आयसीसी टि२० विश्वचषक २०१०

Submitted by केदार on 20 April, 2010 - 10:01

यंदाचा आयसीसी टि२० विश्वचषक वेस्ट इंडिज मध्ये ३० एप्रिल ते १६ मे दरम्यान खेळला जाणार आहे.
भारतासोबत क ग्रूप मध्ये अफगाणीस्थान व साउथ अफ्रिका हे देश आहेत.

टीम मध्ये दुखापतीमुळे सेहवाग नसणार अशी बातमी वाचली. त्याऐवजी मुरली विजय खेळत आहे.

वर्ल्डकप विषयीचे मत व त्यावर चर्चा करण्यासाठी हा धागा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आणि वर धोनी निर्लज्जासारखा काल प्रेस कॉन्फरन्स मध्ये म्हणाला की श्रीलंकेला हरवलं तर ते Consolation Prize होईल. Consolation Prize मिळवायला गेले होते हे लोक? Illogical मेला!

आपणच मूर्ख. हे लोक एनडॉर्समेन्ट मधून खोर्‍याने पैसा काढणार (आता Lay's खाणं बंद, Hippo जिंदाबाद!) , खेळाला दुय्यम मानणार आणि आपण उगाच त्यात जीव अडकवून आपलं रक्त आटवतोय. मी तर पाकिस्तान पुन्हा कप जिंकलेलं पहायची सुध्द्दा तयारी केली आहे मनाची. Sad

>>आता Lay's खाणं बंद, Hippo जिंदाबाद<< Happy

cricbuzz या संकेतस्थळानुसार
India have to beat Sri Lanka by a margin of at least 20 runs and hope Australia beat the West Indies. Neither parts of this permutation are too outrageous, although Sri Lanka's task is a little easier. They simply have to beat India, or even lose by less than 20 runs, and then rely on the Aussies to do them a favour.

पण श्रीलंका व विंडिज जिंकले तर मग रनरेट वर उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित होतील व मग त्यात ऑस्ट्रेलिया बाहेर जावी ही सुप्त इच्छा आहे. Happy

<< पण हॉकी मध्ये अशा काही विजयांमुळे तरी लोकांना आपण हॉकीही खेळतो हे आठवत राहील. >>
अगदी खरंय. राजाश्रय व लोकाश्रय मिळवायला विजयपथावरूनच जावं लागतं, निदान भारतात तरी ! "अझलन शाह"मधलं निर्भेळ यश कौतुकास्पद तर आहेच पण भारतीय हॉकीसाठी ते खूप शुभकारक ठरण्याचीही दाट शक्यता आहे. तसं खरंच ठरो !!

>>पण भारतीय हॉकीसाठी ते खूप शुभकारक ठरण्याचीही दाट शक्यता आहे. तसं खरंच ठरो !!

तुमच्या तोंडात साखर पडो. निदान असं झालं तर क्रिकेट आणि ते खेळणारे खेळाडू ह्यांना मिळालेलं अवास्तव महत्त्व कमी होईल. Sad

बाय द वे, हॉकीचे नियम सोप्या भाषेत समजावून देणारी एखादी साईट आहे काय? (Hockey For Dummies टाईप!). तसं मला क्रिकेट फार कळतं अश्यातला भाग नाही. पण एलबीडब्ल्यू, हूक, स्वीप वगैरे कळत नसलं तरी फोर, सिक्स, बोल्ड, रनाऊट वगैरे गोष्टी कळतात ढोबळ मानाने Happy तसं हॉकीबद्दल समजलं तरं बरं होईल.

<<क्षेत्ररक्षणाचा उंचावलेला दर्जा,>>
मी पूर्वी विचारले होते की क्षेत्ररक्षणाचे काही मोजमाप आहे का? जसे बेसबॉलमधे 'चुका' मोजतात. तसे क्षेत्ररक्षणातल्या चुका, जसे अडवता येण्यासारखा चेंडू न अडवणे, घेता येण्याजोगा झेल सोडणे, अडवल्यावर (खरे तर चेंडू हाती लागला तर), तो योग्य दिशेला, फेकणे इ.

शिवाय मला दुसरा प्रश्न. वरच्या एव्हढ्या चर्चेत 'कोच' नामक पदाचा उल्लेखहि नाही. पूर्वी चॅपेल असे, नंतरहि कुणि गोरा, परदेशी बाबा आणला होता ना? ते काय करतात आजकाल?

<<पण भारतीय हॉकीसाठी ते खूप शुभकारक ठरण्याचीही दाट शक्यता आहे. तसं खरंच ठरो >>

अनुमोदन. नाहीतरी क्रिकेट फारच झालयं! तुम्ही सर्व लहान होता, पण एकेकाळी भारताचा हॉकीमध्ये पहिला क्रमांक होता जगात. ऑलिंपिकमधे हमखास एक सुवर्णपदक मिळत असे.

स्वप्ना... विकी वर आहे भरपूर माहिती हॉकी संदर्भात. फक्त नुसतं हॉकी म्हणून शोधल्यास आईस हॉकी बद्दलच कळेल तेव्हा शोध घेताना फिल्ड हॉकी असा शोध घे...

झक्की तो नविन परदेशी आफ्रिकेचा एकेकाळचा फलंदाज गॅरी कर्स्टन आहे... सध्या तो कुठे गायबलाय ते काळायला काही मार्ग नाही.. माझ्यामते तो आयपीएल च्या विरोधात असावा.... आणि म्हणूनच सध्या काही बोलत नाहीये.. सगळी स्पर्धा झाली की मग त्याची हकालपट्टी होईल.. तेव्हाच बोलेल बहुतेक काही तरी...

पण आय पी एल आवडत नाही म्हणून आय सि सि चे काम करायचे नाही का? त्यानेच का धोणीला नवे डावपेच शिकवले?
जिंकल्यावर पगाराव्यतिरिक्त भाराभर इतर पैसे देतात, तर हरल्यावर ते परत घ्यायला पाहिजेत.
Angry

आत्ता धोणी नि संघ गाने म्हणत बसला असेल - आता वाजले की बारा, मला जाऊ द्या ना घरा.

मग तिकडून कुणितरी म्हणेल, खेळून झाल्याशिवाय जायचे नाही!! Proud

Jadeja, Zaheer and Vijay out. Dinesh Karthik, Vinay Kumar and Piyush Chawla are in >> लै भारी अर्धी मॅच जिंकली. Happy

धोणीने स्वतः येउन घान केली. १९० + व्हायच्या ऐवजी आता १६३. ऑर्डर मध्ये बदल करायची काय गरज होती? त्याला स्वतःला काहीच करता आले नाही.

गंभीर बहुतेक त्या मुरलीमुळेच शेल मध्ये जात होता. असो पुढे बघू.

आता तासाभराने बघायचे, गोलंदाजांनी काही करामत केली असेल तर. सध्या वामकुक्षी हाच वेळेचा सदुपयोग आहे.

आपला संघ आज रात्रीच्या शेवटच्या एस.टी. ने घरी परत निघाला. उद्या सकाळपर्यंत एस्.टी. भारतात पोहोचेल.

ज्यावेळीं जिंकू किंवा मरूं याशिवाय पर्यायच नव्हता व रोहित, हरभजन पर्यंत फलंदाज होते, तेंव्हा-
शेवटच्या ५ षटकात - भारत- ३७ धावा.
शेवटच्या ५ षटकात - श्रीलंका- ६० धावा.
आपण सेमि-फायनलला जाणं अयोग्यच ठरलं असतं.

मस्त आर्टीकल

http://www.cricinfo.com/world-twenty20-2010/content/current/story/459405...

आजोबा नेहमी म्हणायचे ... निर्लज्जं सदा सुखी

कालची धोनीची प्रेस कॉन्फरन्स बघताना तेच डोक्यात घुमत होत

आम्ही १०० % दिल . तरीही हारलो तर आमची काय चूक ?

हे तुमच १०० % ? बर ते खर मानल तर १०० % देउन तुम्ही सुपर ८ मधे एकही मॅच जिन्कु शकत नसाल तर याचा अर्थ तुम्ही त्या लेवलचे (लायकीचे म्हणायला पहिजे खर तर ) नाही ना ?

हुश्श केले मी (आता पुढल्या मॅचेस रक्त न आटवता पाहता येतील म्हणून) आणि चेतन शर्माने (का ते ओळखा)

थॉमस आणि उबेर कप मधे आपली मुले मुली उपउपांत्य फेरीत कठीण परीक्षेला बसताहेत , त्यांच्या साठी पण घसा सुकवूया.

हारले एकदाचे. सुटले सर्व भारत वासीय.

धोनी नावाच्या माणसाच्या मूर्खपणाने आणि अतिशहाणपणाने सर्व घाण करून ठेवली.

हिम्सकूल, धन्यवाद माहितीबद्दल. Happy

बरं झालं मी प्रेस कॉन्फरन्स पाहिली नाही नाहितर टीव्ही फोडला असता. १००% दिलं एव्हढं म्हटल्याबद्दलच धोनीला चौकात उभा करून फटकावला पाहिजे. १००% देतात ते जाहिरातींना हे लोक. तिथेच त्यांच्या बॅटिंगच्या पोझेस पाहून घ्याव्यात. प्रत्यक्षात सगळं शून्य. हे वाचा Spineless performance by India in T20 WC ह्या माणसाला कोणीतरी सांगायला पाहिजे की पाठ असली तर कणा असणार ना. ह्या लोकांच्या पाठी पैश्याची ओझी वाहून मोडल्या आहेत. Sad

हिम्सकूल, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. हा विषय सोडून दिलेलाच बरा. त्यांच्यावर आपण इतका वेळ खर्च करावा एव्हढी त्यांची लायकीच नाही.

432cmmiv.JPG साला तुमी लोक कधीच नाय सुधारनार ! पैशाचा खेळ येड्यासारखा क्रिकेटचा खेळ म्हनूनच बघत बसनार आनि डोक्याला ताप आननार !!

अरे हे काय? आपण स्पर्धेतून बाहेर पडलो आणि इथे चर्चाच थांबली. मला वाटलं होतं की कप कोण जिंकेल ह्यावर काही "जोरदार" मतं वाचायला मिळतील. Sad

९९% इंग्लंड- ऑस्ट्रेलिया ( पाकिस्तानी काहीही करु शकतात!) फायनल.
मला वाटतंय इंग्लंड जिंकावे... पण मला वाटून काय फायदा? Sad

काल आपल्या भारतीय संघाच्या खेळाडूंनी स्थानिक पब मधे जावून तमाशा केला. चाहत्यांशी मुजोर वागणूक व त्यांच्याशी बाचाबाचीही केली. सहा खेळाडू होते असे ऐकले, त्यात नेहराने मारही खाल्ला म्हणे.

काल दिवसभर न्यूज चॅनेल्स आरडाओरडा करीत होते, जास्त काही पाहता आल नाही.

Pages