हा देश कृषीप्रधान कसा?

Submitted by अभय आर्वीकर on 22 March, 2010 - 12:04

हा देश कृषीप्रधान कसा?

- सोनिया गांधी या जागतिक राजकारणाच्या केंद्रबिंदू आहेत.
- अमिताभ बच्चन शतकातील सर्वोत्कृष्ट गायक आहेत.
- रवि शास्त्री क्रिकेटचा प्राण आहे.
- लातुर हे जागतिक दर्जाचे शहर आहे.
मी जर असे म्हणायला लागलो तर ते कुणालाही झेपण्याची शक्यता नाही. बेंबीच्या देठापासून ओरडून सांगीतले तरी कोणी पटवून घेईल? नाहीच घेणार. कारण स्पष्ट आहे. वर उल्लेखिलेल्या व्यक्ती आपापल्या क्षेत्रात श्रेष्ठ असल्यातरीही त्यांच्या कौतुकासाठी मी वापरलेली शब्दविशेषणे अतिशयोक्तीपुर्ण आहेत. या तर्‍हेच्या भाषाप्रयोगाने संबधित व्यक्तिचे कौतुक होण्यापेक्षा उपहासच होत असते. आणि असे गुणगौरव करणारा एकतर वेडसर किंवा निष्कारण गोडवे गाणारा “भाट” ठरतो.
मग जर हे खरे असेल तर जेंव्हा जेव्हा “भारत हा कृषीप्रधान देश आहे” किंवा “शेती ही भारतिय अर्थव्यवस्थेचा कणा आहे” असे म्हटले जाते तेव्हा नेमके काय अपेक्षीत असते? कौतुक की उपहास?
भारत हा कृषिप्रधान देश आहे,शेतकरी अर्थव्यवस्थेचा कणा आहे, शेतकरी देशाचा पोशिंदा आहे वगैरे-वगैरे बरेच काही बोलले जाते पण…..
या देशाला कृषीप्रधान मानावे अशा कुठल्याही पाऊलखुणा प्रतीबिंबीत होतांना दिसत नाहीत, या देशातल्या राजकिय नेत्यांच्या डोक्यात शेतकरी प्रथमस्थानी कधिच नव्हता,आजही नाही. बुद्धीप्रामाण्यवादी,थोर-महान विचारवंताच्या वैचारिक बैठकीचा केंद्रबिंदु “शेती आणि शेतकरी” कधिच नव्हता, आजही नाही. मग हा देश कृषीप्रधान कसा?.

टीव्ही मध्ये शेती हा विषय किती? या विषयाचा नंबर कितवा?
वृत्तपत्रात शेती हा विषय किती? या विषयाचा नंबर कितवा?
लोकसभा/राज्यसभा अधिवेशनात शेती हा विषय किती? या विषयाचा नंबर कितवा?
संसदेत पुढार्‍यांच्या भाषणामध्ये शेती हा विषय किती? या विषयाचा नंबर कितवा?
अंदाजपत्रकीय एकुन खर्चामध्ये मध्ये शेती हा विषय किती? या विषयाचा नंबर कितवा?
एवढे जरी लक्षात घेतले तरी भारत हा कृषिप्रधान देश आहे,शेतकरी अर्थव्यवस्थेचा कणा आहे,असे म्हणण्याचे कोणी धाडस करेल असे मला वाटत नाही.

भारत हे कृषीप्रधान राष्ट्र आहे असे मी सुद्धा म्हणायचो.एक दिवस विचार केला की मी असे का म्हणतो…..?
तर उत्तर मिळाले की पुस्तकात वाचले म्हणुन म्हणतो. पुस्तकात लिहिणार्‍यानेही कुठे तरी वाचले असणार म्हणुन लिहिले असणार, त्याच्या आधीच्यानेही कुठे तरी वाचले असणार म्हणुन लिहिले असणार…. ही यादी किती लांब आहे देवच जाणे.

”कोणीतरी म्हणतय म्हणुन मीही म्हणतो” असेच ना?

देशाचे चित्र डोळ्यासामोर ठेवुन स्वयंप्रेररणेने ‘भारत हे कृषीप्रधान राष्ट्र आहे’ असे ज्याला वाटते त्याच्या वैचारीक बैठकीमध्ये आणि कृतिशील हालचालीमध्ये हे प्रतिबिंब नक्कीच उमटायला हवे. पण तसे होत असतांना दिसत नाही.

“कृषीक्षेत्राला भारतिय अर्थव्यवस्थेचा कणा” मानले गेले. गेली अनेक वर्षे मी हा ‘अर्थव्यवस्थेचा कणा’ शोधायचा प्रयत्न करतोय परंतु गवसतच नाहीये. अर्थव्यवस्थेचा “दिवाळीचा सन” म्हणजे केंद्रिय अर्थसंकल्पच ना? तिथे तर ह्या ‘कण्या’पेक्षा रेल्वेसुद्धा जास्त महत्व खावुन जाते. रेल्वे इतका मान सुद्धा या ‘अर्थव्यवस्थेच्या कण्याला’ मिळतांना दिसत नाही. धोरणात्मक निर्णयांमध्ये शेती विषयाचा शेवटून पहिला नंबर लागतो.
आणि जर का हे खरे असेल तर शेतकर्‍याला “देशाचा राजा” म्हणणे म्हणजे शेतकर्‍यांची क्रूर थट्टाच नाही काय?
ही शेतकर्‍यांची मानसिक छळना आहे असे मला वाटते.
या देशात जसे काही लोक शेतीवर उपजिविका करतात तसेच या शेतीमुळेच अनेकांना आत्महत्याही करावी लागते.
असा विचार करता “भारत हा कृषिमरण देश आहे” हे जास्त संयुक्तिक नाही का?
मग
“सोनिया गांधी या जागतिक राजकारणाच्या केंद्रबिंदू आहेत” हा जर उपहास/व्यंग असेल तर “भारत हा कृषिप्रधान देश आहे” हे सुद्धा उपहास/व्यंगच.
आणि
“भारत हा कृषिप्रधान देश आहे” हे जर खरेच असेल तर “सोनिया गांधी या जागतिक राजकारणाच्या केंद्रबिंदू आहेत” हेही खरेच.

उगीच वेगवेगळे मापदंड नकोत.

…गंगाधर मुटे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>>> त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्न हे उत्पादकतेशी निगडीत नसून त्या उत्पादनाच्या बाजारभावावर अवलंबून आहे हे आपण लक्षात घेतले पाहीजे. <<<<
अगदी बरोबर पोस्ट मुटेजी! अन सगळ्यात महत्वाचे म्हणजे १६% राष्ट्रीय उत्पन्नावर (?) ५५% प्रजा (कशीबशी) जगते हे सोईस्कर दुर्लक्षित केले जाते!

एआरसी, मी तुमच्या पोस्टशी व त्यात व्यक्त केलेल्या विचारान्शी सहमत नाही.

एव्हडा त्रास होतोय शेतीचा तर या शहरात्.लायकीप्रंमाणे काम मिळेल.
arc, तुम्ही माझ्याविषयी व्यक्तिगत बोलत असाल तर एक लक्षात घ्या की मी व्यक्तिगत पातळीवर खाऊन - पिऊन अगदीच मजेत आहे. ज्या दिवशी मला शेतीची दशा आणि दिशा कळली त्याच दिवशी मी माझे "पोट" शेतीतून काढून घेतले. आणि व्यवसायात घातले. Happy

<< लायकीप्रंमाणे काम मिळेल.>>
आणि हो, मी पात्रता आणि लायकीबद्दल एवढेच म्हणेन की तुम्ही एक करा. तुमच्या गावात महिण्याला रू. १,००,०००/- ( एकलाख रू.) पेक्षा जास्त मिळकत मिळवणारी जी मंडळी आहे त्यांना शेती करून आपली पात्रता/लायकी सिद्ध करा म्हणावं. मलाही जरा बघुद्या लायकीच्या बळावर कसे पोट भरता येते ते.
वस्तुत: लायकीच्या बळावर या देशात अर्थप्राप्ती होते हे विधानच खोटे आहे.
येथे लायकी नव्हे तर व्यवस्थेला महत्व आहे भाऊसाहेब ARC. Happy

कृपया एक गणित सोडवा.
जर शामराव M.Sc, Ph.D , I.A.S असेल तर....

१) जर त्याने त्याची विद्वत्ता/लायकी/पात्रता शेतीत वापरली तर त्याचे मासिक उत्पन्न किती.
२) जर त्याने त्याची विद्वत्ता/लायकी/पात्रता व्यवसायात वापरली तर त्याचे मासिक उत्पन्न किती.
३) जर त्याने त्याची विद्वत्ता/लायकी/पात्रता रिक्षा चालविण्यात वापरली तर त्याचे मासिक उत्पन्न किती.
४) जर त्याने त्याची विद्वत्ता/लायकी/पात्रता शासकिय नोकरीत वापरली तर त्याचे मासिक उत्पन्न किती.
५) जर त्याने त्याची विद्वत्ता/लायकी/पात्रता राजकारणात वापरली तर त्याचे मासिक उत्पन्न किती.

महिमा कुणाचा ? पात्रतेचा की व्यवस्थेचा?

ज्या दिवशी मला शेतीची दशा आणि दिशा कळली त्याच दिवशी मी माझे "पोट" शेतीतून काढून घेतले. आणि व्यवसायात घातले. >>> exactly हेच्ज तर हवय ना. तुम्हाला जे कळते ते इतर शेतकर्‍याना कळायला हवे.त्यासाठी न्युटनचा मेंदु असावा लागत नाही.

तुमच्या गावात महिण्याला रू. १,००,०००/- ( एकलाख रू.) पेक्षा जास्त मिळकत मिळवणारी जी मंडळी आहे त्यांना शेती करून आपली पात्रता/लायकी सिद्ध करा म्हणावं.>> का यावे त्यांनी तोट्याच्या व्यवसायात? आपला चांगला पगार आणी सुखाचे आयुष्य सोडुन जिथे नफा मिळत नाही तो रोजगार /व्यवसाय करावा इतके काही ते मुर्ख नाहीत.

व्यवस्थेला दोष देण्यात वेळ घालवाल तर असेच लेख लिहिण्यात पानेची पाने वाया घालवाल. ज्या व्यवसायात मनुष्यबळ जास्त उप्लब्ध असते त्यात पात्रता कितीका जास्त असेना पैसा कमीच मिळणार हे कटु सत्य आहे. आज testers /coders जास्त पगार असतो कारण ते संख्येने फारसे उपलब्ध नाहीत, उद्या त्यांची संख्या वाढली की त्यांना मिळणारा पगार आपोआप कमी होणार.मुळात शेतकर्‍यांनी शेती केली नाही तर त्यांना तुरुंगवासाची शिक्षा होइल असा कुठलाही कायदा या देशात नाही.त्यामुळे व्यवस्था तुमच्या व्यवसायावर अन्याय करत असेल तर तुम्ही तो व्यवसाय बदलावा.
तुमच्या गणिताचे उत्तर,
मी शामराव असेल तर पर्याय क्रमांक ४ निवडेल कारण मुळात UPSC देउन IAS झाल्यावर जिथे कमी पैस मिळतो तिथे मी तरी जाणार नाही.ते स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेण्यासारखे आहे.क्रमांक ५ चा धोका असा आहे, कि दर पाच वर्षानी लोकांकदे मत मागायला जावे लागते जे मला तरे जमेल असे वाटत नाही.

वस्तुत: लायकीच्या बळावर या देशात अर्थप्राप्ती होते हे विधानच खोटे आहे.
येथे लायकी नव्हे तर व्यवस्थेला महत्व आहे भाऊसाहेब ARC.

मुटे जी ...आप की हर बात "सौ " टके सही होती है ....!

ज्या दिवशी मला शेतीची दशा आणि दिशा कळली त्याच दिवशी मी माझे "पोट" शेतीतून काढून घेतले. आणि व्यवसायात घातले
मुटे जी ...तुम्ही सत्य बोललात !
पण ज्यांना हे सगळं कळुन देखिल बाहेर पडता येत नाही ,तेवढी हिम्मत कुठे शिल्लक राहीली आहे ? या व्यवस्थेशी आणि निसर्गाशी लढुन! त्यांच्या यातना किती भयानक असतील ? कारण प्रत्येकाला सगळं सोडुन शहरात मिळेल ते काम करण शक्य आहे ?

मुळात शेतकर्‍यांनी शेती केली नाही तर त्यांना तुरुंगवासाची शिक्षा होइल असा कुठलाही कायदा या देशात नाही.
खरं आहे ...असा कुठलाही कायदा नसताना देखिल हा (वेडा की मुर्ख ?)"शेतकरी " सगळ्या जगासाठी अन्न पिकवण्याचं काम करतोय,दुसरं म्हणजे त्या बिच्यारयाला चांगल माहीत आहे,की जरी त्यांने आपल्या उत्पादनात ५० % जरी कपात केली,तरी तो कसाबसा नक्किच जगेल ,पण बाकीच्यातले करोडो अन्नाला महाग होतील्,मग तुमच्या तर्काप्रमाणे आपलं सरकार बाहेरुन सगळी धान्यं (गहु कदाचित किडकाही असेल !) आयात करेल,आणि ते मुकाट्यानं खावं लागेल्,सरकारला जनतेच फक्त पोट भरणं हा एवढाच कार्यक्रम महत्वाचा असेल्,आणि या एवढी प्रचंड आयात करण्यासाठी आपला देश दुसरयांकडे नक्कीच गहाण ठेवावा लागेल !

>>>> कारण प्रत्येकाला सगळं सोडुन शहरात मिळेल ते काम करण शक्य आहे ?
आणि सगळेजणच शहरान्कडे पळाले, तरची अवस्था किती भयानक असेल? (आत्ताच शहरे किती बकाल झालेली आहेत, किती असुरक्षित आहेत ते बघता, लोकसन्ख्या कमी करायला किडीमुन्गी/ढेकणे/उन्दीर मारण्यासारखी औषधे न घेता अतिलोकसन्ख्येच्या देशातील लोकान्ना केवळ "शहराकडे" केन्द्रीत केले तरी पुरेसे होते आहे असे नाही वाटत? तस नस्त तर जागतिक ब्यान्केच्या अटीमधिल एक अट "शहरीकरणाची" नस्ती!
त्यान्ना सगळ काही "अमेरिकेच्या धर्तीवर" व्हायला हवय की वर म्हणल तस लोकसन्ख्या कमी करण्याचा उपाय सुचवताहेत? Proud

<< त्यामुळे व्यवस्था तुमच्या व्यवसायावर अन्याय करत असेल तर तुम्ही तो व्यवसाय बदलावा. >>

ARC, कृपया काही प्रश्नाची उत्तरे द्यावीत.

सर्वांनी शेती सोडून द्यायचे ठरवले तर,
१) पर्यायी व्यवसाय सांगा.
२) नोकर्‍या उपलब्ध नाहीत. मग बेरोजगारीत भर घालायची?
३) व्यवसायाला भांडवल कुठून आणायचे?

आणि एक धोकाही लक्षात घ्यावा.
जेव्हा जेव्हा अशी बिनापर्यायाची स्थिती उद्भवते तेव्हा-तेव्हा मनुष्यजात (फक्त शेतकरी नाही)
१) कुणी आत्महत्येकडे वळतो.
२) कुणी वाटमारी,दरोडेखोरी,चोरी करतो.

असे इतिहास (कदाचित अलिखित) सांगतो.

माझ्या मते, उगाच सरकार किंवा शेतकरी यांना दोष देण्या पेक्षा, भारताला कृषीप्रधान देश कसा बनविता येइल यावर चर्चा झाली तर ते उत्तम राहील......

कुठल्याच देशात शेतकरी सुखी नाही..... भारतातले शेतकरी लहान शेतकरी असल्यामुळे ते आधिक जाणवते.....

कुनि निंदा कुनि वंदा शेति हाच आमचा धंदा! तुम्हांला काय वाटते ? आम्हि शेतकरि लोक वेडे आहोत का ? आहो...आमच्याकडे दोन दोन एकर शेति आसनारे मोटारसायकल घेउन फिरतात! मला चांगल आठवत..१९९५ सालि आमच्या गावात एकच ग्रामपंचायतिचा टिव्हि होता आज घडिला रोजंदारिवर काम करनार्‍याच्या घरि डिश आनि कलर टिव्हि आहे ब्लॅकव्हाईट टिव्हि आनि दुरदर्शनचि अ‍ॅटेना बघायला देखिल मिळ्नार नाहि ! १० लाख शेतकर्‍यां मागे एखाद्याने आत्महात्या केलि आसेल तर आख्खा शेतकरि वर्ग कर्जात आहे आसे म्हनायचे आहे काय ? मि स्वता: एक हाडाचा शेतकरि आहे मि माझ्या मातित सुखात आहे .आता माझि शेति सोडुन तुमच्या शहरात काम करायला आलोच तर... मि दाहावि नापास! मला कोन काम देईल ? समझा दिलहि तरि .......एसी ......कॅबिन ..खुर्चि संगनक हे सर्व मिळेल का? आहे उत्तर कुनाकडे? त्यापेक्षा मि माझ्या शेतित गावात सुखात आहे! आनि नेटवर बसुन आपल्या सारख्या विद्वान मंडळिंच्या चर्चेत सहभागहि घेत आहे ! बाकि तुमच चालु ध्या ..दळत बसायला काय हारकत आहे?.आपल्या ईतके आंम्हि हुशार नाहि आनि आमचे ईतके वाचन हि नाहि.......कार्ट बावळटहे घ्या पदरात ...................बाकि आंम्हि हिकड खाउन पिउ,,,,,,,,न सुखि आहोत.. Wink Wink .आंमळ काळजि नसावि........ Wink Wink ..एक शेति ऊपयोगि माणुस न मिळाल्या मुळे शेति करित नसलेला शेतकरि............

१० लाख शेतकर्‍यां मागे एखाद्याने आत्महात्या केलि आसेल तर आख्खा शेतकरि वर्ग कर्जात आहे आसे म्हनायचे आहे काय ?

दुर्दैवाने अख्खा शेतकरी वर्ग कर्जात आहे, हे खरे आहे.
आणि महत्वाची गोष्ट अशी की आत्महत्त्या करणार्‍या शेतकर्‍यापेक्षा, आत्महत्त्या न करणार्‍या शेतकर्‍यावरील कर्जाचा आकडा मोठा आहे.

त्यापेक्षा मि माझ्या शेतित गावात सुखात आहे!

.......एसी ......कॅबिन ..खुर्चि संगनक हे सर्व नोकरी करूनच किंवा उद्योग करूनच मिळू शकतात. शेती करून नाही हे तुम्ही एका अर्थाने मान्य करता आहात.

.......एसी ......कॅबिन ..खुर्चि संगनक हे सर्व न मिळताच तुम्ही सुखी आहात हे तुमच्या "सुखाच्या" व्याख्येवर अवलंबून आहे. Happy

होय >>> आत्महत्त्या करणार्‍या शेतकर्‍यापेक्षा, आत्महत्त्या न करणार्‍या शेतकर्‍यावरील कर्जाचा आकडा मोठा आहे.तुमच म्हनन खरहि आसेल , जर आख्खा शेतकरी वर्ग कर्जाखालि आसेल,तर त्याला जे कर्जबाजारी शेतकरी आहेत तेच जबाबदार आहेत,कर्जाचा डोंगर काहि एका वर्षात होत नाहि,ज्याच्या शेतीत दहा,हजाराच ऊत्पंन्न मिळनार आसेल तोहि आज २० ते २५ ह्जाराचे{हा आकडा ऊदाहरनादाखल आहे ह्या पेक्षा कितितरी पटिने जादा आसु शकतो} कर्ज कढतो मग! ते फेडायचे कसे? त्यात ह्या राजकिय पक्षांचा थयथयाट , आंम्हि विज बिल माफ करनार ,शेतिवरिल कर्ज माफ करनार, त्यामुळे हा जो कर्जाखालिल वर्ग आहे तो कर्जच भरत नाहि, त्यामुळे शेतीच्या मुळ किमती पेक्षा कर्ज जादा होते, परिनामि कर्ज वाढत जाते , मग बँकेच्या नोटिसा, कोर्टाच्या नोटिसा, त्याचे परिनाम आपल्या समोर आहेच! ...........आमच्या बाबतित बोलायच झाल्यास, आंम्हि वेळेवर कर्ज भरतो, अन..नाहि भरायला जमले तर व्याज भरुन रीनिव्ह करुन घेतो,आनि...>कॅबिन ..खुर्चि संगनक हे सर्व न मिळताच तुम्ही सुखी आहात हे तुमच्या "सुखाच्या" व्याख्येवर अवलंबून आहे. >>> आहो हे सर्व आमच्याकडे आहे ! स्व:ताचे आहे, आणि हे वर लिहिलेले आहे. त्यावर बसुन तर आंम्हि नसलेल्या आकलेचे तारे तोडतोय! आनि हो आंम्हि खरोखर दहावि नापास आहोत मला दहाविला सर्व विशयात ८८ मार्क होते! आपल्या ईतके आंम्हि हुशार नाही! आनी आमचे ईतके वाचन हि नाही.....कार्ट बावळटहे घ्या पदरात ................ Wink ;-)! ..एक शेती ऊपयोगी माणुस न मिळाल्या मुळे शेती करीत नसलेला शेतकरी............

ज्याच्या शेतीत दहा,हजाराच ऊत्पंन्न मिळनार आसेल तोहि आज २० ते २५ ह्जाराचे{हा आकडा ऊदाहरनादाखल आहे ह्या पेक्षा कितितरी पटिने जादा आसु शकतो} कर्ज कढतो मग!

ईन्टरफेल, तुम्ही अगदी या देशातल्या थोर विचारवंतासारखेच विचार करताय. कारण तुमच्या वरील एका वाक्यातच या देशातल्या शेतीची हलाखी स्पष्ट होत असतांना तुम्ही मात्र ते मानायला तयार नाहीत.हाच गुण नेमका विचारवंतामध्ये आणि तज्ज्ञामध्ये आढळत असतो.
आता हे बघा.

१) शेतीत दहा,हजाराच ऊत्पंन्न मिळनार आसेल
दहा हजार वार्षिक उत्पन्न म्हणजेच एका अख्ख्या शेतकरी कुटूंबाचं उत्पन्न.
एवढ्या उत्पन्नात शेतीसाठी होणारा खर्च किती? त्याला जगायला उरतात किती? एवढ्या उत्पन्नात कसे जगावे? या विषयी जरा सविस्तर लिहाना.

२) आणि मग तो कर्ज काढून जगत असेल तर तो दोष कसा?
त्याने कंदमुळे, पालापाचोळा, दगड धोंडे खावून जगावे काय?
की त्याने आणि त्याच्या कुटूंबियाने पैसे नसेल तर कपडेही घालू नये? कपडे घातले नाही तरी चालेल पण कर्ज काढू नये, असे तुम्हाला वाटते?

३) अजिबात कपडे न घालणारेही स्वतःला सुखी समजतातच की. Happy

४) ज्याच्या शेतीत दहा,हजाराच ऊत्पंन्न मिळनार आसेल त्यालाहि २० ते २५ ह्जाराचे कर्ज मिळत असेल तर या देशातल्या बँका बेअक्कल/ अव्यावहारी आहे हे सिद्ध होते.
त्यांचा दोष शेतकर्‍याच्या माथ्यावर का मढता?

<< मुटेजी , तुमचे सगळे मुद्दे नेहमी अस्सल असतात !
हे सगळं कोठुन आल ? >>

अनिलजी, हे सर्व आपल्या अवतीभवतीच असते.
त्यासाठी विद्द्याविभुषणांची गरजच नाही.

फक्त एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टीकोण मानवीय असावा. Happy

मुटेजी, ....(तोच प्रतिसाद (बदलुन) पण योग्य जागी टाकतोय ...)
या कृषीप्रधान देशात एखाद्या शेतकर्यांसाठी लढणारयां नेत्यांच्या सभेची,संघर्षाची,आंदोलनाची,उपोषणाची बातमी,त्यात पोटतिडकीने मांडलेले अनेक ज्वलंत आणि त्याच्या जीवनमरणाशी निगडीत असलेले मुद्दे,झालेली चर्चा यांना आपल्या देशात वर्तमानपत्रात खरच किती आणि कुठे जागा असते ? त्यापेक्षा एखाद्या शेतीवर उभ्या आयूष्यात चकार शब्द न काढलेल्या पुढारयाच्या "वाढदिवसाची " सचित्र बातमी पहिल्या पानावर झळकते...

अनिलजी,
शेतकरी काय किंवा शेतकरी नेता काय.... यांची दखल घ्यावी असे यांच्याकडे काय आहे?
हे सगळे फुकट वर्तमानपत्र वाचतात, विकत घेवून वाचत नाही असे त्यांना वाटते.
वर्तमानपत्र विकत घेवून वाचणारे आणि जाहीरात देणारे त्यांच्यासाठी महत्वाचे.

आणि तरीही हे लोकशाहीचे चवथे आधारस्तंभ बरका....!! Lol

<< माझ्या मते, उगाच सरकार किंवा शेतकरी यांना दोष देण्या पेक्षा, भारताला कृषीप्रधान देश कसा बनविता येइल यावर चर्चा झाली तर ते उत्तम राहील....>>

गणेशजी,
चर्चा कोणी करायची? तुम्ही आणी मी.
कशासाठी? तर भारताला कृषीप्रधान देश कसा बनविता येइल यासाठी.
तुम्ही आणि मी चर्चा केल्याने भारत कृषीप्रधान देश बनेल?
भारताला कृषीप्रधान देश बनविण्याची ताकद आणि 'अधिकार' माझ्याकडे नाहीत.
तुमच्याकडे आहेत? जर नसेल तर... चर्चेचा उपयोग?
ज्याच्याकडे ताकद आणि 'अधिकार' आहे त्या सरकारला सोडून देवून ...
निव्वळ वांझोटी चर्चा करण्याचे प्रयोजनच काय? Happy

मुटे जी, खरं आहे !
वर्तमानपत्र विकत घेवून वाचणारे आणि जाहीरात देणारे त्यांच्यासाठी महत्वाचे.
आणि तरीही हे लोकशाहीचे चवथे आधारस्तंभ बरका....!!

आजकाल तर या "स्तंभाला" पेड न्युज चा "आधार" ज्यास्त मिळु लागलाय ....!

मुटेजी, तुमच्या मते ..
भारत खरंच कृषीप्रधान होण्यासाठी ,शेतीला दिवस चांगले येण्यासाठी कोणते उपाय करावे लागतील ?
ज्याच्याकडे ताकद आणि 'अधिकार' आहे त्या सरकारला
मला तर वाटतं यासाठी शेतकरयांची स्वतंत्र "वोट बैंक" निर्माण झाली पाहिजे,अधिकाधिक लोक त्यातुन निवडुन गेले पाहिजेत ...

<< भारत खरंच कृषीप्रधान होण्यासाठी ,शेतीला दिवस चांगले येण्यासाठी कोणते उपाय करावे लागतील ?>>

सर्वप्रथम " शेती फायद्याची होईल अशी व्यवस्था व्हायला पाहीजे"
त्यानंतर बाकी सर्व.

सर्वप्रथम " शेती फायद्याची होईल अशी व्यवस्था व्हायला पाहीजे">>>> कुणाच्या फायद्याची?

सध्या ती सत्ताधारी, दलाल अन व्यापार्‍यांच्या फायद्याची आहेच कि?

(कालच 'गोष्ट छोटी डोंगराएवढी ' हा चित्रपट पाहिला.)

मुटेसाहेब,
तुम्ही म्हणता ते सगळ बरोबर असेल ही........ परंतु दोष देऊन तरी काय साध्य होणार आहे.

कुणाच्या एकाच्या हातात अधिकार दिले, तरी देश काय १-२ वर्षात कृषीप्रधान होणार नाही........

नुस्तच सरकार आणि लोकप्रतीनीधीनां दोष देऊन चालणार नाही...... त्यात दोष सगळ्यांचाच आहे.

एक कुटंब प्रमुख म्हणुन १००% अधिकार आपल्या हातात असले तरी आपण एक यशस्वी कुटुबं चालवु शकुच असे नाही.

शेती कडे बघण्याचा दृष्टीकोण बदलला पाहीजे..... एक व्यवसाय म्हणुन बघितले पाहीजे, ते नुस्त जगण्याचे साधन नाही.....

परवडत नसेल, तर पर्यायी उपाय शोधले पाहीजे........

गणेशजी,

<< परंतु दोष देऊन तरी काय साध्य होणार आहे.>>

कसाबला फाशी दिल्यावर जे साध्य होते तेच.

<<कुणाच्या एकाच्या हातात अधिकार दिले, तरी देश काय १-२ वर्षात कृषीप्रधान होणार नाही....... >>

सहमत. कारण सत्ताबदलाने व्यवस्था बदलत नाही.

<< नुस्तच सरकार आणि लोकप्रतीनीधीनां दोष देऊन चालणार नाही...... त्यात दोष सगळ्यांचाच आहे. >>

सगळ्यांचा म्हणजे कोणाकोणाचा ?

<< शेती कडे बघण्याचा दृष्टीकोण बदलला पाहीजे..... एक व्यवसाय म्हणुन बघितले पाहीजे, ते नुस्त जगण्याचे साधन नाही.... >>

शेती कडे बघण्याचा दृष्टीकोण बदललेला आहेच..... आता कोणीही नुस्ते जगण्याचे साधन म्हणुन शेती करत नाहीत.... एक व्यवसाय म्हणुनच आता शेती केली जाते.

<< परवडत नसेल, तर पर्यायी उपाय शोधले पाहीजे.......>>

७० टक्के जनतेने शेती सोडून द्यायची तर ७० करोड जनतेसाठी तुम्हीच पर्यायी व्यवसाय सुचवावा.
अवश्य विचार केला जाईल. Happy

>>>>>> तुम्ही आणि मी चर्चा केल्याने भारत कृषीप्रधान देश बनेल? <<<<<<< Lol
माहितीहे ना? मग हा बीबी कशासाठी उघडलाय? Wink
असो, इथे चर्चा करुन भारत बनेल की नाही माहित नाही, पण गेले दोन महिने लिम्बी तिच्या शेतावर खप खप खपत्ये आहे, मी पण जातो अधुन मधुन, अन तसे गेल्याने गेल्या दहा वर्षात जे घडले नाही, ते येत्या दोनचार वर्षात नक्कीच घडवू, निदान आमच्या घरापुरते धान्य तरी आमचे आम्हीच पिकवू! Happy
त्याकरता काय काय करतो आहे, केल आहे, करणार आहे, याबद्दल कधीतरी नन्तर लिहीन, सध्या करुदे तर खरी! केल्याशिवाय बोलायचे काम नाही! केल्याने होत आहेरे, आधी केलेची पाहिजे, ते येरागबाळ्याचे काम नोहे!

कारण सत्ताबदलाने व्यवस्था बदलत नाही.
मुटेजी ,वरील वाक्याशी मी तितका सहमत नाही ...
सत्तेत ताकद आहे,अनेक महत्वाचे निर्णय त्याद्वारेच घेतले जातात ...
जर शेतीचा खरा अभ्यास असलेले,शेतात/मातीत स्वतः राबलेले,शेतकरयांची दु:खे अनुभवलेले,
त्याची जाण असलेले सच्चे लोक जर सत्तेत येऊ लागले तर नक्कीच फरक पडेल यात मला तर शंका वाटत नाही ...
(उदा.जर शरद जोशी,वामनराओ चटप्,राजु शेट्टी,लक्ष्मण वडले,रघुनाथदादा पाटील, पाशा पटेल,बच्चु कडु,गणपतराव देशमुख,एकनाथ खडसे या सारखे नेते आज जर सत्तेत असते (काही आहेत पण विरोधी पक्षात आहेत,त्यामुळे मर्यादा आहेतच) तर नक्कीच फरक पडला असता, कारण या लोकांचा पिंड (विचार्,तत्वे) नक्कीच इतरांपेक्षा वेगळा आहेच ..
अशा लोकांची यापुढे संख्या वाढवायची की कमी करायची ते या ७०% शेतकरयांच्या हातात, त्यांच्या मतात नक्की आहे,पण त्यासाठी शेतकरयाला आपल भलं नक्की कशात आहे,आपल भलं करनारे नक्की कोण आहेत ते लवकर आणि वेळेवर ओळखता आल पाहिजे,त्यासाठी जिथे जिथे अशी माणसं उभी राहतील त्यांच्या मागे राहायला,पाठींबा द्यायला शिकावं (त्यासाठी त्रास होणार्,हे ग्रहित धरावं) ,अस मला मनापासुन वाटतं ..शेतकरयांना देव अशी बुद्धी देवो हिच प्रार्थना !

<< माहितीहे ना? मग हा बीबी कशासाठी उघडलाय? >>

लिंबुटिंबूजी, हा बीबी कशासाठी उघडलाय? याचे उत्तर सोप्प्प्पे आहे.:स्मित:
- शेतकर्‍याच्या दुर्दशेला कोण जबाबदार आहे, याचा नेमका वेध चर्चेतून घेण्यासाठी.
- शेतीतील गरीबीला चव्हाट्यावर मांडण्यासाठी.
- भारतवर्षातील संपुर्ण शेतीव्यवसाय तोट्यात आहे, हे सप्रमाण सिद्ध करण्यासाठी.
- पुढारी,तज्ज्ञ, विचारवंत यांचा शेतीविषयक दृष्टीकोण सावत्रपणाचा आहे आणि
- पुढारी,तज्ज्ञ, विचारवंत यांचे शेतकरी प्रेमही बेगडे, ढोंगी आहे याला शास्त्रीय आधार देण्यासाठी.
आणि
- शेतकर्‍याच्या गुन्हेगाराला शब्दबाणांनी झोडपण्यासाठी.

आणि जर का कोणी सप्रमाण, तर्कशुद्ध, वास्तवावर आधारीत प्रामाणिकपणे असे सिद्ध करून दिले की
माझे मत चुकीचे आहे तर त्याला गुरूस्थानी मानून मी माझी स्वतःची वैचारीक बैठक बदलून घेण्यासाठी. Happy

<<<< कसाबला फाशी दिल्यावर जे साध्य होते तेच. >>>>

कसाब ने गुन्हा केला म्हणुन त्याला फाशी दिली जाणार आहे,.... पण व्यवस्थेला दोष देऊन काय साध्य होणार. हुशार माणसाने वेळेवर सावध होऊन स्वता मध्ये बदल करुन घेतला पाहीजे, आजच्या स्पर्धात्मक जगात जो थांबल तो संपला.

<<<< सगळ्यांचा म्हणजे कोणाकोणाचा ? >>>>
आपण जर सरकार्/व्यवस्थेला जबाबदार ठरवत असणतर, तर सरकार म्हणजे कोणं? त्यात आपण सगळेच आलो ना....!

<<<<< शेती कडे बघण्याचा दृष्टीकोण बदललेला आहेच..... आता कोणीही नुस्ते जगण्याचे साधन म्हणुन शेती करत नाहीत.... एक व्यवसाय म्हणुनच आता शेती केली जाते.>>>>

अजुन ही शेती कडे एक जगण्याचे साधन म्हणुनच बघीतले जाते..... एक व्यवासाय म्हणुन शेती केली गेली असती तर, त्यात बदल नक्कीच झाले असते. जसे तोट्यात जाणारे इतर व्यवसाय नफ्यात आणण्या साठी केले जाणारे बदल.

<<<< ७० टक्के जनतेने शेती सोडून द्यायची तर ७० करोड जनतेसाठी तुम्हीच पर्यायी व्यवसाय सुचवावा.
अवश्य विचार केला जाईल. >>>>

७०% हा आकडा जुणा आहे, तो आता ५०% चा पण खाली असेल. अजुन त्यात, शेती वर अवलंबुन असणारे छोटे शेतकरी आजकाल शेतीवर अवलंबुन न राह्ता सरकार वर अवलंबुन असतात. त्यामुळे तो आकडा अजुन खाली येऊ शकतो

पर्यायी व्यवसाय खालील प्रमाणे असु शकतात,.....,

१) घरातील सगळ्यानी शेती वर अवलंबुन न राहता, इतर व्यवासाय करणे (नोकरी, धंदा, मजुरी,.... इ.)
२) जास्त जमीन असेल आणि ती झेपत नसेल तर त्यातील काही ठेकेदारी पधतीने इतराना देणे.
३) संपुर्ण किंवा काही भाग ५०% भागीदारी ने इतराना देणे.
४) शेती वरच घरातील सगळे खर्च (उ. दा. लग्न, मुंज, जाऊळ इ.) भागतील अशी अपेक्शा करु नये, हे पचायला अवघड असले तरी तेच सत्य आहे.

शेती साठी घेतलेले कर्ज फक्त शेती साठी च वापरायला पाहीजे
डोक्या वर कर्ज असेल तर काही वर्ष नगदी पिंका (उत्पन्न खर्च जास्त असल्यामुळे) वर जुगार न लावता, कर्जा ची परत फेड होई प्र्यन्त कमी खर्चा चे पिंक घेणे.......

Pages