म्युच्वल फंड

Submitted by webmaster on 14 May, 2008 - 09:09

म्युच्वल फंड या विषयावरची सर्वसाधारण चर्चा. एखाद्या विशिष्ट फंडाबद्दल चर्चा करायची असेल तर नवीन गप्पांचं पान सुरू करा.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

online trading करन्याआधि practice साठी trading site aahet ka? without investment खेळून पाहता येईल अशी? >> भारतातल्या ट्रेडींगसाठी मला साइटस् बद्दल नक्की माहिती नाही. पण तुम्ही पेपर ट्रेडींग करून प्रॅक्टीस करू शकता...

मि Reliance growth fund र्मधे sip सुरु केल आहे १ वर्शा साथि.
त्याचे returns कसे आहेत. १००० महिना.

म्युच्युअल फंडामध्ये ३ प्रकार असतात.

- Dividend, Dividend Reinvest and Growth

एखाद्या फंडाने डिव्हिडंड दिल्यानंतर त्याची NAV डिव्हिडंड च्या किंमतीने कमी होते.

परंतु Dividend Reinvest and Growth या पर्यायांबद्दल कोणी ज्ञान देऊ शकेल का? या ३ पर्यायांपैकी सर्वोत्तम पर्याय कोणता?

गुरुजी,
१) डिव्हिडंड पेआउट : यात त्या फंडला झालेला फायदा लाभांश म्हणून युनिटधारकाला वितरित केला जातो. त्याच्या बँक खात्यात जमा होतो.
२) Dividend Reinvest यात डिव्हिडंड्ची अमाउंट वापरून ex-dividend NAV ने तुमच्या खात्यात आणखी युनिट्स जमा होतात. म्हणजे एका परीने मिळालेला लाभांश वापरून तुम्ही त्याच योजनेचे आणखी युनिट विकत घेतले, ex-dividend NAV ला.
३) ग्रोथ : यात लाभांश दिला जात नाही. योजनेला नफा झाला तर तिची NAV वाढत जाते.
सर्वोत्तम पर्याय कोणता हे तुमच्या गरजेवर अवलंबून आहे.
जर तुम्ही दीर्घ कालासाठी काही उद्देशाने गुंतवणूक करत असाल तर ग्रोथ पर्याय योग्य. इक्विटी/बॅलन्स्ड योजनेत ग्रोथ पर्यायच बरा, त्यामुळे तुमच्या योजनेचा performance कसा आहे ते तुलना करणे सोपे जाते.
२) जर तुम्हाला नियमित उत्पन्न हवे असेल तर Dividend payout योग्य. उदा: मासिक उत्पना योजना किंवा डेब्ट योजना(अर्थात लाभांशाची गॅरंटी नाही)
३)इक्विटी शिवाय अन्य योजनांमधे लाभांश जाहिर करताना फंडला dividend distribution tax भरावा लागतो. त्यामुळे योजनेची NAV लाभांशाच्या रकमेपेक्षा थोडी जास्त खाली जाते. पण हा लाभांश तुम्हाला मात्र करमुक्त आहे. तेव्हा ज्यांचे उत्पन्न करपात्र आहे त्यांना डेब्ट योजनेत वा मासिक उत्पन्न योजनेत पहिला पर्याय फायदेशीर ठरू शकतो.(ठरेलच असे नाही).इक्विटि योजनेत लाभांशावर कर नाही.

जर तुम्ही पर्याय १ स्वीकारला असेल आणि तुम्हाला त्या रकमेची गरज नसेल तर पर्याय २ मधे जाता येईल.

Reliance growth fund ने अतिशय उत्तम परतावे दिलेत गेल्या ३ वर्षात. माझा SIP आहे यात.
>>जर तुम्ही दीर्घ कालासाठी काही उद्देशाने गुंतवणूक करत असाल तर ग्रोथ पर्याय योग्य.<< सहमत.

पुढच्या वर्षी उत्पन्न करपात्र होईल्....त्याआधी फंडात पैसे गुंतवावे म्हणतेय.! कुठला फंड घ्यावा, जाणकारांनी मार्गदर्शन करावे...

तुम्हाला equity linked tax savings scheme हवीय का? शक्यतो जुन्या स्कीम मधे पैसे गुंतवावेत, तसेच अगदी मार्चची वाट न बघता एप्रिलपासूनच पैसे गुंतवण्यास सुरुवात करावी.sip केल्यास मार्केट मधल्या चढउतारीचा परिणाम कमी होईल.
फंड निवडताना नुसताच परतावा न पाहता, फंड हाउस बरोबर व्यवहार करताना असलेली सोय , आपल्या कडे आधी पासून असलेल्या स्कीम्स यांचा ही विचार करावा.
इथे तुम्हाला परतावा, रिस्क यांची माहिती मिळेल.

http://new.valueresearchonline.com/funds/h2_fund_select.asp?mininitinves...

<<<तुम्हाला equity linked savings scheme हवीय का? शक्यतो जुन्या स्कीम मधे पैसे गुंतवावेत, तसेच अगदी मार्चची वाट न बघता एप्रिलपासूनच पैसे गुंतवण्यास सुरुवात करावी<<<.

भरतजी, म्युच्वल फंड बद्दल मला काहीच माहीती नाहीये.इक्विटी लिन्क्ड बद्द्ल अजुन सांगा प्लिज. (वरच्या चर्चेवरुन मी एल आय सी मार्केट प्लस मधे गुंतवलेले पाण्यात जाणार असं दिसतय. Sad )

आयकर वाचवण्यासाठी ज्यात गुंतवणुक करता येते अशा स्कीम्स म्युच्यल फंड्स काढतात, जास्तीत जास्त १,००,००० पर्यंत गुंतवणूक एका वर्षात करता येते. पण आपल्याला किती गुंतवणूक करण्याची गरज आहे ते पाहावे, जसे पगारातून कापला जाणारा प्रॉव्हिडंट फंड, मुलांच्या शिक्षणावरील खर्च, इ.
गुंतवणुकीच्या अन्य मार्ग-जसे एनेस्सी, ५ वर्षांचे डिपॉझिट यापेक्षा परतावा जास्त मिळण्याची शक्यता. (पुन्हा तुम्ही पैसे ३ वर्षाच्या लॉक्-इन कालानंतर कधीही काढू शकता, म्हणजे संधीची वाट पाहता येते).
मी ज्या फंड हाउसेस मधे गुंतवणूक केली त्यात hdfc mf परतावा आणि सेवा या दोन्हीच्या बाबतीत चांगला वाटला. HDFC Tax saver ,HDFC Long Term Advantage Fund (ELSS) हे दोन्ही चांगले आहेत.पुन्हा HDFCMF सगळ्यात मोठ्या ५ फंड हाउसेस पैकी एक आहे...
युटीआयच्या इक्विटी स्कीम्सचा परतावा यांच्या तुलनेत व सरासरीपेक्षाही बराच कमी आहे.
Dividend Reinvest हा पर्याय निवडू नका, कारण वाढलेल्या युनिट्स ना पुन्हा ३ वर्षांचा लॉक इन लागेल. पेआउट किंवा ग्रोथ पर्याय बरा. मी दिलेल्या लिंक मधे दाखवलेले रिटर्न्स ग्रोथ पर्यायासाठी आहेत.

HDFC Long Term Advantage Fund (ELSS), Franklin Tax Shield (ELSS) हे दोन्ही SIP चांगले आहेत. Growth option मध्ये फक्त notional growth होते. त्यापेक्षा Dividend Payout हा पर्याय चांगला.

आर्या,एल आय सी मार्केट प्लस युलिप योजना आहे, आणि त्याविषयीच्या वादंगाबद्दल तुम्ही ऐकलेच असेल. पैसे पाण्यात गेले असे काही नाही, पण हात दगडाखाली मात्र नक्की आलाय. त्यातले चार्जेस सुरुवातीच्या वर्षांत कापून घेतल्याने तुम्हाला गुंतवणुकीवर चांगला परतावा हवा असेल, तर शेवट पर्यंत टिकून राहणे आवश्यक आहे.
विमा हा आपल्यानंतर आपल्या प्रियजनांच्या आर्थिक सुरक्षेसाठी असतो, तेव्हा विमा आणि गुंतवणूक या गोष्टी निराळ्या ठेवाव्या. विम्यासाठी टर्म पॉलिसी आणि गुंतवणुकीसाठी म्युच्यल फंड घेतल्यास तुमची कॉस्ट नक्कीच कमी बसेल. करबचतीसाठी गुंतवणु़क करतानाही ती आपल्या एकंदर आर्थिक नियोजनात बसणारीच करावी.
(दर वर्षी मार्चच्या शेवटच्या आठवड्यात नवी नवी विमा पॉलिसी घेणारी मंडळी असतात)

वीमा आणि मुच्युअल फंड हे दोन वेगले प्रकार आहेत. युलिप घेऊ नका. खुप जास्त चाज्रेस लागतील. त्या पेक्षा टम्र इंशुरंस घ्या आणी चांगले इक्विटी डायव्रसीफाइड फंड मधे SIP सुरु करा महिना १००० रुपये.
खालील पैकी :-
1. IDFC Premier Equity - Plan A
2. DSP Blackrock Top100
3. HDFC Equity
4. SBI Magnum Global
5. ICICI Pru Discovery Fund

संतोष म्हात्रे
- AMFI Certified Mutual Funds Advisor,India
- NYSE Certified Series 6 Professional,USA

DSP Blackrock Top100, SBI Magnum Global या दोन्हीपैकी कोणत्या स्किममध्ये गुंतवणुक करणे फायदेशीर आहे?

DSP Blackrock Top100 मध्ये करणे चांगले ठरेल असे वाटते. कारण SBI Magnum Global चा फंडसाईज खूप मोठा आहे. म्हणजे ह्यांची हालचाल पण हत्ती सारखी मंद ठरेल. गेले चार एक वर्षे असे दिसून येत आहे की ज्यांचा फंड साईज व्यवथित आहे ते फंड चांगले परफॉर्म करतात. उदा सुंदरम चे फंड. अर्थात SBI Magnum अन टॉप ५ मध्ये फार फरक नाही. SBI चे फंड मॅनेजर्स चांगलेच असतात. त्यामुळे हा देखील चांगलाच आहे. जेंव्हा ५ वर्षाचे रिटर्नस पाहतो तेंव्हा SBI वगैरे टॉप वर येतील पण १ वगैरे पाहिले तर बरेच छोटे फंड टॉप वर येतात.

आम्ही दोनेक वर्षांपुर्वी काही पैसे एका ब्रोकरच्या सल्ल्याने म्युच्युअल फंडात गुंतवले आहेत, पण सध्या एकंदरीत या गुंतवणुकीत तोटा दिसत आहे....
जाणकार सल्ला देतील का?

डिटेल्स असे आहेत :

MF.jpg

I am more worried about JM Agri & Infra Fund.

तीन चुका झाल्यात : १)सगळे पैसे एकदम गुंतवलेत. इक्विटी/बॅलन्स्ड फंडस मधे गुंतवताना गुंतवणूक साधारण वर्षभर काही दिवसांच्या अंतराने करायला हवी होती. एस आय पी उत्तमच्...त्यामुळे बाजारातल्या चढउताराचा परिणाम कमी जाणवतो. ही सगळी गुंतवणूक शेअर बाजार त्याच्या सर्वोच्च पातळीवर असताना झाली आहे, सेन्सेक्स २००००-२१०००. त्यामुळे नुकसान आणखीनच जास्त.
२) सेक्टर फंड्स मधल्या गुंतवणुकीत रिस्क डायव्हर्सिफाइड इक्विटि फंड पेक्षा बरच जास्त असते...त्यामुळे यात फायदा जास्त झाला तरी नुकसानही अधिक जास्त होते. सेक्टर फंड मधे गुंतवणुकीची खरे तर गरज नाही, केलीच तर एका सेक्टर मधे आपल्या एकंदर गुंतवणुकीपेक्षा २-३% जास्त असू नये. जेव्हा आपण डायव्हर्सिफाइड इक्विटी फंड मधे गुंतवणूक करतो , तेव्हा त्यात हे सेक्टर बहुधा येतातच. याउपर एखाद्या सेक्टर फंड मधे गुंतवायचेच असेल तर त्याचा नीट अभ्यास करून करणेच योग्य (जसे कंपनीचे शेअर घेताना आपण करतो).
३) नव्या योजनांत पैसे गुंतवलेत- इथे फंडची कामगिरी तपासण्याची संधी मिळत नाही, त्यामुळे शक्यतो नव्या स्कीम मधे गुंतवणूक टाळावी.
आता या फंड बद्दल.
१) जे एम अ‍ॅग्रि - हा क्लोज एन्ड फंड आहे, आणि डिसेंबर २०१० मधे मॅच्युरिटी आहे, त्यानंतर ती ओपन एंड होईल. सध्या महिन्यातले पहिले ५ दिवस रिपर्चेस करता येते. अ‍ॅग्रि सेक्टर आणि इन्फ्रा सेक्टर दोन्ही गेले वर्षभर खराब चाललेत. गेल्या एका महिन्यात या फंडची एनएव्ही वाढली आहे. चांगला मॉन्सूनच्या भरोशावर वाट बघून मॅच्युरिटीलाबाहेर पडणे योग्य.
२) बिर्ला सनलाइफ इंटरनॅशनल इ॑क्विटि प्लान : याची कामगिरी बेंचमार्क व याच प्रकारच्या इतर फंड्सपेक्षा फार वाईट नाही.
३) सुंदरम बीएन्पी परिबा एनर्जी अपॉर्च्युनिटी ग्रोथ : हाही क्लोज एंडेड सेक्टर फंड आहे, कामगिरी साधारण आहे. डिसेंबर २०१० मॅच्युरिटी आहे.
४)रिलायन्स इक्विटी अ‍ॅडव्हँटेज फंड : याची कामगिरी सेन्सेक्स पेक्ष चांगली, पण इतर फंडस्च्या तुलनेत साधारण (अ‍ॅव्हरेज आहे).जास्त गुंतवणूक फायनान्स, एनर्जी या क्षेत्रात आहे.
५)कोटक इंडो वर्ल्ड इंफ्रास्ट्रक्चर फंड- खराब कामगिरी -इतर फंड्स्च्या तुलनेत आणि सेन्सेक्स पेक्षाही. वित्त, बांधकाम, उर्जा क्षेत्रात गुंतवणूक जास्त.
६) आयसीआयसीआय प्रु.रिअल इ.से.: हा क्लोज एंड हायब्रिड फंड आहे व इक्विटीचे प्रमाण नगण्य आहे. डिसेंबर २०१० मधे मॅच्युरिटी आहे.
७)युटीआय इन्फ्रा अ‍ॅड -१ : क्लोज एंड -मॅच्युरिटी डिसेंबर २०१०. खराब कामगिरी.

सगळ्या क्लोज एंड योजनात मॅच्युरिटी पर्यंत राहणे योग्य ठरावे.

अगदी चुकीचा सल्ला मिळालाय तुम्हाला, हे मी एक गुंतवणुकदार म्हणून सांगतोय.

http://new.valueresearchonline.com/default.asp इथे भेट देत रहा.

अगदी चुकीचा सल्ला मिळालाय तुम्हाला, हे मी एक गुंतवणुकदार म्हणून सांगतोय >> भरतशी मी सहमत आहे. पण डॅमेज इज डन, त्यामुळे परत त्या सल्लागारा कडे जाऊ नका. गंमत म्हणजे हे सगळे सेक्टरल फंड आहेत. इन्फ्राबद्दल फार काळजी करु नका.मध्यंतरी मार्केट तीन ते चार वेळा करेक्ट झाले तेंव्हा तुम्ही ते अजून घेतले असते तर जास्त चांगले झाले असते. आताही जर करेक्शन झाले तर थोडे थोडे इन्फ्रा फंड (वेगळे) घेतले (करेक्शन झाल्यावरच) तर हे २,१२५ चे नुकसान सहज भरुन येईल.
तो रियल इस्टेटवाला विकून टाका. तेवढा फायदा बुक करुन घ्या. त्या सेक्टर मध्ये काही राहिलं नाही आता.
इतर फंड बद्दल मी साशंक आहे. खासकरुन JM AGRI. त्यात ऑलरेडी तुमचे ३४,७०० गेले आहेत व फक्त १५००० उरले पण मला वाटत की ह्या १५००० ची एवढी निकड नसेल (कारण रक्कम हातात फक्त १५ च येईल ) तर हा फंड विकू नये, ओपन झाल्यावर जसे जसे हा फंड थोडावर वाढला तसे तसे विका. एवीतेवी पैसे गेले आहेत तर लॉस बुक करुन काय फायदा?

परत असे दिसते की तुम्ही गुंतवणूक केल्यावर त्या गुंतवणूकीकडे दुर्लक्ष केले. कारण तसे नसते तर ह्या प्रत्येक पडझडीत जास्त खरेदी करता आली असती. काही डायव्हर्सीफाईड फंडस नी खूप चांगले रिटर्नस दिले आहेत. आणि माझ्यामते कुठल्याही गुंतवणूकदाराला हे सर्वात जास्त धोकादायक असते. तेंव्हा पुढिल गुंतवणूक केल्यावर तिच्याक्डे लक्ष द्या. मुख्य म्हणजे मार्केट वर गेल्यावर गडबडीत गुंतवणूक करु नका.

(सॉरी जरा जास्तच सल्ले दिले. )

केदार यातले बहुतेक फंड्स क्लोज एंड आहेत त्यामुळे आणखी खरेदीची शक्यता बंद.
लॉस अ‍ॅव्हर्शन - गुंतवणूक नुकसानीत विकण्याचे टाळणे हा एक दोष मानला जातो...डोळस गुंतवणू़कदार तोटाही सहन करण्याची तयारी ठेवतो..जे एम अ‍ॅग्रि दिवाळी किंवा मॅच्युरिटीला विकणे उत्तम्...तसे पण जे एम ची इक्विटी फंड्स मधली कामगिरी खूप खालावली आहे....सेक्टर फंड्स मधे एवढी गुंतवणूक का हवी याचा विचार करायला हवा...या सर्व फंडमधली बहुतेक गुंतवणू़क वित्त, उर्जा व इंफ्रा या क्षेत्रात आहे जे २००७ मधे अगदी तेजीत होते.
रिअल इस्टेट वाला फंड debt oriented आहे, त्यामुळे त्यात फायदा नुकसान असे काही नाही.

मी गेल्या वर्षी reliance growth fund चा SIP सुरु केला होता. १K every month.
मला आता अजुन SIP करायचे आहे. दर महिना २०K गुन्तवायचे आहे. पण एकाच MF मधे सगळे पैसे टाकण्या पेक्षा ३-४ MF मधे गुन्तवायचे आहे. गुन्तवणुक long term उद्दिष्टा करता असल्याने growth option मधे गुन्तवणुक करण्याचा विचार आहे.चौकशी अन्ती मला खालील MF बरे वाटतात आहे.

1) Hdfc Top 200
2) Hdfc prudence
3) Franklin India BlueChip
4) Icici Pru Dynamic
5) Templeton India Pension Plan
६) Franklin Prima plus

या पैकि कुठल्या MF मधे गुन्तवणुक करणे फायदेशिर ठरु शकते? जाणकारानी please सल्ला द्यावा. या व्यतिरिक्त इतर कुठल्या चान्गल्या MF चि माहिती असल्यास जरूर सान्गा. वरिल सर्व funds चि माहिती मि www.valueresearchonline.com वरुन मिळवलि आहे.

धन्यवाद
अरुन्धती

१) एच डी एफ सी टॉप २०० : अगदी योग्य निवड ..सातत्याने चांगली कामगिरी...२०% गुंतवणू़क स्मॉल कॅपमधेही आहे.
२)एच डी एफ सी प्रुडंस फंड : हा अ‍ॅग्रेसिव्ह बॅलंस्ड फंड आहे :७५ % इक्विटी मधे..मिड कॅप /स्मॉल कॅपचे प्रमाण ४०%/२०%. अनेक निखळ इक्विटी फंडपेक्षा जास्त परतावा देतो.
३)फ्रँकलिन इंडिया ब्ल्युचिप : अर्थात नावाप्रमाणेच भक्कम : इक्विटीच्या तुलनेत कमी धोका..सेन्सेक्स्/निफ्टीपेक्षा चांगली कामगिरी पण इतर फंड्च्या तुलनेत नेहमीच चांगली असेलच असे नाही.
४) आयसीआयसीआय प्रु डायनॅमिक : बदलत्या मार्केट प्रमाणे गुंतवणू़क बदलणारा फंड : पडत्या मार्केटमधे गुंतवणुकीस योग्य्...कामगिरीत सातत्य नाही.
५)टेंपल्टन इं.पेन्शन प्लानः ही debt स्कीम आहे, यात एस आय पीची गरज नाही. इतर डेब्ट फंडसच्या तुलनेत कामगिरी खराब.
६) फ्रँकलिन प्राइमा प्लसः दीर्घ कालावधीत चांगली कामगिरी .सेन्सेक्स्/निफ्टीपेक्षा चांगली कामगिरी पण इतर फंड्च्या तुलनेत नेहमीच चांगली असेलच असे नाही.

याखेरीज टेंपलटन इंडिया ग्रोथ फंड हाही विचार करण्यायोग्य आहे.
फ्रँ.टें.ची गुंतवणूक एका निश्चित विचाराने होत असते, बदलत्या वार्‍याप्रमाणे बदलत नाही त्यामुळे दीर्घ कालावधीसाठी चांगल्या आहेत.
जर डेब्ट स्कीम निवडायची असेल तर टेंपलटन इंडिया शॉर्ट टर्म इनकम प्लान चांगली आहे, व्याज दरांच्या अनिश्चिततेच्या दृष्टीने.
१, ३ नक्कीच गुंतवणूक योग्य.

धन्यवाद भरत Happy
गुन्तवणुक सन्दर्भात तज्ञ नसल्याने, आपण करतोय ते चूक कि बरोबर तेच कधि कधि सम्जत नाहि. तज्ञ लोकान्चा सल्ला मिळाला कि जरा हायसं वाटतं

धन्यवाद.
अरुन्धती

Pages