घर : खरच एक गुंतवणुक आहे काय?

Submitted by निवांत पाटील on 7 May, 2010 - 13:31

आता जवळ्पास सगळ्या मित्रांनी घर घेवुन झालय. प्रत्येकाचं बजेट कमीत कमी ४० ते ५० लाखाच आहे. (नवी मुंबई आणि पुणे). उरलेले पण आता शॉपिंग करताहेत. काहिजण एकटे कमावणारे तर थोडेफार दोघे कमावणारे... ५ ते ८ लाख डाउन पेमेंट आणि बाकि हप्ता.

आता माझं मतः खरचं एवढे पैसे "गुंतवुन" घर घेण चांगला चॉइस आहे का? त्यापेक्षा भाड्याच्या घरात रहाणे बरे. समजा एका शहरात घर घेतले आणि दुसर्या ठिकाणी चांगली ऑफर आली तर निवड करताना किती गोंधळ. कसा हिशोब लावायचा? इव्हन भाड्याने दिले तरी हप्ता आणि भाडे यांचे गणित बसत नाही. बर परत विकणे आणि दुसरीकडे घेणे हे काही सोपे वाटत नाही (मायबोली वरील अनेक अनुभव वाचुन). दुसरी गोष्ट एकदा एवढी गुंतवणुक केली कि दुसर काही करतायेण्याजोग रहात नाही. मग फक्त घर बांधुन त्यात रहाण हेच साध्य आहे का आयुष्याच?

माझ्याशी चर्चा करताना मांडलेले मुद्दे: घराची किंमत वाढ्त जाते त्यामुळे ती एक चांगली गुंतवणुक आहे. (माझ्या मते विकल्याशिवाय नाही आणि किंमत वाढली तर आपण विकणार असतो का?) जेवढे भाडे भरतो तेवढ्याच पैशात आपले घर होत. (हे गणित अजुन मलातरी कळालेल नाहीय, कोणितरी समजावुन सांगाव म्हणुन हा प्रपंच).

माझ्याबाबतीत माझे गावाकडे घर आहे आणि शेवटी नोकरी करुन झाल्यावर तिथेच जाउन रहाणार आहे. त्यामुळे हे घर घेणे "गरज वाटत नाही" या सदरात येते. जर ४० ते ५० लाख भारतात मिळत असतील (वर्षाला) तर नक्किच ४० ते ५० लाखाचे घर घेणे परवडते असे मला वाटते.

तर खरोखरच कर्ज घेउन घर घेणे म्हणजे गुंतवणुक आहे का? कि मनाचे समाधान?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुण्यात होत असलेल्या नान्देड सिटी प्रकल्पाबद्दल काय मत आहे?

२ बी एच केचा एक प्लॅट घ्यावा की शेजारी शेजारी १ बी एच केचे दोन प्लॅट घ्यावेत?

त्या दिवशी मी सिंहगडरोडवरच्या प्लॅट बद्दल लिहले होते. ते परांजप्यांच्या नविन योजने मधील आहेत. ( मधुकोष, सिंहगड रोड पुणे)

नांदेडसिटी बहुतेक बर्‍याच दिवसांपासून मार्केट मध्ये आहे. गुंतवणूक असेल तर १ बिचके पण बरच पडेल. (मुलांना किंवा मुलींना किरायाने द्यायला.) पण स्वतः राहायचे असेल तर आता जरी एखादी बेडरुम महागात पडत असेल तरी जास्त बेडरुमचा घ्यावा असे वाटते.

जास्तीचे पैसे असतील तर पिरंगुट च्या पुढे प्लॉटस आहेत. ते दुसर्‍या रस्ताने हिंजवडी फेज ३ च्या जवळ पडतात, तिथे केलेली गुंतवणूक (जागेत) नक्कीच फायद्याची पडेल.

जास्तीचे पैसे असतील तर पिरंगुट च्या पुढे प्लॉटस आहेत. ते दुसर्‍या रस्ताने हिंजवडी फेज ३ च्या जवळ पडतात, तिथे केलेली गुंतवणूक (जागेत) नक्कीच फायद्याची पडेल.>>> साधारणपणे काय दर चालु आहे? प्लॉट साइझ काय आहे?

पिरंगुटच्या पुढे 'आर्यावर्त' म्हणून प्लॉट्सची स्कीम आहे. माझ्या एका नातेवाईकाने घेतली होती व विकली. व्हेकेशन होम म्हणूनसुद्धा चांगली जागा आहे. अर्थात इन्व्हेस्टमेंट म्हणून किती फायदेशीर आहे माहीत नाही, म्हणजे ती लोकेशन किती लवकर डेव्हलप होतीय वगैरे. पण हिंजवडीपासून जवळ पडते.
(केदार तू हेच म्हणातोयस का?)

१) राहते घर हे गुंतवणुकीपेक्षा स्थैर्य आणि स्वातंत्र्य,हक्क यासाठी हवे.
२) भाड्याने राहणे स्वस्त पडते असे वाटणे साहजिक आहे. गुंतवणूक म्हणून घर विकत घेऊन भाड्याने देणार्‍या लोकांना २० लाख किमतीच्या घरावर महिना ७-८हजार म्हणजे वर्षाला १ लाख म्हणजे ५% टक्क्या पेक्षा कमी परतावा पडतो. पण घराच्या बजार्भावात होणारी वाढ्(जी कधी मृगजळ ठरू शकते) हा परताव्याचा मुख्य स्त्रोत. पण इथे लिक्विडिटी(गुंतवणूक हवी तेव्हा बाजारात सहज विकून पैसे परत मिळण्याची सोय्)ची शाशव्ती नाही. तसेच घर घेतानाच्या सर्व कायदेशीर बाजू तपासून घेणे सामान्य माणसाला सहज शक्य नसल्याने तोही धोका(रिस्क फॅक्टर). हे पाहता आदर्श गुंतवणुकीच्या सेफ्टी, लिक्विडिटी, रिटर्न या ३ पैकी २ निकषांवर घर गुंतवूणिकीच्या दृष्टिने कमी पडते.
३) भाड्याने घर घेऊन राहणे घर विकत घेण्यापेक्षा स्वस्त पडते का? यात भावनिक मुद्दे व सोय यांचा विचार न करता फक्त आर्थिक बाबींचा विहार करताना, गृह कर्जावर मिळणार्‍या घसघशीत कर सवलतींचा विचारही करायला हवा.

नाँदेड सिटी प्रॉजेक्ट मध्ये घर घेवु इच्छीनर्याणी खालील लक्षात घ्या

तुम्ही भिंतीना खीळे ठोकु शकत नाही, त्या वेगळ्या मटेरियल RCC मध्ये बनवलेल्या आहेत.
तुम्ही इंटर्नल चेंज करू शकत नाही कारण फ्लोर प्लान एक्का व्यक्ती साठी चेंज करत नाहीत
ग्राहकाने प्रत्यक्षा यओन बघावे, साइट वर बघू नये.
मेण्टनेन्स देखील जास्त आहे
१ BHK मध्ये हॉल बेडरूम पेक्षा छोटा आहे .. १ BHK बुक करताना विचार करा

१ BHK गुंतवणूक म्हणून बघत असाल तर विश्रांत वाडी किंवा लॉहगाव ईक चांगला ऑप्षन आहे

.://..99.../ एक चांगली साइट आहे .

मी स्वतः पुण्या मध्ये गुंतवणुकीची जागा शोधत आहे, बघू कधी प्रयतनना यश येते ते !

घर घेण्यासंबंधी (मुंबईत) काही शंका आहेत, कुठे विचारावं ते कळलं नाही म्हणून इथेच विचारतेय. माहितगारांनी कृपया सल्ला द्या.

आम्हांला मुंबईत रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करायची इच्छा आहे, त्यादृष्टीने घर संशोधन मोहिम सुरु आहे. सध्याचा ट्रेंड कसा आहे? म्हणजे घराचे पैसे भरताना किती ब्लॅक/व्हाईट द्यावं लागतं? ब्लॅक मध्ये व्यवहार करणं बंधनकारक असतंच कां? तसेच साधारण सिस्टीम काय असते कोणी सांगू शकेल कां?

घराचा जी एस टी कसा भरतात ?

बिल्डरला देतात की सरकारी अकाउंट ला भरतात ?

बिल्डरला दिले आणि त्याने ते पुढे सरकारला भरले , नाही भरले आपल्याला कसे समजणार ?

२०१० मध्ये पन्नास लाखांचे घर विकत घेण्यासारखे आहे का, अशी शंका निवांत पाटील सरांना होती. आता नवी मुंबईत २ बीएचकेची किमान किंमत १ कोटीच्या वर आहे. तर 10 वर्षाच्या अंतरांनी हे सिद्ध केले आहे की मालमत्ता मूल्ये वाढत आहेत. आता मला एक शंका आहे की नवी मुंबईत 2030 मध्ये 2 बीएचके मूल्य 3 कोटी असेल का?

सर्वसाधारणपणे ग्राहकांना बिल्डरला जीएसटी रक्कम भरणे आवश्यक असते. प्राप्त झालेल्या जीएसटी रकमेची त्याने भरपाईची पावती द्यावी. जर त्याने सरकारला पैसे दिले नाहीत तर ते त्याचे डोकेदुखी / नुकसान करेल

Pages