घर : खरच एक गुंतवणुक आहे काय?

Submitted by निवांत पाटील on 7 May, 2010 - 13:31

आता जवळ्पास सगळ्या मित्रांनी घर घेवुन झालय. प्रत्येकाचं बजेट कमीत कमी ४० ते ५० लाखाच आहे. (नवी मुंबई आणि पुणे). उरलेले पण आता शॉपिंग करताहेत. काहिजण एकटे कमावणारे तर थोडेफार दोघे कमावणारे... ५ ते ८ लाख डाउन पेमेंट आणि बाकि हप्ता.

आता माझं मतः खरचं एवढे पैसे "गुंतवुन" घर घेण चांगला चॉइस आहे का? त्यापेक्षा भाड्याच्या घरात रहाणे बरे. समजा एका शहरात घर घेतले आणि दुसर्या ठिकाणी चांगली ऑफर आली तर निवड करताना किती गोंधळ. कसा हिशोब लावायचा? इव्हन भाड्याने दिले तरी हप्ता आणि भाडे यांचे गणित बसत नाही. बर परत विकणे आणि दुसरीकडे घेणे हे काही सोपे वाटत नाही (मायबोली वरील अनेक अनुभव वाचुन). दुसरी गोष्ट एकदा एवढी गुंतवणुक केली कि दुसर काही करतायेण्याजोग रहात नाही. मग फक्त घर बांधुन त्यात रहाण हेच साध्य आहे का आयुष्याच?

माझ्याशी चर्चा करताना मांडलेले मुद्दे: घराची किंमत वाढ्त जाते त्यामुळे ती एक चांगली गुंतवणुक आहे. (माझ्या मते विकल्याशिवाय नाही आणि किंमत वाढली तर आपण विकणार असतो का?) जेवढे भाडे भरतो तेवढ्याच पैशात आपले घर होत. (हे गणित अजुन मलातरी कळालेल नाहीय, कोणितरी समजावुन सांगाव म्हणुन हा प्रपंच).

माझ्याबाबतीत माझे गावाकडे घर आहे आणि शेवटी नोकरी करुन झाल्यावर तिथेच जाउन रहाणार आहे. त्यामुळे हे घर घेणे "गरज वाटत नाही" या सदरात येते. जर ४० ते ५० लाख भारतात मिळत असतील (वर्षाला) तर नक्किच ४० ते ५० लाखाचे घर घेणे परवडते असे मला वाटते.

तर खरोखरच कर्ज घेउन घर घेणे म्हणजे गुंतवणुक आहे का? कि मनाचे समाधान?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो राज तुम्ही म्हणताय तसेच असते, इकॉनॉमीची वाढ सुरु होण्यासाठी दर कमी असावे लागतात. मी ते वाक्य थोडे वेगळ्या पद्धतीने लिहीले गेले आहे. कारण मग मला ईंट्रेस्ट व त्याचे परीणाम हे लिहीत बसावे लागले असते. ते टाळण्यासाठी मी थोड सोपे करायचा प्रयत्न केला होता.

टोणगा, छान पोस्ट.

खालचा व्हीडिओ जरुर पहा. ह्यात काय लॅकींग आहे बघा. मला दोन गोष्टी पटल्या नाहीत त्या लोकांचे प्रतिसाद आल्यावर लिहिते.

http://khanexercises.appspot.com/video?v=YL10H_EcB-E

मला न पटलेल्या गोष्टी (व्हिडिओतल्या):
- १००के इन्कम असलेले लोक मिलियन डॉलर्सचं घर घेत नाहित; घेत असल्यास मोठ्ठी चूक
- २५०के डाऊन पेमेंट (२५%); म्हणजे या माणसाची क्रेडिट हिस्टरी एकदम बेक्कार आहे (घर न घेण्याचं हे तर कारण नाही ना?) Happy
- व्हिडिओ कधी रेकॉर्ड केला आहे याची कल्पना नाही; पण ४% इंटरेस्ट रेट, ६% मॉर्गेज हे सगळं आता इतिहास जमा...

माझे दोन नवे पैसे!

छान आहे विडियो आर्च.
राजच्या पहिल्या मुद्द्याला अनुमोदन. १०० के कमवणार्‍या लोकांना एक मिलीयन डॉ च घर घेऊ नये. जास्त डाऊन पेमेंट करुन महिन्याचे इंन्स्टॉलमेंट अगदीच कमी करता येइल आणि मग भाडे आणि मॉर्टगेज मधली गॅप कमी होइल. मुख्य म्हणजे लवकर घर पेऑफ केलं तर फक्त प्रॉपर्टी टॅकसेस आणि मेंटनन्स चा खर्च उरतो. अमेरिकन लोकांची मुळात नजर मोठी आणि खर्च करायची तयारी जास्त असते त्यामुळे त्यांना हे विधान पटणे जरा अवघड आहे. आपण(भारतीय विचारसरणीचे) उपलब्ध करुन दिलेल्या क्रेडिट पेक्षा सहसा कमीच लोन घेतील. अमेरिकन लोकं पुष्कळ पुढे सरकतात आणि आपल्या पेक्षा जास्त क्रेडिट बिनधास्त उचलतात (आपल्य इतकच कमवुन).

वरील सगळ्या पोस्ट वाचल्या. केदार-टोणगा-वैद्यबुवांनी छान लिहीलय. मी गृहवित्त (हाऊसिंग फायनांस) या क्षेत्रात काम केलेल असल्यामुळे मुद्दाम माझे अनुभव देतोय :

  • "मुर्ख लोक घर बांधतात अन शहाणी लोकं त्यात भाड्याने राहातात अशी एक इंग्रजी म्हण आहे पण ती विनोदासाठी ठिक आहे. प्रत्यक्षात भारतासारख्या देशात घर खरेदी करणे हा अजुन किमान दोन ते तीन दशके तरी उत्तम पर्याय राहील. आपल्या पायाभुत सुविधा जसजश्या सुधारत जातील तसतशी देशाची आर्थिक स्थितीही बदलेल अन मग भाव स्थिर व्हायला सुरुवात होईल पण तोवर घर हा भारतात "अप्रिशिएटींग असेटच" राहील यात वाद नाही. काही बाजारपेठेत - मेनली मुंबईसारख्या मोठ्या शहरात-अपवाद समोर येतीलही पण ते बिल्डर लॉबीने घडवुन आणलेले असतील. ( मी वीस वर्षांपुर्वी नागपुर्/त्रिवेंद्रम्/जोधपुर सारख्या शहरात केलेल्या गुंतवणुकी आजही इतर कुठल्याही गुंतवणुकींपेक्षा जास्त रिटर्न्स देतायत..) हे झाल एक ब्रॉड समालोचन. आता वैयक्तीक पातळीवर बघुया.
    जगातले सगळे गुंतवणुक सल्लागार आयुष्याची पहीली गुंतवणुक ही घरच असावी अस स्पष्ट सांगतात.. याचे फायदे दोन : सुरुवातीस ज्यावेळेस तुमच्या जबाबदार्‍या कमी तेंव्हा आर्थिक भाषेत ज्याला"एस्टेट बिल्डींग" म्हणतात ते व्हायला सुरुवात होते व कर्ज परताव्याच्या जबाबदारीमुळे एक शिस्त येते. दुसर -कालांतराने जेंव्हा तुमच्या जाबाबदार्‍या वाढतात तेंव्हा हाच असेट एक मोठ फॉल्-बॅक ऑप्शन होऊ शकत..( जस खासगी नोकरी करतांना एक नियम मी नेहेमी नव्या मुलांना शिकवतो -- खात्यात आपल्या सहा महीन्याच्या खर्चाचे पर्से नेहेमी शिल्लक ठेवा मग तुम्ही लाचारी किंव्हा असाहयतेत नोकरी करणार नाही... तसच हेही........असो हे विषयांतर झाल)
    मासिक हफ्ता-इतर खर्च विरुद्ध भाडे हा हिशेब कधी भाड्याच्या बाजुने लागतोही पण दिर्घकाळाचा हिशेब नेहेमी कर्ज घेऊनही अक्वायर केलेल्या घराच्याच बाजुने लागतो हे मी ठामपणे सांगु शकतो.
    आपल्या देशात घर घेण्याला भावनिक्/टॅक्सेशन संबधीत असे अनेक पदर्/आयाम आहेत. मी याक्षेत्रात नोकरी करतांनाचे एकाहुन एक अनुभव आहेत पंधरा अठरा वर्षापुर्वीचे जेंव्हा लहान शहरात वित्तपुरवठा बँका करत नसत्..त्यावेळेस तिथे घर बांधायसाठी पैसा देतांना मी अनेक सिच्युएशन्स/माणसाचे अनेक रंग पाहीलेयत अन त्यावरुन सांगु शकतो... या देशात घर अन त्यासाठी कर्ज घेण हे फायद्याचच राहाणार आहे अन जनमत त्याच बाजुने राहाणार आहे.

तसेच आता रिवर्स मॉर्गेज नावाची सुविधा आहे त्यामुळे राहत्या घरावर म्हातारपणी कर्ज मिळू शकते. म्हण्जे मुलांवर आर्थिक जबाबदारी येत नाही आपली.

जरी महिण्याला भाडे मिळत नसेल तरी हा पर्याय चांगला वाटतो. कोणी calculations केली असतील तर कृपया शेअर करा. मला वाटते घराच्या किंमती पेक्षा जागेची किंमत जास्त % वाढते. >>>>

यावर माझी काही मते..
१. जमीन खरेदीसाठी बँक लोन देत नाही (दिल्यास त्यावर ३ वर्षाच्या आत घर बांधणे बंधनकारक असते.)
त्यामुळे तुमच्याकडे खरेदी किंमती एवढी रक्कम "जमा" असेल तरच हा चांगला ऑप्शन असेल. पर्सनल लोन वर १८% व्याज देऊन जमीन खरेदी करण्यात काहीच पॉईंट नाही.
२. होमलोन मुळे मिळणारा टॅक्स बेनिफिट मिळत नाही.
३. आणि जर शेतजमीन व त्यावर मेहनत घेणारे कोणी नसेल तर ती जमीन विकुपर्यंत त्यापसुन काहीच उत्पन्न येणार नाही व ती डेड इन्वेस्ट्मेंट असेल. जर शेती असेल तरी तुम्ही स्वतः लक्ष घालत नाही तोवर फारसा फायदा हातात येत नाही.
४. जर तुम्हाला त्या जमीनीचा व्यावसायिक कारणांसाठी उपयोग करायचा असेल तर नाना परवाने मिळवण्यासाठी मनुष्यबळाची गरज आहे.

फायदे:
१. तुलनेने कमी liability/इन्वेस्टमेंट. (याला मराठीत काय म्हणायचं--> जोखिम??)
२. रीसेल मध्ये depreciationहोत नाही. जे तयार घराच्या बाबतीत होतंच.
३. मेंटेनन्स कॉस्ट कमी.

भाव वाढ का झाली याच मुख्य कारण -

२००३ पर्यन्त लोन मागणारा एकटा असायचा -

आय टी मुळे (२००१ ची मंदी संपल्यावर ) बायकांना पण पुरुषां प्रमाणे संधी / पैसा मिळू लागला --------
मग दोघं मिळुन लोन मागु लागली..........
ही अवस्था ( २००३ ) पुर्वी क्वचितच बघयला मिळाली असेल.....

मागणी - पुरवठा पेक्षा हे कारण जास्त योग्य वाटतय....

गिरीशच्या पोस्ट ला पुर्ण अनुमोदन.

"मासिक हफ्ता-इतर खर्च विरुद्ध भाडे हा हिशेब कधी भाड्याच्या बाजुने लागतोही पण दिर्घकाळाचा हिशेब नेहेमी कर्ज घेऊनही अक्वायर केलेल्या घराच्याच बाजुने लागतो हे मी ठामपणे सांगु शकतो."
हे अतिशय महत्वाचे आहे. तुम्ही जर ५ वर्षाचा कालावधी धरला तर कदाचित वेगळा हिशोब होउ शकतो पण जर १५-२० वर्षाचा कालावधी असेल तर घरखरेदी कम्स आउट विनर!

राज अगदी अगदी! Happy

४ टक्के व्याज, १०० के असलेल्या माणसाची २५०के बचत, १ मिलीयनचे घर हे पाहूनच मला पुढे बघावे वाटले नाही. खानसाहेबांनी उगीच विरुद्ध बाजू मांडायची म्हणून ओढून ताणून केलेले गणित वाटते. आज वेळ मिळाला की मी असेच गणित टाकतो. Happy

कर्ज काढून घर नेहमीच महाग पडते.मागे एका वर्षात २ ते ३ पट किंमत वाढली ती स्पिकयुलेशन टाइपच वाटते.एवढ्या किमतीचे कर्ज काढण्यापेक्षा दुसर्या शहरात गुंतवणूक केलेली चांगली.आपण ज्या गोष्टीसाठी जी किंमत मोजत आहोत ती खरोखरच त्या किंमतीची आहे का हे महत्वाचे.आत्ता ज्यांनी ५० लाखांचे फ्लाट घेतले आहेत्,त्यांची किंमत लगेच निश्चित वाढणार नाही.कारण सध्याच डिल्स कमी होताहेत्.उद्या जर ह्या किंमती अशाच प्रकारे खाली आल्या तर्?कदाचित आपली व्हर्चुअल वाढलेली किंमत कमी होउन विकत घेतलेल्या एवढी आली तर हप्त्यापेक्षा भाडे परवडले असेही होइल.:d

त्या व्हिडीओत फॅलसीज आहेतच.

१. १००K च्या माणसाला मिलियन डॉलर्सच्या घरासाठी २५% down payment देऊनही loan sanction होऊ शकणार नाही
२. खरच मिलियन डॉलर्सच घर ३००० डॉलर्स भाड्यात मिळू शकेल?

पूर्वी असं मानायचे की घराची किंमत तुमच्या yearly income च्या दुप्पट असावी. आता interest rates कमी असल्यामुळे तिप्पट आणि अगदीच हाता तोंडाशी गाठ बांधायची असेल तर चौपट. पण मग इतर मजेला काट्छाट.

साधारण नियम असा की income चा १/४ monthly note मध्ये जावा. पण इतरही लोन्स म्हणजे कार लोन, स्टुडंट लोन असेल तर हिशोब त्याप्रमाणे करावा. पण महिन्याचा १/४ भाग saving असावा. घर घेताना कमीत कमी सहा महिन्याच्या नोट्स तरी saving मध्ये ठेवून द्याव्या. कधी अडचण आली, job problem असेल तर वगैरे.

गृहितक -
पुण्यात साधारण ३५ लाखाचे घर.
२० टक्के म्हणजे ७ लाख स्वतःची गुंतवणूक. पैसे नसतील तर घर घेणे हा पर्याय नाही. Happy ७ ऐवजी ३, ४ किंवा ५ ने पण हे सर्व मांडता येते.
वेटेड अ‍ॅव्हरेज व्याजदर ७.८ टक्के
एफडी करता व्याजदर ७.५ टक्के
इएमाअय. - २६,४२५
तुमचा पगार - हे मला नाही ठरवता येणार, पण एवढा इमआय फेडायला निदान वर्षाला ५.५ ते ६ लाख.

दोन ऑप्शन्स मांडले आहे.

१. घर किरायाने घेणे.
किराया व व्याज व त्यावरील टॅक्स ह्यांची नोंद घेतली आहे. किराया दर वर्षानी फक्त ३ टक्क्यांनी वाढवला आहे.

२.घर विकत घेणे..

इएमाआय, टॅक्स बेनिफीट, इव्कीटी बिल्डप व्हॅल्यू ( फक्त ५ टक्क्यांनी ) पण विचारात घेतली आहे. कारण घर घेतो तेंव्हा ते वाढणार असे गृहीत असते, व इतर गोष्टी समान राहता ते योग्य गृहीतक आहे. शिवाय घर फक्त ५ टक्क्याने वाढेल असेल गृहीत घरले आहे.

हे फार रफ गणित आहे हे मान्य, पण पूर्ण वर्षांचा विचार करता घर घेणे कसे फायदेशीर ठरते हे सर्वात शेवटच्या नेट इफेक्ट वरुन कळेल. Happy

home_Calc.png

अजून हे बरच सुधारता येईल ह्याची कल्पना आहे, कदाचित एक दोन गोष्टी राहून गेल्या असतील. पहिले चार एक वर्ष घर घेणे हे महागात पडते, पण त्यानंतर दरवर्षी ते फायद्यात जात राहते.

केदार जरा मोठ्या फाँट मध्ये टाकणार का ? व्यवस्थित दिसत नाहीये .
आणि जर १ ते १.५ वर्षात सगळं कर्जे फेडायचं म्हंटल तर घर फायद्यात पडु शकत का ?

घर कधी घ्यावं म्हणजे भाव व्यवस्थित मिळेल हे जरा सांगणे मुश्किलच वाटते. इथे अमेरिकेत वाट्टेल त्या लोकांना गृहकर्ज देऊन नंतर डिफॉल्ट झाल्यामुळे मॉर्टगेज बॅक्ड सिक्युरिटीजची पार धुळधाण उडाली. भारतात त्या मानानी कर्ज देणार्‍या कंपन्या आणि आपली एकंदरित इकॉनॉमीच जरा "कन्जर्वेटिव" असल्या मुळे कर्ज वाट्टेल त्या लोकांना मिळणे अवघड होते. हे सांगायचं कारण, भारतात फ्लॅट्सच्या किमती जर वाढल्या असतील तर माझ्य मते टोणग्यानी वर सांगितलय तसा काळा पैश्याचा व्यवहारानी थोड्याफार प्रमाणात पण मुख्यतः वाढत्या लोकसंखेमुळे, प्रगत होणार्‍या आपल्या इकॉनॉमी मुळेच वाढत असाव्यात. थोडक्यात फर वेगात नाही तर "स्टेडी" पेस मध्ये किमती वाढतच राहतील. त्यामुळे भाव पडतील ह्या भितीनी भाड्यानी घर घेऊन राहाणे योग्य निर्णय वाटत नाही.

गुगल डॉक्सवर फाईल अपलोड करेन, पण ते नेमके ऑफिसमधून चालत नाही.

घराच्या किमती काळ्यापैश्या मुळे वाढल्या नाहित असे माझे म्हणने आहे. Happy ते मी आधीही हुडाच्या की टोणग्याच्या परतोनि पाहू वरच्या प्रश्नावर मी मांडले आहे. ( दर हारणारी मॅच फिक्स आहे असे म्हणन्यासारखे आहे ते.) किमती ह्या डिमांड / सप्लाय रेशोमुळे पुण्यात अन मुंबईत वाढत आहे, तेवढी जागाच नाही तर किमती वाढणारच ! हां एकदम ग्रोथ का? तर २००३ नंतर पुण्यात किती आयटी कंपन्या आल्या वर एकदम किती पगार वाढले ह्याचे गणित मांडले की उत्तर लगेच मिळेल. तिकडे २००३ ते २००८ मध्ये लोकांचे पगार कधीकधी १०० टक्यांनी वाढत होते.

मुर्ख लोक घर बांधतात अन शहाणी लोकं त्यात भाड्याने राहातात वपुंच्या एका पुस्तकातही हे वाक्य आहे...

आपण जेव्हा घरासाठी कर्ज घेतो, तेंव्हा १५ ते २० वर्षाच्या टर्ममध्ये आपण त्याच्या ३-५ पट पैसे भरत असतो... मला हे कॅल्क्युलेशन जास्त महत्वाचे वाटते.. म्हणजे २० वर्षत घराची किंमत किमान ४-५ पट झाली तरच आपण फायद्यात रहाणार...

केदार एक शंका : इव्कीटी बिल्डप व्हॅल्यू दर वर्षी ५ % का? म्हणजे हे गृहितक बरोबर वाटते का? मध्ये घरांच्या किंमती २५ ते ३० % कमी झाल्या असे पेपरला वाचले होते. ( खरे खोटे माहित नाही). समजा असा एखादा प्रसंग २० ते ३० वर्षात आला. तर ती शक्यता गणितात मांडता येइल का? कारण फक्त इव्कीटी बिल्डप व्हॅल्य हाच एक्मेव मुद्दा फायदा करुन देणार आहे.

केदार, एक प्रश्न. कर्जाचे सुरवातीचे हफ्ते व्याज जास्त आणि मुद्दल अगदी कमी असे असतात. तर नेमकं किती व्याज आणि किती मुद्दल ह्याचे प्रमाण पण ठरलेले असते का?
पाटील, आता गृहितक मांडताना पुढे भाव कसे वाढतील किंवा कमी होतील हे कसं गृहित धरणार? त्यामुळे आता एखादी लो एंड ला असलेली एक्वीटीची टक्केवारी घेतलेलीच बरी नाही का? नंतर ज्या वर्षी तुम्हाला घर विकायचं आहे त्यावेळी चालु असलेल्या भावांवर तुमचा फायदा तोटा ठरेल.

पाटील - ५ टक्केच गॄहीत घरण्यामागचे कारण. - निदान १५ वर्षात घर दुपटी पर्यंत जाईल हे आहे. हे गृहीतक (५ टक्के) अत्यंत कमी आहे. घराच्या किमती २५ टक्यांनी कमी झाल्या ही हुल आहे. खरे तसे नाही. आणि ते खरे असले तरी ० ते १५ वर्षात मार्केट मध्ये दोनदा बबल येउन जाते. ( ८ वर्षाची सायकल असते साधारण) तेंव्हा ते अ‍ॅव्हरेज होईल. सह्कारनगर, सिंहगड रोड, जुने पुणे इथे आजही १ करोडला लोक घर घेतात कारण जागा नाही. घेणारे लोक आहेत म्हणून घर विक्री होतात.

किती व्याज आणि किती मुद्दल ह्याचे प्रमाण पण ठरलेले असते का? ->> हो.

शिवाय त्यामध्ये मी प्रिपेमेंट ० ठेवले आहे. पण ६० टक्के उदाहरणात असे दिसून येते की लोक प्रि पे करुन व्याज वाचवतात. तो फायदा त्या एक्सल साठी विचारात घेतला नाही.

सगळ्याचा पोस्ट उत्तम आहेत
तसेच अमा ने सान्गितलेला रिवर्स मॉर्गेज चा मुद्दा पण फायदेशीर आहे.
पण त्या करता तुमच स्वताच घर पाहीजे
म्हणुनच घर विकत घेण कायमच फायदेशीर.

ही सगळी चर्चा घर खरेदी ही गुंतवणूक होऊ शकते का या मूळ बीबीच्या मुद्द्याला धरून चालली आहे. मी ज्याना पहिलेच घर घेता येत नाही त्या लोकांच्या दृष्टीने लिहीत होतो. त्यामुळे ते जरा असंबद्ध वाटत असेल...

तिकडे २००३ ते २००८ मध्ये लोकांचे पगार कधीकधी १०० टक्यांनी वाढत होते.
>> माझेही हेच मत आहे. आता पुन्हा attrition सुरु झाले आहे, लोकाना ४० % पगार वाढ मिळु लागली आहे.
अमरावती,कोल्हापुर,सांगली इथेही दरवाढ सहाव्यावेतन आयोगाच्या क्रुपेने sustain होणार.

आपण जेव्हा घरासाठी कर्ज घेतो, तेंव्हा १५ ते २० वर्षाच्या टर्ममध्ये आपण त्याच्या ३-५ पट पैसे भरत असतो... मला हे कॅल्क्युलेशन जास्त महत्वाचे वाटते.. म्हणजे २० वर्षत घराची किंमत किमान ४-५ पट झाली तरच आपण फायद्यात रहाणार...
>> absolutely right, पण होते काय की पहिल्या घराला हे logic लावताच येत नाही, कारण भाड्याच्या घराची insecurity कुणालाच नको असते.

तसेच अमा ने सान्गितलेला रिवर्स मॉर्गेज चा मुद्दा पण फायदेशीर आहे.>>>>>> रिवेर्स मॉर्टगेज वर छोटं कर्ज घेतलं तर ठीक आहे. मी स्वतः रिवर्स मॉर्टगेज पासुन सहसा लांबच राहायचा प्रयत्न करीन. एकदा नोकरी मधुन निवृत्त झाल्यावर येणार्‍या मिळकतीवर फार भार नकोच. चल्लन्वाढ आणि बाकी मुद्दे बघता पेन्शन, ४०१ के वगैरे मधुन येणारे पैसे कितपत पुरतील ह्यात शंका आहे. आजकाल तर १ मिलीयन डॉ(अमेरिकेत) सुद्धा तुम्हाला जर तुम्ही खुप जगलात (८५ च्या वर) तर पुरतील की नाही यात शंका आहे. नोकरी गेल्यावर येत असलेल्या पैश्यात भागवायला फक्त एकच मार्ग, खर्च कमी करणे. सगळ्यात चांगला काळ नोकरदारांना त्यांची मुलं कॉलेज संपवुन स्वतःच्या पायावर उभे राहतात तेव्हा असतो. नोकरी ही चालु असते, त्यात घरं वगैरेची कर्ज चुकते झालेले असतात (होपफुली) आणि एकदा मुलं बाहेर पडली की खर्च अजुनच कमी होतो.

भारतात गुंतवणुकीसाठी घर (extra) घेउन ते भाड्याने देणे योग्य आहे का? जर का भाडेकरुने घर सोडायला नकार दिलाच तर काय option आहे ? भारतातले कायदे भाडेकरुच्या बाजुने आहेत का अजुनही? नसतिल तरी law implementaion किती करु शकतो आपण ? मग ति एक डोकेदुखी होउ शकते. हा एक risk factor आहेच. थोडक्यात : हे इतके सोपे आहे का?

इथे अमेरिकेत हा blog famous आहे. http://patrick.net/housing/crash.html

भारतात गुंतवणुकीसाठी घर (extra) घेउन ते भाड्याने देणे योग्य आहे का?>>>> इथे राहुन जरा किचकट वाटतय. सध्याच वातावरण पहाता (दहशतवाद) भाडेकरु कोण आहे/ कसा आहे/ काही कायदेबाह्य गोष्टी करेल का? पोलिस घरमालकाला पण खुप पिडतात... आपण तिथे असु तर ठीक आहे.

रिवर्स मॉर्गेजमधे पेन्शन पण असते ना की फक्त कर्ज?

मी जे वाचले होते त्यानुसार, बँक तुम्हाल तुम्ही मरेपर्यंत पेन्शन देणार (it will be proprtionate to market value of your home) आणि मग तुमच्यानंतर घर त्यांचे ,मला फक्त एक भीती वातते ह्यात, तुमचे घर हडप करण्यासाठी बँक जर unethically वागली तर काय? म्हातारपणी कसे हाताळणार ते? ICICI सारख्या बँकानी तर गुंड पाळलेले असतात. nationalised banksपण मागे नाहीत ह्यात.

Pages