उजळ कांती हवी

Submitted by webmaster on 3 June, 2008 - 00:45

"उजळ कांती हवी" या विषयावर पूर्वी झालेलं हितगुज इथे वाचा
http://www.maayboli.com/hitguj/messages/103387/107548.html

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काया स्किन क्लिनिक महाग आहे पण त्यात स्किन अनॅलिसिस करून मिळते. व्हाईट हेड चा प्रशन असेल. पोल्युशन मुळे ही होउ शकते दक्षे.

दक्षे,
जास्वंद जेल केसाला वरती कुणीतरी सांगितल्याप्रमाणेच लावणे.
केस गळणे, कोंडा, केसांचा पोत सुधारतो. टिनेज वर्षांमधे केस पांढरे होण्याची समस्या असेल तर ती पूर्णपणे जास्वंद जेलमुळे गेलेली पाहिलीये मी. पण ३०+ ला असेल पांढरे होण्याची समस्या तर मला नाही वाटत ते रिव्हर्सिबल आहे. कदाचित पांढरे होण्याचा वेग कमी होत असेल किंवा अजून नव्याने पांढरे होणे थोडे कमी होत असेल पण पांढरे झालेले परत काळे होणं शक्य नाही. कारण ती नॉर्मल एजिंग प्रोसेस आहे जी आता एकुणातच थोडी लवकर सुरू होते स्ट्रेस, जंक फूड, जाग्रणं, वेळाअवेळा... इत्यादींमुळे...

अ‍ॅलो व्हेरा त्वचेवर कुठेही...
भाजल्याचे पॅचेस, छोट्या जखमांचे पॅचेस, सुरी किंवा ब्लेडने कापल्याचे बरे होत आलेले व्रण, सनटॅन, चेहर्‍यावरचे पॅचेस, त्वचेचा पोत सगळ्यासाठी महत्वाचे

प्राची आणि नी, धन्यवाद, कालंच उर्जिता जैन चं कोरफड जेल आणलं. जास्वंद जेल नाही मिळालं. त्वचा अजून काबूत आहे माझ्या Proud पण केस नाहीत. जास्वंद जेल ताबडतोब मिळवून उपाय होतो का ते पाहते.

बाकी माझे केस पांढरे ३०+ चे नाहीत, आधी पासूनच आहेत.. पांढर्‍याचे काळे नाही झाले तरी चालतील, पण यापुढे कमी व्हावेत, सगळ्यात आधी मला केस मजबूत आणि दाट व्हायला हवे आहेत. फार गळतायंत. Sad

आता काल आणलेल्या कोरफड जेल ची मज्जा, रात्री झोपण्या अगोदर चेहरा धुवुन लावलं आणि चेहरा न धुता तशीच झोपुन गेले. सकाळी कपाळ गार पडलं होतं..
आक$$$छी...!!! Proud
तर, कोरफड जेल, कितीवेळ लावून ठेवावे? कधी धुवावे याबद्दल जरा मार्गदर्शन करा.
रच्याकने, नाकाजवळचा पिंपल एका अ‍ॅप्लिकेशनमध्ये बराच बसलाय... Happy

ते क्रिम कोल्हापूरच्या प्रकाश मेडीकल स्टोअर्स चं स्वत:चं प्रॉडक्शन आहे. >>
त्याच नाव काय आहे ? मुंबई पुण्यात कुठे मिळते?

दक्षिणा, तू 30+ आहेस? Uhoh

ते कोरफड जेल कुठल्याही क्रिमसारखं वापरायचं गं. मी तरी लावल्यावर चेहरा धुवायच्या भानगडीत पडत नाही.

अश्विनी, नारायण फार्मसीचा खाणाखुणांसकट तपशीलवार पत्ता दे.

मनिषा - पुण्यात नाही मिळत ते क्रिम आणि त्याला काही नाव पण नाहिये Sad तुला हवंय का? तु कुठे असतेस? पुण्यात असशील तर तुला देण्याची व्यवस्था करीन, नसशील तर मी प्रकाश मेडीकलचा नं देईन.... तु एकदा बोलुन घे आणि ते पाठवतात का ते विचार... किंवा पुण्यात कुठे तेच क्रिम मिळतं का ते विचार आणि मला ही सांग..

मंजु, टेंभीनाक्याला दिघ्यांच्या घराच्या आधी २ धार्मिक साहित्याची दुकाने आहेत कोपर्‍यावर त्याला लागून आहे हे नारायण औषधालय. Laazureने १५-१७ दिवसांत माझ्या पाठीला ब्लाऊज व ड्रेसच्या गळ्यामुळे आलेल्या टॅन पुर्ण गेला. रात्री तोंड धूवून (२ मिनिटं फेस ठेवून धुवायचा) झोपल्यावर सकाळी चक्क ओठही लाल दिसतात Uhoh (मी नेहमीच चेहरा धुताना ओठ मुडपत नाही). माझ्या बॉसिणीला हवा होता म्हणून १ आणून दिला होता. तिलाही चांगलाच फरक जाणवतोय. आता मला म्हणतेय २ आणून दे.

अगं दक्षे कोरफड जेल चेह-याला लावुन तसेच झोपायचे आणि सकाळी चेहरा धुवायचा.

क्रिमसारखे लावायचे, फेसपॅकसारखे थापायचे नाही. माझ्याकडे उर्जिताचे 'लिविंग विथ हर्ब्स' आहे त्यात असेच लिहिलेय.

अश्वे मला पण........

माझे हात आणि पाठ लई काळी पडलीय..... Sad मागे ट्रेकला गेलेले तेव्हा जंगलात पाठीला किडे चावले भरपुर ते डाग अजुनही तसेच आहेत...

अश्विनी, ओके. आज उद्याकडे बघते.

मी ते कोरफड जेल रात्री झोपताना आणि सकाळी आंघोळ झाल्यावर असे दोनदा लावते.

अगं ते लगेच मुरते म्हणुन म्हटले Happy

तुला तर सकाळी सर्दी झाली त्यामुळॅ मला वाटले सगळे ६० मिलि लावलेस की काय???? Happy

मी फ्रिजमध्ये ठेवलेय आणि मधुन मधुन लावते काढुन.. इतके मस्त गारेगार वाटते.... माझी लेकही घेऊन गेलीय एक डब्बा....

अश्वे मला lazur साठी कुरियरवाली मिळाली Happy

वर्षा, मस्त लिंक शोधलीस.

अश्विनी, त्या लिंकमधल्यासारखाच आहे ना गं साबण?

उर्जिताजैन याम्ची वेबसाईट आहे का?

जास्वंद जेल तेल लावलेल्या केसांवर लावायचा का आणि मग शॅम्पुने केस धुवायचे का? की तेल न लावल्ता नुसता जेल लावायचा आणि नुअत्या पाण्याने केस धुवायचे?

दक्षिणा, आर्च....धन्यवाद Happy
दक्षा.... प्रकाश मेडीकल चा फोन नं दे ना गं.
त्या क्रीमची सोय होईस्तोवर आर्च चा उपाय करुन बघता येईल. पण आठवड्यातून किती वेळा लावायचं ?

मी पंचामृत फेशीयल केले, चेहरा २ दिवस फार तजेलदार दिसला. पण त्यानंतर खूप कोरडा पडत आहे. रोजच्या प्रमाणे मॉइस्चराईजर लावते, पण त्वचा खूपच रुक्ष झाली आहे. काय करु? माझ पंचामृताचे प्रमाण चुकले की हे काही वेगळेच प्रकरण आहे.:(

जयश्री, मसुराचे पीठ आणि हळद दुधात कालवुन लावले तर फायदा होतो. साबणाच्या ऐवजी अथवा साबण लावुन झाल्यावर लावायचे.

Pages