युक्ती सुचवा/ युक्ती सांगा

Submitted by पूनम on 12 March, 2009 - 05:13

१) एखादा पदार्थ हमखास जमावा, यासाठी तुम्ही काही युक्त्या (टिप्स) वापरत असाल, तर सगळ्यांना सांगा.
निव्वळ पाककलेतच नाही, पण स्वयंपाकघरात वेळ वाचावा म्हणून, भांडी/उपकरणं स्वच्छ रहावी म्हणून इत्यादीसाठी काही खास टिप्स असतील तर त्याही सांगा.

२) कोणत्या बाबतीत अडला असाल आणि एखादी टिप हवी असेल, तर इथे विचारा. (पदार्थ करताना जमला नाही, तर तो 'माझं काय चुकलं' मध्ये विचारा. इथे त्या व्यतिरिक्त काही असल्यास विचारा)

३) पदार्थांची वेगवेगळ्या भाषेतली नावे, एकाच पदार्थाची एकाच भाषेतली पण वेगवेगळ्या देशातली नावे , कधी त्यात असलेला लहानमोठा फरक या संबंधी माहिती इथे विचारण्याआधी ह्या धाग्यावर पहा- http://www.maayboli.com/node/25383

४) मऊसूत गोल पोळ्या करायच्या आहेत? त्या कशा करायच्या? कोणत्या तव्यावर करायच्या? सुगरणींच्या युक्त्या इथे पहा- http://www.maayboli.com/node/25385

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

या पार्‍याच्या गोळ्या साधारणपणे किराणा माल विकणार्‍यांकडे असतात. पण अलिकडे दोन तीन वेळा चौकशी केल्यावर मिळाल्या नाहीत. (बंद झाल्या का ? )
तांदूळ टिकवण्यासाठी, कडूनिंबाचा पाला पण वापरतात. पण हा सुकला कि त्याची पूड होते व ती निवडून काढणे कठिण जाते, म्हणून ती पाने, सुकवून, पातळ फडक्यात बांधून ठेवायची. बोरिक पावडर, हा खात्रीचा उपाय आहे, पण ती वापरल्यास तांदूळ फार धुवावे लागतात.

माझ्या लहानपणी ते पार्‍याच्या गोळ्या व बोरिक पावडर दोन्ही करत असे आइ आलटून पालटून. एका मोठ्या पिम्पात गहू साठ्वत. माझा एक किलो तांदूळ खपत नाही महिन्या भरात.

नाचणी पिठ एक वाटी+ दही अर्धी वाटी+ उपमा रवा १ वाटी, आले व मिरची, जिरा मीठ वाट्ण, कोथिम्बीर असे केले तर नॉन स्टिक वर चांगले निघतील.

कॅनमधली टोमटोप्युरी उरली आहे, साधारण किती दिवस टिकेल फ्रिजमधे/ फ्रिजरमधे ?
कि पुन्हा वापरणे योग्य नाही ? प्लिज काहि टिप्स..??

मी काल पनीर माखनी साठी व आज थोडी राईस करता वापरली ..पण अजुन १- दिड कप टोमॅटोप्युरी उरली आहे .

धन्यवाद..

तांदळाच्या डब्यात तमालपत्रं घालून ठेवली तर किडा होत नाही.
साखरेत लवंग घालून ठेवल्यास मुंग्या लागत नाहीत.

अजुन १- दिड कप टोमॅटोप्युरी उरली आहे >> आईस ट्रेमधे घालुन क्युब्स कर आणि २ दिवसानी झिपलॉक बॅगमधे भरुन फ्रिझरमधे ठेव १ टोमॅटो = १ क्युब याप्रमाणात वापर.

Tips for Storing-Tomato-Puree:

Store it by putting it in different sized containers as you need. Freeze till you need it.
you can pour it in ice cube trays, freeze. Once the cubes are set, remove from tray and store them in a ziplock bag in your freezer
Use the cubes as and when needed. Take out the needed no. of cubes from the freezer and use as you wish.
Once you defreeze the puree cubes, use them up. Do not refreeze.

स्मिता, टोमॅटो प्युरी फ्रिजमध्ये ठेवली असल्यास साधारण पाचेक दिवस टिकेल. कॅनवर याबाबत सुचना असतीलच.

कुकरची रिंग सैल होत असेल तर डीप फ्रीझ मधे ठेवावी. वापरायच्या तासभर आधी काढून ठेवावी. नियमित पणे केल्यास तिचे आयुष्य वाढेल.

कोथिंबीर किंवा कोणत्याही पालेभाज्या जास्त टिकण्यासाठी, निवडुन घुऊन घ्याव्यात. पाणी निथळुन पेपर टॉवेलवर रात्रभर ठेवाव्यात, मग सकाळी त्याच पेपर टॉवेलमधे गुंडाळुन घट्ट झाकणाच्या डब्यात ठेवाव्यात. हा डबा मग फ्रिजमधे ठेवावा. कोथिंबीर ८-१० दिवस नक्की चालते आणि पटकन कशात पण टाकायला कामी येते.

धन्यवाद मिनोती, भरत, प्राची !!

हो गं .. नेमका कॅन टाकला म्हणुन कळेना .. मी हा कॅन प्रथमच आणला , आणी या प्युरीचा वापर जरा अतिच झाला १-२ दिवस.. पण टाकवत नाहीये
क्युबच करते आता ..म्हणजे पुन्हा काही दिवसानी वापरता येतील.. Happy

खू.....प बारीक रवा आहे घरात. उपमा,शिरा अगदी काहीतरीच होतात त्याचे. घास घोळतो घशात.
काय करायचे त्याचे ??

खू.....प बारीक रवा >> रवा-उत्तपा करुन बघ .. जरासे आंबट दही/ताक असेल तर त्यात रवा भिजत ठेव २-३ तास. नंतर त्यात कांदा, आलं लसुण जीरेपूड मिरच्या मीठ कोथिंबिर घालुन मिक्स कर .. लागल्यास पाणी घाल व नॉनस्टीक तव्यावर उत्तापे घाल मस्तं खरपूस भाजावे व लोणी, चट्णीबरोबर खावे गरमागरम !!

तसेच लाडु/वड्या/ सांजाची पोळी वगैरे आहेतच ..

अरे वा.. एव्हढे ऑप्शन्स.. सही आहे..
लाडूचाच विचार करत होते. पण त्यात पाकाची झंझट असल्याने विचार बारगळला..
बाकीचे काहीतरी करीन..
धन्यवाद!!

बस्के, अग पाकाशिवाय चांगले लाडू होतात रव्याचे. एकदम खात्रिदायक. जुन्या मायबोलीवर मी रेसिपी टाकली होती.

माझ्याकडे चूकून सोयाबीन आणले गेले आहे. Sad एकदा उसळ करून पाहिली त्याची पण कोणी खाल्ली नाही.
काय करता येईल त्याचे?

प्रीती बघते लिंक धन्यवाद
सिंडे, तो चांगला पर्याय आहे. मी कदाचित भिजवण्याच्या आधीच करेन. Proud सोयाबीन चांगले का नाही लेख वाचल्यापसून तर कन्फ्यूजच आहे. प्रकार करून बघू का टाकू Sad

Lol

खूप रताळी आणि sweet potatoes आहेत. त्याचं काय काय करता येईल?
किस (खिस) एक ऑपशन आहे. अजुन काय करता येईल?

रताळ्याच्या पोळ्या,शिरा,खिर्...वेफर्स होतिल (बटाट्यासारखे)

रताळ्याच्या फोडी - गोल चकत्या करुन तुपात परतणे, त्यात बारीक केलेला गुळ टाकुन पाणी असलेलं झाकण ठेवायचं आणि थोडी कमी शिजु द्यायची, वाढताना वेलदोडा पुड टाकायची.
रताळ्याचं पुरण - शिजवुन स्मॅश करुन घ्यायची, साखर घालुन शिजवायचं आणि पोळी करायची.

रताळ्याची भाजी (उपवासाला बटाट्याची करतात तशी) चकत्या करून घ्यायच्या आणी तेल्/तूपा वर जीर्‍याची फोडणी देऊन परतायच्या

बस्के, बारीक रव्याचे मैसूर बज्जी : रवा मैदा समप्रमाणात घेउन दह्यात भिजवायचे मग त्यातमिरची, कोथिम्बिर, आले मीठ जिरे वाटून घालायचे. तळायचे छोटे छोटे वडे. आतून जाळी पड्ते.

Pages