१) एखादा पदार्थ हमखास जमावा, यासाठी तुम्ही काही युक्त्या (टिप्स) वापरत असाल, तर सगळ्यांना सांगा.
निव्वळ पाककलेतच नाही, पण स्वयंपाकघरात वेळ वाचावा म्हणून, भांडी/उपकरणं स्वच्छ रहावी म्हणून इत्यादीसाठी काही खास टिप्स असतील तर त्याही सांगा.
२) कोणत्या बाबतीत अडला असाल आणि एखादी टिप हवी असेल, तर इथे विचारा. (पदार्थ करताना जमला नाही, तर तो 'माझं काय चुकलं' मध्ये विचारा. इथे त्या व्यतिरिक्त काही असल्यास विचारा)
३) पदार्थांची वेगवेगळ्या भाषेतली नावे, एकाच पदार्थाची एकाच भाषेतली पण वेगवेगळ्या देशातली नावे , कधी त्यात असलेला लहानमोठा फरक या संबंधी माहिती इथे विचारण्याआधी ह्या धाग्यावर पहा- http://www.maayboli.com/node/25383
४) मऊसूत गोल पोळ्या करायच्या आहेत? त्या कशा करायच्या? कोणत्या तव्यावर करायच्या? सुगरणींच्या युक्त्या इथे पहा- http://www.maayboli.com/node/25385
अख्खी लवंग खराब होऊ शकते का?
अख्खी लवंग खराब होऊ शकते का? माझ्याकडे नोव्ह. २००८ मध्ये पॅक केलेल पाव किलोच पाकीट आहे (बर्याच दिवसांनी खुप अडगळ काढ्ली त्यात मिळाल) थोड वापरल आहे (उघडलेल आहे), ६ महीन्यानंतरची एक्सपायरी डेट होती. पाकीटाच्या तळाला थोडी पावडर दिसत आहे, पण कीड वगैरे नाही, वास तर एकदम आहे तसाच आहे खमंग, काय करु? टाकुन देऊ का? की जरा गरम करुन पावडर करुन ठेऊ? की तशीच काढुन डब्यात भरुन ठेऊ?
तोषवी, स्प्रिंग रोलसाठी तयार
तोषवी, स्प्रिंग रोलसाठी तयार पेष्ट्री वापरली तर नाहि खराब होत, पण एका डब्यात ठेवीन क्लिंग फिल्म ने कव्हर करुन ठेवावी. घरी कव्हर केले असेल तर, फार टिकणार नाही, पण एक दोन दिवस टिकेल (सारणात कमीत कमी तेल / पाणी असावे )
शिल्पा, तशी लवंग खराब होणार नाही. कारण सहसा तिला किड लागत नाही. पण उघडलेली असल्यास वापरु नये. या लवंगा कपड्याच्या कपाटात, पुस्तकांच्या कपाटात ठेवल्यास कसर लागणार नाही (पर्यायी उपाय )
दिनेशदा, तिने ती लवंग थोडी
दिनेशदा, तिने ती लवंग थोडी भाजून वापरली तर?
भाजल्यास चालेल. पण शक्यतो
भाजल्यास चालेल. पण शक्यतो लवकर वापरावी लागेल. भाजताना बेताचीच भाजावी नाहीतर ती कडवट होते. भाजताना ठसका पण लागतो.
आवड असेल तर ती साखरेच्या पक्क्या पाकात पण टाकता येईल. पाक सुकल्यावर, मुखशुद्धी साठी वापरता येईल.
थोडीशी भाजुन पावडर करुन
थोडीशी भाजुन पावडर करुन फ्रीजमध्ये ठेवली तर चालेल काय? एवढी लवंग लवकर कशी संपवणार? टाकुन द्यायलाही जिवावर आलय? खाण्याव्यतिरिक्त आणखी काही उपयोग होऊ शकेल काय दिनेशदांनी सांगितल्याप्रमाणे?
मला वाटतं काहीच हरकत नाही.
मला वाटतं काहीच हरकत नाही. कसले कसले भात केलेस की आठवणीने तुपावर त्यातली टाकत जा.
धन्स दिनेशदा,मी तयाए
धन्स दिनेशदा,मी तयाए स्प्रिन्ग रोल शीट्स /एग्ग रोल शीट्स वापरणार आहे.
<<क्लिंग फिल्म ने कव्हर करुन ठेवावी>>म्हनजे अॅल्युमिनिअम फॉइल ने का?की प्लास्टिक रॅप्/क इतर काही ???
क्लिंग फिल्म - म्हणजे पातळ
क्लिंग फिल्म - म्हणजे पातळ प्लास्टीक रॅप
रूनी धन्स!
रूनी धन्स!
BJ's मधुन द्राक्षाचा मोठा पॅक
BJ's मधुन द्राक्षाचा मोठा पॅक आणला होता २ किलोचा, एकदम आबंट निघाली, नुसती खाता येणे अशक्य आहे. त्याचे काय करता येईल?
रुनी, दिनेशदांनी लिहिलेली
रुनी, दिनेशदांनी लिहिलेली भाजी कर.
किंवा कच्चा पाक कर, त्यात रस मिसळून सरबत कर.
रात्री शिल्लक राहिलेल्या
रात्री शिल्लक राहिलेल्या कणकीच्या चपात्या काळ्या पडतात त्यासाठी काही उपाय?
हसरी, उरलेली कणीक हवाबंद
हसरी, उरलेली कणीक हवाबंद डब्यात ठेवत जा.
कणीक फ्रिजमध्ये ठेवली होती
कणीक फ्रिजमध्ये ठेवली होती का? असल्यास बाहेर काढ्ल्यावर जरा दुधाचा हात लावून परत मळून घेत जा. पोळ्या काळ्या पडणार नाहीत.
शिल्पा, लवंग भाजून त्याची पावडर करून ती सिल्कच्या साड्यांच्या घड्यांमधून पसरून ठेव,साड्यांना कसर लागणार नाही.
कपडे, पुस्तके यांना कसर
कपडे, पुस्तके यांना कसर लागण्यापासून वाचवायचे असल्यास तीनचार सुक्या मिरच्या आणि चमचाभर कलौंजी (कांद्याचे बी ) यांच्या छोट्या छोट्या पोटल्या बनवून कपाटात टाकून ठेवाव्यात.
हसरी, कणिक (दोन वगैरे
हसरी, कणिक (दोन वगैरे दिवसांची) एकदम मळून फ्रिजात ठेवायची असेल तर, जाडसर प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवायची, काळी पडत नाही.. पण २ दिवसाच्या वर नाही. एक प्रॉब्लेम म्हणजे, लाईट गेली तर खराब होण्याची शक्यता असते.
दक्षिणा अनुमोदन. कणीक मळून
दक्षिणा अनुमोदन.
कणीक मळून तेलाचा हात लावून प्लास्टिकच्या पिशवीत गोळा ठेवायचा- पातळ (भाजीवगैरे च्या) पिशव्या. मग तो गोळा ड्ब्यात ठेवायचा. आधी १५ मिनिटे काढून ठेवायचा मग मळून पोळ्या करायच्या.
आइसक्रिममध्ये घालायचे
आइसक्रिममध्ये घालायचे स्टबिलायझर कुठल्या दुकानात मिळेल?
केक डेकोरेट करताना वापरतात ते टर्नटेबल मुंबईत कुठे मिळेल? काय किंमत असेल साधारण???
भिजवलेली कणीक, काळ्या
भिजवलेली कणीक, काळ्या पॉलिथीनमधे ठेवली, तर काळी पडत नाही असा माझा अनुभव आहे. (कारण माहीत नाही.)
साधना, दादरला रानडे रोडवर हे मिळू शकेल. टर्न टेबल म्हणजे वायर रॅक ना ? ते पण तिथे मिळेल.
प्राची, सुक्या मिरच्या वा
प्राची, सुक्या मिरच्या वा कांद्याचे बी एकत्र करुन ठेवायचे का?
हो सुनिधी, दोन्ही एकत्रच एका
हो सुनिधी, दोन्ही एकत्रच एका पोटलीत बांधायचे.
आता मला एक मदत करा... पोळी
आता मला एक मदत करा...
पोळी एकदम मऊसुत होण्यासाठी अगदी कणिक मळण्यापासून ते पोळी भाजेपर्यंत
(लाटण्याची प्रक्रिया धरून) मला जमतील तितक्या टिप्स द्या. गॅस ची आंच कशी असावी? लाटताना लाटणं किती जाडीचं घेऊ? पोळी कितीवेळा पलटू... इ.
माझ्या पोळ्या होतात तशा चांगल्या, पण डबा उघडला ऑफिसमध्ये की थोड्यावेळाने वातडसारख्या होतात. (एसी मुळे असेल का? :अओ:) कृपया मदत करा...
दक्स, पोळी झाल्यावर उभी हातात
दक्स, पोळी झाल्यावर उभी हातात धरून हापटायची (आतली हवी काढून टाकायची) आणि पोळीच्या डब्यात एखादे मऊ (कॉटनचे) फडके पांघरून ठेवावे. त्यावर पोळी कोमट होईतो राहू द्यावी, नंतर घडी करावी. अश्या सर्व पोळ्या झाल्या की दुरडी बांधावी आणि डब्याचे झाकण लावावे. अश्या पोळ्या मऊ राहतात.
तेल, तूप लावत असशील पोळीला तर हवाबंद डब्यात ठेव कोमट झाल्यावर.
पोळी अगदी डाग पडेपर्यंत तव्यावर भाजू नये. थोडी अलीकडेच काढावी. स्टीमने कच्ची राहात नाही.
पोळी लाटताना मध्ये तेल लाऊन
पोळी लाटताना मध्ये तेल लाऊन तिन घड्या करुन मग नुसती काठाने गोल फिरवत लाटलिस तर कडा पातळ होउन मध्ये मऊ होते.. मग भाजताना पोळी फारतर तिनवेळा उलटावी..भाजताही तव्यावर गोल फिरवत भाजली तर सगळीकडे सारखी भाजली जाते.. जळके डाग पडत नाहीत.
मग वर चिन्नु ने सांगितल्या प्रमाणे भाजुन झाल्यावर फुगलेली पोळी हाताने उभी दाबून वाफ काढुन डब्यात ठेवावी.
काही लोकांना उलतण्याने पोळी दाबूब भाजायची सवय असते.. अशि भाजलेली पोळी थंड झाल्यावर वातड होते.
चिन्नु दुरडी बांधावी म्हण्जे
चिन्नु दुरडी बांधावी म्हण्जे काय?
सान्वी, मी पोळी हातानेच भाजते, उलथणं वगैरे नाही वापरित. आणि पोळीला वरून तेल्-तूप काही नाही लावत. पण पोळी मी बहुतेक ३ पेक्षा जास्ती वेळेला उलटते.
लाटलेली पोळी मंद गॅस असताना टाकते, मग लगेच बेस जमला की उलटून गॅस मोठा करते. पोळीला ब्राऊन डाग पडलेले मला आवडतात, पण तोवर पोळी थोडी कडक होते हे लक्षात आल्यावर अलिकडेच पलटते.
दुरड बांधणे म्हणजे गाठ मारणे.
दुरड बांधणे म्हणजे गाठ मारणे. त्या मलमलच्या फडक्यात सगळ्या पोळ्या ठेवल्या की चारही टोकं वर घेऊन त्याची गाठ मारायची.
डब्यात न नेता, फॉईलमधे
डब्यात न नेता, फॉईलमधे न्यायची, एकदम मऊ रहाते. फुलके ट्राय कर. पोळीला डाग येतिल इतपत भाजु नये. कणिक मळल्यावर, तशिच १५ मि झाकुन ठेवायची. मग पाण्याच्या हाताने मळुन, तेलाच्या हाताने मळायची. एकदम मऊ पोळ्या होतात.
अळुवड्या तळल्यावर कोरड्या
अळुवड्या तळल्यावर कोरड्या होऊन तोठरा बसु नये म्हणुन काय करावं? साधारण २ रोल्स असतील तर किती वेळ उकडावेत ?
सारण फार कोरडे होतेय किंवा
सारण फार कोरडे होतेय किंवा जास्त तळल्या जात आहेत. (किंवा फार पातळ कापल्या जातात. )
इथे उन्हाळा चालू झाल्यावर
इथे उन्हाळा चालू झाल्यावर मुंग्यांनी भारी वात आणलाय
जालिम उपाय सुचवा काहीतरी
Pages