युक्ती सुचवा/ युक्ती सांगा

Submitted by पूनम on 12 March, 2009 - 05:13

१) एखादा पदार्थ हमखास जमावा, यासाठी तुम्ही काही युक्त्या (टिप्स) वापरत असाल, तर सगळ्यांना सांगा.
निव्वळ पाककलेतच नाही, पण स्वयंपाकघरात वेळ वाचावा म्हणून, भांडी/उपकरणं स्वच्छ रहावी म्हणून इत्यादीसाठी काही खास टिप्स असतील तर त्याही सांगा.

२) कोणत्या बाबतीत अडला असाल आणि एखादी टिप हवी असेल, तर इथे विचारा. (पदार्थ करताना जमला नाही, तर तो 'माझं काय चुकलं' मध्ये विचारा. इथे त्या व्यतिरिक्त काही असल्यास विचारा)

३) पदार्थांची वेगवेगळ्या भाषेतली नावे, एकाच पदार्थाची एकाच भाषेतली पण वेगवेगळ्या देशातली नावे , कधी त्यात असलेला लहानमोठा फरक या संबंधी माहिती इथे विचारण्याआधी ह्या धाग्यावर पहा- http://www.maayboli.com/node/25383

४) मऊसूत गोल पोळ्या करायच्या आहेत? त्या कशा करायच्या? कोणत्या तव्यावर करायच्या? सुगरणींच्या युक्त्या इथे पहा- http://www.maayboli.com/node/25385

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तो मेन्यू विचारायचा धागा कुठला, हाच का?

मला विकेंडला ७-८ जणांसाठी पावभाजी करायची आहे. भाज्या किती लागतील ?

जेवणाऐवजी पावभाजी असेल तर, पाऊण ते एक किलो बटाटे, अर्धा किलो टॉमेटो, साधारण २ वाट्या मटार, अर्धा किलो कांदा, अर्धा किलो भोपळी मिरची, अर्धा किलो फ्लॉवर, पाव किलो फरसबी लागेल.

वरुन घालायला पाव किलो कांदा, १ जुडी कोथिंबीर आणि २-३ लिंबं.

पुरली नाही तर सगळे खादाड आहेत आणि उरली तर सगळे डाएटवर आहेत समज Wink

दोन बटाटे एक्स्ट्रा शिजवून ठेव. मीठ बीठ जास्त झालं तर ढकलून दे भाजीत. नाही लागले तर उद्या पराठा.

आम्हा खादाडांसाठी अश्विनीने आणली होती पावभाजी.. अगदी यम्मी यम्मी!! Happy

अगं बस्केला एवढ्या भाज्यांसाठी आल्या- लसणीचं पण प्रमाण सांग. पेस्ट घालावी लागेल ना भाजीत.

मंजे, पण त्या दिवशी काश्मिरी मिरचीचं तिखट आणायला विसरले होते गं त्यामुळे लाल नाही झाली भाजी.

बस्के (हे उभटच्या विरुद्ध वाटतं Light 1 ) ८-१० लसूण पाकळ्या आणि साधारण २ इंच आलं वाटून घाल.

बेडेकरांचा (टण्या नव्हे ;-)) पावभाजी मसाला घातला तर मस्त लाल रंग येतो भाजीला आणि चवही छान येते. मी हल्ली तोच पावभाजी मसाला वापरते.

ह्म्म्म. ट्राय केला नाहिये. एव्हरेस्टचा असतो माझ्याकडे. या वेळी बेडेकरांचा (टण्या नव्हे) आणेन. पण थोडं काश्मिरी तिखट संग्रही ठेवलं पाहिजे असं वाटतंय मला. आपलं गटग झाल्यावर आम्ही ३५ जणी पळसधरीला गेलो होतो तेव्हा तिथल्या एका घरी ६० जणांसाठी पावभाजी केली होती सामुहिकरित्या. तेव्हा एकीने पुरचुंडीत काश्मिरी तिखट आणलं होतं. दोन चमचे घातल्यावर अस्सा काही रंग आला की बस !!!

बस्कू, पावभाजीची भाजी उरली, तर काय करायचे ह्याची टिप मी आधीच दिलेली आहे, तिचा लाभ घे Wink

केश्वि, साधारण तीन किलो भाज्यांना (सगळ्या मिळून) ८-१०च लसूण पाकळ्या? कमी वाटताहेत मला. लसूण वाटली, तर चांगली मलई पेढ्याएवढी तरी लागेल, असं मला वाटतंय. अर्थात खाणार्‍यांच्या आवडीवरही आहे. मी अनेकदा आलं लसूण घालतही नाही भाजीत, नुसता मसाला आणि भाज्या. तशीही मस्त लागते.

पूनम, मी सुद्धा कितीतरी वेळा आलं लसूण घालत नाही. मसाला असतोच व्यवस्थित घातलेला पण लसूणही भरपूर घातला तर एकदम भपकारा येईल भाजीला म्हणून मी घातलीच तर बेतानंच घालते. ८-१० लसूण पाकळ्या वाटून मध्यम मलई पेढ्याएवढी होईलच की ! Wink

ए नाssही, आल्या लसणीच्या पेस्टशिवाय पावभाजीला चव नाही Wink

जाऊ दे, बस्केला ठरवू देत.

बस्के गेली सुद्धा भाज्या आणायला मार्केटात. आपण बसलोय वर्चुअल पावभाजी बनवत. मंजे तुझं ते "ए नाssही" हे समोरच म्हटल्यासारखं वाटलं, ऐकूही आलं मला Happy

हेहे.. नाही अजुन नाही गेले.. आता झोपणार. उद्या जाणारे.. तशी भरपूर खूप वेळा केलिय. पण इतकी जास्त जरा अंदाजपंचे करण्यापेक्षा हे बरं ना? माझ्याकडे एव्हरेस्ट व बादशाहचे मसाले आहेत. बहुतेक बेडेकर नाही. Sad

हे काश्मिरी तिखट कुठेही मिळत का?? आणि हो आललसुण हवाच. त्याशिवाय पावभाजीला मजा नाही. Happy
दुकानातल्यासारखा पावभाजीचा रंग माझा बै कधीच आला नाहिये. ते रंग घालतात अस ऐकलय मागे.

दुकानातल्यासारखा पावभाजीचा रंग माझा बै कधीच आला नाहिये.
ते रंग घालतात अस ऐकलय मागे.>>>> हे ऐकवुन माझीही रंग न आलेली पावभाजी खपवलीये मी अनेकदा Happy

मिसळ पण करते ना, कध्धी कध्धी रंग आणि तवंग येत नाही.:(

ज्ञाती , तवंग येण्यासाठी छोट्या कढईत तेल गरम कर आणि मग त्यात थोड तिखट घाल मग ती फोडणी मिसळीवर ओत. मस्त तवंग येइल. Happy

मस्त तवंग येइल>>> Happy आत्ता घालते मटकी भिजायला.
माझी बहिण बीट रुटचा एखादा तुकडा घालते पावभाजीत रंगासाठी.>> चांगली आहे आयडिया.
रच्याकने, स्टुडंट अस्ताना, आम्ही केसाचे तेल करुन विकायचो. जास्वंदीच्या तेलाला रंग येण्यासाठी मन्जिष्ठाच्या चार काड्या टाकायचो, मस्त रंग यायचा तेलाला. घेणारे खुश Happy

पेपरीका घातलं की पण छान लाल रंग येतो मिसळ/पावभाजी ला. पण जास्त झालं तर एक उग्रपणा पण येतो.

छ्या, हे वाचुन तोंडाला पाणी सुटलय... या विकांताला करायलाच लागणार पावभाजी... त्याशिवाय पोटात्मा शांत व्ह्यायचा नाही Proud

Pages