IPL २०१०

Submitted by समीर on 11 March, 2010 - 23:13

आजपासून तिसर्‍या IPL स्पर्धेला सुरूवात होतेय. पुढले ६ आठवडे आता रोज २०/२० सामने. त्यावर चर्चा करण्यासाठी हा धागा.

यंदा सर्वाना (USA वगळ्ता Sad ) हे सामने युट्युबवर पहायला मिळणार आहेत. त्यामुळे अवैध दुवे शोधत बसायची गरज नाही Happy

इथे पहा http://www.youtube.com/ipl

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाहीतर तसा तो फेकीच !!

याबाबत तज्ञाना विचारले असता त्यात आक्षेपार्ह काही नाही अन्यथा एक आशियाई बोलर यशस्वी ठरताच आय सीसीच्या डोमकावळ्यानी काव्काव करून त्याला आयुष्यातून उठवले असते.मुरलीवर जसा गोर्‍यानी प्रयोग करून पाहिला.

टोणगा, ज्या वेळी बॉलर्स बोलिंग करतान्च्या टेस्ट घेतात तेव्हा हे मलिंगा सारखे व्यवस्थित अ‍ॅक्शन करतात..
(नियमात बसेल अशी Proud ) , पण प्रत्यक्षात अंपायर्स लक्ष दिले पाहिजे..

टी२० विश्वचषकासाठी DDD चे ४ खेळाडू आहेत, त्यातले २ फक्त १-२ सामने खेळून अंग शेकत बसलेत. सगळ्यात जास्त खेळाडू असलेला दिल्ली आयपीएल मधे कितवा येणार? आणि एकही नसलेला केकेआर कितवा?
कपिल देव सचिनलाही अजूनही सल्ले देतोच आहे. २००३ च्या विश्वचषकानंतर की आणखी केव्हातरी त्याने विक्रमांसाठी खेळण्यापेक्षा निवृत्त व्हावे म्हटले. स्वतः फक्त रिचर्ड हेडलीचा विक्रम मोडण्यासाठी खेळला आणि खेळवला जात होता हे विसरून.
पहिल्या टी २० कप सारखी आताही नवीन टीम नव्या कप्तानासह उतरविली तर काय वाईट? युवराज्,सेहवाग जागी मनीश पांडे, सौरभ तिवारी इ. मडळी उतरवून.

>>कपिल देव सचिनलाही अजूनही सल्ले देतोच आहे. २००३ च्या विश्वचषकानंतर की आणखी केव्हातरी त्याने विक्रमांसाठी खेळण्यापेक्षा निवृत्त व्हावे म्हटले. स्वतः फक्त रिचर्ड हेडलीचा विक्रम मोडण्यासाठी खेळला आणि खेळवला जात होता हे विसरून.
>> Lol खरयं

यावेळी IPL त्रास देणार आपल्या खेळाडूंना, कारण IPL व विश्वचषक यात फारच कमी दिवसांचा अवधी आहे.

मलिंगा फेकी वाटत नाही मला. हात तिरपा खाली आणतो एवढेच. शोएब मात्र वाटतो.

कपिल चा लेटेस्ट सल्ला काय आहे?

यावेळेस संघात काहीतरी गडबड वाटते. सेहवाग, युवराज, भज्जी या लोकांचे धोनीशी जमत नाही की काय कोणास ठाउक? पुढच्या वर्ल्ड कप (वन डे वाला २०११ चा) पर्यंत काही भांडणे काढू नका म्हणाव Happy

काल मुंबई पुन्हा जिंकली. Happy साहेबांना एका दिवसांकरिता का होईना केशरी टोपी मिळाली.
पंजाबने जबरदस्त लढा दिला, पण बोपाराच्या षटकात सामना फिरला. जयवर्धनेच्या चेहर्‍याकडे बघवत नव्हत, बिचार्‍याला कसला धक्का बसला होता.

साहेबांचे धोतर धोक्यात आलेच होते. विशेषतः रन रेट १०.५० झाला अन स्वतः आ ऊट झालेले. तिवारीने कसा बसा काचा मारून दिला तेव्हा जमले एकदाचे Proud

रायडू , सतिश वगैरे फार विश्वासार्ह वाटत नाहीत. साहेब गेल्यावर नीट लढतील याची खात्री नाही. विशेषतः बंगलोरकरांविरुद्ध खात्री वाटत नाही...

युवराज बहुदा केवळ शरीराने ग्राऊंडवर असतो..
त्याच्या सध्याच्या बॉडी लँग्वेजवरून त्याचं काहीतरी बिनसलय आणि पूर्वीचा युवराज कुठेतरी हरवलाय हे सतत जाणवत रहातं. रागीट तर तो आधीपासुनच आहे. पण हल्ली `आय डोंट केअर' अ‍ॅटिट्युडने खेळल्यासारखा खेळतोय त्यामुळे आयपीएलमधल्या सातपैकी एकाही मॅचमध्ये त्याला धड खेळता आलं नाही.. हे असच जर त्याचं चालु राहिलं तर टी२० वर्ल्ड कपच्या दृष्टीने भारतासाठी डोकेदुखी ठरू शकेल.. Sad

>>> युवराज बहुदा केवळ शरीराने ग्राऊंडवर असतो..

आणि सेहवाग सुद्धा. कर्णधारकी काढून घेतल्यापासून दोघेही केवळ पाट्या टाकत आहेत आणि सुतकी चेहर्‍याने मैदानात वावरत आहेत. त्यांच्या देहबोलीवरून त्यांच्या मनस्थितीची कल्पना येते.

सेहवाग ७ पैकी ५ सामन्यात अपयशी ठरला तर युवराजने सातही सामन्यात काहिही केलेले नाही. परवाच्या सामन्यात सेहवागने धावा तर काहीच केल्या नाहीत आणि गेलने दिलेला एक लोणियाचा गोळा मिडॉफवर सोडला.

दोघांमध्येही अजिबात व्यावसायिकता दिसत नाही.

दिल्ली आणि पंजाबच्या कर्णधारांनी त्या दोघांनाही पुढच्या सगळ्या मॅचेस बाहेर बसवायला पाहिजे.. निदान नविन लोकांना तरी संधी मिळेल...

काल बरा खेळून पण पुढच्या पंजाबच्या मॅच मध्ये जयवर्धने बाहेर बसेल बहुतेक... संगकारा आत आल्यावर तो किंवा बोपारा बाहेर.. पण बोपाराचा फॉर्म बघता तोच..

युवराज इस नॉट कॅप्टन मटेरियल. सेहवाग्ने कप्तानपद स्वतःच सोडले होते ना? आणि गंभीर तर त्याचा बडी आणि फॅन आहे. तो नेहमी असाच तर दिसतो मैदानात आणि खेळतोही असाच -लॉटरीच्या तिकिटासारखा. पहिल्या पाच बल्लेबाजात आहे की तो.

Kumar Sangakkara missed out on Kings XI Punjab's clash with Mumbai Indians on Wednesday after being the first skipper to be banned for the team's slow over rates.

Mumbai Indians skipper Sachin Tendulkar could also be a casualty after he was fined for slow over rate in Tuesday's game. Indian Premier League CEO Sundar Raman tweeted that Tendulkar has been fined for slow over rate and this is his second offence.

As per the rules, a third offence consists of a USD 50,000 fine and a one-match ban. The second offence is made up of a USD 40,000 fine to the captain and USD 10,000 to the players.

Kolkata Knight Riders skipper Sourav Ganguly and Delhi Daredevils captain Gautam Gambhir have also been fined USD 10,000 for the first offence.

The Indian premier League has become very stringent this year when it comes to slow over rates and several eyebrows have been raised about the heavy fines. It is not just the captain who bears the brunt for repeated offences. Like in Kings XI's case, the third offence was followed with a fine of USD 20,000 for each player.

सावकाश खेळल्याबद्दल उलट त्या संघांनाच आयपीएलने पैसे द्यायला हवेत. लोक काय उशिर झाला म्हणुन टिवीसमोरुन हलत नाहीत. तेवढाच जरा जास्त वेळ आचरट जाहिराती दाखविण्यासाठी. नाहीतरी तो 'स्ट्रटीजिक टाइमआउट' जाहिराती दाखवण्यासाठीच आहे ना? Happy

मला वाटते, फलंदाज तक्रार करत असतील, त्यांची एकाग्रता कमी होते म्हणून.

त्यातून त्या वाया गेलेल्या वेळात जर सचिनच्याच जाहिराती दाखवल्या तर सचिनला त्याचे पैसे जास्त मिळतील. म्हणजे एक जाहीरात १ लाख डॉ. मग त्यातले ५०,००० गेले तरी काय हरकत आहे? ५०,००० चा फायदाच.

पुनः हा दंड जो होईल, तो 'धंद्यानिमित्त झालेला खर्च' म्हणून प्राप्तीमधून कमी करता येईल का?
(Deducted from taxable income)

कारण आय पी एल ला कर माफ असला तरी खेळाडूंना कर माफ केल्याचे ऐकले नाही.
बाकी सचिनने इतके विक्रम करून भारताचे नाव जगात केले याबद्दल भारत सरकार कदाचित् त्याचे सर्व कर माफ करतील. माझी काहि हरकत नाही.
Happy

युवराजची भारताच्या २०-२० विश्वचषकासाठीच्या संघात निवड झाल्याचे कळल्यावर संगाकाराला नवल वाटले. या दोघांमधले संबंध चांगले नसल्याचे कळते. युवराजने आपले कर्णधारपद गेल्याशी अजूनही जुळवून घेतलेले नाही. युवराज आपले पूर्ण प्रयत्न करीत नाही. तो संघातील इतरांपासून लांब राहतो. त्याच्या धावा होत नाहीत, तो अन्फिट वाटतोय आणि वजनही वाढले आहे.
(इंडियन एक्स्प्रेस मधील बातमीचा मराठी अनुवाद.)

पण स्वतः संगकाराच्या धावा युवराजपेक्षा कमी आहेत, त्याचे काय?

'कपिल चा लेटेस्ट सल्ला काय आहे?'

सचिन जर ४३ दिवसांची IPL खेळण्याइतका फिट आहे तर त्याने T20 विश्वचषक खेळायला हवा. - कपिल उवाच.
आता सचिन स्वत:ला २०११ च्या ५०-५० विश्वचषका साठी सांभाळून ठेवतोय आणि ते कसे करायचे ते त्यालाच चांगले कळते हे यांना कोण सांगणार. नाहीतरी २०-२० ला चडडी क्रिकेट म्हणतात ना, मग तो नवीन पोरांना खेळू दे की.
रायुडूला गिलख्रिस्टने बुकलल्याबद्दल आणि नंत क्षेत्ररक्षणात अडथळा आणल्याबद्दल खिलाडूपणाचे डेक्कनचे १० गुण मुंबईला दिले पाहिजेत.

साहेब ज्या चेन्डूवर बाद झाले तो खेळताना साहेबांची बरीच हबेलहंडी उडाली होती. धोतरात बॉल नक्की कसा घुसला कळलेच नाही Proud फुल मार्क्स टू राहुल. मुम्बै इन्डियन्स फारच छान खेलताहेत. मुख्य म्हनजे साहेबांवर फार अवलम्बून नाहीत. त्यामुळे अगदी शेवटच्या ५ ओव्हरमध्ये ५०-६० धावा काढायला कोणी तरी धावून येतोच.

सचिन्द्वेष्ट्यांची पुन्हा एकदा सचिनच्या धोतराची उठाठेव सुरू झाली.

सचिन कितीही चांगला खेळला (IPL २०१० च्या आतापर्यंत झालेल्या ८ सामन्यात ४९.८६ सरासरीने व १४० हून अधिक स्ट्राईक रेटने एकूण ३४९ धावा, त्यात ४ अर्धशतके), त्याच्या नेतृत्वाखाली कितीही सामने जिंकले (IPL २०१० च्या आतापर्यंत झालेल्या ८ पैकी ७ सामने मुम्बई इन्डियन्सने जिंकले आहेत), त्याला कितीही वेळा "सामनावीर" पुरस्कार मिळाला (८ पैकी ३ सामन्यात सामनावीर) तरी सचिन्द्वेष्ट्यांचा त्याच्याविषयीचा जळफळाट काही कमी होत नाही.

सचिनच्या खेळाने भल्याभल्यांच्या शुभ्र धोतराचे पीतांबर झालेले आहे. परंतु या द्वेष्ट्यांची त्याच्या डोळ्यातील कुसळ दाखवायची खोड काही जात नाही.

मैदानावर जाऊन खेळण्यापेक्षा कीबोर्ड बडवून किंवा TV studio मधे बसून दात विचकून मतप्रदर्शन करणे सोपे असते. अशोक मल्होत्रा, अरुण लाल, अतुल वासन, संजय मांजरेकर इ.इ. या सगळ्यांना इतके सगळे कळते तर स्वतः मैदानात उतरायचे तेव्हा काय व्हायचे?

tonaga - 30-March
>>>
रायडू , सतिश वगैरे फार विश्वासार्ह वाटत नाहीत. साहेब गेल्यावर नीट लढतील याची खात्री नाही. विशेषतः बंगलोरकरांविरुद्ध खात्री वाटत नाही...
>>>

tonaga - 4-Apr
>>>
साहेब ज्या चेन्डूवर बाद झाले तो खेळताना साहेबांची बरीच हबेलहंडी उडाली होती. धोतरात बॉल नक्की कसा घुसला कळलेच नाही फिदीफिदी फुल मार्क्स टू राहुल. मुम्बै इन्डियन्स फारच छान खेलताहेत. मुख्य म्हनजे साहेबांवर फार अवलम्बून नाहीत. त्यामुळे अगदी शेवटच्या ५ ओव्हरमध्ये ५०-६० धावा काढायला कोणी तरी धावून येतोच.
>>>>

हुडा, किती तो मतात फरक चार दिवसात.. अश्याने कधितरी संघाला पण चांगलं म्हणुन जाशील.. Proud

पंजाब जिंकले.. २०० रन्स चेस केले.. माहेला जयवर्धने १००..
आज श्रीसांथ प्रिटी झिंटाच्या रोल मधे होता.. Proud , नाचायचाच काय तो बाकी होता फक्त.. Wink

Pages