आयसीसी टि२० विश्वचषक २०१०

Submitted by केदार on 20 April, 2010 - 10:01

यंदाचा आयसीसी टि२० विश्वचषक वेस्ट इंडिज मध्ये ३० एप्रिल ते १६ मे दरम्यान खेळला जाणार आहे.
भारतासोबत क ग्रूप मध्ये अफगाणीस्थान व साउथ अफ्रिका हे देश आहेत.

टीम मध्ये दुखापतीमुळे सेहवाग नसणार अशी बातमी वाचली. त्याऐवजी मुरली विजय खेळत आहे.

वर्ल्डकप विषयीचे मत व त्यावर चर्चा करण्यासाठी हा धागा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

राज्दीप सरदेसाई ट्विटर वर :st lucia pub owner to ibn: there was no fight, only an exchange of words. yet, we call it a 'brawl'!
सेंट लुशिया चा पब मालक आय्बीएन ला: कसलीही मारामारी नाही, फक्त बाचाबाची.

(काही लोक तिथे भारतीय खेळाडूंची टर उडवत होते बहुधा.)

सुनील गावसकर ट्विटर वर : भारतीय खेळाडूंचे तंत्र हे पराभवाचे खरे कारण, आयपीएलच्या पार्ट्या हे नाही.

इंग्लंडचा खेळ खरंच बहरतोय. ऑसीजचा वरचष्मा असला तरी आफ्रिदीच्या नेतॄत्वाखाली बर्‍याच वर्षानी पकिस्तानी संघात कोणतीच धुसपुस नसावी असं जाणवतंय. त्यांची मॅच "स्पिरीटेड" होणार, हे निश्चित !

ह्या लोकांना पबमध्ये पाहून चाहत्यांनी टोमणे मारले, काही काळ ह्यांनी ऐकून घेतलं आणि मग नेहरा मारामारी करायला गेला. शेवटी म्हणे युवराज प्रकरण चिघळू नये म्हणून मधे पड्ला. ऐकावं ते अजबच. नुस्ती शाब्दिक बाचाबाची झाली तर नेहराचे कपडे काय आपोआप फाटले का? Happy

आता गॅरी कर्स्टनचा रिपोर्ट काय म्हणतो पाहू. त्याने आधीच बरेच खेळाडू ओव्हरवेट आहेत आणि फिटनेस राखण्याबद्दल उदासीन आहेत असं म्हटलंय. तसंच मी स्वतः ४२ असून त्यांच्यापेक्षा जास्त फिट आहे असं म्हणालाय.

न्युज चॅनेल्स झाडे लावावी तशा बातम्या पेरतात, याच संदर्भात खुद्द राजदीप सरदेसाई.
सचिन तेंडुलकर अकदा हॉटेलात पडला होता तेव्हा काय काय संशोधन झाले होते आठवा!

पाकिस्तान १९१ ऑस्ट्रेलिया ४ ष्टकात ३५/२. आता कुणाच्या बाजूने सामना बघायचा?
पाकिस्तान सलग तिसर्‍यांदा फायनल मधे जाणार की ऑस्ट्रलियाच्या मुकुटात नसलेले शेवटचे रत्नही त्यांना मिळणार?

शेवटच्या सोळा चेंडूंत ५३ धावा!!
विजिगिषु वृत्ति म्हणतात ती हीच!

एकेकाळी इंग्लंड व ऑस्ट्रेलिया हे सर्वात चांगले संघ होते. बाकीचे कुठेतरीच होते. आता पुनः त्या संघात सामना.

<<असा सामना अनेक दिवसात बघितला नव्हता. ( सच्याची १७५ च्या इनिंग नंतर) केवळ उच्च.>> संपूर्ण अनुमोदन !
काल तरी पाकिस्तानी खेळाडूना "पाकडे" म्हणणं क्रिकेटचाच घोर अपमान केल्यासारखं झालं असतं !!

काल उमराव अकमलने ओठाला हिरवा चुना लावूनसुद्धा, शुक्रवार असूनसुद्धा आणि कमरान अकमलने पाकड्यांचे क्षेत्ररक्षण चालू असताना पूर्ण २० षटके भेसूर आवाजात अखंड बडबड करून सुद्धा पाकडे हरले. ऑस्ट्रेलियन्स खर्‍याखुर्‍या चॅम्पियनसारखे खेळले. त्यांची फलंदाजी चालू असताना व २० पैकी साडेएकोणीस षटके सामना पूर्णपणे पाकड्यांच्या बाजूला झुकलेला असताना सुद्धा कांगारूंचा आत्मविश्वास कायम होता. शेवटच्या ५ षटकात जिंकण्यासाठी ७० धावांचे अशक्यप्राय आव्हान (६ गडी बाद झालेले असताना) त्यांच्यासमोर होते तरीसुद्धा त्यांची देहबोली शेवटपर्यंत सकारात्मक होती. शेवटच्या चेंडूपर्यंत पराभव मान्य करायचा नाही व प्रत्येक सामना जिंकण्यासाठीच खेळायचा या त्यांच्या वृत्तीमुळे ते जिंकले.

अंतिम सामन्यासाठी माझा पाठिंबा कांगारूंनाच !

कालचा सामना अशक्य झाला.

शेवटच्या चेंडूपर्यंत पराभव मान्य करायचा नाही व प्रत्येक सामना जिंकण्यासाठीच खेळायचा या त्यांच्या वृत्तीमुळे ते जिंकले>>> भारताकडे नेमके हेच कमी पडतेय. आता जो तो उठून हरण्याचा दोष आयपीएलला देता येणार नाही हे बोलतोय (गांगुली, माही, गावस्कर इत्यादि) मग हरण्याचा दोष द्यायचा कुणाकडे तेही एकदा सांगून टाका ना!!!

युवराजचे पोट चांगले गरोदर बाईसारखं दिसतय आणि तरी त्याला फिटनेसची चिंता नसेल तर जबाबदार कोण? टीम निवडणारे/खेळणारे की बीसीसीआय????

एकुणच ह्या नव्या ब्रिगेड मध्ये डिसेन्सी जरा कमीच आहे!
क्रिकेट हा जंटलमन्स गेम राहिला नाहिये हेच खरे!

इंग्लंडने क्षेत्ररक्षण तर अप्रतिम केलंय. चँपियन्ससारखं ! कॉलींगवूड या चषकाची आपली सर्वोत्तम खेळी आज करेल असं मला सतत कां वाटतंय ?

<<(मधुमेह नसला तर)>>प्रसिद्ध धोनि अँड कंपनीच्या सुपरआठच्या तीन कडू गोळ्यांचा स्ट्राँग डोस घेतल्याने सध्यातरी मधुमेहाची काळजी नाही !

कॉलिंगवुड योग्य वेळी आलाय. विश्वचषक जिंकणार म्हणुन इन्ग्लन्ड घाबरले का असे वाटले २ विकेट चटकन गेल्यावर.

इंग्लंड च्या बाबतीत बोलताना कायम 'Always the bridesmaid but never the bride' असे म्हणत कारण त्यांनी आत्तापर्यंत एकही 'विश्व' कप स्पर्धा जिंकलेली नव्हती. त्यामुळे जरा चांगले वाटले इंग्लंड जिंकले हे. एरव्ही कधीही त्यांना पाठिंबा दिल्याचे आठवत नाही.

इंग्लंड ने जिंकलेली कोणतीही स्पर्धा - मला आठवते ती १९९७ मधे डिसेंबरला शारजात एक जिंकली होती. कदाचित आत्तापर्यंत या दोनच असाव्यात.

This time, the bridesmaid was certainly prettier than the bride, ........ notwithstanding her "Sidebottom " !:हहगलो:
इग्लंडची पारंपारीक उच्चभ्रू आखडूगिरी सोडून इंग्लीश खेळाडू बेफाम नाचताना पाहून बरं वाटलं ... सुधारताहेत लेकाचे !

Pages