आयसीसी टि२० विश्वचषक २०१०

Submitted by केदार on 20 April, 2010 - 10:01

यंदाचा आयसीसी टि२० विश्वचषक वेस्ट इंडिज मध्ये ३० एप्रिल ते १६ मे दरम्यान खेळला जाणार आहे.
भारतासोबत क ग्रूप मध्ये अफगाणीस्थान व साउथ अफ्रिका हे देश आहेत.

टीम मध्ये दुखापतीमुळे सेहवाग नसणार अशी बातमी वाचली. त्याऐवजी मुरली विजय खेळत आहे.

वर्ल्डकप विषयीचे मत व त्यावर चर्चा करण्यासाठी हा धागा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद फारेंडा. सालं पैसे भरायचं काही नाही पण दिवसा मॅची असल्या की बघायला पण मिळत नाही. शेवटी क्वार्टर्स च्या आस पास घेइन पॅकेज. मागच्या वेळी असच केलं होतं. काय धमाल आली होती बॉ बघायला. माझी ट्रेन मिस होता होता वाचली होती आपल्या फायनल च्या वेळी.

हो मी. IPL + WC मिळून १२० ला दिले होते त्यांनी. मला वाटले नंतर ते ८० ला करणार म्हणून मी एकत्र घेतले.

फॉर्मात येण्याआधीच गंभीर लाडात कां आला[ ६ चेंडू ४ धावा]? अफगाणिस्तान गोलंदाज अनुभवी असल्यासारखे वाटतात.

शेवटी जिंकलो एकदाचे आफ्रिकेविरूद्ध. जो सामना ३०-४० धावांच्या फरकाने जिंकायला पाहिजे होता तो फक्त १४ धावांनी जिंकलो. शेवटच्या ६ षटकात आफ्रिकेला जिंकण्यासाठी ९३ धावा हव्या होत्या. त्यावेळी प्रवीणकुमारची ३ षटके व नेहराची २ षटके शिल्लक होती. पण धोनीने ६ पैकी ४ षटके फिरकी गोलंदाजांना दिली व उरलेली २ नेहराला दिली. प्रवीणकुमारला एकही षटक दिले नाही. आफ्रिकेने फिरकी गोलंदाजांच्या ४ षटकात ६१ धावा केल्या तर नेहराच्या २ षटकात १७ धावा निघाल्या. नशीबानेच जिंकलो म्हणायचे. धोनीची प्रवीणकुमारला वाया घालविण्याची व बदडत असताना सुद्धा फिरकी गोलंदाजांना चालू ठेवण्याची चालच कळली नाही.

रैना जबरदस्त खेळला. युवराजही मस्त खेळला. त्याच्या आजच्या खेळावरून लक्षात आले की तो IPL मध्ये मुद्दामच वाईट खेळत होता.

त्याच्या आजच्या खेळावरून लक्षात आले की तो IPL मध्ये मुद्दामच वाईट खेळत होता.>>>
त्याच्या टीमने एक मॅच जिंकली. शेवटच्या रनच्या वेळी सगळे उठुन उभा राहिले होते टाळ्या वाजवत आणि हा हिरा खुर्चीला फेव्हिकॉल लावल्यासारखा बसला होता. मग नाइलाजाने उठुन टाळ्या वाजवत होता हे पाहिल नाहि का??
रैना फॉर्मात आहे ते बरय...

प्रवीणकुमारला बॉलिंग का नाही दिली ? हा प्रश्न मलाही पडलाय. त्याने एका ओव्हरमधे फक्त ३ धावा दिल्या होत्या. त्याला काही दुखापत होती का? नेटवर कुठे काही उल्लेख आहे का ह्याचा?

क्रिकईन्फो च्या मतानुसार, विजयाची खात्री झाल्यामुळे हे प्रयोग केले गेले.

>>प्रवीणकुमारला बॉलिंग का नाही दिली ? हा प्रश्न मलाही पडलाय.

आमच्या घरी तर रणकंदन झालं ह्यावरून. माझ्या भावाने धोनीने पैसे खाल्लेत इथपर्यंत त्याला शिव्या घातल्या. Happy ऑस्ट्रेलियाची शेवटची पडझड पहावली नाही. तो पाकिस्तानचा विकेटकीपर एव्हढा का ओरडत होता सारखा? मला तर वाटलं होतं की कोणीतरी ऑस्ट्रेलियन बॅट्समन त्याच्या डोक्यात बॅट घालणार आता.

त्याच्या आजच्या खेळावरून लक्षात आले की तो IPL मध्ये मुद्दामच वाईट खेळत होता>>> आखिर वो युवराज है!!!! उससे पंगा लोगे तो पछताओगे.

>>> तो पाकिस्तानचा विकेटकीपर एव्हढा का ओरडत होता सारखा?

तो कामरान अकमल प्रत्येक चेंडू पडल्यावर "शाबाश" "शाबाश" असे ओरडून वैताग आणत असतो. कितीही घाण चेंडू टाकला तरी त्याच्या तोंडाची टकळी काहि थांबत नाही. ICC ने त्याला तोंडावर पट्टी बांधण्याची सक्ती करावी.

ICC ने त्याला तोंडावर पट्टी बांधण्याची सक्ती करावी. >> मोरे/मोंगिया ही असाच वात आणंत. मोरेची मियांदाद ने केलेली १९९२ च्या विश्वचषकातील नक्कल आठवतीये.

>>> मोरेची मियांदाद ने केलेली १९९२ च्या विश्वचषकातील नक्कल आठवतीये.

तो मोरे नव्हे. मियांदाद ने १९८५ च्या बेन्सन अँड हेजेस कपच्या अंतिम सामन्यात सदानंद विश्वनाथच्या आक्रमक क्षेत्ररक्षणाला व त्याच्या बडबडीला वैतागून त्याच्यावर दबाव आणण्यासाठी खेळपट्टीजवळ कान धरून बेडूकउड्या मारून दाखविल्या होत्या. त्यानंतर सदानंद विश्वनाथ एकदम गप्प झाला.

हो. १९९२ ला सुद्धा जावेद ने बेडू़कउड्या मारल्या होत्या. मी ते विसरलोच होतो. मला फक्त १९८५ चे आठवत होते.

जयवर्धनेने शतक केले. गेला लगेच तो बाद होऊन.

>>तो कामरान अकमल प्रत्येक चेंडू पडल्यावर "शाबाश" "शाबाश" असे ओरडून वैताग आणत असतो.<< अगदी अगदी, बॅट्समनला राग कसा येत नाही Happy

मोरेची मियांदाद ने केलेली १९९२ >>>
मिंयादादने माकडउड्या की बेडुकउड्या मारलेल्या आठ्वत आहेत.
पण हा जावेद मिंयादाद कुठे धुतल्या तांदळासारखा होता.
तो तर टोनी ग्रेगच्या हाताखाली स्लेजींग मध्ये मास्टर झालेला होता.

मलाही ८५ वाल्या उड्या आठवत नाहीत. फक्त ९२-वर्ल्ड कप मधल्याच आठवत आहेत.

जावेद ने भारताला ८७ पर्यंत हैराण केले. पण ९२ पासून आजपर्यंत त्याचा आपण कायम पोपट केलेला आहे.

>>> मलाही ८५ वाल्या उड्या आठवत नाहीत.

सुनील गावसकरच्या "One Day Wonders" मध्ये सुद्धा याचा उल्लेख आहे.

जावेद एक 'लव्हेबल बास्टर्ड' होता. शेवटच्या बोलवर सिक्स (त्या काळात)मारण्याची त्याची जिगर होती. तशी तो पिचवर असेपर्यन्त प्रतिपक्ष कधीही निश्चिन्त होऊ शकत नसे. तो माकडचाळे करी पण त्याने क्रिकेट करीअर सिरियसलीच केले. मुम्बैला आल्यानन्तर बाळासाहेब ठाकरेंना भेटण्याची दिलदारीही त्याच्यात होती. बाळसाहेबानीही त्याच्या 'त्या ' सिक्सरची याद काढून त्याला दाद दिली....

""तो कामरान अकमल प्रत्येक चेंडू पडल्यावर "शाबाश" "शाबाश" असे ओरडून वैताग आणत असतो. कितीही घाण चेंडू टाकला तरी त्याच्या तोंडाची टकळी काहि थांबत नाही. ICC ने त्याला तोंडावर पट्टी बांधण्याची सक्ती करावी.""

मी काही वेळा (अशा वेळी जास्त)टीव्ही मूक करून्...एफ एम वर समालोचन ऐकतो.
यात आणखी एक फायदा म्हणजे रेडिओवर समालोचन काही क्षण आधी येते..इथे चौकार गेल्यावर टीव्हीवर गोलंदाज चेंडू टाकताना दिसतो. त्यामुळे सतत टीव्ही पहावा लागत नाही..इतर कामे करता करता मॅच पहाता येते.

यंदाचा विश्वचषक रटाळ वाटतोय, कदाचित पावसामुळे रद्द झालेल्या सामन्यांमुळे असेल किंवा IPL ची सवय झाल्यामुळे असेल.

>>> उद्या भारत वि. श्रीलंका मॅच. टफ होइल.

गेल्या एक-दीड वर्षात भारत व श्रीलंका इतक्या वेळा एकमेकांशी खेळलेले आहेत की आता पुढची किमान ५ वर्षे तरी त्यांनी एकमेकांशी खेळू नये.

उद्या भारत वि. श्रीलंका नाहीये.

भारताच्या सुपर ८ मधील मॅचेस अश्या आहेत.

Fri May 7

13:30 GMT | 09:30 Local
09:30 EDT | 08:30 CDT | 06:30 PDT India v TBC* at Bridgetown, ICC World Twenty20

* अजून टीम माहित नाही.

Sun May 9

13:30 GMT | 09:30 Local
09:30 EDT | 08:30 CDT | 06:30 PDT West Indies v India at Bridgetown, ICC World Twenty20

Tue May 11

17:00 GMT | 13:00 Local
13:00 EDT | 12:00 CDT | 10:00 PDT India v Sri Lanka at Gros Islet, ICC World Twenty20

ह्यातील दोन मॅच जिंकने अवघड नाही असे आत्ता तरी वाटत आहे. ( WI व लंका)

बांग्लादेशने ऑस्ट्रेलियाचे नाक दाबलंय..६५-६ /१२.५ षटकात.
शेवटपर्यंत डोके पाण्याबाहेर काढू देऊ नका...आणि सुपर ८ मधून बाहेर फेका.

Pages