डीसी जीटीजी १०,११ एप्रिल २०१० (वसंता आला!!)

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

ऐन वसंतात एका वेळी...

कार्यक्रमाची रुपरेषा साधारण अशी-

१. शनिवारी सकाळी ११ वाजेपर्यंत सगळे आमच्या घरी या. दुपारचे जेवण, गप्पा करुन मग डीसीमध्ये जाता येईल.
२. डीसीत भटकून झाल्यावर रात्रीची खादाडी restaurant मध्ये बुकिन्ग करुन करता येईल, तिथेही गप्पा मारता येतील. वेगळ्या हॉलची गरज नाही.
३. शनिवारी मुक्काम करणार्‍यांना हॉटेलमध्ये रहायचे असेल त्यांना मध्यवर्ती ठिकाण सुचवता येईल. ज्यायोगे त्यांना दुसर्‍या दिवशीही डीसीत जाता येईल. तसे कळवा.
४. ज्यांना शनिवारीच परत जायचे आहे त्यांना जाता येईल.
५. ज्यांना रविवारी सकाळी परत जायचे तर जाता येईल, किंवा ज्यांना पुन्हा डीसीला भेट द्यायची आहे त्यांना स्वतंत्रपणे डीसीत जाता येईल.

विनयचा वृत्तांत :
http://www.maayboli.com/node/15357

वसंता आणि त्याची सेना (स्वाती आंबोळे)
http://www.maayboli.com/node/15344

आवाज कुणाचा? (अटलांटाकरांचा!): (नानबा)
http://www.maayboli.com/node/15359

डिसी स्नेहसंमेलन - शिट्टीच्या चष्म्यातून (अमृता)
http://www.maayboli.com/node/15360

लाफींग बेडुक आणि ब्रँडी (विनायक)
http://www.maayboli.com/node/15363

डीसीत वसंत बहरला (स्वाती_दांडेकर)
http://maayboli.com/node/15365

वाढीव नंबराचा चष्मा (सिंडरेला)
http://www.maayboli.com/node/15406

डीसी महागटग वृत्तांत - नवीन अचूक किनार्‍यावरून (सशल)
http://www.maayboli.com/node/15435

कल्लोळातील उरलेसुरले (दीपांजली, लालू)
http://www.maayboli.com/node/15405

आणि..
डीसी गटग : धॄतराष्ट्राच्या पट्टीमागून (संतोष किल्लेदार)
http://www.maayboli.com/node/15665

विषय: 
प्रकार: 

मग? पैसे मिळतात!

शिवाय देव आनंद हा नट पूर्वी कंडक्टरच होता. पुढे (आमच्या काळात) तो फार मोठा नट झाला.
त्यानेच 'हरे रामा, हरे कृष्णा' हे प्रसिद्ध भजन त्याच्या सिनेमात घेतले होते. शिवाय 'बदले दुनिया साडी, तुम ना बदलना' अस खोल अर्थ असलेला संदेशहि लोकांना त्याच्या एका सिनेमात दिला होता.

शिवाय मस्त, सैन्यातला सारखा, खाकी गणवेष मिळतो, टिक टिक वाजणारा चिमटा मिळतो! त्याने 'जाने दो म्हंटल्याशिवाय बस चालू होत नाही!

किती म्हणून सांगू कंडक्टरची महति!!

शिवाय 'बदले दुनिया साडी, तुम ना बदलना' अस खोल अर्थ असलेला संदेशहि लोकांना त्याच्या एका सिनेमात दिला होता. >>> Rofl

झक्की, तुम्ही पण एखादी stand-up, sit-down comedy सुरू करा!

रजनीकांत पण कंडक्टर होता.

वैद्य, सांस्कृतिक कार्यक्रमांची फायनल यादी येऊ द्यात.

हीच ती मटार उसळ/शिकरण मानसिकता! कंडक्टर म्हटल्यावर ऑर्केस्ट्राचा कंडक्टर आठवत नाही कोणाला. चिमटे वाजवत चिल्लर मोजत बसलेत. Proud

'बदले दुनिया साडी, तुम ना बदलना' >>
का हो झक्की, एवढी कुठची साडी तुम्हाला आवडली? अंघोळीनंतर कपडे नको का बदलायला? Happy

सांसकृतिक कार्यक्रमा बद्दल मी ममद्या मटनसम्राट ह्यांच्या सारखी भुमिका घ्यायची ठरवली आहे.
सांसकृतिक कार्यक्रम:
जमतील तसे
कार्यक्रम सादरकर्ते:
ज्यांच्यात ७०-७५ लोकांसमोर उभं राहुन परफॉर्म करता येतं असे सगळे

आर्च, ज्यांना उद्देशुन हे गाणं झक्की म्हणत असतील त्यांनी हा प्रश्न तरी विचारला असेल का? प्रश्न कशाला? त्याना हे ऐकु आलय हे तरी त्या दाखवत असतील का?

झक्की, तुम्ही पण एखादी stand-up, sit-down comedy सुरू करा! <<<

त्यांना बसल्या-बसल्या विनोद आणि ऐकणार्‍यांना लोळता लोळता ? Lol

त्या हॉटेलात नळ वगैरे नाहीयेत ना? त्या नानबा म्हणे नळावरची भांडणे उकरून काढतात! हो संमेलन संपेस्तवर तरी उगाच आपल्या आपल्यात भांडणे नकोत. हे स्नेहसंमेलन आहे! फार तर कल्लोळ म्हणा, घोळ म्हणा, गदारोळ म्हणा, पण 'भांडण का अंतिम महायुद्ध' नका करू इथे!
Happy Light 1

मायक्रोफोन, स्पिकर वगैरेची तयारी झाली आहे ना?. एन जे हुन उ.उ.वि. येतोय. इतक्या लोकाना ऐकायचा असेल तर मा. स्पि. लागणारच. Happy

मला या इतक्या लोकांच्यातले अर्धे लोक तरी निश्चितच माहित नाहीत. म्हणून चिकट पट्टीवर नावे लिहीण्याच्या माझ्या कल्पनेचा जरूर विचार करा. शिवाय मायबोलीवरील नाव लिहा, खरे नाव मागून वाटले तर विचारून घेता येईल. फेसबूकवर बर्‍याच लोकांनी मला मित्र बनवले आहे, पण त्यांचे मायबोली नाव माहित नसल्याने माझी फार पंचाईत होते.

<झक्की, तुम्ही पण एखादी stand-up, sit-down comedy सुरू करा! >

त्याचाहि एक किस्सा आहे.
बाकी असा कुठला विषय आहे की ज्याबद्दल माझ्या दीर्घ आयुष्यात काही किस्सा नाही!

तर माझ्या पुतण्याचे लग्न होते शिट्टीमधे यात क्लबमधे. पुतण्याची बायको अमेरिकन. लोक जमले पण नवरदेवाच्या वडिलांचा (म्हणजे माझ्या भावाचा) पत्ता नाही!
लोक चुळबुळ करू लागले. मला कुणि म्हणाले, तू जरा वेळ लोकांना आपल्या लग्नातल्या विधींबद्दल काही सांग. मग काय 'माकडाच्या हातात कोलीत!' पुढची ४५ मिनिटे लोकांना हसवून हसवून बेजार केले. माझा भाऊ आला तरी त्याच्याकडे कुणाचे लक्षच नाही! लोक एव्हढे खूष, की पुढे त्या पुतण्याच्या दुसया मुलाच्या वाढदिवसाला पुतण्याचे सासरचे लोक भेटले तेंव्हाहि ते म्हणाले तुम्ही धमाल केलीत, तुम्ही प्रोफेशनल आहात का? असायला पाहिजेत!!

झक्की आत्ताच तुमच्या पुतणीबरोबर - अनुबरोबर - बोलले. तिनं आवर्जून तुम्हाला पुण्यातल्या नोकरीचे किस्से सांगण्याची विनंती कर असे सांगितले आहे. Happy

नेमटॅगची आयडीया मी परवा पार्ल्यात मांडलेली. तेव्हा 'ओळखा पाहू' हवच म्हणुन ती बाद करण्यात आली.

Pages