाठी

प्रश्या, सही लिहितोस
अमल्या, तू तिन्ही त्रिकाळ
अमल्या, तू तिन्ही त्रिकाळ त्या सिरियलचा विचार कर....... पण पटलं मला, खरंच चांगलं खाद्य आहे सिरियल बनवण्यासाठी >>>>> मंजे, चला कधीतरी तुला माझं काहीतरी पटलं तर .....
.... असो ... जोक्स अपार्ट ......
मंजे, आजकाल हे असचं काहीतरी लोकांना खुप आवडत असतं ...... तु कुठल्याही चॅनेलवर बघ एक तरी अशी सिरीयल चालू असतेच ..... आणि ...... जो अच्छा लगता है, वही बिकता है ...... म्हणून चॅनेलवाले दाखवत राहतात आणि अनेक लोकं त्या सिरीयल्स मध्ये गुंतून जात, त्या बघत राहतात ......
मंजिरी , तु इथे लिहित आहेस
मंजिरी ,
तु इथे लिहित आहेस >>>प्रश्या, सही लिहितोस स्मित >>>
आणि नंतर तसं !!
तुला नकी कसा शेवट अपेक्षित होता ???
अरे प्रसाद, तुला (आय मिन,
अरे प्रसाद, तुला (आय मिन, नायकाला) चौघिनी मिळुन धुवुन काढले असते तिथे तर या सर्वाना खुप मजा आली असती..... आणि चिन्टु टाळ्या वाजवतोय्...(निरागसता म्हणतात ती यालाच का हो...!).