डीसी जीटीजी १०,११ एप्रिल २०१० (वसंता आला!!)

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

ऐन वसंतात एका वेळी...

कार्यक्रमाची रुपरेषा साधारण अशी-

१. शनिवारी सकाळी ११ वाजेपर्यंत सगळे आमच्या घरी या. दुपारचे जेवण, गप्पा करुन मग डीसीमध्ये जाता येईल.
२. डीसीत भटकून झाल्यावर रात्रीची खादाडी restaurant मध्ये बुकिन्ग करुन करता येईल, तिथेही गप्पा मारता येतील. वेगळ्या हॉलची गरज नाही.
३. शनिवारी मुक्काम करणार्‍यांना हॉटेलमध्ये रहायचे असेल त्यांना मध्यवर्ती ठिकाण सुचवता येईल. ज्यायोगे त्यांना दुसर्‍या दिवशीही डीसीत जाता येईल. तसे कळवा.
४. ज्यांना शनिवारीच परत जायचे आहे त्यांना जाता येईल.
५. ज्यांना रविवारी सकाळी परत जायचे तर जाता येईल, किंवा ज्यांना पुन्हा डीसीला भेट द्यायची आहे त्यांना स्वतंत्रपणे डीसीत जाता येईल.

विनयचा वृत्तांत :
http://www.maayboli.com/node/15357

वसंता आणि त्याची सेना (स्वाती आंबोळे)
http://www.maayboli.com/node/15344

आवाज कुणाचा? (अटलांटाकरांचा!): (नानबा)
http://www.maayboli.com/node/15359

डिसी स्नेहसंमेलन - शिट्टीच्या चष्म्यातून (अमृता)
http://www.maayboli.com/node/15360

लाफींग बेडुक आणि ब्रँडी (विनायक)
http://www.maayboli.com/node/15363

डीसीत वसंत बहरला (स्वाती_दांडेकर)
http://maayboli.com/node/15365

वाढीव नंबराचा चष्मा (सिंडरेला)
http://www.maayboli.com/node/15406

डीसी महागटग वृत्तांत - नवीन अचूक किनार्‍यावरून (सशल)
http://www.maayboli.com/node/15435

कल्लोळातील उरलेसुरले (दीपांजली, लालू)
http://www.maayboli.com/node/15405

आणि..
डीसी गटग : धॄतराष्ट्राच्या पट्टीमागून (संतोष किल्लेदार)
http://www.maayboli.com/node/15665

विषय: 
प्रकार: 

बा रा ची गाडी: (झक्की, भाई, विनय, वैद्यबुवा, स्वाती, सायो, मैत्रेयी, आणि २ किंवा तीन अतिथी )...
आता गाडीचे बुकिंग टाकतोय. अजून ३ ते ४ शीटी आहेत... Happy

पुढच्या शनीवारी ह्या वेळेला जिटीजी चालु असेल....रस्त्याच्या कडेने जिटीजी च्या कार्यक्रमाची ढोबळ मानाने रुपरेषा काय आहे???

मोठी गाडी आरक्षित केलीय... तेव्हा आता पंधरा शीटी आहेत.. कुणाला यायचं असेल तर सांगा लगेच.
मी GPS आणेन. पण सायो तुझा पण बॅकअप म्हणून आण.
येणार्‍यांनी सकाळीच गाडीत खाण्यासाठी काय काय आणा(च)....

रूपरेषा: गप्पा, गोष्टी.. न आलेल्यांवर विशेष चर्चा (म्हणजे त्यांची आठवण काढणे)... गाणी, खेळ, ऊऊवि, झक्कींचे वाट्टेल त्या विषयावर प्रवचन... इत्यादी इत्यादी...

विनय Happy

<झक्कींचे वाट्टेल त्या विषयावर प्रवचन... >

कुणाला वाट्तेल त्या विषयावर? नि फक्त गाडीत की डीसीत? शिवाय किती वेळ?

लालू, फोटो झक्कास आहेत. Happy

फारएन्ड, सेव्ह केले का? (मला चेरीच्या बागेत ओबामाज् सोबत फोटो काढून हवा आहे. त्यांच्यातल्या त्यांच्यात कोणीही कोणाच्याही मांडीवर बसायला वा टपल्या मारायला माझी हरकत नाही.) Proud

नि फक्त गाडीत की डीसीत? शिवाय किती वेळ?

>>त्याची तुम्हाला काय चिंता ?चिंता बाकीचेच लोक करतील. सुरु केले की थांबायचे नाहि. बाकीचे लोक त्यांचे काम करतील. तुम्ही तुमचे चालू द्या. बाकीचे लोक लक्ष देतील, न देतील. पण कर्म करते रहो. या वयात आता फल की अपेक्षा मत करो.

डीसी जीटीजी २०१० ला हार्दीक शुभेच्छा! उपस्थित रहाणार्‍या मायबोलीकरांचा हेवा वाटतोय... मंगळवार पर्यंत हाकेच्या अंतरावर असुन सुद्धा बुधवारी घरी परतावं लागतंय; दुसर्‍या मेगा इव्हेंट साठी... Happy

सगळ्यांना ह्याप्पी महागटग! Happy मज्जा करा.
लालू तुस्सी ग्रेट हो!
एवढ्या मोठ्या प्रमाणात आयोजन करणे म्हणजे खायचे काम नाही. (ते काम बाकी मंडळी करतील :-))

वृतांत तर प्रत्येक गटाचे निराळे असतील. शिट्टी, बारा, अटलांटा टप्याटप्याने गटग शुक्रवारपासुनच चालू. Happy

डीसी जीटीजी ला खूप शुभेच्छा.
लालू, खरच कमाल आहे तुझी Happy
आणि
<<मी फक्त आयोजन केले, ते आपोआप 'मोठ्या प्रमाणावर' झाले. (मी रिक्षा फिरवली होती)>>
रिक्षा काय, त्यात कितीशी बसणार, तू तर ट्रेन फिरवलीस Proud

रिक्षा काय, त्यात कितीशी बसणार >>>> भाग्य तू हे लालूला म्हटलेस. सगळी लालू मावते बरका एका रिक्षात Proud

लालूला आणि महागटगला शुभेच्छा Happy

प्रत्येक कंपूने वृत्तांत लिहा. वर्णनं, डायलॉग्ज, नवीन कॉईन केलेल्या टर्म्स, गॉसिप, योग्य वाटतील ते फोटो, सगळं येऊदे. रिक्षा जोमाने फिरलीये, तिला न्याय द्या Proud

जमलं तर चेरी ब्लॉसमही बघा Happy जे लोक नंतर डीसी दर्शन करणार आहेत, त्यांनी तोही वृत्तांत लिहलात, तर इकडे कमालीच्या उकाड्यात आम्हाला बरं वाटेल तेवढंच.

एन्जॉय माडी!

वसंतालाला शुभेच्छा!!

पूनम म्हणतेय त्याप्रमाणे प्रत्येक कंपूचा वृत्तांत येऊ दे. आणि फोटो मेला Wink

तुमच्या महागटगला आमच्याकडून शुभेच्छा. संयोजक आणि सामील होणार्‍यांचंही अभिनंदन.

गटग झाल्यावर तेवढं खुसखुशीत वृत्तांत लवकर टाकायचं बघा. सगळ्या गटांचे वेगवेगळे वृत्तांत येणार असतील तर छानच, आमचा एक आठवडा वाचनात चांगला जाईल.

नमस्कार.
वृत्तांतात, स्नेहसंमेलनाच्या सूचनेपासून प्रत्यक्ष संमेलन सुरू होण्यापैकी काही ठळक गोष्टींचा देखील उल्लेख करा. मुख्यतः ज्यांना अमेरिकन भूगोलाची फारशी माहिती नाही,** त्यांच्यासाठी, ठिकठिकाणाहून येणार्‍या लोकांच्या अडचणी, व त्यावर त्यांनी कशी मात केली हेहि लिहा.

** हे लोक बहुतकरून अमेरिकतच रहातात.

भारतातल्या लोकांना मात्र अमेरिकेची संपूर्ण अद्ययावत माहिती असते. पुणे ते सातारा याखेरीज इतरत्र कुठेहि प्रवास न केलेल्या एका महात्म्याने मला कॅलिफोर्नियातील लोकांची मनोवृत्ति, न्यू जर्सीतून जे एफ के विमानतळावर जायला किती वेळ लागतो, हे सर्व सांगितले होते.

त्याच्या मते जास्तीत जास्त २० मिनिटे लागावीत. मग मला का बरे दीड तास लागतो?

न्यू जर्सी म्हणजे फक्त होबोकेन, व जे एफ के च्या मार्गावर इतर कुणीहि नसल्याने (अगदी पोलीस सुद्धा,) मी ८० मैल वेगाने जाऊ शकतो, असा त्याचा समज होता हे मला लक्षात आले, पण का उगाच बिचार्‍याचा फुगा फोडावा?
Happy भारतातील लोक - सत्य लिहीले तरी तुम्हाला प्रिय नसल्याने तुमची क्षमा मागतो.
ज्याप्रमाणे आजोबा आपल्या चार वर्षाच्या नातवाच्या 'अफाट' ज्ञानाचे केवळ सप्रेम कौतुकच करतात तसे मला वाटते!

लालु एवढं महा जीटीजीचं आयोजन करणं म्हणजे खरचं तुस्सी ग्रेट हो . तुमच्या महाजीटीजीला माझ्यातर्फे हार्दीक शुभेच्छा . Smiley

पहिल्यांदा ह्याला जीटीजी म्हणायच्या ऐवजी वसंतविहार म्हणा...

पुणे-मुंबईचा ववि तसा तिकडचा ही वविच.... फक्त भरपूर पावसाच्या ऐवजी भरपूर नविन पालवी फुटलेली झाडं सोबतीला असतील इतकाच काय तो फरक....

सगळ्यांना ह्या वसंतविहारासाठी शुभेच्छा..

जास्तीत जास्त वृत्तांत लिहाच.. बाकीचे लिहितीलच पण झक्कीकाकांचा स्पेशल वृत्तांत यावा म्हणून सगळ्यांनी त्यांना खूप आग्रह करा...

गटग लालू आयोजित करतेय, त्यासाठी वसंतसेना जमणार आहे हे माहितीये पण वसंतलाला कोण आहे ? (गटग जवळ आले की मला जास्तच फाको सुचतात :फिदी:)

महागटगसाठी खूप खूप शुभेच्छा !
यायची खूप इच्छा होती पण ह्या वेळी नाही जमले. महागटगला शोभतील असे महावॄत्तांत मात्र नक्की लिहा Happy

मला असे वाटते की बरेच लोक येणार आहेत, सगळेच सगळ्यांना ओळखत असतील असे नाही. तर नावाच्या पट्ट्या लावाव्यात का प्रत्येकानी आपल्या छातीवर? मात्र त्यावर मायबोली वरील नाव लिहावे.

वाटल्यास मी बसेन दरवाजापाशी पेन नि चिकट पट्ट्या घेऊन. नि एकेकाला चिकट पट्टी देईन.

Pages