डीसी जीटीजी १०,११ एप्रिल २०१० (वसंता आला!!)
ऐन वसंतात एका वेळी...
कार्यक्रमाची रुपरेषा साधारण अशी-
१. शनिवारी सकाळी ११ वाजेपर्यंत सगळे आमच्या घरी या. दुपारचे जेवण, गप्पा करुन मग डीसीमध्ये जाता येईल.
२. डीसीत भटकून झाल्यावर रात्रीची खादाडी restaurant मध्ये बुकिन्ग करुन करता येईल, तिथेही गप्पा मारता येतील. वेगळ्या हॉलची गरज नाही.
३. शनिवारी मुक्काम करणार्यांना हॉटेलमध्ये रहायचे असेल त्यांना मध्यवर्ती ठिकाण सुचवता येईल. ज्यायोगे त्यांना दुसर्या दिवशीही डीसीत जाता येईल. तसे कळवा.
४. ज्यांना शनिवारीच परत जायचे आहे त्यांना जाता येईल.
५. ज्यांना रविवारी सकाळी परत जायचे तर जाता येईल, किंवा ज्यांना पुन्हा डीसीला भेट द्यायची आहे त्यांना स्वतंत्रपणे डीसीत जाता येईल.
विनयचा वृत्तांत :
http://www.maayboli.com/node/15357
वसंता आणि त्याची सेना (स्वाती आंबोळे)
http://www.maayboli.com/node/15344
आवाज कुणाचा? (अटलांटाकरांचा!): (नानबा)
http://www.maayboli.com/node/15359
डिसी स्नेहसंमेलन - शिट्टीच्या चष्म्यातून (अमृता)
http://www.maayboli.com/node/15360
लाफींग बेडुक आणि ब्रँडी (विनायक)
http://www.maayboli.com/node/15363
डीसीत वसंत बहरला (स्वाती_दांडेकर)
http://maayboli.com/node/15365
वाढीव नंबराचा चष्मा (सिंडरेला)
http://www.maayboli.com/node/15406
डीसी महागटग वृत्तांत - नवीन अचूक किनार्यावरून (सशल)
http://www.maayboli.com/node/15435
कल्लोळातील उरलेसुरले (दीपांजली, लालू)
http://www.maayboli.com/node/15405
आणि..
डीसी गटग : धॄतराष्ट्राच्या पट्टीमागून (संतोष किल्लेदार)
http://www.maayboli.com/node/15665
लालू, फोटु लै मस्त!! फारेंडा,
लालू, फोटु लै मस्त!!
फारेंडा, खोड आणि फुलवाला फोटु जपून ठेव. लालूकडून प्रताधिकार उसने घे.
मस्त फोटो.
मस्त फोटो.
बा रा ची गाडी: (झक्की, भाई,
बा रा ची गाडी: (झक्की, भाई, विनय, वैद्यबुवा, स्वाती, सायो, मैत्रेयी, आणि २ किंवा तीन अतिथी )...
आता गाडीचे बुकिंग टाकतोय. अजून ३ ते ४ शीटी आहेत...
२,३ अतिथी?अजून ३ ते ४ शीटी
२,३ अतिथी?अजून ३ ते ४ शीटी आहेत>>>????
पुढच्या शनीवारी ह्या वेळेला
पुढच्या शनीवारी ह्या वेळेला जिटीजी चालु असेल....रस्त्याच्या कडेने जिटीजी च्या कार्यक्रमाची ढोबळ मानाने रुपरेषा काय आहे???
मोठी गाडी आरक्षित केलीय...
मोठी गाडी आरक्षित केलीय... तेव्हा आता पंधरा शीटी आहेत.. कुणाला यायचं असेल तर सांगा लगेच.
मी GPS आणेन. पण सायो तुझा पण बॅकअप म्हणून आण.
येणार्यांनी सकाळीच गाडीत खाण्यासाठी काय काय आणा(च)....
रूपरेषा: गप्पा, गोष्टी.. न आलेल्यांवर विशेष चर्चा (म्हणजे त्यांची आठवण काढणे)... गाणी, खेळ, ऊऊवि, झक्कींचे वाट्टेल त्या विषयावर प्रवचन... इत्यादी इत्यादी...
विनय
ओके, माझा जीपीएस आणते.
ओके, माझा जीपीएस आणते.
लालू... वरच्या लिस्टात तीन
लालू... वरच्या लिस्टात तीन मोठे बाराकर (ROM) टाक...
<झक्कींचे वाट्टेल त्या
<झक्कींचे वाट्टेल त्या विषयावर प्रवचन... >
कुणाला वाट्तेल त्या विषयावर? नि फक्त गाडीत की डीसीत? शिवाय किती वेळ?
लालू, फोटो झक्कास आहेत.
लालू, फोटो झक्कास आहेत.
फारएन्ड, सेव्ह केले का? (मला चेरीच्या बागेत ओबामाज् सोबत फोटो काढून हवा आहे. त्यांच्यातल्या त्यांच्यात कोणीही कोणाच्याही मांडीवर बसायला वा टपल्या मारायला माझी हरकत नाही.)
नि फक्त गाडीत की डीसीत? शिवाय
नि फक्त गाडीत की डीसीत? शिवाय किती वेळ?
>>त्याची तुम्हाला काय चिंता ?चिंता बाकीचेच लोक करतील. सुरु केले की थांबायचे नाहि. बाकीचे लोक त्यांचे काम करतील. तुम्ही तुमचे चालू द्या. बाकीचे लोक लक्ष देतील, न देतील. पण कर्म करते रहो. या वयात आता फल की अपेक्षा मत करो.
डीसी जीटीजी २०१० ला हार्दीक
डीसी जीटीजी २०१० ला हार्दीक शुभेच्छा! उपस्थित रहाणार्या मायबोलीकरांचा हेवा वाटतोय... मंगळवार पर्यंत हाकेच्या अंतरावर असुन सुद्धा बुधवारी घरी परतावं लागतंय; दुसर्या मेगा इव्हेंट साठी...
सगळ्यांना ह्याप्पी महागटग!
सगळ्यांना ह्याप्पी महागटग! मज्जा करा.
लालू तुस्सी ग्रेट हो!
एवढ्या मोठ्या प्रमाणात आयोजन करणे म्हणजे खायचे काम नाही. (ते काम बाकी मंडळी करतील :-))
आणि हो, वृत्तांत लिहालच.
आणि हो, वृत्तांत लिहालच.
वृतांत तर प्रत्येक गटाचे
वृतांत तर प्रत्येक गटाचे निराळे असतील. शिट्टी, बारा, अटलांटा टप्याटप्याने गटग शुक्रवारपासुनच चालू.
धन्यवाद राज, प्राची. मी फक्त
धन्यवाद राज, प्राची.
मी फक्त आयोजन केले, ते आपोआप 'मोठ्या प्रमाणावर' झाले. (मी रिक्षा फिरवली होती)
डीसी जीटीजी ला खूप
डीसी जीटीजी ला खूप शुभेच्छा.
लालू, खरच कमाल आहे तुझी
आणि
<<मी फक्त आयोजन केले, ते आपोआप 'मोठ्या प्रमाणावर' झाले. (मी रिक्षा फिरवली होती)>>
रिक्षा काय, त्यात कितीशी बसणार, तू तर ट्रेन फिरवलीस
रिक्षा काय, त्यात कितीशी
रिक्षा काय, त्यात कितीशी बसणार >>>> भाग्य तू हे लालूला म्हटलेस. सगळी लालू मावते बरका एका रिक्षात
काऊंटडाऊन : 2 days , 59
काऊंटडाऊन :
2 days , 59 hours , 3583 minutes , 214943 seconds
लाल्या फोटु मस्त. आणि तुमी
लाल्या फोटु मस्त. आणि तुमी सगळे मस्त येंण्जॉय करा
लालूला आणि महागटगला शुभेच्छा
लालूला आणि महागटगला शुभेच्छा
प्रत्येक कंपूने वृत्तांत लिहा. वर्णनं, डायलॉग्ज, नवीन कॉईन केलेल्या टर्म्स, गॉसिप, योग्य वाटतील ते फोटो, सगळं येऊदे. रिक्षा जोमाने फिरलीये, तिला न्याय द्या
जमलं तर चेरी ब्लॉसमही बघा जे लोक नंतर डीसी दर्शन करणार आहेत, त्यांनी तोही वृत्तांत लिहलात, तर इकडे कमालीच्या उकाड्यात आम्हाला बरं वाटेल तेवढंच.
एन्जॉय माडी!
वसंतालाला शुभेच्छा!! पूनम
वसंतालाला शुभेच्छा!!
पूनम म्हणतेय त्याप्रमाणे प्रत्येक कंपूचा वृत्तांत येऊ दे. आणि फोटो मेला
तुमच्या महागटगला आमच्याकडून
तुमच्या महागटगला आमच्याकडून शुभेच्छा. संयोजक आणि सामील होणार्यांचंही अभिनंदन.
गटग झाल्यावर तेवढं खुसखुशीत वृत्तांत लवकर टाकायचं बघा. सगळ्या गटांचे वेगवेगळे वृत्तांत येणार असतील तर छानच, आमचा एक आठवडा वाचनात चांगला जाईल.
नमस्कार. वृत्तांतात,
नमस्कार.
वृत्तांतात, स्नेहसंमेलनाच्या सूचनेपासून प्रत्यक्ष संमेलन सुरू होण्यापैकी काही ठळक गोष्टींचा देखील उल्लेख करा. मुख्यतः ज्यांना अमेरिकन भूगोलाची फारशी माहिती नाही,** त्यांच्यासाठी, ठिकठिकाणाहून येणार्या लोकांच्या अडचणी, व त्यावर त्यांनी कशी मात केली हेहि लिहा.
** हे लोक बहुतकरून अमेरिकतच रहातात.
भारतातल्या लोकांना मात्र अमेरिकेची संपूर्ण अद्ययावत माहिती असते. पुणे ते सातारा याखेरीज इतरत्र कुठेहि प्रवास न केलेल्या एका महात्म्याने मला कॅलिफोर्नियातील लोकांची मनोवृत्ति, न्यू जर्सीतून जे एफ के विमानतळावर जायला किती वेळ लागतो, हे सर्व सांगितले होते.
त्याच्या मते जास्तीत जास्त २० मिनिटे लागावीत. मग मला का बरे दीड तास लागतो?
न्यू जर्सी म्हणजे फक्त होबोकेन, व जे एफ के च्या मार्गावर इतर कुणीहि नसल्याने (अगदी पोलीस सुद्धा,) मी ८० मैल वेगाने जाऊ शकतो, असा त्याचा समज होता हे मला लक्षात आले, पण का उगाच बिचार्याचा फुगा फोडावा?
भारतातील लोक - सत्य लिहीले तरी तुम्हाला प्रिय नसल्याने तुमची क्षमा मागतो.
ज्याप्रमाणे आजोबा आपल्या चार वर्षाच्या नातवाच्या 'अफाट' ज्ञानाचे केवळ सप्रेम कौतुकच करतात तसे मला वाटते!
लालु एवढं महा जीटीजीचं आयोजन
लालु एवढं महा जीटीजीचं आयोजन करणं म्हणजे खरचं तुस्सी ग्रेट हो . तुमच्या महाजीटीजीला माझ्यातर्फे हार्दीक शुभेच्छा .
पहिल्यांदा ह्याला जीटीजी
पहिल्यांदा ह्याला जीटीजी म्हणायच्या ऐवजी वसंतविहार म्हणा...
पुणे-मुंबईचा ववि तसा तिकडचा ही वविच.... फक्त भरपूर पावसाच्या ऐवजी भरपूर नविन पालवी फुटलेली झाडं सोबतीला असतील इतकाच काय तो फरक....
सगळ्यांना ह्या वसंतविहारासाठी शुभेच्छा..
जास्तीत जास्त वृत्तांत लिहाच.. बाकीचे लिहितीलच पण झक्कीकाकांचा स्पेशल वृत्तांत यावा म्हणून सगळ्यांनी त्यांना खूप आग्रह करा...
गटग लालू आयोजित करतेय,
गटग लालू आयोजित करतेय, त्यासाठी वसंतसेना जमणार आहे हे माहितीये पण वसंतलाला कोण आहे ? (गटग जवळ आले की मला जास्तच फाको सुचतात :फिदी:)
सिंडे, आपने हमारी अपेक्षा
सिंडे, आपने हमारी अपेक्षा पुरी कर दी
महागटगसाठी खूप खूप शुभेच्छा
महागटगसाठी खूप खूप शुभेच्छा !
यायची खूप इच्छा होती पण ह्या वेळी नाही जमले. महागटगला शोभतील असे महावॄत्तांत मात्र नक्की लिहा
मला असे वाटते की बरेच लोक
मला असे वाटते की बरेच लोक येणार आहेत, सगळेच सगळ्यांना ओळखत असतील असे नाही. तर नावाच्या पट्ट्या लावाव्यात का प्रत्येकानी आपल्या छातीवर? मात्र त्यावर मायबोली वरील नाव लिहावे.
वाटल्यास मी बसेन दरवाजापाशी पेन नि चिकट पट्ट्या घेऊन. नि एकेकाला चिकट पट्टी देईन.
Pages