हा देश कृषीप्रधान कसा?

Submitted by अभय आर्वीकर on 22 March, 2010 - 12:04

हा देश कृषीप्रधान कसा?

- सोनिया गांधी या जागतिक राजकारणाच्या केंद्रबिंदू आहेत.
- अमिताभ बच्चन शतकातील सर्वोत्कृष्ट गायक आहेत.
- रवि शास्त्री क्रिकेटचा प्राण आहे.
- लातुर हे जागतिक दर्जाचे शहर आहे.
मी जर असे म्हणायला लागलो तर ते कुणालाही झेपण्याची शक्यता नाही. बेंबीच्या देठापासून ओरडून सांगीतले तरी कोणी पटवून घेईल? नाहीच घेणार. कारण स्पष्ट आहे. वर उल्लेखिलेल्या व्यक्ती आपापल्या क्षेत्रात श्रेष्ठ असल्यातरीही त्यांच्या कौतुकासाठी मी वापरलेली शब्दविशेषणे अतिशयोक्तीपुर्ण आहेत. या तर्‍हेच्या भाषाप्रयोगाने संबधित व्यक्तिचे कौतुक होण्यापेक्षा उपहासच होत असते. आणि असे गुणगौरव करणारा एकतर वेडसर किंवा निष्कारण गोडवे गाणारा “भाट” ठरतो.
मग जर हे खरे असेल तर जेंव्हा जेव्हा “भारत हा कृषीप्रधान देश आहे” किंवा “शेती ही भारतिय अर्थव्यवस्थेचा कणा आहे” असे म्हटले जाते तेव्हा नेमके काय अपेक्षीत असते? कौतुक की उपहास?
भारत हा कृषिप्रधान देश आहे,शेतकरी अर्थव्यवस्थेचा कणा आहे, शेतकरी देशाचा पोशिंदा आहे वगैरे-वगैरे बरेच काही बोलले जाते पण…..
या देशाला कृषीप्रधान मानावे अशा कुठल्याही पाऊलखुणा प्रतीबिंबीत होतांना दिसत नाहीत, या देशातल्या राजकिय नेत्यांच्या डोक्यात शेतकरी प्रथमस्थानी कधिच नव्हता,आजही नाही. बुद्धीप्रामाण्यवादी,थोर-महान विचारवंताच्या वैचारिक बैठकीचा केंद्रबिंदु “शेती आणि शेतकरी” कधिच नव्हता, आजही नाही. मग हा देश कृषीप्रधान कसा?.

टीव्ही मध्ये शेती हा विषय किती? या विषयाचा नंबर कितवा?
वृत्तपत्रात शेती हा विषय किती? या विषयाचा नंबर कितवा?
लोकसभा/राज्यसभा अधिवेशनात शेती हा विषय किती? या विषयाचा नंबर कितवा?
संसदेत पुढार्‍यांच्या भाषणामध्ये शेती हा विषय किती? या विषयाचा नंबर कितवा?
अंदाजपत्रकीय एकुन खर्चामध्ये मध्ये शेती हा विषय किती? या विषयाचा नंबर कितवा?
एवढे जरी लक्षात घेतले तरी भारत हा कृषिप्रधान देश आहे,शेतकरी अर्थव्यवस्थेचा कणा आहे,असे म्हणण्याचे कोणी धाडस करेल असे मला वाटत नाही.

भारत हे कृषीप्रधान राष्ट्र आहे असे मी सुद्धा म्हणायचो.एक दिवस विचार केला की मी असे का म्हणतो…..?
तर उत्तर मिळाले की पुस्तकात वाचले म्हणुन म्हणतो. पुस्तकात लिहिणार्‍यानेही कुठे तरी वाचले असणार म्हणुन लिहिले असणार, त्याच्या आधीच्यानेही कुठे तरी वाचले असणार म्हणुन लिहिले असणार…. ही यादी किती लांब आहे देवच जाणे.

”कोणीतरी म्हणतय म्हणुन मीही म्हणतो” असेच ना?

देशाचे चित्र डोळ्यासामोर ठेवुन स्वयंप्रेररणेने ‘भारत हे कृषीप्रधान राष्ट्र आहे’ असे ज्याला वाटते त्याच्या वैचारीक बैठकीमध्ये आणि कृतिशील हालचालीमध्ये हे प्रतिबिंब नक्कीच उमटायला हवे. पण तसे होत असतांना दिसत नाही.

“कृषीक्षेत्राला भारतिय अर्थव्यवस्थेचा कणा” मानले गेले. गेली अनेक वर्षे मी हा ‘अर्थव्यवस्थेचा कणा’ शोधायचा प्रयत्न करतोय परंतु गवसतच नाहीये. अर्थव्यवस्थेचा “दिवाळीचा सन” म्हणजे केंद्रिय अर्थसंकल्पच ना? तिथे तर ह्या ‘कण्या’पेक्षा रेल्वेसुद्धा जास्त महत्व खावुन जाते. रेल्वे इतका मान सुद्धा या ‘अर्थव्यवस्थेच्या कण्याला’ मिळतांना दिसत नाही. धोरणात्मक निर्णयांमध्ये शेती विषयाचा शेवटून पहिला नंबर लागतो.
आणि जर का हे खरे असेल तर शेतकर्‍याला “देशाचा राजा” म्हणणे म्हणजे शेतकर्‍यांची क्रूर थट्टाच नाही काय?
ही शेतकर्‍यांची मानसिक छळना आहे असे मला वाटते.
या देशात जसे काही लोक शेतीवर उपजिविका करतात तसेच या शेतीमुळेच अनेकांना आत्महत्याही करावी लागते.
असा विचार करता “भारत हा कृषिमरण देश आहे” हे जास्त संयुक्तिक नाही का?
मग
“सोनिया गांधी या जागतिक राजकारणाच्या केंद्रबिंदू आहेत” हा जर उपहास/व्यंग असेल तर “भारत हा कृषिप्रधान देश आहे” हे सुद्धा उपहास/व्यंगच.
आणि
“भारत हा कृषिप्रधान देश आहे” हे जर खरेच असेल तर “सोनिया गांधी या जागतिक राजकारणाच्या केंद्रबिंदू आहेत” हेही खरेच.

उगीच वेगवेगळे मापदंड नकोत.

…गंगाधर मुटे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

<< दुर्दैवाने, ही नेते मन्डळी वा शेकाप सारखे पक्ष शेवटी कुठल्यातरी राजकीय पक्षाच्या दावणीलाच बान्धले गेले,>>

शरद जोशींसाठी हे विधान अजिबात लागू होत नाही.

राजू शेट्टींबद्दल थोडा काळ अजून वाट पहावी लागेल.

शेकाप हा मुळातच राजकिय पक्ष. त्यात शेतकरी,कामगार हे शब्द नावापुरतेच.

असले "लढाऊ" नेते आपोआप निर्माण होत नाहीत, तयार केले जातात! >>>> हे सर्वपक्षीय/सर्वधर्मीय आहे. म्हणुन फक्त एकाच पक्षाला/धर्माला झोडपणे योग्य नाही. बहुसंख्य जनतेला हा खेळ समजत नाही, हीच आपली शोकांतीका आहे.
(मी कुठल्याच पक्षाचा सदस्य नाही)

दुर्दैवाने, ही नेते मन्डळी वा शेकाप सारखे पक्ष शेवटी कुठल्यातरी राजकीय पक्षाच्या दावणीलाच बान्धले गेले
मुटे जी, उलट तुम्ही इतिहास नीट तपासुन पाहिला तर शरद जोशी यांनी भाजपाशी जवळीक केली (स्वतः केलेली प्रतिज्ञा मोडली..),त्यांच मंत्रीपद स्विकारल आणि याच कारणामुळे राजु शेट्टींनी त्यांना राम राम केला,आणि आपला 'स्वाभिमान' जपला,जोशींची लाचारी त्यांना पटली नाही, शेट्टीनी स्वत:ची चळवळ उभी केली,पक्ष काढला,आमदार,खासदार झाले पण कोणत्याही पक्षात प्रवेश नाही,पाठींबा घेतला नाही,(तिसरी आघाडी म्हणजे बाकीच्यांनी आपल्या वागण्याने 'फुसका बार' ठरवला) त्यांच्या या निश्कलंक वागण्यामुळे त्यांचा नेहमी विरोधक अपप्रचार करतात,अफवा तर नेहमीच्याच आहेत कारण त्यांच्याकडे दुसरा कोणता मार्गच नाही,त्यामुळे आजच्या घडीला तरी संपुर्ण महाराष्ट्रात तरी शेतकरयांचा नेता म्हणुन जर सगळ्यात मोठी ताकत कोणाची असेल तर ती फक्त राजु शेट्टींचीच आहे (तसं त्यांनी सिद्ध करुन दाखवलं आहे) बाकी कुणाचीही नाही..(शरद जोशी आणि त्यांचा पक्ष तर आता संपल्यात जमा आहे),
त्यामुळे सगळ्यानाच एकाच दावणीला बांधण बरोबर नाही ...ते जे काही चांगलं शिल्लक आहे ,ते हे संपवायला निघाल्यासारखं आहे ..
राजु शेट्टींना विधानसभेच्या निकालापुर्वी एका पत्रकारानी प्रश्न विचारला,की तुमचा पक्ष कोणाला पाठींबा देणार, युतीला की कअ‍ॅंग्रेस पक्षाला तर त्यांच उत्तर पहा ..'तुम्ही अस विचारताय की "चोराला" पाठींबा द्यायचा की "दरोडेखोराला" ? ,असं स्पष्ट बोलण्याची हिम्मत कोणता नेता करु शकतो ?
या देशात हा एकमेव नेता असेल ज्यांन भर प्रचारसभेत लोकांना आव्हान केल की 'तुम्ही मी फक्त जैन आहे म्हणुन मतं देणार असाल तर मला ते मत नको,तुम्ही ते देउ नका,माझं काम बघुन मत देणार असाल तर द्या,इतरानी देखिल मी केवळ जैन आहे म्हणुन मला मत टाळुन माझ्यावर अन्याय करु नका !" ,इतकं स्पष्ट ,बेधडक आणि प्रामाणिक मत मांडणारा दुसरा कुणी नेता कुणी पाहिला आहे का ?
शेवटी ते ९५,००० मतानी निवडुन आले,त्यांना एकुण जवळपास ३,८५,००० मते मिळाली ..(त्यात जैन समाजाच एकुण मतदान ६०,००० च्या पुढे नाही !) हे मी सांगीतलं कारण त्यांच्यावर जातीयवादी टिकाही केली गेली ..

आपला देश कृषी प्रधान नसुन IT प्रधान होत आहे.
देशात फक्त संगणक बनतात, व सगल्यान्ना अभियंता बनायचे आहे.
शेतकरी नही.

दुख्ख ह्याचे आहे की maximum political जनता आपल्या देशात agriculture मधुन येते तरिही त्यानाच शेतकरी लोकंच्या गरजा कळत नाहीत.

शेतकरी चळवळीत शरद जोशींचे आणि राजु शेट्टींचे स्थान काय हे मी चांगल्या तर्‍हेने जाणतो.
शरद जोशींना वाईट म्हटल्याशिवाय राजु शेट्टींचे मोठेपण सिद्ध न करता येणे ही शेतकरी हिताचे दृष्टीने चांगली बाब नाही.
शरद जोशींनी मांडलेला "विचार" ही कधिही न संपणारी बाब आहे.
काही ऐतीहासिक सत्य हे कुणी स्विकारणे किंवा नाकारण्यापलीकडले असते.
..............................
<< .'तुम्ही अस विचारताय की "चोराला" पाठींबा द्यायचा की "दरोडेखोराला" ? ,
आमच्या उमेदवारांना जातीच्या आधारावर मते देऊ नका >>

ही शरद जोशींच्या पुस्तकातील विधाने आहेत. आणि फार पुर्वीची.
कधी वेळ मिळाला तर त्यांची पुस्तके अवश्य वाचा.
.............................

असो.
राजकिय पुढार्‍यांची धोतरं धुता - धुता शेतकर्‍यांच्या पिढ्या बर्बाद झाल्यात.
मी पण तेच करावे हा तुमचा आग्रह योग्य नव्हे.
एवढे दिवस मी कुठलीय चर्चा व्यक्तीगत पातळीवर होवु नये या साठी जाणिवपुर्वक प्रयत्न करत आलो.
पण तुमचा मुद्दा, चर्चा व्यक्तीगत पातळीवर आणुन ठेवतो.
शक्यतो हे टाळावे.

<< दुख्ख ह्याचे आहे की maximum political जनता आपल्या देशात agriculture मधुन येते तरिही त्यानाच शेतकरी लोकंच्या गरजा कळत नाहीत. >>

अभिषेकजी, हे सर्व त्यांना कळते.
पण त्यांचा मुख्य आणि एकमेव उद्देश स्वतःची गरीबी हटविने हा असतो.
आणि म्हणुन त्या शेतकरीपुत्र राजकारण्यांना कोणाच्या तरी ताटाखालचे मांजर बनून राजकारण करावे लागते.
या प्रयत्नात शेतकरी हिताचा बळी जातो. हे गेल्या ५० वर्षातील वास्तव आहे.

>>>>> ज्यांन भर प्रचारसभेत लोकांना आव्हान केल की 'तुम्ही मी फक्त जैन आहे म्हणुन मतं देणार असाल तर मला ते मत नको,तुम्ही ते देउ नका,माझं काम बघुन मत देणार असाल तर द्या,इतरानी देखिल मी केवळ जैन आहे म्हणुन मला मत टाळुन माझ्यावर अन्याय करु नका !" <<<<<<<
या वाक्याबद्दल निवडणूक आयोगाकडे तक्रार कशी काय झाली नाही याचे आश्चर्य वाटते! असो. या बीबीचा विषय नाही.
मुटेसाहेब, शेतकर्‍यान्पुढील आव्हाने या सदरात, असन्ख्य गोष्टी मोडतात, पैकी सेझ वा अन्य प्रकारे सरकारकडून घाऊकरित्या जमिनी ताब्यात घेणे हा एक प्रकार असून, मिळणार्‍या एकरकमी मोबदल्यामुळे शेतकर्‍यातच गटतट पडत चाललेले दिसून येतात.
अल्पभूधारक शेतकर्‍याच्या कथा नि व्यथा अजुनच वेगळ्ञा, कसेतरी निसर्गावर अवलम्बुन राहून वर्षाचे धान्याची बेगमी झाली तर झाली अशी परिस्थिती अस्ताना झखमेवर मीठ चोळल्याप्रमाणे, शहरि वातावरणात वाढलेले तज्ञ जेव्हा नाना उपदेशाचे डोस पाजताना दिस्तात तेव्हा ते सहन करणे अशक्य होते! अशा परिस्थितीत, शेतकर्‍यान्च्या पुढच्या पिढ्या दहावी-बाराव्वी कशीतरि उरकुन शहराकडे कारकुनी/अन्य मोलमजुरी करुन महिनोमाल एकरक्कमी पगार मिळविण्यासाठी (जो पगार कित्येकदा शेतीच्या उत्पन्नाच्या कित्येक पट असू शकतो) शहरान्कडे धाव घेतात, पण तो पगार तस पहाता माणूस वा कुटुम्ब म्हणून शहरात जगण्याकरता पुरेसा नसतो तेव्हा वाट्याला पुन्हा शहरी झोपडपट्टीतले बकाल जीवनच येते! मात्र यातुनच येत्या दहावीस वर्षात, शेतीकरायला म्यानपावर उपलब्ध असेल की नाही याचीच शन्का वाटते. अन जर गावाकडे माणसे थाम्बलीच नाहीत, तर शेती कोण करणार? कुणाच्या घशात ती जाणार? यात परभाषिक किती? कम्पन्या वगैरे किती? ते काहीही झाले तरी यातुन अन्नधान्याबाबत कमालिचे परावलम्बित्व येणार नाही का? असे प्रश्न मला तरि पडतात! Happy
अन तरीही मी म्हणतो की होय, भारत हा शेतीप्रधान, कृषीप्रधान देश आहे! Happy

मुटे जी,
शरद जोशींना वाईट म्हटल्याशिवाय राजु शेट्टींचे मोठेपण सिद्ध न करता येणे ही शेतकरी हिताचे दृष्टीने चांगली बाब नाही.
शरद जोशींना मी वाईट तर मानतच नाही,तेच तर शेतकरी चळवळीचे खरे संस्थापक आहेत,पण हे ही खर आहे,की शेट्टींच मोठेपण आता शरद जोशींच नाव न घेता नक्कीच सिद्ध होतं,शरद जोशींनी मात्र शेट्टींच्यावर टिका केली, शेट्टींनी कधीही त्यांच्यावर टिका केलेली नाही,दुसर म्हणजे विधानसभेत आणी आता संसदेत शेतकर्यांच्या वतीने त्यांची दु:खं मांडण्याच काम हे शेट्टींनीच केल आहे,कारण या दोन सभाग्रहातच सगळे निर्णय घेतले जातात म्हणुन,तिथे गेल्याशिवाय शेतकरयांच्या दु:खात काही फरक पडणार नाही हे त्यांनी जाणलं म्हणुन,जोशी यांच तत्वज्ञान नक्किच अगोदर आहे,शेट्टींनी तेच वापरल ,फक्त ते अधिक आक्रमकपणे आणि मतपेटीतुन इतकच,हे काम इतर शेतकरी नेत्यांना किती जमलं हा ही इतिहासच आहे,माझा इतकच म्हणणं आहे की जोशीं जुने आणि अनुभवी नेते आहेत,त्यामुळे जे चांगल आहे त्याला मी नेहमीच चांगल म्हणतो..शेवटी आजपर्यंत अश्या शेतकरी नेत्यांच आणि त्यांच्या चळवळींच
प्रांतीय मुद्यामुळे नक्कीच नुकसान झालं आहे,! (मी देखिल आज अखेर कोणत्याही पक्षाचा,संघटनेचा सभासद नाही..)

राजकिय पुढार्‍यांची धोतरं धुता - धुता शेतकर्‍यांच्या पिढ्या बर्बाद झाल्यात.
मी पण तेच करावे हा तुमचा आग्रह योग्य नव्हे.

एखाद्या सच्च्या ,बेडर आणि लढवय्या शेतकरी नेत्याला समर्थन देण किंवा पाठींबा देण,लढायला आणखी बळ देणं म्हणजे 'धोतर धुणं' नक्कीच नाही ..
आजपर्यंत शेतकरयानी अनेक नेत्यांना मोठं केल,पण त्यातले बरेच जण शेतकर्‍यानां विसरले ..
म्हणुन शेतकर्यानी राजकारणाचा त्याग करावा अस मुळीच नाही ,शेवटी या राजकारणातच तर शेतकर्यांची दुखा:च उत्तर दडलेले आहे,त्यामुळे शेतकर्यानी असे ज्यास्ती ज्यास्त लढाऊ नेते विधानसभेत पाठवले पाहिजेत,तुमच्या विचार,चळवळी जोपर्यंत "मतपेटीतुन" सिद्ध होत नाही तोपर्यंत त्याची कोण दखल घेइल ?

या वाक्याबद्दल निवडणूक आयोगाकडे तक्रार कशी काय झाली नाही याचे आश्चर्य वाटते! असो.

लिंबुटिंबु जी, त्यातला नेमका अर्थ, स्पष्टवक्तेपणा,प्रामाणिकपणा न लक्षात घेता,फक्त तक्रारीचा स्वर काढणारे आपल्यासारखी शेकडो असतीलच आणि तक्रार देखिल नक्कीच केली असेल आणि निवडणुक आयोग नक्कीच जाग आहे असं आपण मानायला हरकत नसावी, अस आपण समजु !
इतकं स्पष्ट ,बेधडक आणि प्रामाणिक मत मांडणारा दुसरा कुणी नेता कुणी पाहिला आहे का ?

वरील वाक्याच उत्तर मात्र तुमच्याकडे नसेल नक्कीच नसेल ...अस दिसतं !
कारण अस बोलायला खूप मोठी हिम्मत लागते ,वाघाचं काळीज लागत,ते ही राजकिय क्षेत्रात म्हणजे उच्च कोटीचा आत्मविश्वास नक्कीच लागतो, शेवटी आपण कोणतीही गोष्ट कसं समजुन घेतो त्यावर बरचं अवलंबुन आहे ...!

दुसर म्हणजे विधानसभेत आणी आता संसदेत शेतकर्यांच्या वतीने त्यांची दु:खं मांडण्याच काम हे शेट्टींनीच केल आहे,
शेट्टींनी यात आवश्यक नाही.
यापुर्वी केशवराव धोडगे, दत्ता पाटील, वसंत बोंडे, सरोज काशीकर, मोरेश्वर टेमुर्डे, वामनराव चटप आदींनीही ते केलेच आहे.
प्रश्न एवढाच की १०-१२ आमदार/ खासदार लोकसभा , विधानसभेत फारसं काहीच करू शकत नाहीत.
त्यामुळे संपुर्ण शेतकर्‍याच्या जिवनमानात कवडीचाही फरक पडत नाही.

<< कारण या दोन सभाग्रहातच सगळे निर्णय घेतले जातात म्हणुन,तिथे गेल्याशिवाय शेतकरयांच्या दु:खात काही फरक पडणार नाही हे त्यांनी जाणलं म्हणु न,जोशी यांच तत्वज्ञान नक्किच अगोदर आहे,शेट्टींनी तेच वापरल ,फक्त ते अधिक आक्रमकपणे आणि मतपेटीतुन इतकच,हे काम इतर शेतकरी नेत्यांना किती जमलं हा ही इतिहासच आहे, >>

आजपर्यंत शेतकर्‍यांची मतं खाऊन भरपुर नेते बबांड गब्बर झाले आहेत.

<< माझा इतकच म्हणणं आहे की जोशीं जुने आणि अनुभवी नेते आहेत,त्यामुळे जे चांगल आहे त्याला मी नेहमीच चांगल म्हणतो..शेवटी आजपर्यंत अश्या शेतकरी नेत्यांच आणि त्यांच्या चळवळींच
प्रांतीय मुद्यामुळे नक्कीच नुकसान झालं आहे,! >>

शरद जोशींनी एक मोठ्ठी चूक केली ती ही की बहूसंख्य समाजात जन्म घेतला नाही. (मी बहूसंख्य आहे,उगीच नवा वाद नको)

(मी देखिल आज अखेर कोणत्याही पक्षाचा,संघटनेचा सभासद नाही..)

मी सभासद आहे. पण त्याहीपेक्षा मला माझे विचार महत्वाचे आहे.

<< एखाद्या सच्च्या ,बेडर आणि लढवय्या शेतकरी नेत्याला समर्थन देण किंवा पाठींबा देण,लढायला आणखी बळ देणं म्हणजे 'धोतर धुणं' नक्कीच नाही >>

सगळी मंडळी जनतेची मते घेऊनच निवडून येतात. त्यांना जे लो़क मते देतात त्यांच्या मते तो पुढारी सच्च्या ,बेडर आणि लढवय्या च असतो.
अर्थात मी मात्र राजू शेट्टी सच्च्या ,बेडर आणि लढवय्या शेतकरी नाही असे म्हणालेलो नाही.
पण मी कॉमन वाक्य वापरलय.
मी या देशात चांगले नेते कोण आणि वाईट नेते कोण अशी यादी बनविलेली नाही.

<< इतकं स्पष्ट ,बेधडक आणि प्रामाणिक मत मांडणारा दुसरा कुणी नेता कुणी पाहिला आहे का ?
वरील वाक्याच उत्तर मात्र तुमच्याकडे नसेल नक्कीच नसेल ...अस दिसतं !
कारण अस बोलायला खूप मोठी हिम्मत लागते ,वाघाचं काळीज लागत,ते ही राजकिय क्षेत्रात म्हणजे उच्च कोटीचा आत्मविश्वास नक्कीच लागतो, शेवटी आपण कोणतीही गोष्ट कसं समजुन घेतो त्यावर बरचं अवलंबुन आहे ...! >>

हा प्रश्न तुम्ही पहिल्यांदा राजू शेट्टींना विचारा. त्यांना जर तसे वाटत असे तर मला सांगा.
//////////////////////////////////////////////////////////////////////

राजू शेट्टी काही ना काही प्रमानात शेतकरी विषयात काम करतात. त्यामुळे मी त्यांच्याविरोधात आपली शक्ती निष्कारण खर्च करावी, त्यांच्या कार्याला निष्कारण अपशकून करण्याची गरज आहे असे मला वाटत नाही.
त्यांचे कौतूक करावे असे मला त्यांच्या कार्यात काही आढळले नाही. आणि टिका करावे असेही काही दिसत नाही.
तुम्ही निष्कारण त्यांना मध्ये घालून त्यांचा अनावश्यक अपमान करता आहात.
तुम्ही म्हणता म्हणून ते थोर ठरत नाहीत किंवा मी कौतूक करत नाही म्हणुन लहान ठरत नाही.
त्यांच्यात ती योग्यता असेल तर काळच त्यांना थोर बनवेल.

शेट्टींनीच यात च आवश्यक नाही.
वरिल वाक्याशी नक्कीच सहमत आहे,कारण मी संपुर्ण भुतकाळ जाणतो अस नाही ..

यापुर्वी केशवराव धोडगे, दत्ता पाटील, वसंत बोंडे, सरोज काशीकर, मोरेश्वर टेमुर्डे, वामनराव चटप आदींनीही ते केलेच आहे.
प्रश्न एवढाच की १०-१२ आमदार/ खासदार लोकसभा , विधानसभेत फारसं काहीच करू शकत नाहीत.
त्यामुळे संपुर्ण शेतकर्‍याच्या जिवनमानात कवडीचाही फरक पडत नाही.

मी ही काहींबद्दल वाचलय, पण राजु शेट्टी यांची आंदोलनाची "धार" या सगळ्यांपेक्षा वेगळी आणि जहाल आहे ,शेवटी न्याय हा याच जन्मात मिळाला तर त्याचा उपयोग होइल ..
शेवटी १०-१२ आमदार-खासदार देखिल सभागह गाजवु शकतात ...

आजपर्यंत शेतकर्‍यांची मतं खाऊन भरपुर नेते बबांड गब्बर झाले आहेत.
शेवटी ते प्रत्येक शेतकर्याच स्वताच "मत" आहे,गब्बर झाले तरी चालतील पण रस्त्यावर येवुन लढण्याची धमक असली पाहिजे,नुसत वयक्तिक फायद्यासाठी 'आंदोलन' नको ..

शरद जोशींनी एक मोठ्ठी चूक केली ती ही की बहूसंख्य समाजात जन्म घेतला नाही. (मी बहूसंख्य आहे,उगीच नवा वाद नको)
ते मात्र कुणाच्या हातात नाही,पण हे खरं आहे,शेवटी सत्ताधारी लोकांच ते हमखास हत्यार आहे आणि कोणत्याही शेतकरी नेत्यापुढे अडचनींचा डोंगर तर असतोच ,त्यांना अनेक 'टप्यावर' लढाव लागतं,यश खूप महाग असत,त्याला कोणीही अपवाद नाही ...

(एक मात्र नक्की मला शरद जोशी यांना आणि तुम्हाला राजु शेट्टींना थोड आणखी समजुन घ्यावं लागेल )

<<एक मात्र नक्की मला शरद जोशी यांना आणि तुम्हाला राजु शेट्टींना थोड आणखी समजुन घ्यावं लागे<<>>
त्याशिवाय हा देश कृषीप्रधान होणार नाही का ?

<< त्याशिवाय हा देश कृषीप्रधान होणार नाही का ? >>

न व्हायला काय झालं?
भविष्यात काय दडलय हे कोणास माहीत आहे.?

पण निखारे जिवंत असेल तर मशाली पेटवणे सोपे जाते.

नाहीतर मग..

निखारे विझूनी कशी राख झाली?
अता चेतवू मी मशाली कशाने?

अशी म्हणायची वेळ येते. Happy

>>>> शरद जोशींनी एक मोठ्ठी चूक केली ती ही की बहूसंख्य समाजात जन्म घेतला नाही. (मी बहूसंख्य आहे,उगीच नवा वाद नको)<<<<<
ती शरदजोशिन्ची चूक की समाजाची या वादात आपण सध्या पडू नये! पण फार फार मोठ्ठ सत्य व समाजाचा एकन्दरीत दाम्भिक पणा तुम्ही अत्यन्त मोजक्या संयत शब्दात मान्डला हे! अर्थात लेखनसीमा, या बीबीचा विषय नाहि!

<< ती शरदजोशिन्ची चूक की समाजाची या वादात आपण सध्या पडू नये! >>

निसंशय चुक शरद जोशींचीच.
या जातप्रिय देशात जन्म घेतांना एवढे तारतम्य बाळगायलाच हवे होते.

हा देश "जातप्रियप्रधान देश आहे" हे जाहीरपणे कुणीच मान्य करीत नाही हा दुसरा दांभीकपणा.

त्याशिवाय हा देश कृषीप्रधान होणार नाही का ?
शेतकर्यांच्या जीवनमान सुधाराव यासाठी लढणार्या अशा लोकांवर अन्याय झाला,दुर्लक्ष्य झालं म्हणुन तर ' हा देश कृषीप्रधान नाही ' अस म्हणायची वेळ आली आहे ...!

हाड्

सॉरी ह्या प्रतिक्रीये बद्दल पण आपल्या अवस्थेसाठी दुसरा कोणीतरी जबाबदार आहे ही मनोवृत्तीच अश्या अवस्थेला कारणीभूत आहे.

<< त्याशिवाय हा देश कृषीप्रधान होणार नाही का ? >>

न व्हायला काय झालं?
भविष्यात काय दडलय हे कोणास माहीत आहे.?

मुटे जी, तुमच्या प्रतिक्रियेला मी सहमत आहे ....
आजचा शेतकरी हा तरुण आहे,जागा झालेला आहे,त्यामुळे भविष्यात नक्कीच चांगल घडेल अशी आशा करु आपण !
शेवटी शेतकरी,त्यांच्या संघटना,त्यांचे नेते ,त्यांची आंदोलने या सर्वाचा शेतकर्याचा जीवनाशी, एकमेकांशी घनिष्ठ संबध तर आहेच ...!

<< आपल्या अवस्थेसाठी दुसरा कोणीतरी जबाबदार आहे ही मनोवृत्तीच अश्या अवस्थेला कारणीभूत आहे. >>
ही मनोवृत्ती नाही तर वास्तवता आहे.
आपण येथे संबंध शेतकरी वर्गाबद्दल बोलतोय.
शेतकर्‍याला या देशात मतदानाचा सोडून इतर कोणताही असा अधिकार प्राप्त नाही की तो त्या बळावर स्वतःच्या समस्या सोडवू शकेल.
१) तो पुर्णतः निसर्गावर अवलंबून आहे.
२) शेतमालाचे भाव ठरवणे त्याच्या हातात नाही.
३) शेतीला आवश्यक वस्तुंचा पुरवठा/उपलब्धता वेळेवर व योग्य दरात असणे याचे नियंत्रण त्याच्या हातात नाही.

हे सर्व बिगरशेतकर्‍यांच्या हातात आहे.
मग शेतकर्‍याला त्याच्या दुरावस्थेसाठी त्यालाच जबाबदार कसे ठरवता येईल?
यातूनच
आपल्या अवस्थेसाठी दुसरा कोणीतरी जबाबदार आहे अशा मनोवृत्तीचा जन्म होतो.

///////////////////////////////////////////////////////////////////////////

थोडेसे विषयांतर

एक शेर ऐका(वाचा).

"भुईला दिली ओल नाही ढगाने
कशी अंकुरावीत आता बियाणे?"

बीजाची इच्छा आहे अंकुरण्याची, कोंब फ़ुटून वृक्ष बनण्याची,इतर वृक्षाप्रमाणे उंच-उंच वाढून गगनाशी स्पर्धा करण्याची...पण अंकुरण्यासाठी भुईत ओलावा असावा ना? बिना ओलाव्याने अंकुरायचे तरी कसे? अंकुरायला पाणीच हवे, कोणाचा कोरडा सल्ला किंवा अगम्य आशावाद किंवा प्रचंड मनोबळ असून-नसून उपयोग तो काय? ओलावा मिळाला तरच इच्छाशक्ती,आशावाद,मनोबळ उपयोगाचे. नाही तर शुन्य उपयोगिता.
भुईला पण वाटते की त्या बीजाचा जन्म व्हावा. मातृत्वाची प्रेरणा काय असते,हे त्या मातेलाच कळे. पण ती तरी काय करणार बिचारी? ओलाव्यासाठी ती पुर्णत: मेघावर अवलंबून. मेघाकडून तिला पाण्याचे थेंबच हवे. कोरडे गर्जन नकोच. कोरड्या गर्जनाचा आवाज फ़ार मोठा. अशा गर्जनांमुळे गर्जना केल्याचा मेघाला आनंद मिळेलही कदाचित. पण अशा गर्जनांचा भुईने आणि बीजाने उपयोग तरी काय करून घ्यावा?
बीजाला उगवता आले नाही कारण मातीत ओलावा नव्हता. आणि मातीत ओलावा तयार होण्यात न होण्यात बीजाचा दोष तो काय?
पाऊस पाडला नाही हा दोष मेघांचा. दोष मात्र मढला जातो बीजाच्या माथ्यावर.
मेघांना दोषी ठरविण्यासाठी लागणारी हिंमत ज्यांच्याकडे नाही ते चक्क बियाणेच वांझ होते असा शेरा मारून मोकळे होतात.

गंगाधर मुटे
..........................................................................

मुटे जी , खासच !
मला वाटतं ,शेतकर्याचं आणि सरकारच सध्याच्या नातं आणि सत्य परिस्थीती तुम्ही अगदी मोजक्या शब्दात मांडली आहे,
यातला प्रत्येक शब्द, त्याचा संदर्भ शेतकर्याच्या यातना,त्याची झालेली आणि रोज होणारी परवड दाखवतो ,हे वाचुन माझ्यासारख्याला जर राग येत असेल, आणि चक्क बियाणेच वांझ होते असा शेरा मारणांरयाबद्दल जर मनात चीड निर्माण होत असेल तर ..त्याला प्रत्युत्तर द्यावसं वाटत असेल,यांना धडा शिकवावा असं वाटत असेल तर यात माझं काही चुकतयं का ?

मुटेसाहेब, मर्यादित अर्थापर्यन्त तुमची वरील पोस्ट सर्वस्वी खरी आहे! पण..... हा पण मात्र अस्तित्वात आहेच!
तो कसा अस्तित्वात आहे या बद्दल मात्र मी "या वर्षी" तरी काही बोलणार नाही, अनुभूती हव्वी तितकी आहे, प्रत्यक्ष अनुभव घेतोय, कदाचित वर्षादोन वर्षात मी यावर ठामपणे बोलेन की दरवेळेस दुसर्‍याकडे बोट दाखविण्याची गरज सर्वान्ना अस्तेच का? अन ज्यान्ना नस्ते ते नेमके काय करतात!
असो Happy

लिंबूटींबूजी,
मी एकूनच शेतकरी वर्गाबद्दल बोलतोय. त्यामुळे एखाददुसर्‍याचा अनुभव सबंध शेतकरी वर्गासाठी उपयोगाचा ठरू शकत नाही.
शेती व्यवसायाचा विचार करतांना गणिती भाषेत असे म्हणता येईल की किमान ५१ टक्के शेतकरी जे करत आहेत तेच गृहीतक म्हणुन धरावे लागेल. (४९ टक्के शेतकरी आळशी,अज्ञानी,मनोरूग्न अजून काय वाटेल ते म्हणणार्‍यांसाठी सोडून देता येईल. त्यांना प्रशिक्षण देण्याची, शहाणपणा शिकविण्याची गरज आहे, असे ही मान्य करून टाकता येईल.)
पण उरलेले ५१ टक्के शेतकरी तर नक्कीच पात्र आणि कुशल आहेत. त्यांना कुणीतरी मार्गदर्शन करू शकेल एवढा सामर्थ्यशाली व्यक्ती या भारतदेशात अजून पर्यंत मला आढळलेला नाही. आणि तशी शक्याताही नाही.
कारण मुळातच शेतकरी एवढा कर्तबगार आणि अनुभवी असतो की त्याच्यासमोर सर्वजग 'खुजे' वाटावे.

पण त्याच्या कर्तबगारीला या देशात प्रतिष्ठा नाही, म्हणुन हा गोंधळ चाललाय.
सुर्य ग्रासला गेला आहे म्हणुन काजवे सुर्याला वाकुल्या दाखवत आहेत.

मुटेसाहेब, मला देखिल शीतावरुन भाताची परिक्षा घेण्याची घाई नाहीये, घेणारही नाही!
मागे दुसर्‍या बीबीवर कुठेतरी कोकणातले अनुभव मान्डले होते! तुरळक होते, पण निश्चितच स्वागतार्ह होते! तसे का होत नाही, हा माझ्यापुढचा प्रश्न आहे!
अडचणी आहेतच, अस्तातच, पण त्यावर मात करताना घोडे कुठे पेण्ड खातय त्याचा शोध मी चालवला आहे! असो Happy तुमच्या भावना पोचल्या

लिंबुटींबुजी,
जेव्हा कापडाला दहा-पाच भोके पडतात तेंव्हा ठीगळ बसवणे हा स्वागतार्ह उपाय असतो.
येथे शेतीच्या अर्थव्यवस्थेच्या चिंध्या-चिंध्या झाल्याय.
सर्व तज्ञ,पुढारी मंडळी ठीगळ बसवण्याचे मार्ग अवलंबून चिंध्याच्या आणखी चिंध्या करण्यामध्ये भर घालतात.
प्रश्न सुटण्याऐवजी आणखी किचकट होतात.
आणि सगळ्यात वाईट गोष्ट अशी की या ठिगळ लावायच्या हव्यासाने मुळ मुद्दा पद्धतशिरपणे मागे पडतोय.

शेतीला दुर्दशा येण्याच्या मुख्य कारणावर कोणी बोलतच नाही. Happy

मुटेजी खरा प्रश्न वेगळा आहे अस माझ मत आहे.

१) शेती मध्ये १६% राष्ट्रीय उत्पन्न आहे पण लोक ५५ % या क्षेत्रात आहेत. याचाच अर्थ अनुत्पादक माणसे फार मोठ्या प्रमाणात आहेत. शेतीचे झालेले तुकडे पहाता दरडोई जेमेतेम ०.७५ एकर शेती येते. यामुळे यातुन काय उत्पन्न मिळणार या भावनेने पाडुन ठेवली जाते.

२) कोरडवाहु जमिनीचे प्रमाण २००१ च्या आकडेवारीत ७५% ट्क्के आहे जी फक्त पावसाच्या पाण्याने सिंचीत आहे ते ही बेभरवशी.
३) ०.७५ एकर शेतीचे यांत्रीकीकरण परवडत नाही यामुळे शेती क्षेत्रात जे मनुष्यबळ आहे ते पुर्ण वापरले जात नाही. परदेशांच्या टक्केवारित त्यांची उत्पादकता काहीच नाही.
यावर उपाय
१) हळु हळु जे शेतीचे तुकडे पडले आहेत ते साधारण दरडोई १० एकर येव्ह्डे आल्याशिवाय शेती हा किफायती धंदा होणार नाही.
२) जे मनुष्यबळ शेतीत अनुत्पादक आहे ते अन्य ठिकाणी वापरले गेले पाहिजे. शेतीवर आधारीत उद्योगांचे प्रमाण अजुन वाढले पाहिजे.
३) सिंचनाचे क्षेत्र अजुन वाढले पाहिजे.
पण कराणार कोण ?

नितिनजी मला थोडे वेगळे वाटते.

शेती मध्ये १६% राष्ट्रीय उत्पन्न आहे
राष्ट्रीय उत्पन्न उत्पादनाच्या संख्यांकावर किंवा वजनावर नव्हे तर त्या उत्पादनाच्या मुल्यावर काढले जाते.
जर वजनाच्या आधारे राष्ट्रीय उत्पन्न ठरवले गेले तर याक्षणी सुद्धा देशाच्या उत्पादनाच्या एकुन उत्पादनापैकी शेतीचे उत्पादन हे ९५ टक्क्यांपेक्षा जास्त असणार हे उघड आहे.
परंतू येथे मुख्य गोम अशी की
औद्योगीक मालाच्या किंमती स्वातंत्र्योत्तर काळात भरमसाठ वाढत गेल्यात त्यातुलनेने शेतमालाच्या किंमती वाढल्या नाहीत त्यामुळे एकूण राष्ट्रीय उत्पादनात शेतीचा हिस्सा कमी दिसतो.
त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्न हे उत्पादकतेशी निगडीत नसून त्या उत्पादनाच्या बाजारभावावर अवलंबून आहे हे आपण लक्षात घेतले पाहीजे.

एव्हडा त्रास होतोय शेतीचा तर या शहरात्.लायकीप्रंमाणे काम मिळेल.जेव्हडे कष्ट करताय त्या प्रमाणात मोबदला मिळेल.निसर्ग लहरीवर अवलंबुन रहावे लागणार नाही.अगदी कारकुनी केली तरी पोटभरतील येव्हदे पैसे नक्की मिळतील.चांगले शिकलेले असाल तर अमेरिकेतही जाल,आयुष्य आरामात जाइल.उगीच लोकांना खायला घालण्यासाठी कशाला स्वतःचे नुकसान करुन घेताय.

Pages