हार्ड रॉक कॅफे

Submitted by अश्विनीमामी on 2 February, 2010 - 21:41

बरेच दिवस मनात होते आज इथे इन्ग्रजी सीरीअल्स वर धागा निघाला आहे म्हणून धाड्स केले आहे. हिन्दी व मराठी गाणी खूप आवड्त असली तरी कधी कधी असा मूड असतो की हार्ड रॉक, पॉप, सॉफ्ट, कंट्री वेस्टर्न संगीत फार परफेक्ट वाट्ते. मेट्ल/ ट्रान्स/ हाउस सुद्धा. कधी मस्तीत नाचायचा मूड असतो तर कधी अनप्लग्ड गाणी ऐकायचा.

मी स्वतः कायम बास बूस्टर चालू ठेवूनच गाणी ऐकते. त्यात ड्र्मस, गिटार वगैरे फार आवडीचे. शाळेत असताना आबा, बोनी एम झाले, अकरावीत स्टेयिन्ग अलाइव व इतर. वेळ व संधी मिळेल तसे हे पाश्चात्य
संगीत ऐकणे चालूच राहिले. आता तर घरात कायम ढुम टाक ढुम टाक चालूच असते. रोलिन्ग स्टोन्स मासिक जेव्हा परवडेल तेव्हा आणते. ब्रायन अडॅम्स, मडोना( जुन्या काळातील) एल्विस, रिकी मार्टिन
नंतर आपली जनरल पार्टी सॉन्गस पण खूप मजा आणतात. ब्रिट्नी, मायली, जोनास हे तरूण कलाकार कधी कधी मजा करून जातात. आफ्रिकन रिदम्स, ओरिजिनल मूवी साउंड ट्रॅक्स, आवड्ते ग्रूप्स बद्दल वाचायला खूप आवडेल. आपल्याला कोणती गाणी व का आवडतात ते लिहा. कॉन्सर्टस बद्दल लिहा. माझे ज्ञान व आपला आनंद द्विगुणित करा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इंग्रजी गाण्यात प्रामुख्याने सुप्रसिद्ध असलेले प्रकार म्हणजे
१. रॉक : हार्ड रॉक, हेवी मेटल, सॉफ्ट रॉक, पंक रॉक, साय्केडेलिक रॉक, रॉक अँड रोल इत्यादि
२. पॉप : डिस्को, युरो बीट, नॉइज, स्पेस एज पॉप, ट्रेडिशनल पॉप इत्यादि
३. ब्ल्युज: डू वॉप, फंक, सोल, कंटेंपररी ब्ल्युज
४. जाझ: स्विंग, लॅटिन जाझ, फ्री जाझ, कूल जाझ इत्यादि
५. हिप हॉप आणि रॅप: क्त्रंक, डर्टि रॅप, इस्ट कोस्ट, वेस्ट कोस्ट, मियामि हिप हॉप इत्यादि
६. रेग्गे : डब, राग्गा इ.
७. लॅटिन: मांबो, सालसा, सांबा, बोस्सा नोवा इ.
८. फोक: इंडि फोक, अँटि फोक इ.
९. कंट्री: कंट्री पॉप, कंट्री रॉक, रोकॅबिलि इ.
१०. इलेक्ट्रॉनिकः ब्रेक बीट, डान्स, ग्लिच इ.

हे सगळे प्रकार त्यांच्या गाण्याच्या पद्धतीनुसार आणि त्यात प्रामुख्याने वापरल्या जाणार्‍या तालानुसार पडलेले आहेत. आपल्या गायन पद्धतीत पहिले सुराला आणि मग तालाला महत्व आहे पण जाझ सोडल्यास इतर पाश्चात्य संगीतात तालाला प्रथम आणि नंतर सुराला महत्व दिलं जातं. त्यामुळे बर्‍याचदा भारतीय संगीत ऐकणार्‍यांना ही गाणी बेसुरी वाटतात.
मला रॉक बीट्स, पॉप बीट्स च्या लिंक मिळाल्या तर अपलोड करेन. त्यामुळे समजणं अजून सोपं जाईल.

अरभाट, देवा, उत्तम माहिती. अजून येउद्या की.

वूड स्टॉक फेस्टिवल बद्दल आपले काय मत? नेट वर फार रंजक माहिती उपलब्ध आहे.

आजचा ग्रूप अ‍ॅटोमिक किट्नस - द टाईड इज हाय. चान्गले आहे व अर्थ पण.

चांगली सिस्टिम हा एक चर्चेचा विषय आहे. माझ्या मतावर जाउ नका. मला फार कळत नाही. तो लग्नात गाणी लावतात ते भले मोठे स्पीकर्स पण मला चालतात. रॉक लीजंड्स वर लिहा भाउ. आमच्या रोड नं १ बं. हि.
वर एका मॉल मध्ये आले आहे एच आर. कॅफे. ते कायम मेसेजेस करत राहतात आज यंव आहे त्यंव आहे. मला लै हौस आहे जायाची. जाउ काय? ड्रेस कोड अस्ते काय?.

system बाबत मेधाला अनुमोदन. मला पण माझ्या बोसपेक्षा Klipsch वर ऐकायला अधिक आवडते. वोह मजाही कुछ और है !. पण एक आहे बोस असो वा क्लिप्श्च, चांगल्या सिस्टिम्वर ऐकण्याचा आनंद वेगळाच.

साठीचे दशक हा फारच इंटेरेस्टिंग काळ होता. एकीकडे सायकेडेलिक रॉक म्हणजे आपल्यातुपल्या भाषेत हिप्पी लोकांचे संगीत निर्माण झाले, तर दुसरीकडे सांगितिकदृष्ट्या त्याच्या दुसर्‍या टोकाला असलेले फोकरॉक संगीत, ज्याला ब्लूज, कंट्री अशा 'पारंपरिक' संगीताचा पाया होता. सायकेडेलिक रॉकचे गाजलेले बॅन्ड्स म्हणजे ग्रेटफुल डेड, जेफर्सन एअरप्लेन, बिग ब्रदर अँड होल्डिंग कंपनी इ. हा प्रकार नक्की काय असतो यासाठी उदाहरणे - जेफर्सन एअरप्लेनचे समबडी टु लव्ह व व्हाइट रॅबिट . सायकेडेलिआमध्ये गिटारच्या साथीला सिंथ आला, अकॉस्टिकबरोबर इलेक्ट्रॉनिक वाद्यांचा वापर वाढला. सतारीसारखी 'महारिषी' वाद्ये आली आणि त्याचबरोबर कॅनाबि, मारियुआना, कोकेन, गांजा आणि खुली लैंगिकता हे सायकेडेलिआचा अविभाज्य आणि प्रमुख भाग बनले. सायकेडेलिआ ही फक्त ऐकायची नाही तर अनुभवण्याची चीज झाली. अशा धुमशानीमध्ये फोक रॉकमध्ये एक सायकेडेलिक बाई आली - जेनिस जॉप्लिन आणि रॉकमधले स्त्रीचे स्थान वगैरे विद्वत्तापूर्ण गोष्टींवर चर्चा करण्याची उत्तम सोय झाली. त्या चर्चेत तिच्याकडे आमच्यासारख्यांना हक्काने बोट दाखवता येऊ लागले. जेनिसने फोकरॉकमध्ये जबरी चैतन्य आणले. आवाजात थोडी खरखर आणि तारूण्यसुलभ जोषाने गायलेली गाणी असा तिचा खास अंदाज होता. ती आधी वर उल्लेख केलेल्या बिग ब्रदर बॅन्डचा भाग होती. नंतर तिने एकटीने गायला सुरूवात केली.

तिची मी एँड बॉबी मगी, समरटाइम मला खूप आवडतात. बॉबी मगी गाणे क्रिस क्रिस्टोफरसने (तिचा त्यावेळचा बॉयफ़्रेन्ड) लिहिले आहे. क्रिसचे नाव कंट्री म्युझिकमध्ये खूप वरचे आहे. कंट्री (संगीत) आवडणारे त्याच्यावर लिहितील Happy समरटाईम ऐकताना असे वाटते की ती खूप किंचाळत आहे. तसा आरोपही तिच्यावर झाला. पण त्या संपूर्ण गाण्याचा इम्पॅक्ट सॉलिड आहे. त्यातले काही गिटार पीसेस खूपच ओळखीचे वाटतात, कारण ते किंवा त्यावर आधारीत संगीत अनेक ठिकाणी वापरले गेले आहे. ड्रगच्या ओव्हरडोसने जेनिस तरुणपणीच गेली. तिने निधनापूर्वी एक अल्बम रेकॉर्ड केला होता. ती गेल्यावर तो प्रकाशित झाला. बॉबी मगी त्यातच होते आणि ते गाणे चार्टटॉपर झाले.
शेवटी तिच्या मर्सेडिज बेन्झ गाण्याचा उल्लेख केला पाहिजे. तसे पाहिले तर हे रॉक नाही. पण तिचा खट्याळपणा सतत जाणवत राहतो आणि अशी गायिका तिची क्षमता पुरेपूर दिसण्याआधीच गेली याची चुटपुट लागते.

अरभाटा धन्यवाद..:)
>> तिने निधनापूर्वी एक अल्बम रेकॉर्ड केला होता. ती गेल्यावर तो प्रकाशित झाला.
अल्बमचं नाव होतं पर्ल.
मर्सेडिज बेन्झ नंतर तिने अजून एक गाणं रेकॉर्ड केलं होतं 'हॅप्पि ट्रेल्स' तिच्या कोणा मित्राला वाढदिवसाचं गिफ्ट म्हणून पाठवलं होतं, ते तिच्या निधनानंतर त्या मित्राला मिळालं

शाळेत असताना जास्त करून पॉप साउंडच ऐकायचो. अ‍ॅबा, बोनी एम, ब्रायन अ‍ॅडम्स वगैरेंपासून बॉयझोन, बॅकस्ट्रीट बॉयज, स्पाइस गर्ल्स हे मुलींचे(च) बॅन्ड्सपर्यंत ऐकणे असायचे. नथिंग्स गॉन्ना चेंज माय लव्ह फॉर यू, कर्मा कमिलिअन वगैरे गाणी भारी वाटण्याचेही दिवस असतात. असेच एकदा 'नथिंग गॉन्ना स्टॉप अस नाउ’ ऐकत मान डोलावत वगैरे असताना मामा तिथे आला. मी काय ऐकतोय हे पाहून तो म्हणाला, अरे अजून तू याच स्टेशनावर का ? मी म्हणालो, ठिक आहे, तुझे स्टेशन सांग. त्यावर तो उत्तरला, तू आता जे काय ऐकतो आहेस त्याला जवळ जाणारे एक गाणे सांगतो. म्हणजे ऐकताना तुला फार शॉक वगैरे बसणार नाही. त्याने नाव सांगितले 'ब्रिज ओव्हर ट्रबल्ड वॉटर'. बॅन्डचे नाव 'सायमन अँड गार्फंकेल'. मी हे नाव कधीच ऐकले नव्हते. त्यांची गाणी ऐकणे तर दूरच राहिले. तेव्हा नेट वगैरे काही नसल्याने पाहिजे ती गाणी मिळवणे सोपे नव्हते (त्यात मी नूमविचा, मित्रसुद्धा माझ्यासारखेच Happy ) मग काही दिवसांनी तो परत घरी आला असताना त्याने वॉकमनवर ते गाणे ऐकवले आणि त्याचे म्हणणे खोटे ठरले. मला शॉक बसला. हा साउंडच माझ्यासाठी नवीन होता. इंग्लिश गाणी अशीही असतात ? माझी आणि सायमन-गार्फंकेलशी ओळख अशी झाली.

लोकसंगीताचा वारसा घेऊन आलेल्या बहुतेक बॅन्ड्समध्ये एक rawness जाणवतो. तो लोकसंगीताचा अंगचा गुण असतो. परंतु हा वारसा घेऊन आलेल्या सायमन-गारफंकेलच्या गाण्यांत मात्र सफ़ाई होती. दिमाख नव्हता पण चमक होती. असा तोल त्यांनी साधला होता. पॉल सायमन हा आतापर्यंतच्या सर्वोत्कृष्ट गीतकारांपैकी मानला जातो. त्याला गीतकारी जमली होती. त्याला आर्ट गार्फंकेलची मस्त सुरीली साथ मिळाली. 'साउंड ऑफ सायलेन्स' हे फोकरॉकचे राष्ट्रगीत आहे. हे एक protest song आहे. सायमनने हे गाणे केनेडींची हत्या झाल्यानंतरच्या काळात लिहिले. खुद्द सायमनचे म्हणणे - "A societal view of the lack of communication." कुठलेही खरे मानले तरी गाणे अतिमहानच. पण प्रोटेस्ट सॉन्ग घ्यायचे झाले तर मी ’आय ऍम अ रॉक’ निवडेन. ब्रिज ओव्हर ट्रबल्ड वॉटर हे रॉक म्हणता येणार नाही, but what the heck ! मला आवडते Happy शेवटी एका गाण्याचा उल्लेख झालाच पाहिजे - 'मिसेस रॉबिन्सन'. द ग्रॅज्युएट (वयाच्या १६-१७व्या वर्षीच पहावा असा चित्रपट ;)) या चित्रपटातले प्रचंड गाजलेले गाणे.
ते अजूनही कधीतरी कार्यक्रम करतात. आता त्यांची जुनाट गाणी कोण ऐकत असेल असे वाटते का ? २००४ साली रोमच्या कलोसियममध्ये झालेल्या त्यांच्या कार्यक्रमाला ६,००,००० लोक उपस्थित होते.

जन्मनाव : रॉबर्ट अ‍ॅलन झिमरमन
१९६२ पासूनचे नाव : बॉब डिलन
नवीन नावामागची प्रेरणा : वेल्श कवी डिलन थॉमस
कामगिरी :
१) रॉकगीतांमध्ये सर्वप्रथम सामाजिक आशय आणणे.
२) साहित्याचा दर्जा असलेली गीते लिहिणे. डिलनने लिहिलेली गाणी कविता म्हणूनही वाचावीत. The Pulitzer Prize jury in 2008 awarded him a special citation for what they called his profound impact on popular music and American culture, "marked by lyrical compositions of extraordinary poetic power." (संदर्भ : विकी)
३) खरखरीत पोताचा गेंगाणा होणारा आवाज व हे कमी की काय म्हणून तालासुराचे भान असेलच असे नाही. पण गाण्यांमधली उत्स्फूर्तता आणि गाण्यात ओतलेला जीव ऐकताक्षणीच भिडतो. त्यामुळे 'थोर रॉक/पॉप गायक व्हायला उत्तम आवाज आणि तालासुराची जाण अत्यावश्यक आहे' या समजुतीला छेद दिला. उच्च दर्जाचा रॉकर होण्यासाठी केवळ आवाज व संगीताची जाण यांच्यापलिकडेही काहीतरी लागते हे सिद्ध केले.
४) गाण्याची पद्धत क्रांतिकारक ठरली. फोक म्युझिक, कंट्री, ब्लूज यांचे अद्भुत रसायन तयार केले. हार्मोनिकाचा समर्थ वापर.
५) कुठल्या पद्धतीत कुठल्या प्रकारची गाणी गावीत याच्या परंपरा मोडून अभिनव प्रयोग केले व नवीन पायंडे निर्माण केले. सामाजिक, वैयक्तिक अनुभवकथन, लोकगीते ते संज्ञाप्रवाही (stream of consciousness) गीतांपर्यंत सर्वत्र मुक्त आणि तितकाच प्रभावी संचार. लोकगीतांची चळवळ सोडून त्याने रॉक-एन्-रोलची वाट चोखाळल्यावर त्याच्यावर विश्वासघाताचे, लोकानुनयाचे आरोप झाले. पण हा माणूस नेहमीच परंपरांना छेद देत आला आहे. पण बंडखोरी करायची म्हणून बंडखोरी नाही हे त्याची गाणी ऐकली की लक्षात येते. कुठल्याही लेबलमध्ये बसण्याची, बसवून घेण्याची वृत्तीच नाही. फसवेगिरी, दिखाऊपणा टिकत नसतो. बॉब डिलन किती दूरवर आणि खोलवर गेलाय याची कल्पना त्याचे ऋण मानणार्‍यांची यादी पाहिली की येते. आजमितीला रॉकच्या जवळ जवळ प्रत्येक प्रकारात आपल्याला एक तरी कलाकार सापडतोच सापडतो जो प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरित्या डिलनचे ऋण मान्य करतो. डिलनची अद्वितीयता इथे सिद्ध होते.
वरील लेखन म्हणजे डिलनची अत्यंत तोकडी, मर्यादित ओळख मानावी लागेल, कारण ती माझी मर्यादा आहे. डिलन न आवडणारे असतात. काहींना तो लोकसंगीताच्या चळवळीच्या पाठीत सुरा खुपसणारा वाटतो. याउलट काही जणांना त्याचे इलेक्ट्रिक गिटारीशिवायचे काम फालतू, दिखाऊ वाटते. मी त्यांच्याबरोबर जुगाराचा डाव खेळतो. समोरच्याने एकेक पत्ते उघड करावेत तसे त्यांनी एकेक करून डिलनचे वैगुण्य सांगावे आणि मीसुद्धा माझ्याकडचे पत्ते उघड करावेत. त्यात माझ्याकडे नेहमीच एक्केच असतात - गीतकारी, originality आणि गीतकारी. मी आतापर्यंत हरलो नाहीये.

डिलनच्या मला आवडणार्‍या किती आणि कुठल्या गाण्यांची यादी द्यावी हा मोठाच प्रश्न आहे. खालील यादी मुळीच पूर्ण नाही.
ब्लोइन इन द विंड, लाइक अ रोलिंग स्टोन, रेनी डे विमेन # १२ & ३५, डेजलेशन रो, पॉझिटिव्हली फोर्थ स्ट्रीट, मास्टर्स ऑफ वॉर, सबटेरनिअन होमसिक ब्लूज, हरिकेन

डिलनच्या अनेक गाण्यांपैकी एका गाण्यावर मात्र खास लिहावेसे वाटते. हे गाणे अनेकांनी गायले आहे. माझ्या लक्षात राहिले आहे त्याचे कारण अमेरिकन ब्युटीमधला खतरा प्रसंग - कॅरोलाइन घरी येते तर गॅरेजमधून गाणे ऐकू येत असते. ती गॅरेजचे दार उघडते. आत लेस्टर कामधाम सोडून बेंच प्रेस मारतोय. कॅरोलाइन अवाक ते संतप्त असा प्रवास करत असताना लेस्टर मात्र कूलपणाचा कळस करत तिच्यासमोरच वीड-इ शिलगावतो! तो आख्खा प्रसंग सगळ्या दृष्टींनी केवळ महान आहे. दार उघडले जात असताना लेस्टरच्या दृष्टीकोनातून कॅरोलाइन दिसते. गॅरेजच्या दरवाजाची फ्रेम, त्यात ती आणि तिच्यामागे २ गाड्या - एक साधी, दुसरी एसयुव्ही. अमेरिकन मध्यमवर्गीय संस्कृतीच्या फ्रेममध्ये कॅरोलाइन आणि त्या 'रटाळ' फ्रेममध्ये तिला पहिल्यांदाच पाहणारा साक्षात्कारी लेस्टर. अप्रतिम! त्यांचे संवाद तर सॉलिड खटकेबाज आहेत Happy या आख्ख्या दृष्याला परिपूर्ण करणारे पार्श्वभूमीचे गाणे - ऑल अलाँग द वॉचटॉवर. हे गाणे अनेकांनी कव्हर केले आहे.
डिलनचे गाणे अर्थातच austere आहे. त्यातला हार्मोनिकाचा सूर आपल्याला ओढत ओढत आपल्याच आत नेतो. संगीताचे अस्तित्व 'ते आहे, छान आहे' येवढे आणि येवढेच राहते, फोकसमध्ये मात्र शब्द. बुचकळ्यात पाडणारे शब्द. तरीही दुसर्‍यांदा, तिसर्‍यांदा..... ते शब्द परत परत स्वतःकडे खेचून घेतात. हे काहीतरी भन्नाट आहे एवढेच कळून आपण तिसाव्यांदा गाणे ऐकतो. (मला डिलनची स्टुडिओ व्हर्जन यूट्यूबवर सापडली नाही. कोणाला सापडली तर कृपया द्यावी. धन्यवाद.)
जिमी हेंड्रिक्स एक्स्पिरिअन्सचे कव्हर ऐकले का? हार्मोनिकाची जागा इलेक्ट्रिक गिटारीच्या रिफ्सने घेतली आहे. हार्मोनिकामुळे थोडे धिमे वाटणारे गाणे आता पहिल्यापासूनच वेग घेते. जिमी तार छेडत नाही. जिमी स्वतःला ताणत असल्याच्या आर्ततेने गिटार ताणतो ('छेडतो' फारच नाजूक वाटते). जिमी हेंड्रिक्स एक्स्पिरिअन्समध्ये प्रमुख गायक गिटार असते. ती गुणगुणते, गाते, गुरगुरते, आर्जवे करते आणि किंचाळतेसुद्धा. गिटारमधली आर्तता जिमीच्या आवाजातही उतरते.
डेव्ह मॅथ्यूज बॅन्ड (DMB)चे कव्हर, हेसुद्धा, आणखीनच वेगळे आहे. डिलन आणि जिमी या दोघांच्याही गाण्यात नसलेली नाट्यमयता डेव्ह आणतो. डीएमबीचे ऑल अलाँग ऐकणे म्हणजे रेल्वे स्टेशनच्या फलाटावर उभे असण्यासारखे आहे. दुरून येणार्‍या गाडीची धडधड हळूहळू वाढत जाते आणि अचानक गाडी फुल्ल वेगाने आपल्याच अंगावर येत आहे असा साक्षात्कार होतो. ही सुसाटत येणारी गाडी पार हेलपाटून टाकते. डेव्ह एकदोन 'हत्यारांवर' न विसंबता उपलब्ध सगळ्या हत्यारांचा वापर करतो. गाणे पूर्ण झाल्यावरही थोडा वेळ आगगाडीचा भास राहतो Happy
या तिन्ही वेगवेगळ्या आवृत्त्या आहेत. माझ्या मूडनुसार गाणी ऐकतो. गाणे समजून घ्यायचे असेल तर डिलनचे ऐकावे, कारण डिलन गोष्ट सांगितल्यासारखे गाणे सांगतो. हे गाणे संज्ञाप्रवाही आहे (stream of consciousness). पण डिलन मात्र थोड्याश्या अलिप्तपणे गातो. या विरोधाभासाचा परिणाम म्हणजे गाणे ऐकतानाच एकीकडे गाण्यावर विचारही सुरू राहतो. हे विचार करणे ठरवून न होता आपोआपच होते. जिमीची आवृत्ती थोडी जास्त भावनाप्रधान आहे. त्यामुळे थोडा 'भिजायचा' मूड असेल तर जिमीचे गाणे अगदी फिट बसते. माहौल निर्माण करायचा असेल तर जिमीनेच Happy पण यातले काही न करता तुफान दंगल करायचा मूड असेल तर सरळ डेव्हला गाठायचे. इथे फुकाच अंतर्मुख करणारा डिलन आणि गिटार हळूहळू भिनवणारा जिमी कामाचा नाही. बरोबर आपल्यासारखेच दहापाच येडे आहेत आणि सार्वजनिक दंगल करायची असेल तर डेव्हच्या ऑल अलाँगला पर्याय नाही.

रॉक म्हणले की इलेक्ट्रिक गिटार आलीच. आजपर्यंत आपण गिटारीतून भन्नाट वेगवेगळे आवाज ऐकले आहेत, ऐकत असतो. आपल्याला वाटते की पहिल्यापासूनच लोक असे वाजवत असतील किंवा वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळे प्रयोग केले असतील आणि हळूहळू इलेक्ट्रिक गिटारवादनाचे तंत्र विकसित झाले असेल. हे खरेही आहे आणि खोटेही. प्रयोग झालेच, पण त्यात वेगवेगळ्या नाही तर एकाच माणसाचा (दैवी) 'हात' होता. त्याचे नाव जिमी हेंड्रिक्स (तोच ज्याचे ऑल अलाँग वर आहे). ज्या काळात लोक इलेक्ट्रिक गिटारीशी काहीबाही खेळत होते, शिकत होते आणि आपल्याला लै येतं असं समजून इतरांना शिकवत होते त्या काळात जिमी आला आणि 'बच्चों, तुम जिस स्कूल में सिखते हो उस स्कूल के हम हेडमास्टर रह चुके हैं' असा छप्परफाड डायलॉग टाकून गेला. इलेक्ट्रिक गिटारीचे फीडबॅक आणि डिस्टॉर्शन हे प्रकार जिमीनेच खर्‍या अर्थाने रूढ केले. गिटार फीडबॅक व डिस्टॉर्शन. अकुस्टिक आणि इलेक्ट्रिकमधल्या तांत्रिक फरकाचा पुरेपूर वापर करणारा जिमी हा पहिलाच कलाकार होय. जे आवाज अकुस्टिकवर निघण्याची कल्पनाही करू शकत नाहीत ते जिमीने इलेक्ट्रिकवर काढून दाखवले. गिटारीच्या आवाजाला असलेल्या सीमा जिमीने वाढवत नेल्या आणि श्रोत्यांना तोपर्यंत अज्ञात असलेल्या soundscapesची सैर घडवून आणली. अ‍ॅम्प्लिफिकेशनचा त्याने केलेला वापर बघून इतर सर्व कलाकार खडबडून जागे झाले. ही इलेक्ट्रिक गिटारीची खरी ताकद होती.
'आर यू एक्स्पिरिअन्स्ड' हा त्याचा पहिला अल्बम ऐकून लोक वेडेच झाले. त्यातली सगळीच गाणी आता त्यातल्या अभिनव गिटारीमुळे क्लासिक मानली जातात. जिमीला ज्यांनी प्रत्यक्ष ऐकले आहे ते सांगतात की कन्सर्ट्समध्ये वाजवताना जिमी हा जिमी रहायचाच नाही. काहीतरी दैवी, अमानवी स्टेजवर अवतरलेले असायचे ज्याला तीन हात असायचे आणि एक हात गिटारीसारखा दिसायचा.
आवडती गाणी - पर्पल हेझ, फॉक्सी लेडी (सुरुवातीचा फीडबॅक ऐका), मॅनिक डिप्रेशन, द विंड क्राइज मेरी, फायर, हेय् जो, आर यू एक्स्पिरिअन्स्ड (खरं सांगायचं तर 'आर यू एक्स्पिरिअन्स्ड' मधली सगळीच), ऑल अलाँग द वॉचटॉवर, व्हूडू चाइल्ड (स्लाइट रिटर्न) (व्हूडूमधल्या सोसाट्याच्या डिस्टॉर्शन रिफ्स ऐका) इ. इ.
आज ही गाणी ऐकताना कदाचित असं वाटेलही, 'उं, त्यात काय एव्हढं?' पण गीतेवरची उत्तमोत्तम प्रवचने ऐकायची आणि मग एकदा साक्षात कृष्णाकडून गीता ऐकल्यावर 'उं, त्यात काय एव्हढं?' असं म्हणण्याचा यडचापपणा आपण करू का? Happy

अरभाट सर उत्तम ग्यान देताय हो. धन्यवाद. सर्व लिंका ऐकणार. मी परवा दिल्लीत एक ऐश केली आहे. स्कल कँडीचा एक स्कल क्रशर नावाचा बास बूस्टर वाला हेड्फोन येतो तो घेतलाय. ते लावून यू ट्यूब वर्ची गाणी मस्त ऐकता येतात.

पीस फुल इझी फीलिन्ग

हे गाणे रॉक नाही कंट्री आहे बहुतेक
पण ते मस्त आहे.
सध्या तोच मूड.
रॉयल एन्फील्ड/ हार्ली वरून
दूर हायवे वर जावे
अन चांद्ण्या रात्री ऐकावे नाही?
क्या बोलते लोगों!
जगण्याचे कष्ट असह्य झाले
तर चक्क पळूनच जावे असे.

मी एक सेक्सिस्ट मत लिहू का?

क्रिकेट व रॉक म्युझिक हे फक्त पुरुषांचीच क्षेत्रे आहेत. बायांनी चीअर करावे किंवा मागे नाचावे हवे तर( लंड्न ड्रीम्स मधील असिन!) ती पॉवर व ती angst स्त्रीयांच्यात नाही जन्मत.

लंडन ड्रीम्समधली असीन Lol मामी एकदम डेंजर मत मांडले आहे Happy रॉकर्समध्ये स्त्रिया कमी दिसतात हे खरे आहे. कारण काय असेल ते असो. काही सन्माननीय अपवाद - जेनिस जॉप्लिन, जोन बाएझ (थोडीशी रॉकर आणि डिलनची एके काळची गर्लफ्रेण्ड), क्रॅनबेरीजची डोलोरेस ओरायर्डन (झॉम्बी झॉम्बी झॉम्बी) आणि रॉकमधला बहुतेक एकमेव फक्त-स्त्री-सदस्य-बँड म्हणजे फोर नॉन ब्लॉण्ड्स (हे व्हॉट्स अप, व्हॉट्स गोइंग ऑन).

मी एक सेक्सिस्ट मत लिहू का?

क्रिकेट व रॉक म्युझिक हे फक्त पुरुषांचीच क्षेत्रे आहेत. बायांनी चीअर करावे किंवा मागे नाचावे हवे तर( लंड्न ड्रीम्स मधील असिन!) ती पॉवर व ती angst स्त्रीयांच्यात नाही जन्मत.
>>>> मामी तुम्हीच लिहू शकता हे.. काही म्हणा.. क्रिकेट अंगात शिरत न्हाय बघा.. आणि ते समर ऑफ ६९ किवा कुठला हि हार्ड रोक गाण्यावर माकडा सारखा उड्या कोण मारणार.. म्हणून असेल बघा ..
बाकी माहिती साठी धन्यवाद.. आपला पण हॉटेल कॅलिफोर्निया लई भारी वाटता बोस वर बोय्झोन byakstrit ऐकत वाढलो तेव्हा हिंग्लिश म्हंजी लोक सांगतील ते ऐकायचा किवा जे प्रचलित हायते
nothings गोंना चेंज .. चे दिवस असतात अगदी अगदी.. ओमकारा मंधी दाखवला न तसा अगदी..
.. klipch का काय अजून बघितला नाही गुगल करावा म्हणजे आता..

अरभाट,

मी म्हणेन Les Paul हा खरा एलेक्ट्रीक गिटारचा पायोनीयर. तो २००९ मध्ये ९४ व्या वर्षी गेला. ह्या पानावरचा व्हिडियो त्याच्या आयुष्याचा आढावा घेतो.

जिमी हा साठीच्या काळातच नव्हे तर आजसुद्धा तितकाच प्रेरणादायक आणि पूज्य आहे. परवाच ८ मार्चला त्याचा Valleys of Neptune (मरणोत्तर) हा अल्बम निघाला आणिअ बिलबोर्ड वर चौथ्या क्रमान्कावर गेला. त्याचं रेड हाऊस तर फारच उच्च आहे. Gary Moore चं कव्हर (Fender 50th Anniversary) ऐक.

माझे आवडते कलाकार........

बिटल्स
बिली जोएल
सिस्टम ऑफ डाउन
कोल्डप्ले
यु २
मायकल हेजेस
जो सॅट्रिआनी
एरिक क्लॅप्टन

माझे आवडते कलाकार........

बिटल्स
बिली जोएल
सिस्टम ऑफ डाउन
कोल्डप्ले
यु २
मायकल हेजेस
जो सॅट्रिआनी
एरिक क्लॅप्टन

Following English songs are my favourites

Best days - Graham Culton
hey Jude - Beatles
let it be - Beatles
Summer of 69
Horse with no name - Ameirca
My girl my girl where did you sleep last night - America
Manic Monday - Bangles
It's my life - Bon Jovi
Hurt - Johny Cash
Just a dream- Carrie Underwood
Heart alone
My heart will go on - celin dion (Titanic)
Brown eyed Girl - Van morrison
Yesterday
in my life - Beatles
Can't buy me love - Beatles
Blackbird - Beatles
Hotel California - Eagles
Before he cheats - Carrie underwood
Water is wide
Dust in the wind
Amazing grace
Abraham rock my soul
Telephone - Lady Gaga
You belong with me- Taylor Swift
Planet earth moves slowly
Evacuate the dance floor - Cascada
Sweet sister
Tata Young
--------------------------------------------
खालील काही माझ्या फेवरेट Western classical music pieces ची लिस्ट आहे...
Deer Hunter melody -- Cavatina by stenely Myres (most beautiful classical piece I like)
Fur elise -Ludwig Van beethvan
Asturias (Leyada) - Ibanez
minuet (Dminor piece ) - Ludwig Van Beethoven
Cancion
Chorale
Hungarian Air
Malagueana
Andatino
Sor
Marry had a little lamb
Moon
Jingle bells
London Bridge
Parliment
Spagnoratta
Flemenco Suit - Mir Ali
Waltz
Fantacia
---------------------------------------------------------------------------
आजुन बरीच मोठी यादी आहे ... बाकिचे परत टाकतो

shashank pratapwar -
Eric clapton's "Tears in the heaven" is best..
Did you heard it?

हे इलिनॉयचे इंग्रजी का?
आमच्या ब्रूकलिनमधे 'He does not hve money' ला 'He ain't got no money' असे म्हणतात. तसे काहीसे इलिनॉयमधे असावे असे वाटते.

इथले जाणकार मला काही मदत करू शकतील कां? मला वॉक/व्यायाम करताना योग्य अशी गाणी कोणी सुचवू शकतील कां? उदाहरणार्थ बीट्स असलेली. जसं की माझ्याकडे सध्या ही गाणी आहेत.

बोनी एमची(ब्राऊन गर्ल, रासपुटीन, बाय द रिव्हर्स, डॅडी कूल इ.),
वेन्गाबॉईज (शालाला, ब्राझील),
एनरिक इग्लेशिअसची बायलामोस, रिदम डिव्हाईन
मा.जॅ.ची बिली जीन, दे डोन्ट रिअली केअर, द वे यू मेक मी फील
सिंडी लॉपरचं गर्ल्स जस्ट वॉन्ना हॅव फन
इ.इ.

@ आउटडोअर्स -
बिलिव्ह - Cher
ला बाम्बा - los lobos
टॉक्सिक - britney spears
इट्स रेनिंग मेन - geri halliwell
र्‍हिदम्'स गॉन्ना गेट यू (सुरुवात ऐकून शोध लागेल :)), टर्न द बीट अराउंड, कोंगा - gloria estefan (सेलिन डिऑन आणि एस्तेफान यांनी एकत्र गायलेले कोंगासुद्धा भारी आहे)
फूटलूज - kenny loggins
हेय या, द वे यू मूव्ह - outkast (हा त्यांच्या genre मधला उत्कृष्ट बँड होता)
अ‍ॅनिमल साँग - savage garden
(स्प्रिंगस्टीन आणि स्ट्रेट्सची माफी मागून)
वॉक ऑफ लाइफ - dire straits
डांसिंग इन द डार्क - Bruce springsteen (गाण्याच्या व्हिडिओमधली मुलगी ओळखा :))
टबथम्पिंग - chumbawamba
व्हिडिओ किल्ड द रेडिओ स्टार - the presidents of USA
यू सेक्सी थिंग - hot chocolate
वॉन्नाबी - spice girls इ. इ.

अरभाट, आता लगेचच ह्यातली जेवढी गाणी मिळतील तेवढी सर्च करून डाऊनलोड करते. थँक्स अ लॉट.

@किशोर१६८४

मला खुप आवडत " Tears in the heaven"...खास करुन त्याच अनप्लग्ड व्हर्जन...

ऐरी़क ने त्याच्या वारलेल्या मुलासाठी हे गाण केल होत...खुप आर्त आहे ते गाण..

मामी,
मस्त बाफ ऊघडला आहे...
क्रिकेट व रॉक म्युझिक हे फक्त पुरुषांचीच क्षेत्रे आहेत. बायांनी चीअर करावे किंवा मागे नाचावे हवे तर( लंड्न ड्रीम्स मधील असिन!) ती पॉवर व ती angst स्त्रीयांच्यात नाही जन्मत.>>>
ह्या मताशी सहमत नाही. the cranberries, alanis morissette, evanescence आहेतच की.

बाकी The Bee Gees, Beatles, Bryan Adams, Elton John, U2, UB40 all time favorite.
आपला ओढा retros कडे जास्त.

चंदन वरील सन्माननीय अपवाद आहेत पण बायकांच्या आवाजात ते टिंबर येत नाही हो. परत ते जोरकस गिटार वाजविणे, ते अस्ताव्यस्त केस व दाढ्या, त्या ग्रूपीज, छे छे कल्पनाच करू शकत नाही. ते जाउदे गाणी टाका. Happy

१. बॅक्स्ट्रीट बॉइज (अज्ञातवास)
२. रिकि मार्टीन (अज्ञातवास)
३. एनरिक (अज्ञातवास)
४. शकिरा - व्हेनेव्हर आणि हिप्स डोण्ट लाय
५. मॅडोना
६. बोन जोव्हि:- इट्स माय लाईफ
७. मायकल जॅक्सन- ब्लॅक ऑर व्हाईट
८. ब्रिटनी
९. युफोरिया- हिंदी
१०. मिस्टिरियस गर्ल
११. केचप सॉन्ग
१२. अ‍ॅक्वा- बार्बी गर्ल

Pages