म्युच्वल फंड

Submitted by webmaster on 14 May, 2008 - 09:09

म्युच्वल फंड या विषयावरची सर्वसाधारण चर्चा. एखाद्या विशिष्ट फंडाबद्दल चर्चा करायची असेल तर नवीन गप्पांचं पान सुरू करा.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बरं हा प्रश्न इथे विचारावा की नाही माहित नाही.
सगळे म्हणतात की इंशुरंस आणि इनवेस्टमेंटचि गल्लत करू नका.
आजकाल खूप कंपन्या टर्म इंशुरंस देतात.
पण खरंच कुणी वारल्यावर या टर्म इंशुरंसचे पैसे खात्रिलायक रित्या व लवकर मिळतात का?
मी स्वतः डॉक्टर असल्याने बर्‍याच वेळा मला एल.आय.सी.च्या पॉलिस्यांची डॉक्युमेंटस भरावी लागतात (अटेंडिंग डॉक्टर अ‍ॅट टर्मिनल स्टेज) तेव्हा बर्‍याच पेशंटच्या नातेवाईकांचे,'पैसे लवकर मिळत नाहित्, खूप खेटे घालावे लागतात्,पैसे चारावे लागतात" असे प्रश्न ऐकायला मिळतात.
कुणाला भारतातील कुठल्या कंपनिच्या टर्म पॉलिसींबाबत असा चांगला वाईट अनुभव आहे का?

टर्म पॉलिसीत पैसे टाकून उरलेले म्यु.फं./मार्केट मध्ये टाकावे असे खूप वाटते पण वरिल कारणांमुळे भिती वाटत आहे आणि अननेसेसरिली एंडोमेंट पॉलिस्यांत पैसे वेस्ट होत आहेत.

नमस्कार केदार आणि ईतर माहितीदार Happy

मला दरमहा थोडी थोडी गुंतवणूक म्हणजे साधारण दर महिना ५००/- रूपये अरे दोन तीन किंवा पाच वर्षांसाठी म्युच्युल फंडात गुंतवायची आहे. कोणकोणते म्युच्युल फंड चांगले आहेत कोणी माहिती द्याल का?
HDFC EUITY FUND GROWTH बद्द्ल काय मत आहे.

UTI चा infra fund कसा आहे? हा fund SIP मधे दरमहा १००० /- रुपये भरुन घेणे योग्य राहिल का?

क्रूपया सल्ला द्यावा.

HDFC equity fund चांगला आहे.
इन्फ्रास्ट्रकचर सेक्टरची केल्या एका वर्षातली कामगिरी चांगली नाही. काल खूप महिन्यांनी य सेक्टरबाबत चांगली बातमी आली. (इन्फ्रा इंडस्ट्रीजच्या ग्रोथ बद्दल)
नियमित गुंतवणुकीसाठी सेक्टर फंड पेक्षा डायव्हर्सिफाइड इक्विटी फंड चांगला.
त्यात गुंतवणूक केली की आपोआपच एखादा विशिष्ट सेक्टरही कव्हर होतो.

नमस्कार,
दरमहा १००० /- रुपये गुन्तवणूक करण्यासाठी SBI Magnum Taxgain कसा आहे?
किन्वा (अनुस्वार कसा द्यायचा?) दुसरा एखादा पर्याय कुणी सुचवाल का प्लीज...

सुदीप, तुम्हाला टॅक्स सेव्हिंग साठीच गुंतवणूक करायचीय ना? नवीन डायरेक्ट टॅक्स कोड मध्ये elss योजनांचा समावेश नाही. त्यामुळे इतक्यातच सिप सुरू करू नका.
या वर्षीपुरती गुंतवणुक करून घ्या आणि बजेटची वाट बघा.

नमस्कार,
मी गेल्या १ वर्षापासून रिलायन्स ग्रोथ फन्ड मध्ये एस आय पी द्वारे द्.म. रु. २०००/- गुंतवणूक करत आहे. पुढे चालू ठेवावी का?

गिरिश,

रिलायन्स ग्रोथ ही एक उत्तम योजना आहे. एसायपी जरुर चालू ठेवा. १९९५ साली रु.१० एनेव्हीने सुरु झालेल्या या योजनेची आजची एनेव्ही रु. ४२१ आहे. म्हणजे सोळा वर्षात ४२ पट. काही दिवसापुर्वी ५०० च्या वर गेली होती.

जुयी,
HDFC EUITY FUND GROWTH वर मला चांगले रिटर्न्स मिळालेत. एसायपी साठी
HDFC Top 200 and HDFC prudence हे दोन्ही पण चांगले फंड्स आहेत. टॉप २०० हा पुर्णपणे ए॑क्विटीज मध्ये गुंतवणुक करत असल्याने जरा अग्रेसिव आहे. पास्ट पर्फॉर्मन्स आणि इतर माहितीसाठी ही लिंकः
http://www.moneycontrol.com/india/mutualfunds/mfinfo/portfolio_overview/...

प्रुडन्स बॅलन्स्ड फंड आहे. ७२% एक्विटीज मध्ये तर २०% डेट मध्ये गुंतवणुक करतो. अधिक माहितीसाठी ही लिंकः
http://www.moneycontrol.com/india/mutualfunds/mfinfo/20/22/detsnapshot/i...(G)/ffdesc/HDFC%20Asset%20Management%20Co.%20Ltd./imid/MZU003/imffid/HD

Templeton (I) Equity Income (G), Franklin India Bluechip (G) पण चांगले आहेत.

मी वर दिलेल्या फंड्स चा माझा अनुभव चांगला आहे म्हणून सुचवत आहे. याशिवाय अनेक चांगले फंड्स आहेत, त्याची माहिती मनीकंट्रोलवर मिळेलच. सगळे एकत्र घेऊ नका. आत्ता वेळ नसल्याने अजून डिटेल्स टाकत्/विचारत नाहिये. इथले जाणकार सांगतीलच.

नोटः कुठलीही गॅरंटी मी देत नाही:)

नोटः कुठलीही गॅरंटी मी देत नाही:) >> Lol ती तर फंड इश्यु करणारे पण देत नाहीत.

हे इथे लिहावं का नवीन धागा उघडावा ते कळत नाही पण ..

SBI ९.५० टक्यांने बॉन्ड विक्रीस काढत आहे ते पण १० आणि १५ वर्षांकरता. जरूर घ्यावेत हे बॉन्ड कारण इतक्या दीर्घ कालावधीसाठी ९.५० टक्के परतावा म्हणजे खरच चांगला परतावा आहे.

नोटः कुठलीही गॅरंटी मी देत नाही:) >> ती तर फंड इश्यु करणारे पण देत नाहीत.

>> मला वाटतं या धाग्यात सुरुवातीलाच statutory warning टाकुन ठेवा. म्हणजे दर वेळेला लिहायची गरज नाही. Happy

SBI बाँड विक्री सुरू आहे प्रय्तन करुन बघा जर मिळत असतील तर कारण प्रतिसाद प्रचंड आहे.
FMP मध्ये पैसे गुंतवलेले चांगले काय? रिस्क तशी कमीच असते आणि रिटर्न्सही खात्रीचे असतात. सध्या श्रीराम फायनान्स, L&T आदींचे FMPs आहेत उपलब्ध मार्केटमध्ये.

Hi All,
Please visit following sites for details on Mutual Funds. Moneycontrol.com, valueresearchonline.com.
Also read ET Wealth (which is published every Monday).
Keep investing in 5 star and 4 star rated funds in small lots.
Have long term prospective and most important..
Have Patience and discipline. Invest in good funds irrespective of Indices.

Regards
Hemant Phatak
(Certified Mutual Fund Advisor in India, Certified Life Insurance Advisor)

Hi All,
Please visit following sites for details on Mutual Funds. Moneycontrol.com, valueresearchonline.com.
Also read ET Wealth (which is published every Monday).
Keep investing in 5 star and 4 star rated funds in small lots.
Have long term prospective and most important..
Have Patience and discipline. Invest in good funds irrespective of Indices.

Regards
Hemant Phatak
(Certified Mutual Fund Advisor in India, Certified Life Insurance Advisor)

फंड ऑफ फंड म्हणजे त्या योजनेत गोळा झालेले पैसे शेअर्स्/बाँड्स मध्ये न गुंतवता अन्य म्युच्युअल फंड योजनांत गुंतवणे.

भरत मयेकर |>> ते कळले माझा प्रश्न या आधी असे फंड्स किती यशस्वी झालेत आणि साधारण रिटर्न्स किती अपेक्षित करु शकतो?

नमस्कार मडळी
मला म्युचुअल फंडांमध्ये गुंतवणुक करायची आहे. ५ yrs मला सा॑गाल का? कुठै गुंतवणुक करु? मला काहीच माहीत नाही. please give me whole detail.

.

नाही नाही भरतजी! परवा च्या सकाळ बिझ पेपरला होतं. श्रीराम ट्रान्स्पोर्ट फायनान्सचे फिक्स्ड डिपॉजिट्स्स्! वर टायटलही होतं...की "बँकांपेक्षा एफ डीवर जास्त इन्ट्रेस्ट मिळवायचाय का? "
११ ते ११.५ इंट्रेस्ट रेट देणारेत ते. २७ जुन ला ओपन झाला तो.

आर्या मी नेटवर शोधलं तर मला ती माहिती मिळाली, जी बहुधा चुकीची आहे. क्षमस्व.
पुन्हा श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्सच्या वेबसाईटवर शोधलं तर तिथे व्याज दर दिसतच नाही. पुन्हा शोधून बघतो.

masture i log in the webside which u suggested i found the PPF account investment solution but if u know more about this investment can u please give me suggestion to invest in PPF account or not. anyone know about this investment plan please give me suggestion.

Pages