हार्ड रॉक कॅफे

Submitted by अश्विनीमामी on 2 February, 2010 - 21:41

बरेच दिवस मनात होते आज इथे इन्ग्रजी सीरीअल्स वर धागा निघाला आहे म्हणून धाड्स केले आहे. हिन्दी व मराठी गाणी खूप आवड्त असली तरी कधी कधी असा मूड असतो की हार्ड रॉक, पॉप, सॉफ्ट, कंट्री वेस्टर्न संगीत फार परफेक्ट वाट्ते. मेट्ल/ ट्रान्स/ हाउस सुद्धा. कधी मस्तीत नाचायचा मूड असतो तर कधी अनप्लग्ड गाणी ऐकायचा.

मी स्वतः कायम बास बूस्टर चालू ठेवूनच गाणी ऐकते. त्यात ड्र्मस, गिटार वगैरे फार आवडीचे. शाळेत असताना आबा, बोनी एम झाले, अकरावीत स्टेयिन्ग अलाइव व इतर. वेळ व संधी मिळेल तसे हे पाश्चात्य
संगीत ऐकणे चालूच राहिले. आता तर घरात कायम ढुम टाक ढुम टाक चालूच असते. रोलिन्ग स्टोन्स मासिक जेव्हा परवडेल तेव्हा आणते. ब्रायन अडॅम्स, मडोना( जुन्या काळातील) एल्विस, रिकी मार्टिन
नंतर आपली जनरल पार्टी सॉन्गस पण खूप मजा आणतात. ब्रिट्नी, मायली, जोनास हे तरूण कलाकार कधी कधी मजा करून जातात. आफ्रिकन रिदम्स, ओरिजिनल मूवी साउंड ट्रॅक्स, आवड्ते ग्रूप्स बद्दल वाचायला खूप आवडेल. आपल्याला कोणती गाणी व का आवडतात ते लिहा. कॉन्सर्टस बद्दल लिहा. माझे ज्ञान व आपला आनंद द्विगुणित करा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>>>>>.मी हे ओरिजिनलपेक्षा जास्त ऐकलं आहे.
पण स्टेअरवे टु हेव्हन एरिक क्लॅप्टन यांचे आहे ना? त्यांच्या पुत्राच्या निधनानंतर त्यांनी कंपोझ केलेले?
त्यामुळे मला इतरांचे ऐकवत नाही. ज्याचे दु:ख त्यालाच ठावे. इतरांनी गायलेले सर्व आर्ट/ कला वगैरे.

Pages