म्युच्वल फंड

Submitted by webmaster on 14 May, 2008 - 09:09

म्युच्वल फंड या विषयावरची सर्वसाधारण चर्चा. एखाद्या विशिष्ट फंडाबद्दल चर्चा करायची असेल तर नवीन गप्पांचं पान सुरू करा.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद.

NAV date is 28th but not 29th. माझं काही चुकतयं का?

उद्या कळणारच आहे पण मला जमलं तर आजच हवं होतं.

मी mutual fund मध्ये कधी invest केली नाही आणि आता करावी असे वाटते, SIP पर्याय वापरून.
मला असे विचारायचे आहे कि, दीर्घ कालावधी साठी कोणते funds योग्य आहेत व हि योग्य वेळ आहे का?

HDFC Top 200 Fund (G)
वा
SBI Blue Chip Fund (G)
ह्या मध्ये कोणता पर्याय योग्य आहे?

मला short टर्म साठी पण funds मध्ये गुतंवणूक कारायावयाची आहे. कोणते funds सुचवाल?

SIP चालू करण्याकरिता A U M ऑफिस मध्ये जावे लागते का? Online सोय असते का?

माझ्याकडे सध्या
१. DSP BLACK ROCK EQ. FUND - REGULAR PLAN - DIVIDEND( SIP - 500/- PER MONTH )

२. RELIANCE GOLD SAVING FUND - DIVIDEND PLAN ( SIP - 500/- PER MONTH )

वरील दोन्ही २०११ पासून ५ वर्षापर्यंत आहेत.
या वर्षी मला MUTUAL FUND मधे SIP RS. 1000/- PER MONTH असे किमान दोन MUTUAL FUND मधे गुंतवायचे आहेत. खालीलपैकी कोणत्या फंड मधे गुंतवू ?.

HDFC EQUITY FUND
SBI
RELIANCE GROWTH DIVIDEND PAYOUT PLAN
किंवा अजून काही चांगले.

किंवा ONE TIME INSTALLMENT MUTUAL FUND ( MIN. RS. 10000/- ) असा काहि पर्याय आहे का ?

<<जुने म्युच्युअल फंड काढून टाकणे चांगले.>> मधेच थांबवता येतील का ?

तस बघितल तर... DSP मधे सध्यातरी नफा आहे पण RELIANCE GOLD मधे नाहि ....

SIP चालू करण्याकरिता A U M ऑफिस मध्ये
जावे लागते का? Online सोय असते का?
>>
मलासुद्धा हे माहित करून घ्यायचे आहे.

SIP चालू करण्याकरिता A U M ऑफिस मध्ये
जावे लागते का? Online सोय असते का? > ऑफीस मधे जावे लागत नाही. Online करु शकतो.

HDFC Life ProGrowth Plus - Opportunities Fund..पर्याय योग्य आहे का?

सामीजी: त्यासाठी DeMat account लागेल का? कि रेग्युलर अकाउंटवरून करता येईल?

Saving account chalat nahi vegele account aste. Icici asel ter idirect hdfc asel ter mutual fund account / demat account seperate aahet. Tumche konte account aahe. saving account asel ter bank madhey. Jaun Kyc etc karun chalu karta yeil.

माझे hdfc मधे saving आणि current account आहे.
आणि इतर बँकांमध्ये (sbi, boi, IDBI ) सेव्हिंग अकाउंट्स आहेत.

Then hdfc madhey jaun Mf sathi account open kara mug online transactions karta yetil. Maze pun hdfc madhey aahe 3 wegwegli account aahet one saving one Mf one demat for shares. Bank madhey jave lagel.

सामीजी: त्यासाठी DeMat account लागेल का? कि रेग्युलर अकाउंटवरून करता येईल? > प्रथम होय, demat account आवश्यक आहे.

मी सुद्धा HDFC मध्ये investors services account सुरु करुन घेतलेले. म्युच्युअल फंड इन्वेस्ट्मेंट यामधुन करता येते. हवे ते सिप इथे सुरू करता येते. एक सेविंग अकाऊण्ट असले की त्यावर ही सगळी अकाऊण्ट्स सुरू करता येतात. म्युट्युअल फंडसाठी डीमॅट अकाऊण्ट लागत नाही. केवायसी डिटेल्स द्यावे लागतात, ज्यात तुमचे पॅन नंबर वगैरे डिटेल्स असतात.

पण जेव्हा मी सिप सुरू करायला गेले तेव्हा लक्षात आले की ही मंडळी तुम्हाला रेगुलर प्लॅन देतात, डायरेक्ट प्लॅन देत नाहीत. रेग्युलर प्लॅनमध्ये एजेंट कमिशन कट होते आणि त्यामुळे त्याचे रिटर्न डायरेक्ट मधल्या रिटर्नसपेक्षा कमी येतात. गुंतवलेली रक्कम मोठी आणि दीर्घ कालावधीसाठी असेल तर डायरेक्ट आणि रेग्युलर प्लॅनच्या रकमेत खुप मोठा फरक पडतो.

म्हणुन मग मी ते अकाऊंट तसेच ठेवले आणि सरळ हव्या त्या कंपनीच्या वेबसाईटवर जाऊन गुंतवणूकीचे पर्याय शोधले. काही कंपन्या ऑनलाईन गुंतवणुक करायला देतात, तर काही कंपन्यांमध्ये तुमचा आधीचा फोलिओ नंबर असेल तरच ऑनलाईन नवी गुंतवणुक करता येते. सगळ्या कंपन्यांनी स्वतःचे कस्टमर केअर नंबर दिलेत. त्यावर फोन करुन बोलवायचे.

एजंटच्या नादाला अजिबात न लागता आपली आपण माहिती मिळवायची आणि गुंतवणुक करायची. ज्या बँका त्यांच्या अकाऊण्टमधुन म्युच्युअल फंड इन्वेस्ट्मेंट करु देतात त्या सगळ्या एजंट आहेत. त्यांचे कमिशन आपल्या पैशातुन जाते. आणि घेताना डायरेक्ट प्लॅनच घ्यायचे, तेही ग्रोथ. जर तशीच गरज असेल तरच डिविडंड ओप्शन घ्या.

बरेच गुंतवणुक सल्लागार नव्या फंडात गुंतवणुक टाळा हा सल्ला देतात. (NFO)

नवा फंड कसा परफॉर्म करेल हे भाकित करता येत नाही हे एक महत्वाचे कारण याच्या मागे आहे.

पण आता तेजीत असलेले सगळे फंड कधीकाळी नवे होतेच ना? जुन्या फंडात पैसे घातले तर तुलनेने कमी युनिट्स मिळणार. मग त्याच कंपनीच्या, त्याच फंड मॅनेजरने मॅनेज केलेल्या, त्याच प्रकारच्या नव्या फंडात पैसे घालुन तुलनेत जास्त युनीट्स मिळवुन जास्त फायदा केलेला योग्य नाही काय?

बर्‍याचश नव्या फंडांत 'नवीन' काही नसतं. म्हणजे त्याची थीम नवी नसते. अशी काही नवीन, तुम्हाला पटणारी थीम असेल तर घाला त्यात पैसे.

<<<जुन्या फंडात पैसे घातले तर तुलनेने कमी युनिट्स मिळणार>>> युनिट्सच्या संख्येशी काय करायचंय? ग्रोथ तर नेट असेट व्हॅल्यु(NAV ) वर ठरणार.

जुन्या फंडाची इन्व्हेस्टमेंट स्टाइल, त्याचा पोर्टफोलिओ, फंड मॅनेजरची कामगिरी हे सगळं पाहता येतं. नवीन फंडात यातल्या काहे गोष्टी माहीत नसतात.

<<ही मंडळी रेग्युलर प्लान देतात> हे कळले नाही. तुम्ही कोणाही मध्यस्थामार्फत गेलात , मग तो एजंट असेल, एखादा इन्स्टिट्युशनल ब्रोकर असेल वा बँक असेल ते स्वतःमार्फतच देणार.
डायरेक्ट प्लान तुम्ही ऑनलाइन घेऊ शकता किंवा म्युच्यल फंडाच्या ऑफिसात जाऊन त्याचा फॉर्म घेऊ शकता. मात्र फॉर्म भरताना तिथे डायरेक्ट हा पर्याय निवडायला विसरायचे नाही.

म्युचल फंडमध्ये ऑनलाइन इन्व्हेस्टमेंट करायला डिमॅट अकाउंट हवाच असे नाही. पण एकदा तरी त्यांच्या ऑफिसात जाऊन आपला के वाय सी, इमेल आयडी, सही इत्यादी रजिस्टर करायलाच हवे. एकदा तुमचा अकाउंट त्यांच्याकडे क्रिएट झाला की ऑनलाइन ट्रान्झॅक्शन्स करता येतील.

अनेक म्युच्यल फंड योजना स्टॉक एक्स्चेंजमध्ये लिस्टेड ही आहेत. जसे शेअर्स घेतो तशी त्यांची युनिट्स घेता येतील. ती तुमच्या डिमॅट अकाउंटला क्रेडित होतील. पण बहुतेक ब्रोकरेज लागेल.

मी फक्त एफ एम पी साठी ऑनलाइन ट्रॅन्झॅक्शनस करतो कारण त्यांचा इश्यु फार थोडक्या दिवसांसाठी असतो व याचे फॉर्म्स व माहिती मला एजंटांकरवी मिळालेले नाहीत.

Survatila hdfc madhun karta yeil. Direct sathi problem evdhech ki sarv mutual fund office madhey wegwegle account kadhave lagel eg. Reliance,icici Pru,hdfc etc. saglyanche password etc aale. Ekda savay zali ki tase karu shakta agdi navin asel ter through broker kara

Direct investment option चांगला आहे पण त्यासाठी सुरवातीला AMC's ची office फिरण्याची तयारी हवी. KYC वगैरे करण्यात त्यांची मदत लागतेच. सुरवातीचा documents and account linking चा भाग काळजी घेऊन केलात तर नंतर काही problem येऊ नये. Fund selection साठी internet वर बरीच माहिती उपलब्ध आहे. तुम्ही निवडलेल्या फंडचा performance moneycontrol.com किंवा valuereserchonline.com या websites वर पाहता येईल.
माझ्या SIP ICICI Direct च्या माध्यमातून चालू आहेत. आणि १००० रुपयांमागे १६.८५ रूपये brokerage आहे. पण अस्मादिक आळशी वर्गात मोडत असल्यामुळे online trading account चा वापर करुन घरबसल्या केलेली गुंतवणूक, न केल्यापेक्षा जास्त चांगली

Filling up kyc form of mutual fund application forms is very easy. But agents and even bank employees treat investors as adult illiterates when filling up forms.

लोक्स, मुच्युल फंडाच्या हापिसची पायरी चढणं कोर्टाची पायरी चढण्यासारखं भयानक नाही. Wink

एका फेरीत हवे असलेले फॉर्म्स (फंडाच्या योजनेचा अ‍ॅप्लिकेशन फॉर्म + के वाय सी) आणा किंवा डाउनलोड करून प्रिंट करा. दुसर्‍या फेरीत योग्य कागदपत्रांसहित जमा करा. त्यात इमेल आणि इ-ट्रेडिंगचे ऑप्शन नोंदवा. मग किमान त्या म्य्चुयल फंडात तुम्हाला ऑनलाइन खेळता येईल.

पण तुमची सही, बँक खाती, पॅन, पत्ता, इमेल, फोन नंबर हे सगळं किमान एकदा लेखी द्यायलाच हवं. केवायसी यातच आलं.

केवायसी >>हे दरवर्षी करावे लागते ना?
मी आयसीआयसीआय डायरेक्टमध्ये खाते उघडले आहे. ह्याचा एक फायदा म्हणजे केवायसी ऑनलाईन असते.
हे योग्य की अयोग्य माहिती नाही पण त्यामूळे त्यांचा ऑफिसमध्ये जायची एक खेप वाचते.

कुठुन तरी माझ्या ई-मेल वर ही ELSS (Tax Saver) Funds विषयी माहिती आली होती. ती डकवत आहे.
Returns (%)
Scheme Rating 1 Year 2 Years 3 Years 5 Years

Axis Long Term Equity Fund 5 75.49 43.07 37.2 24.78
Reliance Tax Saver (ELSS) Fund 5 97.34 40.15 37.05 20.89
Birla Sun Life Tax Relief 96 3 66.2 33.44 31.61 14.2
Birla Sun Life Tax Plan 4 64.33 32.31 30.82 15.61
DSP BlackRock Tax Saver Fund 4 60.24 29.37 30.44 15.86
BNP Paribas Long Term Equity Fund 5 62.39 29.61 30.04 17.45
ICICI Prudential Taxplan 4 57.91 29.46 28.95 16.86
SBI Magnum Tax Gain Scheme 93 3 56.12 28.47 27.87 14.03
HDFC Taxsaver 3 63.09 27.96 26.01 15.33
HDFC Long Term Advantage Fund 3 49.23 26.06 25.93 15.64
TATA Tax Saving Fund 4 56.45 27.98 25.9 14.81
Canara Robeco Equity Taxsaver 4 52.98 25.36 25.34 16
LIC Nomura Tax Plan 3 56.44 27.84 25.31 12.53
Kotak Taxsaver 2 66.76 23.16 24.84 12.94
*Returns as on 20-January-2015

म्युच्यल फंडासाठी के वाय सी एकदाच करावे लागते. ते फंड हाउस स्पेसिफिक नसते. एकदा केले की सगळ्या फंड हाइसेससाठी चालते.

बँका काही काही काळाने तुमचा लेटेस्ट फोटो व पत्त्याचे लेटेस्ट प्रूफ मागत रहातात. ते आधीचे हरवले म्हणून, स्वतःकडे रद्दी जमा करायला की तसा नियम असल्याने याची कल्पना नाही.

Share Khan किंवा Angel Broking यांच्यासारख्या ब्रोकरकडुन online म्यूचुअल फंड्स सुरू करणे कितपत योग्य आहे?

ब्रोकरकडुन म्यूचुअल फंड ओपन केल्यास NAV मध्ये किंवा इतर टर्म्स आणि कंडिशन्समध्ये काही फरक असतो का?

Pages