आयसीसी टि२० विश्वचषक २०१०

Submitted by केदार on 20 April, 2010 - 10:01

यंदाचा आयसीसी टि२० विश्वचषक वेस्ट इंडिज मध्ये ३० एप्रिल ते १६ मे दरम्यान खेळला जाणार आहे.
भारतासोबत क ग्रूप मध्ये अफगाणीस्थान व साउथ अफ्रिका हे देश आहेत.

टीम मध्ये दुखापतीमुळे सेहवाग नसणार अशी बातमी वाचली. त्याऐवजी मुरली विजय खेळत आहे.

वर्ल्डकप विषयीचे मत व त्यावर चर्चा करण्यासाठी हा धागा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तरी शेवटी हसी चाललाच.

जर बांग्लाने १४ ते १५ ओव्हर मध्ये हे रन काढले तर पाक बाहेर ! गो बांग्ला.

पाकला बाहेर काढण्यासाठी १४ ते १९ षटकांमध्ये काढायच्या होत्या धावा. त्याआधी केल्या असत्या तर AUssies बाहेर गेले असते. पण बांगलाने बहुतेक पुरे झालं क्रिकेट असा विचार केला असावा Happy

ट्वेंटी२० मधे आत्तापर्यंत तरी फारसा रस नव्हता पण नुकतेच हर्षा भोगलेचे 'आउट ऑफ दि बॉक्स' वाचायला घेतले आणि क्रिकेटच्या ह्या फॉरमॅटमधेही रस वाटायला लागलाय Happy

आज आपण आणि ऑस्ट्रेलिया. माझी तरी पहायची हिंमत नाहिये. Sad

कालच्या मॅचमध्ये पण तो अकमल जीव खाऊन ओरडत होता शेवटच्या बॉलपर्यंत. एक चेंडू मेल्याच्या तोंडावर का बसला नाही कोणास ठाऊक. शेवटी हरले तेव्हा त्याचा आवाज बंद झाला.

>>>>एक चेंडू मेल्याच्या तोंडावर का बसला नाही कोणास ठाऊक.. Lol
चेंडू पण वैतागला असेल त्याच्या बडबडीला.. चांगल्या जागी पडावं म्हणून जमिनीवरच पडत होता. Proud

<<चेंडू पण वैतागला असेल त्याच्या बडबडीला.. चांगल्या जागी पडावं म्हणून जमिनीवरच पडत होता.>> खरंय; पीटरसनने टोलावलेले क्षेत्ररक्षकांच्या हातातले झेलपण म्हणूनच जमिनीकडेच उडी घेत होते !

ऑसीज बेकार मारतायत रे Sad जडेजा खिरापत वाटतोय, युसुफ आणि युवराज पण निष्प्रभ ठरतायत.
आपल्या फलंदाजांनी पण अशीच हाणामारी करावी.

तुडव तुडव तुडवला ऑसीजनी.. पहिली ओव्हर मेडन टाकता काय.. उट्टंच काढलं....

आता आपले हिरो बघायचे काय करतात ते..

गाठली. आता जरा जरा जमायला लागले. दोन षट्कार, एक चौकार. आजून पाच सहा जण असते, तर गाठले असते ऑस्ट्रेलियाला!!!

काय फायदा?

१. विजयला घेऊ नका. (तिन्ही मॅचेस मध्ये काय दिवे लावले ते पाहत आहोतच.)
२. जडेजाला हकलून एक फास्ट बोलर आणा.
३. पठानला बॅटींग करायची आहे ह्याची पण समज द्या.

>>> आता आपले हिरो बघायचे काय करतात ते..

>>> १. विजयला घेऊ नका. (तिन्ही मॅचेस मध्ये काय दिवे लावले ते पाहत आहोतच.)
२. जडेजाला हकलून एक फास्ट बोलर आणा.
३. पठानला बॅटींग करायची आहे ह्याची पण समज द्या.

युसुफ पठाण, मुरली विजय, रवींद्र जडेजा हे IPL च्या फेस्टिव्हल सामन्यातले हिरोज आहेत. इतर कोणत्याही प्रकारच्या सामन्यात आंतरराष्ट्रीय सामन्यात त्यांची फॅ फॅ उडते. युसुफ पेक्षा त्याचा भाऊ शतपटीने चांगला आहे.

T-20 Worldcup-2 चीच पुनरावृत्ती होणार असं वाटतंय.

आज ऑस्ट्रेलियाने जडेजाच्या लागोपाठ ६ चेंडूवर ६ षटकार मारले. त्याच्या पहिल्या षटकाच्या शेवटच्या ३ चेंडूंवर वॉटसनने तर त्याच्या दुसर्‍या षटकाच्या पहिल्या ३ चेंडूंवर वॉर्नरने षटकार मारले.

आज जसे हथियार फेकले ते पहाता आपण मुळीच जिंकु नये हा वर्ल्ड कप !
२००३ ची पहिली आणि शेवटची मॅच आठवली.. दोन्ही ऑस्ट्रेलिया विरुध्द आणि दारुण पराभव !

मला धोणीचा राग .. हो रागच आणखी एका गोष्टीमुळे जास्त आला.

पोस्ट मॅच मध्ये शास्त्रीने प्रश्न विचारल्यावर त्याला रोहित शर्माला त्याचे ड्यु क्रेडीट देता आले असते, पण त्याने दिले नाही. तेच धोणी कॅम्प मधून कोणी मारधाड केली असती तर त्याने मुद्दाम विषय काढून तसे क्रेडीट दिले असते.
हा कद्रुपणा नाही आवडला. तो म्हणून शकला असता, ज्या पद्धतीने शर्मा मारत होता, आणखी एक बॅटसमन राहिला असता तर आम्ही जिंकलो असतो. त्याने थोडे मॉरल बुस्ट झाले असते. नाहीतरी भज्जी ज्या रितीने क्लिन स्टाईक करत होता ते पाहून आपल्या वरच्या फळीने जमालगोटा खाऊन बॅटींग केली हे सिद्ध होतेच.

WI ची गत पण आपल्यासारखीच झाली. जयवर्धनेचा जसा खेळतो ते बघता लंका जड जाईल. नेमका संगकारा परत निट खेळायला लागला.

तरी रविवारसाठी सज्ज .. बघू काय होते ते.

>>> मला धोणीचा राग .. हो रागच आणखी एका गोष्टीमुळे जास्त आला.

धोनीचे डावपेच समजलेच नाहीत. संघात दोनच जलदगती गोलंदाज घेतले पण सकाळच्या वातावरणाचा फायदा उठवायचा म्हणून नाणेफेक जिंकूनसुद्धा गोलंदाजी घेतली. त्यावर कडी म्हणजे सकाळच्या वातावरणात पहिल्या ६ पैकी ४ षटके फिरकी गोलंदाजांना दिली.

चार अतिवेगवान गोलंदाज घेऊन खेळणार्‍या ऑसीजविरोधात फलंदाजी करतानाची व्यूहरचना
साफच चुकली असावी. चेंडुच्या वेगाचा अंदाज घेण्याआधीच बॅट फिरवण्याचा आततायीपणा नडला,
हे स्पष्ट होतं. रोहित शर्माने एक-दोन धावांवर सुरवातीला समाधान मानून नंतर धाववेग वाढवलाच ना !
गोलंदाजीचा अचूक अंदाज घेऊन संपूर्ण डावाची त्यानुसार आंखणी करणार्‍या सचिनसारख्या परिपक्व
फलंदाजाचा अभाव, हाच या प्रतिभावान खेळाडूनी भरलेल्या संघाचा कच्चा दुवा वाटतो.

तो कमरान अकमल वाईडला पण शाबस म्हणतोच. फार डोक उठवतोय तो, म्युट करुनच पाहावे लागणार.

पाक जवळजवळ ह्या स्पर्धेतून बाहेर गेले. न्युझीलंडची शेवटची ओव्हर जबरी होती. Happy

न्यूझीलंडने जबरदस्त झुंज देऊन केवळ १ धावेने सामना जिंकला. त्यांनी हॉपकिन्सला बसवून मॅकलमला क्षेत्ररक्षणाची जबाबदारी दिली पाहिजे व ओरामला आत आणले पाहिजे.

गुरुजी, क्षेत्ररक्षण की यष्टीरक्षण. मला किवी टीम आवडते...ते gentlemen's cricket खेळतात, कदाचित दादागिरी करण्यासारखे काही केले नाही म्हणुन असेल्...पण शेजार्‍यांपेक्षा खूप सज्जन्...पहा जॉन राइट वि. ग्रेग चॅपेल्..किंवा पाँटिंग /फ्लेमिंग..व्हेटोरी आजच्या काळातला सर्वोत्कृष्ट डावखुरा फिरकी गोलंदाज आणि अष्ट्पैलू खेळाडू.

<<व्हेटोरी आजच्या काळातला सर्वोत्कृष्ट डावखुरा फिरकी गोलंदाज आणि अष्ट्पैलू खेळाडू.>> शिवाय,
कसलेला क्प्तान होण्याच्या मार्गावर असलेला... कालच्या पाकविरुद्धच्या कमालीच्या अटीतटीच्या सामन्यात
त्याचं संतुलन कौतुकास्पद होतं; मला तर ऑस्ट्रेलीयाच्या बॉर्डरच्या जागरूक स्थितप्रतिज्ञतेचीच आठवण झाली !

धोनिचा गान्गुली व्हायला लागलाय .
दादा जसा दिनेश मोन्गिया मेव्हणा असल्यासारखा कायम खेळवायचा तस धोनिच जडेजा साठी चाललय .
युसुफ पठाणलाही कमीत कमी ५ मॅचमधे एकदा तरी फायर व्हायची सक्ती करायला हवी .१० मधे १दा तर हरभजनही धुवुन जाईल .

धोनीचं आजकाल सर्व अनाकलनीय चालू आहे... रविंद्र जडेजा सारखा yz खेळाडू संघात पुन्हा पुन्हा येतो कसा?
अरे त्याला "ऊचला" रे! तो आजही आपल्याला सामना हरवून देणार!

Pages