हार्ड रॉक कॅफे

Submitted by अश्विनीमामी on 2 February, 2010 - 21:41

बरेच दिवस मनात होते आज इथे इन्ग्रजी सीरीअल्स वर धागा निघाला आहे म्हणून धाड्स केले आहे. हिन्दी व मराठी गाणी खूप आवड्त असली तरी कधी कधी असा मूड असतो की हार्ड रॉक, पॉप, सॉफ्ट, कंट्री वेस्टर्न संगीत फार परफेक्ट वाट्ते. मेट्ल/ ट्रान्स/ हाउस सुद्धा. कधी मस्तीत नाचायचा मूड असतो तर कधी अनप्लग्ड गाणी ऐकायचा.

मी स्वतः कायम बास बूस्टर चालू ठेवूनच गाणी ऐकते. त्यात ड्र्मस, गिटार वगैरे फार आवडीचे. शाळेत असताना आबा, बोनी एम झाले, अकरावीत स्टेयिन्ग अलाइव व इतर. वेळ व संधी मिळेल तसे हे पाश्चात्य
संगीत ऐकणे चालूच राहिले. आता तर घरात कायम ढुम टाक ढुम टाक चालूच असते. रोलिन्ग स्टोन्स मासिक जेव्हा परवडेल तेव्हा आणते. ब्रायन अडॅम्स, मडोना( जुन्या काळातील) एल्विस, रिकी मार्टिन
नंतर आपली जनरल पार्टी सॉन्गस पण खूप मजा आणतात. ब्रिट्नी, मायली, जोनास हे तरूण कलाकार कधी कधी मजा करून जातात. आफ्रिकन रिदम्स, ओरिजिनल मूवी साउंड ट्रॅक्स, आवड्ते ग्रूप्स बद्दल वाचायला खूप आवडेल. आपल्याला कोणती गाणी व का आवडतात ते लिहा. कॉन्सर्टस बद्दल लिहा. माझे ज्ञान व आपला आनंद द्विगुणित करा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

समर ऑफ ६९ गाणे ऑल टाइम फेवरिट.
लंबाडा
वेन्गा बॉइज
मिली वॅनिली( तेच ते )
भांगरा पॉप आवडते( there goes my credibility :P)
हनी हनी आबा पण अल्टिमेट
ट्रेसी चॅपमन.
टेक मी होम कंट्री रोड वेस्ट वर्जिनीया. स्कूटर वरून भटकताना.
बॅक्स्ट्रीट बॉइज

माझ्या डोक्यात एक संगीताची भेळ आहे. क्या करूं मैं तो हुं ही ऐसी.

मस्त बीबी मामी

माझेही समर ऑफ ६९ फेवरेट.. माझे काही फेवरेट्स.

१. रोनान केटिंग - लाइफ इज रोलरकोस्टर
२. बॉयझोन - सगळीच
३. लिंकिन पार्क - इन द एण्ड आणि नंब
४. शकिरा - व्हेनेव्हर आणि हिप्स डोण्ट लाय
५. बॅक्स्ट्रीट बॉइज
६. शॅगी
७. तेरियाकि बॉइज
८. यु आर ब्युटिफुल - जेम्स ब्लंट

अज्जुन टंकतोच.. आठवतील तशी

समर ऑफ ६९ माझेपण फेवरेट
त्यानंतर बॅक स्ट्रीट बॉय्ज, टिना टर्नर, व्हिटनी ह्युस्टनपण एकेकाळी आवडायचे,
सलिन डियॉन चे लेट द रेन क अँड वॉश माय टिअर पण खुप आवडते.
एल्टन जॉनचे द लॉयन किंग मधले.
आय होपे यु डान्स अजुनही आवडते. हे आत्ता आठवलेले.
मामी मस्त बीबी. Happy

राज ऐकलं. तू जळवतो आहेस हं. तुझ्याकडे ते बोस चे छोटे स्पीकर्स आहेत का? आता लिरिक्स नोट करणार व
बोस ५.१ सर्च करणार. लिंक बद्दल धन्यवाद.

Only the strong नावाचा एक मूवी होता. त्यात अफ्रीकन रिदमची २ अफलातून गाणी होती.

१. झूम झूम झूम - २००० च्या आसपास उसगावात टोयोटची एक जाहिरात आली होती या गाण्यावर बेतलेली.
२. पॅरानॉवे - आपल्या अक्कीचे 'बाराना दे' हे ह्याची नक्कल आहे.

काही वर्षापूर्वी मी परदेशी संगिताची ओळख करून देणारा बीबी उघडला होता. त्यावर लोकानी उत्साहाने पोस्टी करायला सुरुवातही केली होतींअन्तर मॉड नी की अ‍ॅडमिन. नी ही मराठी साईट आहे व परदेशी संगिताबदाल माहिती देणार्‍या पुषकळ साईट्स आहेत त्यामुळे इथे स्पेस वाया घालवण्यात हशील नाही असे काहीसे म्हणून तो बीबी बन्द केला होता. मायबोलीचे धोरण बदलले असेल अशी अपेक्षा करू या...

मी इंग्लिश गाण्यांची चाहती आहे. पण त्यांच्या संगीताचे प्रकार मात्र अजिबात कळत नाहीत. रॉक कोणते, हिप्-हॉप कोणते, रॅप कशाला म्हणायचे नी जॅझ काय या बाबत पुर्ण अज्ञानी.

आवडत्या गाण्यांमधे हॉटेल कॅलिफोर्निया ऑल टाईम फेव्हरिट.
ब्रायन अ‍ॅडम्स ची बहुतेक गाणी आवड्तात. बाकि बर्‍याच गायक / बँड ची एक दोन गाणी खास आवडीची आहेत वानगी दाखल - अ‍ॅशर लेन चे न्यु डेज, मार्क अ‍ॅन्थनी चे यु सँग टु मी, रोनन किटिंग चे व्हेन यु से नथिंग अ‍ॅट ऑल, निना सायमन चे आय गॉट लाईफ वगैरे. पण बहुतेक गाणी इकडुन तिकडुन ऐकलेली (जाहिराती, शेजार्‍यांच्या घरातुन कानावर पडलेली, टॅक्सी मधे ऐकलेली) आणि आवडलेली अशी.
नॉटिंग हिल आणि वेडिंग डेट अलिकडेच पुन्हा पाहिल्यामुळे त्या मधली गाणी पुन्हा मनात घोळत आहेत.

काही वर्षापूर्वी मी परदेशी संगिताची ओळख करून देणारा बीबी उघडला होता. त्यावर लोकानी उत्साहाने पोस्टी करायला सुरुवातही केली होतींअन्तर मॉड नी की अ‍ॅडमिन. नी ही मराठी साईट आहे व परदेशी संगिताबदाल माहिती देणार्‍या पुषकळ साईट्स आहेत त्यामुळे इथे स्पेस वाया घालवण्यात हशील नाही असे काहीसे म्हणून तो बीबी बन्द केला होता. मायबोलीचे धोरण बदलले असेल अशी अपेक्षा करू या...>> अरेच्चा
सॉरी चुकीचा बीबी असेल तर बंद करावा. आमची प्लेलिस्ट आहेच. लिहिले नाही तर काय फरक पड्णार आहे?
बीबी गेली तरी आयपॉड मियां आहेत साथीला. Happy

जाउ द्या झालं रॉबिनहूड.
पण लोकांना आजकाल हेच आवडते असे दिसते. हे सगळे आजकालच्या काळातले आहे.

मराठी गाणी, गायक आवडणारे अनेक लोक असतील, (कदाचित्. निदान अमेरिकेत तरी आहेत, महाराष्ट्रात माहीत नाही) पण इंग्रजी गाणी, समजली नाहीत, तरी ऐकायला आवडणारे कुणि मराठी असतील का, म्हणून हा बा. फ.

खरे तर विषय काही असो, समान आवड असणार्‍या लोकांना मराठीत लिहीता, बोलता यावे, संपर्क साधावा, ओळखी वाढाव्यात, शिळोप्याच्या गप्पा माराव्या, म्हणून मायबोली.
असे मला वाटते.

उद्या आपण इंग्रजी सिनेमांची चर्चा करणारा बा. फ. उघडू. हळू हळू इंग्रजी किंवा हिंदीत लिहू लागू. कारण महाराष्ट्रातले शिकलेले लोक, पुण्यामुंबईतले, नाशीक, नागपूरचे सगळे इंग्रजी किंवा हिंदीच बोलतात असे ऐकले. तेंव्हा त्यांच्याशी ओळखी करु म्हणायचे, संवाद साधायचा तर मराठी लिहून कसे चालेल? शिवाय आम्हाला इंग्रजी सिनेमाबद्दल बोलायचे तर मराठीत कसे लिहीणार?

आता मराठी संस्कृति, भाषा यांचा नाद सोडा. समाजाबरोबर पावले टाका, पण मराठी संस्कृति? ह्या:! जुनाट, बुरसटलेली. छट पूजा वगैरे करा जरा. लग्नात सुद्धा पूजा, होम पेक्षा नाच गाणी, जोडे लपवणे वगैरे महत्वाचे. बाकी सगळे रटाळ!

अमेरिकन टिव्ही चॅनल्सचा बीबी चालत असेल तर हा ही चालायला हरकत नाहीच.
असो, मला ही summer of 69 आवडतं. कॉलेजात असताना वगैरे Boney M ची गाणी आवडायची. तसंच venga boys, A teens ही आवडताना. मागे एक छान गाण्यांची सिडी होती आमच्याकडे. मिळाली तर शोधायला हवी.

अशी आवड व्यक्त करायचे हे स्थान नाही हे अगदी पट्ले. बंद करा बीबी. मी गैरसमज करून घेणार नाही. Happy

स्लार्टी आजोबा कुठे गेले ? त्यांनी मस्त लिहिलं असतं इथे . हार्ड रॉक, मेटॅलिका, जॅझ वगैरे खास आवडीचे विषय.

summer of 69>>माझे पण The Favorite हे Love of common people (Paul Young), Smokie चे Living next door to Alice आणि Steve Collins चे PartTime Lover बरोबर

बंद करा बीबी. मी गैरसमज करून घेणार नाही.

नाही हो, तुम्ही आपले चालू द्या! कुणाची काय मत असतील म्हणून आपण का म्हणून आपले मत बदलायचे? लोकच सांगतील, त्यांना आवडले तर लिहीतील, नाहीतर आपो आपच बंद पडेल.

माझे पण अनेकदा प्रयत्न झाले, भारत कसा सुधारेल या मुद्द्यावर. पण प्रतिसाद मिळणे थांबले नि ते आपो आप काळाच्या पडद्या आड गेले.

याला म्हणतात खरी लोकशाही.

ब्रायन अ‍ॅड्म्सचं 18 Til I Die अल्बम मधील माझं आवडतं गाणं: Have You Ever Really Loved A Woman?

Enjoy!

http://www.youtube.com/watch?v=hq2KgzKETBw

मामी, सगळी गाणी माझ्या झुन वर आहेत, पण बोस वर ऐकण्यातली मजा काही और. घर घेतल्यावर सर्वप्रथम मी बोसची लाइफस्टाईल ६० सिस्ट्म घेतली; बाकी इतर गोष्टी नंतर... Happy

वा.. मस्त बाफ..
राज, हॉटेल कॅलिफॉर्नियाचा हा व्हीडिओ नव्हता पाहीला.. कधीही केव्हाही ऐकू शकते मी हे गाणं! थॅंक्स !

माझ्या आवडीची गाणी लिहीन नंतर.. आत्ता गाणं ऐकते.. Happy

अपन इस मामले में अंगूठाटेक -

संगीत म्हटलं की कान ह्यांना शोधायला निघतात Happy

पं. भीमसेन जोशी _/\_
आबिदा परवीन
मो. रफी
आशा भोसले

summer of 69 आवडतं. कॉलेजात असताना वगैरे Boney M ची गाणी आवडायची. तसंच venga boys, A teens ही आवडताना. >> येस्स! मला पण..
मला 'हेल्लो.. इज इट मी यु आर लूकिंग फॉर', 'इफ टूमॉरो नेव्हर कमस', MLTR ची सगळी गाणी, 'कॅन आय टच यु देअर', त्या येड्या एन्रिक इग्लिसियासची गाणी, ब्रिटनीचं वूमनायझर (ह्या शब्दाचा अर्थ बराच उशिरा कळला :P)..जस्टिन टिंबरलेकची 'काही' गाणी.. आवडतात

>>कधीही केव्हाही ऐकू शकते मी हे गाणं! <<
अ‍ॅबसोल्युट्ली! या गाण्याचे शब्द आणि प्रवाह इतका भारी आहे की प्रत्येकाचं इंटरप्रीटेशन वेगळं असु शकतं. शेवट्च्या तीन ओळीतर एकदम चाबूक...
"We are programmed to receive. You can checkout any time you like, But you can never leave!"

इथे कुणी एल्ट्न जॉनचे पंखे नाहीत का ?
मला एल्टन जॉनची सगळीच गाणी आवडतात , त्यातल्या त्यात सॅक्रिफाईस तर जाम आवडतं.

इथे कोणी एनिग्मा फॅन्स आहेत का?>>माझे Long Drive Companion :). खास करून गाडीतले बाकीचे सगळे झोपले कि मी Engima लावून बसतो. दर वर्षी Fall colors बघून परत येताना हि कंपनी असते Happy

वाह !! मलाही एनिग्मा - क्रेटुची गाणी भयंकर आवडतात..
इंजिनिअरिंगला अभ्यास मस्त व्हायचा, गाणी ऐकत.
झोप येत नसेल तर मी २०,००० माईल्स ओव्हर द सी किंवा इन्व्हिजिबल लव्ह लावून ठेवते लूपमध्ये.

आयला मी कसा नाय बघितला हा बाफ.

इंग्लिश दगड संगीतात देवासमान पिंक फ्लॉइड.. पायपर अ‍ॅट द गेट्स ऑफ द डॉन पासून द फायनल कट पर्यंत सगळे ग्रेटच (वॉटर्स गेल्यावरचा मोमेन्टरी लॅप्स ऑफ रीझन बकवास होता आणि डिव्हिजन बेल ऐकायला बरा वाटला तरी फ्लॉइड टच नव्हता).. पिंक फ्लॉइडचे कुठले गाणे आवडते हे सांगणे अवघड पण तरी,
संपूर्ण वॉल आल्बम (कारण सगळी गाणी एकाला एक जोडून आहेत)
संपूर्ण डार्क साइड ऑफ द मून
एकोज (विशेषतः पॉंपेईच्या स्टेडिअम मध्ये त्यांनी वाजवलेलं मिळालं तर बघाच)
शाइन ऑन यु क्रेझी डायमंड
विश यु वेअर हिअर
बाइक
इफ
अ सॉसर फुल ऑफ सिक्रेट्स

मुंबईमध्ये वॉटर्सची कन्सर्ट पण अचाट झाली होती.

पिंक फ्लॉइड नंतर बॉब डायलन, लेड झेपेलिन, यु२, स्कॉर्पिअन्स, डायर स्ट्रेट्स (नॉफलरच्या सिंगल्स), आर इ एम, द व्हू, ब्लॅक सबाथ, मेटॅलिका, गन्स अँड रोझेस, एरोस्मिथ वगैरे वगैरे अनेक.. पण प्रत्येक आल्बम आणि प्रत्येक गाणं नाही ऐकलेलं..

क्रीड हा असाच एक फार गुणी ग्रुप होता.. फार लवकर फुटला तो पण..

मला सरसकट एखाद्या आर्टिस्ट पेक्षा त्यांची ठरावीक गाणी आवडायची/आवडतात.

वॉक लाईक अ‍ॅन इजिप्शीअन (बँगल्स),
मॅन इन द मिरर (मा.जॅ.)
आइस आइस बेबी (वॅनीला आइस) (की आईस? :-))
ग्रेसलँड
नेवर गॉना गीव यु अप
समर हॉलीडेज (क्लीफ रीचर्ड)
यु कान्ट टच धीस (हॅमर)
फंकी टाउन
कॉलींग ऑकुपंट्स ऑफ इंटरप्लानेटरी क्राफ्ट (कारपेंटर्स)
लंबाडा
... आणि इतर अनेक

इतरांच्या लिस्ट्स वाचतांना पण मजा येते

>>इथे कुणी एल्ट्न जॉनचे पंखे नाहीत का ?

मी आहे ना! खूप ऐकली नाहीत पण जी ऐकलीयत ती आवडलीत.
सॅक्रीफाइस मस्तच पण मला 'ब्लेस्ड' जास्त आवडतं.

.

Pages