हार्ड रॉक कॅफे

Submitted by अश्विनीमामी on 2 February, 2010 - 21:41

बरेच दिवस मनात होते आज इथे इन्ग्रजी सीरीअल्स वर धागा निघाला आहे म्हणून धाड्स केले आहे. हिन्दी व मराठी गाणी खूप आवड्त असली तरी कधी कधी असा मूड असतो की हार्ड रॉक, पॉप, सॉफ्ट, कंट्री वेस्टर्न संगीत फार परफेक्ट वाट्ते. मेट्ल/ ट्रान्स/ हाउस सुद्धा. कधी मस्तीत नाचायचा मूड असतो तर कधी अनप्लग्ड गाणी ऐकायचा.

मी स्वतः कायम बास बूस्टर चालू ठेवूनच गाणी ऐकते. त्यात ड्र्मस, गिटार वगैरे फार आवडीचे. शाळेत असताना आबा, बोनी एम झाले, अकरावीत स्टेयिन्ग अलाइव व इतर. वेळ व संधी मिळेल तसे हे पाश्चात्य
संगीत ऐकणे चालूच राहिले. आता तर घरात कायम ढुम टाक ढुम टाक चालूच असते. रोलिन्ग स्टोन्स मासिक जेव्हा परवडेल तेव्हा आणते. ब्रायन अडॅम्स, मडोना( जुन्या काळातील) एल्विस, रिकी मार्टिन
नंतर आपली जनरल पार्टी सॉन्गस पण खूप मजा आणतात. ब्रिट्नी, मायली, जोनास हे तरूण कलाकार कधी कधी मजा करून जातात. आफ्रिकन रिदम्स, ओरिजिनल मूवी साउंड ट्रॅक्स, आवड्ते ग्रूप्स बद्दल वाचायला खूप आवडेल. आपल्याला कोणती गाणी व का आवडतात ते लिहा. कॉन्सर्टस बद्दल लिहा. माझे ज्ञान व आपला आनंद द्विगुणित करा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझे ऑल टाईम फेवरेट्स :-

UB40 : I Can't Help Falling in Love.
Billy Vaughn or Bobby Darin : Come September
Cliff Richards : Congratulations & Celebrations.
Whitney Houston : I Will Always Love You ( The Bodyguard)
MJ : Heal the World
MJ : The Way You Make Me Feel (Thriller)
Lou Bega : Mambo No. 5
Boney M : Brown Girl In The Rain
Celine Dion : My Heart Will Go On (Titanic)

फार Nostalgic वाटत आहे.

युटू ऐकायला मी तशी उशीराच सुरूवात केली. म्हणजे त्यांचे 'जोशुआ ट्री' आणि 'आख्टुंग बेबी' हे हिट्ट आल्बम येऊनसुद्धा काही काळ लोटला होता. त्याची गंमत अशी झाली - एमटीव्ही नुकताच भारतात सुरू झाला होता. त्याआधीपासून थोडेफार कर्णसंस्कार झाले असल्यामुळे एमटीव्ही नुसताच बघण्यासाठी नसून ऐकण्यासाठीसुद्धा असतो हा साक्षात्कार झालेला Wink एकदा घरी आल्यावर टीव्ही लावला असताना मस्त गाणे सुरू होते. तेव्हा गाण्याच्या शेवटी बँड, गाण्याचे नाव वगैरे दिसते, पण ते नीट बघायचे राहून गेले आणि डोक्यात फक्त 'U' आणि कुठलातरी नंबर एवढेच राहिले (इंग्रजी गाण्याचे शब्द कळण्याइतकी झेप तेव्हा नव्हती, आताही नाही.) मग मित्राशी बोलताना सहज त्याला विचारले, अरे, तो बँड कुठला रे? यु आणि कुठलातरी नंबर? तर तो लगेच म्हणाला, युटू. ओक्के, युटू तर युटू. मग त्यांची गाणी मिळवून ऐकायच्या मागे लागलो. ती मिळाली, ऐकली, आवडली वगैरे सर्व झाले, पण एमवर ऐकलेले गाणे काही मिळेना! यथावकाश कळले की आपण जे गाणे ऐकले होते ते युटूचे नव्हतेच, ते युबी४० (UB40) या बँडचे होते - कान्ट हेल्प फॉलिंग इन लव्ह. ते तेव्हा बिलबोर्डावर बरेच वर होते त्यामुळे सारखे लागायचे. हेही गाणे मस्तच आहे, पण युटूची झाली तेवढी मटका-ओळख अजून कोणाचीच झाली नाहीये. (या दोन्ही बॅड्सच्या संगीतात फरक आहे. युबी४० ब्रिटिश तर युटू आयरिश एवढेच काय ते साधारण साम्यस्थळ.)

बोनो हा युटुचा मुख्य गायक, तर 'द एज' (The Edge) हा त्यांचा गिटारवादक. बोनोच्या आवाजाला एक वेगळे वजन आहे. युटुची गाणी भव्य वाटतात, त्याचे एक कारण बोनोचा आवाज हे आहेच. पण त्याहीपेक्षा कांकणभर अधिक महत्त्वाचे कारण म्हणजे एजचे गिटारवादन. एजची स्वतःची अशी खास शैली आहे. इतर कुठेही तुम्हाला अशी शैली आणि तिचा सातत्याने प्रभावी वापर आढळणार नाही. त्याची खासियत म्हणजे गिटारमधून प्रतिध्वनीसारखा घुमणारा नाद निर्माण करणे. पुढील काही गाण्यांचे सुरुवातीचे साधारण मिनिटभराचे भाग ऐकले तरी एजच्या शैलीचा अंदाज येईल -
बॅड
प्राइड
विथ ऑर विदाउट यू
व्हेअर द स्ट्रीट्स हॅव्ह नो नेम
स्टिल हॅवन्ट फाउंड व्हॉट आय अ‍ॅम लूकिंग फॉर
म्हणजे मी काय म्हणतोय ते लक्षात येईल. एजच्या या वेगळ्याच वादनामुळे गाण्याला एक भव्यता प्राप्त होते. इंग्रजीत 'साउंडस्केप' असा एक सुंदर शब्द आहे, एजच्या गिटारवादनाने गाण्याचे 'साउंडस्केप' निर्माण होते. मला नेहमीच युटुचे संगीत ऐकताना आपण स्टार वॉर्समधील (किंवा आता अ‍ॅव्हाटारमधील) कुठल्यातरी अज्ञात, भव्य प्रदेशात आहोत असा काहीसा भास होत राहतो. अर्थातच एजचे या शैलीवर पूर्ण प्रभुत्व आहे. ती कधीच अती वाटत नाही किंवा ती त्याच्या ताब्यातून निसटून स्वैरपणे गाण्यात धुमाकूळ घालतीये असेही होत नाही. अगदी 'आय स्टिल हॅवन्ट फाउंड....', 'विथ ऑर विदाउट यू......' सारखी वैयक्तिक आशयाची गाणी असोत की 'प्राइड' सारखी सामाजिक, बोनोच्या 'जेन्युइन' आवाजाला एजची गिटार असे कोंदण देते की बस्स! त्यांच्या 'द जोशुआ ट्री' आल्बमातली बहुतेक सर्वच गाणी मला आवडतात, तसेच 'आख्टुंग बेबी' मधलीसुद्धा.

युटुचे गीतलेखन ही त्यांची एक मोठी जमेची बाजू. त्यांच्या गीतांमध्ये रोमँटिसिझम आहे, पण तो पलायनवादी नाही (जसा पॉपमध्ये आढळतो). युटुचा रोमँटिसिझम व्यवहारी, अस्तित्वाशी सांगड घातलेला आहे. त्यांची गीते ऐकल्यावर कळते की त्यांनी नेहमीच सामाजिक बांधिलकी मानली आहे. प्राइड (मार्टिन ल्युथर किंग ज्यु.), संडे ब्लडी संडे (उ. आयर्लंडमधील यादवी व हिंसाचार), रनिंग टु स्टँड स्टिल (हेरॉइनचे व्यसन) इ. सारखी अनेक गाणी त्यांच्या जागृत सामाजिक जाणीवेची साक्ष देतात. ही सामाजिक बांधिलकी फक्त गायनवादनापुरतीच राहिली नाही, तर प्रत्यक्ष जीवनात युटु (विशेषतः बोनो) सामाजिक कार्यात अत्यंत कृतिशील राहिले आहेत. त्यांच्या अमाप प्रसिद्धीचा, लोकप्रियतेचा सुयोग्य वापर अनेक समाजोपयोगी कामांसाठी ते करतात. इतर गायकवादकांना करायला भाग पाडतात. जे गीतलेखनात तेच प्रत्यक्ष जीवनात तेच परत गीतलेखनात असा चक्रनेमिक्रम युटुने पाळला आहे. असे गीतलेखन आणि त्याला अतिशय अनुरूप असे संगीत देणे युटुला जमले आहे. त्यांच्या संगीतातील भव्यता इथे अत्यंत परिणामकारक ठरते. त्यांच्या गीतकारीला अध्यात्मिक बाजूसुद्धा आहे. 'स्टिल हॅव्हन्ट फाउंड...' मधल्या त्या ओळी 'ऑल कलर्स ब्लीड इन्टु वन'...... मला आपल्या संतांची आळवणीच आठवते थेट. हार्लेम हा न्यूयॉर्कमधील गरीब वस्तीचा भाग. गुन्हेगारी बोकाळलेली. हेसुद्धा ऐका - हार्लेममधील एका शाळेतील 'गॉस्पेल कॉयर' (gospel choir)ने साथ दिलेले गाणे - स्टिल हॅव्हन्ट फाउंड व्हॉट आय अ‍ॅम लूकिंग फॉर हे ऐकताना नेहमीच माझ्या अंगावर रोमांच उभे राहते.

१४ फेब्रुवारीला छानसा क्लब परवडणे शक्य नव्हते. देसी नाइट्सना जाण्याची मुळीच इच्छा नव्हती. स्नातकाच्या शिष्यवृत्तीत काय काय किती किती बसवणार? म्हणून १३ फेब्रुवारीच्या रात्रीच एके ठिकाणी गेलो. ठिकाण चांगले होते. दोन-अडीच तास नाचून आणि गोंधळ घालून झाल्यावर थोडे दमलो होतो. हातात शॉट-चेजर होता, त्याचे घोट घेत होतो. अचानक दिवे (आणखी) मंद झाले, काळोखी भव्य गुहा आणखीनच भव्यकाळोखी वाटू लागली. पण हळूहळू भिंतीच्या बाजूने वीजेवर चालणार्या मेणबत्त्या (म्हणजे दिवेच, पण मेणबत्तीचा परिणाम देणारे) पेटू लागल्या. गर्दीसुद्धा थोडी शांतावल्यासारखी झाली.... आणि डिजेने हिपहॉपवरून एकदम उडीच मारली..... ऑल आय वॉण्ट इज यू
"यू से यू वाँट डायमंड्स ऑन अ रिंग ऑफ गोल्ड,
यू से यू वाँट युअर स्टोरी टु रिमेन अनटोल्ड
बट ऑल द प्रॉमिसेस वुई मेड
फ्रॉम द क्रेडल टु द ग्रेव्ह
व्हेन ऑल आय वॉण्ट इज यू"
बघता बघता हिपहॉपचे उडीमय, घुसळमय वातावरण बदलले, बघता बघता डान्स फ्लोअरवर जोड्या बिलगून मंदपणे झुलू लागल्या.
"हेय ऑल, इट्स ट्वेल्व्ह नाऊ अँड यू नो व्हॉट दॅट मीन्स. इट्स द टाइम, इट्स द टाइम टू वॉण्ट द राइट थिंग, इट्स द टाइम टु डू द राइट थिंग" डिजेचे बोल घुमले. हातातला चेजर टेबलवर कधी ठेवला कळलेच नाही.
"यू से यू विल गिव्ह मी आइज इन वर्ल्ड ऑफ ब्लाइन्डनेस
अ रिव्हर इन टाइम ऑफ ड्रायनेस
अ लेबर इन द टेम्पेस्ट....."
बोनोचा आवाज अक्षरशः कळसुत्री बाहुल्यांसारखा सगळ्यांना फिरवत होता, घुमवत होता. मागचे दोन-अडीच तास घातलेला गोंधळ कधीतरी अनेक वर्षांपूर्वी घातला होता असे वाटत होते. कुठल्यातरी इलॅस्टिकने अचानक मधला काळ ताणला होता.... हा देजावू नक्कीच नव्हता. ती केवळ शारीर अशी नशासुद्धा नक्कीच नव्हती. मंत्रभारल्या आवाजाने आपल्या आत जाऊन कुठलीतरी जादुई किंवा कुठलीतरी अगदी आदिम कळ फिरवावी आणि सगळे अंग झंकारून उठावे असे काहीतरी झाले. ते प्रतल बोनोच्या आवाजाचे होते आणि तो नादावत होता,
"बट ऑल द प्रॉमिसेस वुइ मेक
फ्रॉम द क्रेडल टू द ग्रेव्ह"
अन् अचानक अगदी जवळ माझ्या कानात तिचा घुसमटता दाटलेला आवाज कुजबुजला...... "व्हेन ऑल आय वॉण्ट इज यू....." ती रात्र, तिचा क्षणन् क्षण जपून राहिला आहे.
युटु मला महान वाटतो, कारण 'तो महान आहेच' म्हणून नाही, तर एक सुगंधी कोपरा त्यांनी व्यापला आहे म्हणून. अजूनही कधीकधी तो सुगंध मनभर दरवळतो आणि मी परत त्याच्या शोधात बाहेर पडतो.... but I still haven't found what I am looking for.

सर मुजरा घ्यावा. नेव्हर ओन द पर्सन; ओन द एक्स्पीरीअन्स असे माझे मत आहे किती सुरेख अनुभव आहे हो शेअर केल्या बद्दल धन्यवाद. गाणे पण ऐकेनच.

नेव्हर ओन द पर्सन; ओन द एक्स्पीरीअन्स >>>>> वाह! फतेह कि बात हो मामी. तुम्हालाच त्याबद्दल धन्यवाद Happy

मंत्रभारल्या आवाजाने आपल्या आत जाऊन कुठलीतरी जादुई किंवा कुठलीतरी अगदी आदिम कळ फिरवावी आणि सगळे अंग झंकारून उठावे असे काहीतरी झाले >> काय लिहिलय सर. .... All I want कसला महान आहे ....

इफ यु लाईक एम सी हॅम्मर. रॅप लवर्स चेक दिस अऊट, one of my favourites Happy
http://www.youtube.com/watch?v=otCpCn0l4Wo&ob=av2e

ईंडीपॉप मध्ये :-

आर्यन्स :-
यह हवा कहती है क्या http://www.youtube.com/watch?v=jiTefdkAUsU
आखो मे तेरा ही चेहरा http://www.youtube.com/watch?v=yYRLygL_W88

युफोरीया :-
माय री http://www.youtube.com/watch?v=mS9_6GUlIxw

दलेर मेहंदी :-
हर तरफ तेरा जलवा (लिझा रे, she looks awesome)
http://www.youtube.com/watch?v=585NBxF_0II

जबरदस्त गिटारिस्ट व्हान हालेन एडि ह्यांचे परवाच सहा तारखेला निधन झाले. व्हान हालेन नावाचाच एक बँ ड त्यांनी स्थापन केला होता.
हातात निव्वळ बिजली!!!!! त्यांचे इरप्शन हे सोलो फार प्रसिद्ध आहे. तसेच जंप व पनामा अशी इतर गाणी / वादन प्रसिद्ध आहे. त्यांना श्रद्धांजली व हातातील कलेस अभिवादन . ह्यांची व पं रविशंकर ह्यांची जुगल बंदी काय रंगली असती महाराजा..... सोबतीला अल्लारखां
दोज वेअर द रिअल गाइज.

येस, एडि पास्ड अवे लास्ट वीक. टॉप गिटारिस्टचा विषय निघाला तर जिमी हेंड्रिक्स, एडि वॅन हेलन, आणि एरिक क्लॅप्टनचा उल्लेख व्हायलाच हवा. एडिचं "यु रियली गाट मी", "प्रिटी वुमन", "लव वॉक्स इन", ऐकाच माझ्यावर विश्वास नसेल तर... Happy

ऑल्मोस्ट दहा वर्षांनंतर हा थ्रेड बघतोय; खुप चांगले प्रतिसाद आले आहेत. रॉक अतिशय आवडिचा जॉनरं. आणि एकमेव, जो सगळ्या बाजुंनी ट्रांस्फॉर्म (हार्ड/आल्ट रोक, ग्लॅम्/हेवी मेटल, ग्रंज, पंक रॉक...) झालेला. त्याची हिस्टरी लिहिण्याचं धाडस मी इथे करणार नाहि, कारण भरपुर माहिती ऑलरेडी इंटरनेटवर उपलब्ध आहे. पण माझे आवडते बँड इथे लिहिण्याचं धाडस मात्र करतो - जुडास प्रिस्ट, आयर्न मेडन, मेटॅलिका, डेफ लेपर्ड, व्हाइटस्नेक, एसी/डिसी, ब्लॅक सबॅथ, पर्ल जॅम, डायर स्ट्रेट, डूबी ब्रदर्स, सिसिआर, ग्रेटफुल डेड, एरोस्मिथ, रोलिंगस्टोन्स, गन्स अँड रोझेस, अँड मेनी मेनी मोर...

"लिव अँड लेट डायः" या बाँड पटातल्या गाण्याचं वर्जन, पॉल मकार्थी, आणि गन्स अँड रोझेस यापैकि कोणाचं सरस आहे यावर आज इतक्या वर्षांनंतरहि मी संभ्रमीत आहे...

परवा इन्स्टाग्राम वर रील्स बघताना एका नाचाचा बीट व गाणेच फार छान व कॅची वाटले. बघितले तर क्वीन बँड चे फेमस
क्रेझी लिटिल थिंग कॉल्ड लव्ह. एकदम सुरेख गाणे. अगदी व्हेलवेटी व्होकल्स व सुरुवातीचे गिटार ऐ कलेत तर शोले चे टायटल म्युझिक आहे त्याच्या सुरुवातीची पट्टी साधारण त्याच नोट्स वर आहे. ( हे ही माझे आवड् ते.)

मस्त गाणे. अगदी पोलका डॉट ड्रेस घालुन गिरक्या घेत ऐकावे. स्पॉटिफाय वर उपलब्ध आहे.

>>>>>>>माझे ऑल टाईम फेवरेट्स :-
UB40 : I Can't Help Falling in Love.
एल्व्हिस, अँड्रे बोसेली - सर्वांचे व्हर्शन ऐकले आहे. UB40 चे फार आवडते. अर्थात आणि एल्व्हिसचे.
रेड रेड वाईन हे UB40 चे - सुमधुर

Enigma fan aahe na. Principles of lust. Are easy to understand.

Entire album is good and you should listen to it from start to finish. Without disturbance and in darkness. It is like meditation

Entire album is good and you should listen to it from start to finish. Without disturbance and in darkness. It is like meditation >> +१

आज खूप दिवसांनी हार्ड रॉक कॅफे उघडला आहे. कारण २०२४ ग्रामी अवार्ड मध्ये भारतीय कलाकारांना खालील बक्षिसे मिळाली आहेत.

पं झाकीर हुसेन तबला व राके श चौरासिया बासरी ह्यांना पश्तो ह्या गाण्या साठी बेस्ट ग्लोबल म्युझिक पर्फॉरमन्स अ‍ॅवार्ड मिळाले आहे.

तर शक्ती ह्या गृपला बेस्ट ग्लोबल म्युझिक मध्ये द मोमेंट ह्या अल्बमला सर्वोत्तम म्ह णुन बक्षिस मिळाले आहे.
Zakir Hussain's supergroup Shakti, which includes vocalist Shankar Mahadevan also won Best Global Music Album for This Moment. Shakti was formed by violinist L Shankar, percussionist Vikku Vinayakram, and British guitarist John McLaughlin.

ही बातमी ची लिंक हार्दिक अभिनंदन.
https://www.ndtv.com/entertainment/grammys-2024-zakir-hussain-and-shakti...

Pages