मटण खीमा सीख कबाब

Submitted by अंजली on 16 October, 2008 - 18:30

मटण खीमा सीख कबाब

मटण खीमा: १ ते १ १/२ पाउंड
लाल कांदा: १ मोठा बारीक चिरून,
पातीचा कांदा: २ पातीसकट बारीक चिरुन
आलं लसूण पेस्टः १ मोठा चमचा
हिरव्या मिरच्या बारीक चिरुन
१ लहान चमचा तिखट
धने जीरे पूड
बडिशेप पूड
कोथिंबीर बारीक चिरून
आवडत असल्यास थोडा पुदिना बारीक चिरून
शानचा थोडासा (आवडेल तेव्हढा) सीख कबाब मसाला (जर हा वापरला तर तिखट घालू नये)
१/२ चमचा हळद
१ मोठा चमचा तूप
१ अंड्याचे बलक
१ मोठा चमचा बेसन किंवा आवश्यक तेव्हढे ब्रेडक्रम्स
सर्व मिक्स करुन २ तास फ्रिजमधे ठेवणे.
मीठ घातले की पाणी सुटते त्यामुळे ऐनवेळेस मीठ घालून skewers ला लावून कबाब भाजणे. भाजताना थोडे तूप सोडून भाजणे.

याबरोबर कोथिंबीर, हिरवी मिरची, जीरे एकत्र वाटून दह्यात कालवून केलेली चटणी छान लागते. चटणी थोडी सरबरीत असावी. तसेच serve करताना कांद्याच्या व लिंबाच्या चकत्यांबरोबर serve करावे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे बेष्ट केलं इथे रेसिपी आणली ते. मने आता तू तुझी व्हर्शन पण इथेच लिही परत. शनिवारी करणार कबाब मी.

ओव्हन मधे किती टेम्प अन किती वेळ तेही लिहा . ग्रिल वर केलंय का कोणी ?

मी ग्रिलवरच केलं होतं

कबाब मी नेहेमी ओवन मध्ये करते. ओवन साधारण ४५० फॅरनाईट वर, २० मिनिटे.

अंजली, मस्त रेसिपी. बडीशेपेची चव छान येत असेल नं? नक्की करून बघेन.

बेसना ऐवजी ह्यात चण्याची डाळ भिजवून वाटून घालता येते.

४५० वर १५-२० मिनिटं आणि त्यानंतर (प्रत्येकी) ३० सेकंद ब्रॉइल, दोन्ही बाजुनी.
..............
कुणा आवडे चकली, कुणा कानोल्यात सुख; दिवाळीच्या फराळाचा, माझ्या पोटोबाला धाक!!!! Proud

मृ,
अगं मस्तच होतात कबाब. बडीशेप थोडी भरड वाटायची. सगळं मिक्स करतानाच थोडं तूप घातलं आणि भाजताना तूप सोडून भाजलं की अप्रतिम चव येते. मी चण्याची डाळ कधी घातली नाही, पुढच्यावेळेस घालून बघेन.

ही मनस्विनीची कॄती
मी फक्त इथे पोस्ट करतेय

मी वरच्या रेसीपीप्रमाणेच करते. पण मी फक्त egg yolk घालते नी चणाडाळ भिजत घालून पाणी न टाकता वाटते. खीमा पण अगदी fine fine वाटून घ्यायचा. मग त्याच मिश्रणात मसाले,आले लसूणाची आधीच बारीक वाटलेली गोळी टाकून पुन्हा मिक्सी फिरवते. मग शेवटी चणाडाळ वाटलेली टाकून वाफवते. हे सगळे flat steamer मध्ये मिठाशिवाय किंचीत वाफवून घेते मग शेवटी बारीक केलेला कांदा,egg yolk, पातीचा कांदा किंवा पातळ जर झालेच असेल तर ब्रेड क्रम्स असे टाकून थोड्यावेळ फ्रीजमध्ये ठेव.
स्क्रूवर पाण्यात भिजवून ठेवून त्यावर हे गोल थापते. थापून झाले की वरून त्यावर तेल लाव.ओवन मध्ये भाजते. मस्त कुरकुरीत होतात.
शुक्रवारीच बनवणार आहे मी. जमले तर फोटो टाकेन.
हो आणखी एक मी फ्रेश मसाला वाटते. तो छान लागतो. वेलची, काळमीरी, एखादे लवंग, बडीशेप, बडी वेलची,जीरे, धणे हे गरम करून वाट मस्त. शान बीन बेकार लागते मला.

अंजली,

अंडे फक्त बायडींग एजेंन्ट म्हणून आहे ते पुर्ण पांढरे घातले तर सैल होते खीमा. दोन अंड्याची बिलकूल गरज नाही एका पांऊडाला. एकच अंडे घाल नी कालवून कालवून घे खीमा गोळा. होइल बघ.

धन्यवाद शूनू,

ह्याच्यावर पुदीना चटणी सुद्धामस्त लागते. पुदीना, थोडी कोथींबीर्,अगदी एक चमचा ओले खोवलेले खोबरे, हिरव्या मिरच्या,किंचीतसे आलं हे सगळे एकदम बारीक वाटून झाले की लेमन रस टाकायचा नी चवीला मीठ. lime juice नाही.

आज केले हे कबाब. माझ्याकडे शानचा मसाला नव्हता . धणे - जिरं - बडिशेप- वेलची-लवंग-दालचीनी- तेजपान-मिरे कोरडे भाजून भरड पूड केली. एक एग योक घातला अन चमचाभर बेसन घातलं. पातीचा कांदा नव्हता, त्याऐवजी थोडा पुदिना घातला अन गॅस ग्रिलवर ग्रिल केलेले.
मस्त झाले होते कबाब.
अंजली अजून एक 'कीपर रेसिपी' झाली आता.

मेधा, वर्षू,
आवडले ना कबाब... Happy चपली कबाब आणि शामी कबाब पण मस्त होतात. त्याचीपण टाकते रेसेपी. जाणकारांनी मटण कबाबसाठी कुठल्या भागाचा खिमा घ्यावा लिहील्यास मदत होईल. मी हलाल मार्केटमधून खिमा आणते. शक्यतो तयार खिम्याची पाकिटं घेऊ नयेत, कारण त्यात चरबी खूप जास्त असते. माझ्या माहितीप्रमाणे लेग पीस घेउन त्याचा खिमा करून घ्यावा.

माय्क्रोवेव मधे जो कबाब साठि स्टॅन्ड असतो त्याला कसे लावायचे हे ? मी एकदा प्रयत्न केला होता पण ते ओघळुन खालीच येते .

इथल्या कबाबवाल्या दुकानात जाड सळ्या असतात शीखच्या. तसल्या कुठे मिळतील. घरातले बार्बेक्यू स्क्युअर्स जेमतेम ४ मिमि व्यासाचे आहेत.

मेधा, मला तरी इथल्या दुकानांमधून दिसल्या नाहित. भारतात गेले होते तेव्हा तिथल्या दुकांनामधेपण पाहिल्या. मग शेवटी पुण्यात बोहरी आळीत करून मिळतील असं कळलं पण बघायला वेळ झाला नाही. ऑनलाईन बघायला हव्यात.

हे कबाब आत्ताच करून खाऊन झाले . Happy अप्रतिम झाले होते , खूप खूप धन्यवाद. .
मी आज पहिल्यांदा मटणाचे कबाब केले , नेहमी इतरांच्याच हातचे खाल्ले होते . आता नेहमी करणार हे नक्की. Happy
माझ्याकडे शानचा मसाला नव्हता , म्हणून बाकीचे जिन्नस घातले . अंडे सुद्धा नव्हते , म्हणून बाईंडिंगसाठी फक्त ब्रेड क्रंब्स घातले . मस्त लागले एकदम . Happy