युक्ती सुचवा/ युक्ती सांगा

Submitted by पूनम on 12 March, 2009 - 05:13

१) एखादा पदार्थ हमखास जमावा, यासाठी तुम्ही काही युक्त्या (टिप्स) वापरत असाल, तर सगळ्यांना सांगा.
निव्वळ पाककलेतच नाही, पण स्वयंपाकघरात वेळ वाचावा म्हणून, भांडी/उपकरणं स्वच्छ रहावी म्हणून इत्यादीसाठी काही खास टिप्स असतील तर त्याही सांगा.

२) कोणत्या बाबतीत अडला असाल आणि एखादी टिप हवी असेल, तर इथे विचारा. (पदार्थ करताना जमला नाही, तर तो 'माझं काय चुकलं' मध्ये विचारा. इथे त्या व्यतिरिक्त काही असल्यास विचारा)

३) पदार्थांची वेगवेगळ्या भाषेतली नावे, एकाच पदार्थाची एकाच भाषेतली पण वेगवेगळ्या देशातली नावे , कधी त्यात असलेला लहानमोठा फरक या संबंधी माहिती इथे विचारण्याआधी ह्या धाग्यावर पहा- http://www.maayboli.com/node/25383

४) मऊसूत गोल पोळ्या करायच्या आहेत? त्या कशा करायच्या? कोणत्या तव्यावर करायच्या? सुगरणींच्या युक्त्या इथे पहा- http://www.maayboli.com/node/25385

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रंगासाठी ते लाल तिखट फोड्णीत घालायचे तेल गरम असताना. व भाज्या परतल्या की टोमॅटो प्युरी घालतो ना त्यात दोन चमचे केचप घालायचे पावभाजीत.

रंग येण्यासाठी तेल गरम करून त्यात आधी तिखट टाकायचे अन लगेच कांदा परतायचा, अन मिसळ, मटण, चिकन यावर तवंग यावा म्हणून गरम तेलात आधी तिखट अन ३-४ चमचे दूध घालायचे अन मग त्यात कांदा परतायचा, सांबार करतानाही हेच करून बघा Happy

घरात बरेच पांढरे तीळ आहेत लाडु आणि पोळी सोडुन कसे संपवता येतील ? थोडे चमचमीत काय बनवता येईल?

तिळकुटाची चटणी, तिळकुटाचे वरण- पेंडपाला या नावाने माबोवर कृती टाकलिये कोणीतरी, पंचामृत. Happy

अरे वाण्याकडे मिळते की काश्मिरी तिखट Happy कांदा परतल्यावर त्यात काश्मिरी तिखट घातले होते आणि एकदम मस्त लाल झाली भाजी.

तर्रीसाठी तेलावरच आलं लसूण परतली की घालायचे तिखट, त्यावर गरम मसाला वाटून घालून परतायचा नंतर पाणी ओतून उकळी आणायची. तवंग येतो.

माझा नवरा diet करतो आहे...(कितव्यांदा ते विचारु नका...मी मोजुन मोजुन सोडुन दिले आहे.. तर...) मला diet racipes हव्या आहेत.. मन्जे soups, diet dishes etc... मला एथेच माहिती मिळेल का मी कुठे दुसरी कडे चौकशी करु?

बिट प्रमाणात घालायचा. छान वाटते तशी वेगळ्या रंगाची पावभाजी. एव्हरेस्ट्चा मसाला खरोखर छान आहे. ब्याडगी मिरची पावडर घालुनही सुंदर रंग येतो. पण फक्त रंगापुरताच घालावा.

मिसळ पण करते ना, कध्धी कध्धी रंग आणि तवंग येत नाही>>>>>
यासाठी फोडणी घालतानाच लाल तिखट घालाव. जळवु न देता त्यात अर्धा चमचा साखर घालावी. आणि मग फोडणी करावी.

भाकरीला तीळ लावायचे, तीळ घालून कोथिंबीरीचं तिखट करायचं, कोथिंबिरीची झटपट भजी करताना त्यात भरपूर तीळ घालायचे. तीळाच्या साखरेच्या पाकातल्या वड्या होतील व त्यात भरपूर तीळ खपतील तुमचे.

चायनीज पदार्थात पण तीळ वापरतात. (उदा.चिली पोटॅटॉ )
नेपाळ मधे बटाट्याच्या रस्साभाजीत, अख्खे तीळ, तिळाचे कूट आणि तिळाचे वाटण पण घालतात.
तीळापासून केलेली एक खास पेस्ट (ताहिना ) मेडिटेरियन पदार्थात वापरतात. होमूस मधे ती वापरतात. सूपमधे पण वापरतात.
तीळ खमंग भाजून, बडीशेप ओवा, हळद, मीठ मिसळून, मूखवास करता येईल. रोज खाल्ला तरी चालतो.

पावभाजी करताना रंग चांगला येण्यासाठी मी एकदा बीट वापरला होता. (अगदी पिक्कुलासा तुकडा!!) टोमॅटो सूप करताना किंवा सार करताना पण थोडासा बीट घालायचा.

हॉटेलमधे पावभाजी करताना ते भाज्याचे मिश्रण वेगळे ठेवतात आणि कांदा-टोमॅटोचे व मसाल्याचे वेगळे ठेवतात. तसेच, बटाट्याचे प्रमाण सर्वात जास्त असते.

मला आत्ताच्या आत्ता पावभाजी खायची Sad

आख्खे तीळ धिरडी, पालक/मेथी पराठे, थालिपीठ, भाकरी, वांग्याची कोरडी भाजी ह्या सगळ्यात चमचा चमचा घालून संपवावे Happy तिळाची चटणी, भरली मिरची, वांग्याची रस्सा भाजी, पाटवड्याची आमटी, बगारे बैंगन ह्या सगळ्याच्या मसाल्यात जास्त तीळ खपतात.

आर्च, छोटासा तुकडा घालायचा बीटचा.

आम्हाला सहलीला जायचं आहे पण शक्यतो जेवण घरुनच न्यायचं आहे उन्हाळा असल्यामुळे काय नेऊ कळत नाही पण दुपार राहिलं पाहिजे आणि आम्ही सकाळी ६.०० वजता निघणार आहे त्या अगोदर करण्यासारखे सांगा

कणकेत लाल तिखट, मीठ, ओवा, मोहन घालून नेहमीसारखी मळून पोळ्या लाटायच्या. किंचित तेलावर व्यवस्थित भाजायच्या. या प्रवासात टिकतात आणि तोंडिलावण्याचाही प्रश्न येत नाही. गुंडाळी करुन खाऊ शकतो. खुसखुशीत होतात.

शेगावला जाताना मी नेहमी न्यायचे करुन.

उन्हाळ्यात नेण्यासाठी दहिभात चांगला. तो टिकतोच. सोबत काकड्या, कैर्‍या, दाणे घ्यावेत, व ते मिसळून खावे.

उन्हाळ्यात नेण्यासाठी दहिभात चांगला.>> दही नुसते घातले तर दुपार पर्यत आंबट होतो म्हणुन दुध टाकुन १-२ चमचे दही घालावे. दुपार पर्यंत मस्त दही लागुन, छान दही भात तयार होतो.
हसरी अजुन काही पदार्थे
खव्याची पोळी
गोड दशमी
गोड पुर्‍या
तिखट मीठाच्या पुर्‍या
धपाटे
थालीपिठ
सोबत दही, चटणी, लोणचं
सँडविचेस
पुलिहोरा
पुलाव
भात आईस बॉक्समधे ठेवला तर काही होत नाही

प्रीति
पुलिहोरा कसा करतात आणि पुलावा केला तर टिकेल ना दुपारसाठी पुलावाची कुती द्या ना ?
आणि मेथीचा ठेपला पण सांगा ? घरात कुरमुरे आहेत भंडग कशी करायची सांगा

बस्के, पुरली, उरली की कमी पडली?

हसरी, मेथीचा ठेपला चांगला, पण प्रवासात पित्ताचा त्रास होऊ नये म्हणून मेथीऐवजी पालक घाल. सोबत गोड शिरा (केळं न घालता) छान वाटेल न्यायला.

दुसर्‍या दिवशी आम्हा दोघांचे जेवण झाले.>>>> हे बेस्ट Happy जेव्हाच्या तेव्हा संपली की दुसर्‍या दिवशी तिची फार्फार आठवण येते.

मी पण विकांताला पावभाजी केली होती. यावेळी टॉमॅटो कमी घालून छोटा कॅन कॅम्बेल चा टोमॅटो ज्यूस घातला. मस्त लाल रंग आला होता Happy

गरम तेलात आधी तिखट अन ३-४ चमचे दूध घालायचे>>
आरती तेलात दूध घातल्यावर ते पाण्यासारखे उडत नाही का?
मी पण रस्सा भाजी करते तेव्हा जास्त तवंग येत नाही. तेलात तिखट घातल्याने बराच खाट होतो. साखर घालून पहायला हवी.

Pages