म्युच्वल फंड

Submitted by webmaster on 14 May, 2008 - 09:09

म्युच्वल फंड या विषयावरची सर्वसाधारण चर्चा. एखाद्या विशिष्ट फंडाबद्दल चर्चा करायची असेल तर नवीन गप्पांचं पान सुरू करा.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भरत / केदार
थोडे सरप्लस पैसे आहेत. विकली STP करायची आहे. खालील पर्याय कसे आहेत.
DSPBR FRF Regular G Debt fund To
DSPBR Top 100 Regular

HDFC Cash management transfer advantage retail G to
HDFC Prudence and
HDFC Equity or HDFC top 100

Fidelity UST Debt retail G to
Fidelity equity

Reliance money manager retail G
Reliance regular saving equity.

काही वेगळे वाटले तर सुचवा.

केदार >> परत असे दिसते की तुम्ही गुंतवणूक केल्यावर त्या गुंतवणूकीकडे दुर्लक्ष केले. कारण तसे नसते तर ह्या प्रत्येक पडझडीत जास्त खरेदी करता आली असती.

हा महत्वाचा मुद्दा आहे. आणि मी जेवढे होईल तेव्हढे हे करत असतो आणि त्याने झालेला फायदा ही पाहिलेला आहे. मात्र ह्यात वहावत जाता कामा नये.

उदा. २००५ साली मी रिलायन्स इक्विटी अ‍ॅड्व्हाण्टेज मध्ये मी NFO ला ५००० गुंतवून MF Investment मध्ये पदार्पण केले आणि १ वर्षातच NAV 20 च्या वर जाउ लागले तेव्हा मी त्यातुन ५००० बुक करुन घेतले तरीही माझ्याकडे २५० युनिट्स ऊरली. त्यानंतर मात्र पडझड सुरु झाली. मग जेव्हा भाव १८ झाला तेव्हा मी त्यात १०००० गुंतवले, मात्र घसरण सुरुच राहिली, १६ झाल्यावर आणखी ५००० गुंतवले. पडत्या मार्केटमध्ये गुंतवणूक करायला देखील कॅल्क्युलेशन आणि धैर्य लागते पण जर लॉन्ग टर्म ऑब्जेक्टीव्ह असेल तर बर्‍याचदा अशी गुंतवणूक फायदेशीर ठरते.

सध्या पुन्हा NAV 20 च्या आसपास आहे.

मलाही बर्‍याच वेळा लक्ष द्यायला जमत नाही त्यामुळे मी बर्‍याच स्कीम्स डिव्हीडंड देणार्‍या केलेल्या आहेत ज्यामुळे आपोआप बुकींग होत रहाते. बूकींग म्हणणे चुकीचे आहे पण काहीतरी परतावा मिळत रहातो. 'रिइन्व्हेस्टमेण्ट ऑप्शन' माझ्या मते चक्क मूर्खपणा आहे (म्हणजे डिव्हीडंड मधून आणखी युनिट्स विकत घेणे). त्यापेक्षा ग्रोथ ऑप्शन लॉन्ग टर्म साठी चांगला वाटतो असे माझ्या अनुभवावरुन वाटते.

आपले पर्सनल डायव्हर्सीफिकेशन अत्यंत महत्वाचे आहे म्हणजे फिक्स्ड डिपॉ़झिट्स, बोण्ड्स, ईंषुरन्स, पोष्टल स्कीम्स व पीपीएफ ह्यात देखील गुंतवणूक करणे आवश्यक आहे असे माझे मत आहे.

सर्वात महत्वाचे म्हणजे सल्ले जरुर ऐकावेत पण ते आपल्याला पटले तरच स्वीकारावेत आणि एकदा स्वीकारल्यावर अ‍ॅड्वायजर ला दोष देण्यात काही पॉईंट नसतो. करण शेवटी पैसे तुमचे असतात! मीही अ‍ॅड्वायजर च्या इन्सेन्टीव्ह ला बळी पडून एक गुंतवणूक केली होती 'कोटक ३०' पण त्याचा म्हणावा तसा परतावा मिळाला नाही. अर्थात केदारने म्हटल्याप्रमाणे मी त्यावर लक्ष ठेवले नाही. ह्यावरुन अजून एक सूत्र मला मिळाले की तुमचा पोर्टफोलियो भरमसाठ वाढवू नका. जेव्हा शक्य असेल तेव्हा नुकसान सोसूनही Consolidation करता येत असेल तर करत जा कारण नाहीतर बर्‍याच गुंतवणूकीत दुर्लक्ष होऊ शकते.

वरील सर्व निरीक्षणे माझ्या वैयक्तिक अनुभवावर आधारित आहेत पण मला वाटते इथल्या सर्व पोष्ट्स ना एक डिस्क्लेमर टाकणे आवश्यक आहे "Mutual Funds Investments are subject to Market Risks, Please refer to Offer Documents carefully before investing"

त्यामुळे इथे दिलेले सल्ले (देणार्‍या व्यक्तीचा योग्य आदर राखून ) आपल्या बाबतीत योग्य आहेत की नाही ते नक्की तपासून पहावे.

सुरेश : वीकली stp ची कल्पना खुप छान आहे. hdfc cash management treasury advantage fund : एक वर्षाचे 4.68 % expenses :0.5% नो एक्झिट लोड म्हणजे net savings account 3.5% पेक्षा जास्त. prudence fund, top200 , equity तिन्ही छान आहेत.
पन तुम्ही विकली करताय म्हणजे मार्केट खुप लवकर चांगले वधारेल असा विश्वास दिसतोय. मार्केट रेंज बाउंडच आहे म्हणुन म्हटले, व्होलाटिलीटी पण फार नाही सध्या तरी, त्यामुळे विकली आणि मंथली मधे खुप फरक पडेल का अ‍ॅव्हरेजिंगने?
अर्थात तुम्हाला तसा विश्वास असेल तर विकली करायलाच हवे. अनि ही गुन्तवणुक दीर्घ मुदतीसाठीच असायला हवी.

इतर फंड हाउसेसचा अनुभव नाही.

किरण अनुमोदन : सल्ल्याबद्दल.

<<मलाही बर्‍याच वेळा लक्ष द्यायला जमत नाही त्यामुळे मी बर्‍याच स्कीम्स डिव्हीडंड देणार्‍या केलेल्या आहेत ज्यामुळे आपोआप बुकींग होत रहाते. बूकींग म्हणणे चुकीचे आहे पण काहीतरी परतावा मिळत रहातो. 'रिइन्व्हेस्टमेण्ट ऑप्शन' माझ्या मते चक्क मूर्खपणा आहे (म्हणजे डिव्हीडंड मधून आणखी युनिट्स विकत घेणे). त्यापेक्षा ग्रोथ ऑप्शन लॉन्ग टर्म साठी चांगला वाटतो असे माझ्या अनुभवावरुन वाटते.>>

डिव्हिडंड रिइन्वेस्ट आणि ग्रोथ यातला परतावा (रिटर्न) इक्विटी योजनात तरी सारखाच येतो (डीडीटी नसल्याने). बर्‍याच जुन्या योजनांत सुरुवातीला ग्रोथ ऑप्शनच नव्हता, तिथे जर डिव्ह पेआउट घेतले असेल आनि आता ग्रोथच हवी असेल तर रिइन्व्हेस्ट करायला काही हरकत नाही.
जसे शेअर्समधे पण स्टॉप लॉस किंवा लिमिट ऑर्डर करता येते तसे काही फंड योजनांमधे पण अशी सुविधा आली होती. काही योजनाच अशा आल्या होत्या, की अमुक इतके टक्के नफा झाला की तो बुक करून तुम्हाला दिला जाईल.

मी जे एम अग्रि आणि इन्फ्रा, सुन्दरम एनर्जि आपो. मध्ये इन्वेस्ट केले आहे.त्याचे भवितव्य काय आहे?कहि प्रगति होण्यचि आशा आहे का?
in january 2011 both the fund are converting from close ended to open ended. can you suggest that SIP IS BENEFICIAL.
j m agri and infra nav is Rs.3.00
sundaram energy opportunities fund- Rs.8.55
please guide me.

सुधीर हे आधीच इथे लिहिले होते :
सेक्टर फंड्स मधल्या गुंतवणुकीत रिस्क डायव्हर्सिफाइड इक्विटि फंड पेक्षा बरच जास्त असते...त्यामुळे यात फायदा जास्त झाला तरी नुकसानही अधिक जास्त होते. सेक्टर फंड मधे गुंतवणुकीची खरे तर गरज नाही, केलीच तर एका सेक्टर मधे आपल्या एकंदर गुंतवणुकीपेक्षा २-३% जास्त असू नये. जेव्हा आपण डायव्हर्सिफाइड इक्विटी फंड मधे गुंतवणूक करतो , तेव्हा त्यात हे सेक्टर बहुधा येतातच. याउपर एखाद्या सेक्टर फंड मधे गुंतवायचेच असेल तर त्याचा नीट अभ्यास करून करणेच योग्य (जसे कंपनीचे शेअर घेताना आपण करतो).
जे एम अ‍ॅग्रि - हा क्लोज एन्ड फंड आहे, आणि डिसेंबर २०१० मधे मॅच्युरिटी आहे, त्यानंतर ती ओपन एंड होईल. सध्या महिन्यातले पहिले ५ दिवस रिपर्चेस करता येते. अ‍ॅग्रि सेक्टर आणि इन्फ्रा सेक्टर दोन्ही गेले वर्षभर खराब चाललेत. गेल्या एका महिन्यात या फंडची एनएव्ही वाढली आहे. चांगला मॉन्सूनच्या भरोशावर वाट बघून मॅच्युरिटीलाबाहेर पडणे योग्य.
सुंदरम बीएन्पी परिबा एनर्जी अपॉर्च्युनिटी ग्रोथ : हाही क्लोज एंडेड सेक्टर फंड आहे, कामगिरी साधारण आहे. डिसेंबर २०१० मॅच्युरिटी आहे.

सेक्टर फंड मधे आणखी गुंतवणूक करावी का हेच ठरवावे लागेल. दोन्हीमधून मॅच्युरिटीला बाहेर पडणेच इष्ट.

नमस्कार मित्रांनो,

मी काही दिवसांपुर्वीच सेवानिवृत झालो आहे. मलाही काही रक्कम म्युच्यल फंडात गुंतवायची आहे. या माझ्या कामात मला तुमची नक्कीच मदत होईल अशी मी आशा करतो.
दीपतेज

मला HDFC top २०० घेन्याचा सल्ला माझ्या अ‍ॅड्वायजर ने दिला आहे, मि तो घेऊ कि नको क्रुपया योग्य सल्ला द्या.

केदार, सल्ल्या बद्दल धन्यवाद.
त्याच बरोबर खालील प्रश्न डोक्यात घोळत आहेत परंतु निर्णय होत नाही.

१) या पिकवरच्या मार्केटमध्ये, मला जी रक्कम Balanced किंवा Debt Funds मध्ये गुंतवायची

आहे, ती आता गुंतवणे योग्य होईल का? टायमींगच्या दृष्टीने, SIP करावा का ? Balance Fund

करीता.

२) मला Short Term (Fixed Term) Debt Fund बद्दलही फारशी माहीती नाही. अशा

Funds मध्ये मार्केट stable होईपर्यंत म्हणजे ३/४ महीने पैसे ठेवणे फायदेशीर होईल का? (निव्वळ

Savings A/c मध्ये ठेवण्यापेक्षा.) किंवा

३) सध्या अयोध्या खटल्याच्या पार्श्वभूमीवर काही काळ काहीही निर्णय न घेणे योग्य ठरणार आहे.

कृपया आपले मत कळवावे.

दीपतेज तुम्ही जे १ आणी २ विचारले आहेत तेच प्रश्ण मला पण आहेत.
केदार, भरत ,कोणी ह्या प्रश्णाचे उत्तर देउ शकाल का?
सई

टायमींगच्या दृष्टीने, SIP करावा का ? Balance Fund करीता. >>> SIP करणे एक चांगली सवय आहे असे माझे वैयक्तीक मत आहे. पण आत्ता खरचं नका करु. एखाद महिना- पंधरा दिवस वाट पाहा. वाटल्यास ३० दिवसाच्या मुदतीसाठी FD मध्ये पैसे गुंतवा. मार्केट वर गेलेले खाली येऊन परत वर जाणार आहे ह्यात वाद नाही. पण पिक आहे हे माहिती असताना पैसे हातात असलेले बरे. SIP ला आक्टो अखेरिस किंवा मार्केट जर (निफ्टी) २०० ने पडला तर सुरु करा. जर मी लिहल्यासारखे मार्केट पडले नाही तर तुमचे थोडे नुकसान होईल,पण भांडवल तसेच राहिल. (ऑपार्च्युनिटी लॉस्ट म्हणा हव तर) पण आत्ता गुंतवणूक केली व मार्केट पडले तर जास्त होईल.

Funds मध्ये मार्केट stable होईपर्यंत म्हणजे ३/४ महीने पैसे ठेवणे फायदेशीर होईल का >> बँकींग ने आउटपरफॉर्म करण्याचे दुसरे कारण आता व्याजदर थोडे वाढणार आहेत. (कर्जावरचे, सेव्हिजवर काही फारसा फरक नाही, थोडाच पडेल) त्यामुळे डेट फंड मध्ये २-३ महिन्यात किती परतावा मिळेल ह्यावर काही लिहता येते नाही,

तुम्हाला डेट फंड वा SIP हे दोनच पर्याय ठेवायचे असतील तर मात्र मग मी SIP म्हणेन. अन्यथा आधी लिहल्यासारखे १ महिन्याचे FD पण, सेव्हिंग अकाउंटपेक्षा योग्यच ठरेल. किंवा अगदीच वर जाणार्‍या नफ्याला सोडायचे नसेल तर एकुण जर ५ लाख टाकणार असाल तर आत्ता फक्त २०,००० ने सुरु करा.

मार्केटमधील एन्ट्री आणि एक्झिट यांचे टाइमिंग जमवणे हे शक्य असते का? यावर या प्रश्नाचे उत्तर अवलंबून असेल. जर तुम्ही दीर्घकालीन गुंतवणूक करत असाल, तर टाइमिंगपेक्षा SIP कधीही योग्यच ठरेल.
गुंतवणुकीचा एक उद्देश दीर्घकालीन नफा कमवणे हा असला, तरी गरजेच्या वेळी तोटा सहन न करता काही रक्कम उभी करता यावी असे वाटत असेल(आणि तसे वाटायला हवे), तर आपल्या गुंतवणुकीचा काही काही भाग debt, mip, balanced योजनांमधे गुंतवणे हे equity योजनांमधे गुंतवण्याइतकेच गरजेचे आहे. फायदा/नफा, सुरक्षितता आणि लिक्विडिटी या तीनही गरजा पूर्ण करणारी गुंतवणुक साधने वेगवेगळी असतील. त्यांचे आपल्या पोर्टफोलिओमधले प्रमाण स्वत:च्या गरजा, उद्दिष्टे, कुवत आणि मानसिकता (धोका पत्करण्याची तयारी/कुवत आणि गुंतवणुकीसाठी वेळ/विचार देणे) यानुसार बदलेल.
बॅलंसड फंडचा फायदा हा की मार्केट पडले तर आपले नुकसान त्या प्रमाणात न होता, कमी झाल्याने लगेच टोकाचे निर्णय घ्यायची इच्छा होत नाही. MIP योजनाही
debt schemes पेक्षा दीर्घ मुदतीत चांगला परतावा देतात. अर्थात स्टॉक मार्केट पडले तर त्यांची एनेव्हीही खाली येते.
HDFC MIPLT and HDFC Prudence फंड या दोन चांगल्या योजना दिसल्या. मी २ वर्षांपूर्वी MIP->Prudence (balanced fund) असे वर्षभर stp (sytematic transfer plan) करून चांगले रिटर्न्स मिळवले आहेत.
short term debt fund : या पर्यायातले नव्याने निर्माण झालेले काही तोटे. एन्ट्रि लोड बंद झाल्यापासून बर्‍याच फंड्स नी एक्झिट लोड किंवा त्याचा कालावधी वाढवला आहे. तसेच रिझर्व्ह बँकेने जसे जसे रेट्स वाढवलेत तसे तसे या योजनांमधले रिटर्न्स कमी झालेत. आणि यापुढेही ही रिझर्व्ह बँक रेट्स वाढवणारच नाही अशी चिन्हे नाहीत.
त्यापेक्षा अनेक बँका देत असलेली फ्लेक्झी डिपॉझिटची योजना जास्त फायदेशीर ठरू शकते. यात किमान रक्कम सेव्हिंग खात्यात ठेवून उरलेली रक्कम अल्पमुदतीच्या (३-६ महिने ) फिक्स्ड डिपॉझिटमधे ठेवली जाते आणि ती रक्कम काढताना नोटिस पिरियड किंवा पेनल्टीही लागत नाही.

मी Reliance growth fund मधे सीप सुरु केले आहे.
त्यचे future कसे आहे.
दुसरा कोणता फन्द चान्गला आहे सीप साथि
आभारी आहे

केदार,
मी UTI मधे सीप सुरु केले आहे.
त्यचे future कसे आहे.
दुसरा कोणता MF चान्गला आहे SIP करिता.
आभारी आहे

गणेश सप्रेम नमस्कार
युटीआय च्या कुठल्या स्कीम मधे सिप सुरू केलेय हे कळवले असते तर मी मत देउ इच्छीत होतो.असो.
गुंतवणूक करताना तुम्हाला किती काळासाठी करायची आहे, रिस्क फॅक्टर किती घेऊ शकता यावर ह्या गोष्टी अवलंबून असतात. तरीही एक बेंचमार्क म्हणून एसबीआय चा MSFU Contra ग्रोथ घेउन पहा चांगले रिटर्न आहेत. अथवा Reliance Diversified Power Sector Fund घ्या.

In order to enhance compliance with Know Your Customer (KYC) norms under the Prevention of Money Laundering Act, 2002 (PMLA) and to mitigate the risks associated with acceptance of third party payment instruments (cheques, demand drafts, pay orders etc.), Association of Mutual Funds in India (AMFI) has issued best practice guidelines on ‘Risk mitigation process against third party cheques in mutual fund subscriptions’.

Accordingly, with effect from November 15, 2010, SBI Mutual Fund will not accept applications for subscriptions submitted alongwith Third Party Payment instruments.

A. Third-Party Payment by definition:

a) When payment is made through instruments issued from an account other than that of the beneficiary investor mentioned in the application form.

b) In case payments from a joint bank account, the first holder of the mutual fund folio has to be one of the joint holders of the bank account from which payment is made. If this criterion is fulfilled, then this is not construed to be a third party payment.

c) In case payments through Netbanking, the bank account debited towards subscription, should match with the registered bank account as per records. If this criterion is fulfilled, then this is not construed to be a third party payment.

However, the Third-Party guidelines as mentioned above will not be applicable in the following exceptional cases:

· Payment by Parents/Grand-Parents/related persons on behalf of a minor in consideration of natural love and affection or as gift for a value not exceeding Rs. 50,000/- (each regular purchase or per SIP installment).

· Payment by employer on behalf of employee under Systematic Investment Plan (SIP) facility through payroll deductions.

· Custodian on behalf of an FII or a Client.

For all the above exceptional cases, both the investor and the person making the payment should be KYC compliant and also submit “Third Party Payment Declaration Form” duly completed in all respects.

Please note that the above guidelines will apply to all Systematic Investment Plans (SIPs) registered on or after November 15, 2010. SIPs registered before November 15, 2010 will not be affected.

Instructions / Guidelines for Third Party Payments:

a) An investor at the time of his purchase must provide the details of his pay-in bank account (i.e. account from which a subscription payment is made).

b) If the subscription is settled with pre-funded instruments such as Pay Order, Demand Draft, Banker’s cheque, etc., a Certificate from the Issuing banker must accompany the purchase application, stating the Account holder’s name and the Bank Account number from which the amount has been debited for issue of the instrument.

c) A pre-funded instrument issued by the bank against cash shall not be accepted for investments of Rs.50,000/- or more. This also should be accompanied by a certificate from the banker mentioning name, address and PAN (if available) of the person who has requested for the said instrument.

d) If payment is made by RTGS, NEFT, ECS, Bank transfer, etc., an acknowledged copy of the instruction to the bank stating the bank account number from which the amount has been debited, must accompany the purchase application.

B. Registration of Multiple Bank Accounts:

· SBIMF has provided a facility to investors whereby they can register multiple bank accounts in a folio.

· Investors can register upto 5 bank accounts (in case of an Individual / HUF) and 10 bank accounts (in case of Non-Individual)

· Documents required to be submitted along with the registration form:

a) Cancelled cheque leaf with investor’s name pre-printed

b) Bank statement / Bank passbook with account number, account holders’ name and address

· It is advisable that investors submit the change of bank details request / multiple bank accounts registration request if they so desire, at least 10 days prior to the date of dividend / redemption payment, if any.

मराठीत लिहीले नाही क्षमस्व. इमेल मधून आलेले एस बी आय कडून.

असा नियम (थर्ड पार्टी चेक)करण्याचे कारण म्हणजे (दिल्लीत) काही एजंटांनी आपल्या क्लायंटस कडून अ‍ॅप्लिकेशन आणि चेक्स घेतले आणि अ‍ॅप्लिकेशनस बदलुन ते चेक्स वापरून क्लायंट्स ना गंडवले.
काही म्युच्युअल फंडांनी गुंतवणुकदाराने चेक लिहिताना - कखग योजना असे नुसतेच न लिहिता कखग योजना- अमुकतमुक (गुंतवणुकदार) a/c किंवा कखग योजना - गुंतवणुकदाराचा पॅन , असे लिहायची सोय ठेवली आहे.
तरीही चेक लिहिताना मागे अ‍ॅप्लिकेशन्/अकाउंट नं/कस्टमर आयडी तरी नक्की लिहावा.
मल्टिपल बँक अकाउंट्स ही सोय चांगली आहे. बरेचदा आपण नको असलेली बँक खाती बंद करतो आणि ती जिथे नोंदवली आहेत, तिथे कळवत नाही. असे खाते बदलताना आता म्युच्युअल फंड्स्(सगळे नसले तरी काही) जुन्या बँक अकाउंटचा पुरावा (कॅन्सल्ड चेक/पासबुक) मागायचे, ते आपल्याकडे असेलच असे नाही.

जेव्हा बँक खाती देणे अनिवार्य (कंपलसरी) नव्हते तेव्हा अनेकांनी आपल्या पत्नी/मुलांच्या नावे गुंतवणूक केली होती. किंवा अनिवार्य असतील तर आपल्याच खात्यांची माहिती दिली होती. प्रत्यक्षात पत्नी/मुलांची बँक खाती नसायची. आता ती नोंदवणे सोपे होईल.
पूर्वी हे सगळे(बँक खाते/पत्ता बदल) गुंतवणुकदाराची सही जुळवून, त्याच्या सांगण्यावरून केले जायचे, आता गुंतवणुकदाराकडून सगळे पुरावे (अगदी पत्ता बदलाचे) घेउन केले जातात. त्यामुळे सही जुळवण्याची गरज फंड हाउसला राहिली नाही. घरातल्या घरातच बायकोची गुंतवणुक नवर्‍याने तिची खोटी सही व तिच्या नावाने बँक खाते उघडून (बँक अधिकारी पण सामील-छोट्या सहकारी बँकेतला) केल्याचे प्रकार पाहिले आहेत.
कित्येकदा नवराच बायकोच्या सह्या करतो.(प्रत्येक वेळी, पैसे गुंतवताना व काढताना ही). अशा प्रकारचे फ्रॉड्स व्हायला आळा बसेल. पण यात फोटोकॉपी करणार्‍यांचा व्यवसाय भरभराटीस येईल आणि बँकांचे अवांतर उत्पन्न वाढेल , कारण कागदपत्रे प्रमाणित करण्यासाठी (डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन) ते फी आकरतात.

"NABARD" - Bhavishya Nirman Bonds
Rs.9,300/- becomes Rs.20,000/- in 10 years.
Minimum investment 5 Bonds & in multiple of 1 subsequently.
NO TDS for any amount.
Bonds can be credited into your existing Demat account ( optional ).
AAA rating by CRISIL & LAAA rating by ICRA.

ही योजना कशी आहे कोणी सांगेल का?

Rs.9,300/- becomes Rs.20,000/- in 10 years. >>> जर तीच रक्क्म व व्याज दरवर्षी फिक्स डिपॉसिट करत गेलात तर ( @८% रेट) १० वर्षात २००८० मिळतात. योजना चांगली वाटते कारण फिक्स डिपॉसीटचे रेट पुढील १० वर्ष ८% च राहतील ह्याबाबतीत जरा शंकाच आहे.

Rs.9,300/- becomes Rs.20,000/- in 10 years. >>> जर तीच रक्क्म व व्याज दरवर्षी फिक्स डिपॉसिट करत गेलात तर ( @८% रेट) १० वर्षात २००८० मिळतात. योजना चांगली वाटते कारण फिक्स डिपॉसीटचे रेट पुढील १० वर्ष ८% च राहतील ह्याबाबतीत जरा शंकाच आहे.

१) नाबार्ड भविष्य निर्माण बाँड्स यातले उत्पन्न हे व्याज न मानले जाता कॅपिटल गेन्स मानले जाईल. इंडेक्सेशनचा फायदा विचारात घेतला तर कर खूपच कमी बसतो.
३०% आयकर भरणार्‍यांना आणखी फायदेशीर. ज्यांचे उत्पन्न करपात्र नाही, त्यांना तितका फायदा नाही.
२) याचा रेट ऑफ रिटर्न ८% येतोय.
३) सेकंडरी मार्केट मध्ये विकता येईल, त्यामुळे तरलता-लि॑क्विडिटीही आहे.

सुरक्षित गुंतवणूक करू पहाणार्‍यांसाठी योग्य.

मी ऑक्टोबर मधे RELIANCE GROWTH FUND ची SIP चालु केली आहे. ती कितपत फायदेशीर आहे? Tax Saving आणि गुंतवणुक अशा दोन्हीसाठि काय करता येईल??

रिलायन्स ग्रोथ फन्ड ही एक उत्तम योजना आहे. योजना सुरु झाल्या पासुन गेल्या पन्धरा वर्षात अन्दाजे २९% परतावा या योजनेने दिलेला आहे. या योजनेने एसायपीमधे ३१ डिसेम्बर २०१० पर्यन्त च्या मागील पाच वर्षात २१.०२%, दहा वर्षात ३७.९९% परतावा दिलेला आहे.

Tax Saving आणि गुंतवणुक या दोन्ही करता म्युच्युअल फन्डाच्या ELSS (Equity Linked Savings Schemes) चा पर्याय सर्वोत्तम आहे. सध्या एचडीएफसी टॅक्स सेव्हर, रिलायन्स टॅक्स सेव्हर, डिएसपी टॅक्स सेव्हर या योजना उत्तम परतावा देत आहेत.

prosperityplanners, धन्यवाद. पण रिलायन्स ग्रोथ फन्ड हि long term मधे चांगली आहे का?

एचडीएफसी टॅक्स सेव्हर, रिलायन्स टॅक्स सेव्हर, डिएसपी टॅक्स सेव्हर ची जरा अजुन detail माहिती देता येईल का? साधरण किती रक्कम किती वर्षासाठी गुंतवली तर किती परतावा येईल वैगरे.

Pages