उजळ कांती हवी

Submitted by webmaster on 3 June, 2008 - 00:45

"उजळ कांती हवी" या विषयावर पूर्वी झालेलं हितगुज इथे वाचा
http://www.maayboli.com/hitguj/messages/103387/107548.html

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आणि टेन्शनला एखाद्या पोत्यात घालून कुठेतरी दूर सोडून ये<<<<<<<<<<< Sad

हा उपाय सगळ्यात अवघड आह्वे. मला तर अशक्यच वाटतोय Sad

मला पण कधीतरी तरी [पहिल्यांदाच करणारे]फेशियल करायचय पण कुठे जाव नी कोणतं करावं हेच कळत नाहीये Sad

बघते ग दक्षिणा कैलास जीवन लावुन.

शनिवारी रात्री मी तिला पाय शांपुच्या पाण्यात बुडवुन ठेवायला सांगितले आणि मग स्क्रबरने साफ केले व त्याच्यावर एरंडेल तेल व ऑलिव ऑईल मिक्स करुन लावले आणि सॉक्स घालुन झोपवले, सकाळी मस्त मऊ झाले पाय. मग काल निविया लावले तर बाईसाहेब ते लावुन घरभर फिरत होत्या. शेवटी बाबा ओरडले की तुझे क्रिम जमिनीला लागतेय आणि त्यावरुन आजी घसरुन पडेल तेव्हा कुठे जाऊन झोपली. Happy

पण हे सगळे रोज करायला होणार नाही कारण माझ्या लेकीला अंगावर कुठेही गुदगुल्या होत नाहित फक्त तळपायाला होतात, मी तीचे पाय स्क्रब करताना एवढा थयथयाट चालला होता काही विचारु नका. मला हे सगळे करायचा खुप कंटाळा आहे पण शेवटी आई लेकीसाठी करणारच ना. Happy

वर सगळ्यांनी लिहिल्याप्रमाणे तेल, तुप रोज खावे म्हणजे स्किन मऊ राहते हे बरोबर आहे पण माझी लेक रोज सकाळ संध्याकाळ तुप खाते. कधितरी आता बास म्हणुन ओरडावे लागते, तरीपण तिची स्किन आणि केस खुप कोरडे आहेत. ती मोठी होईल तसे होतील का तिचे केस मऊ.

माझ्या भावाच्या लग्नाच्या आधी मला माझ्या मावशीच्या मैत्रीणीच्या मुलीने गोल्ड फेशियल करते म्हणुन सांगितले, चांगले असते, खुपजणांना करते म्हणाली. मी ते केले, त्याचे पैसेही भरपुर दिले आणि दोन दिवसांनी माझा चेहरा सगळा लाल-लाल झाला. आईतर मला म्हणत होती की तुला लहान असताना पित्त उठायचे अंगावर तसे परत तर नाही ना सुरु झाले. Happy

तेव्हा पूनम, तुला घाबरवत नाही पण जरा सांभाळुन कर. Happy

वर्षा, अशी कारणे असू शकतात त्याची...
१. तुझ्या चेहर्‍यावर मुळात एखादा पिंपल किंवा व्हाइट हेडस/ ब्लॅक हेडस असतील आणि ते नीट न काढता/ न स्वच्छ करता फेशियल केले असेल जेणेकरून ते सबंध चेहराभर पसरले असेल.
२. फेशियल करणारीने हात नीट धुवून केले नसणार.
३. तुझ्या त्वचेला काय सूट होईल हे न बघता तिने केलं असणार.
४. जनरली कुठल्याही फेशियलची रिअ‍ॅक्शन दोन तीन दिवसांच्या नंतर येत नाही. पण फेशियल केल्यावर लगेच किंवा पुढचे किमान एक दोन दिवस तरी भरपूर धूळ, प्रदूषण, उन हे टाळायचे असते. नाहीतर क्लीअर केलेल्या पोअर्स मधे ते कण जाऊन उलटी रीअ‍ॅक्शन येते.

यामधे थोडी चूक आपलीही असते. ही सगळी माहीती घेऊन मगच जावे म्हणजे समोरचा बंद डोक्याने करत असला तरी आपण जागरूक असल्याने प्रॉब्लेम होत नाही.

पण जनरली किंवा ९९% म्हणा कोरफडीचा चीक (कोरफडीचे पान कापून आतला काढलेला गर) किंवा कोरफडीचे जेल याने कुणाला त्रास होत नाही.
आणि उन्हाळ्यात तर कोरफड जेलचेच फेशियल बरे कारण उष्म्यामुळे त्वचा जी इरिटेट झालेली असते त्याला थंडावा मिळतो.

१. तुझ्या चेहर्‍यावर मुळात एखादा पिंपल किंवा व्हाइट हेडस/ ब्लॅक हेडस असतील आणि ते नीट न काढता/ न स्वच्छ करता फेशियल केले असेल जेणेकरून ते सबंध चेहराभर पसरले असेल.
२. फेशियल करणारीने हात नीट धुवून केले नसणार. >>>>>>>
नीरजा, ही दोन कारणे असु शकतात कारण ती बाई मला फारशी स्वच्छ वाटतच नव्हती. आणि मी तिच्याकडुन पहिल्यांदाच करत होते, तेही मावशीच्या आग्रहाखातर.
मी नेहमी फेशियल करतच नाही, काहितरी अगदी घरातले काहि कार्य असेल तरच करते म्हणजे वर्षा-दोन वर्षातुन एकदा होते. तेही ईथे मुंबईत माझ्या नेहमीची पार्लरवाली कडुनच. पण तेव्हा लग्न पुण्याला होते आणि ईथुन करुन जाण्यापेक्षा पुण्यात आईकडे गेल्यावर करु असा विचार करुन तिच्याकडुन करुन घेतले ग.

आता मला करायचे आहे तर मी पार्लरवालीला कोरफडीचेच करायला सांगीन. Happy

Lazure, azardian दक्षिण मुंबईत कुठे मिळतील? हे साबण मोठ्या माणसांसाठी पण चालतील का? माझ्या नवर्‍याची स्किन पण काळवंडली आहे, पॅक वगैरे लावायला त्यांना आवडत नाही (बायकांसारखे नखरे नको म्हणतात), म्हणुन हे साबण ट्राय करायचेत.
घरगुती कोरफड नक्की कशी लावावी? थोडस पिवळट पान चालेल की हीरवच पाहीजे? चेहरा धुतल्यानंतर लावायचे की आधी? लावुन किती वेळ ठेवायचे? चेहर्‍याशिवाय इतर स्किन वर कशी लावावी?

धन्यवाद सगळ्यांना. ओके, उन्हाळ्यात नाही करत फेशियल. घरीच क्लेन्सिंग मिल्क आणून चेहरा धुवेन.
आणि जेव्हा पहिलं करेन, तेव्हा कोरफड किंवा हर्बल करेन.
उर्जिता जैनांकडे जायलाच हवंय आता Happy लॅक्मेचं सनस्क्रीन संपत आलंय. अलोव्हेरा जेल आणि केवडा जल फिक्स Happy

अग पूनम फेशियल नको करू पण सकाळी अंघोळीनंतर आणि रात्री झोपताना कोरफड चीक/ कोरफड जेल लाव चेहर्‍यावर. सकाळी थोडसंच रात्री जरा जास्त. चेहरा ओला असतानाच.
तेवढ्यानेही छान होईल.

मि आत्ताच 10 दिवस मॉरिशीयसला जाउन आले. आणी येताना भेट घेउन आले ति ट्यान स्किनची.
क्याट्मरीन क्रुझ च्या डेकवर बसुन समुद्राच्या पाण्यात भिजायला, वॉटरस्पोर्टस करायला भरपुर मजा वाटली.
पण आत्ता पछ्चाताप होतो आहे.
तरि निवीयाच SPF50 असलेल सनस्क्रिन चोपडायचे नुसाती. पण खुपच स्किन काळवंडली आहे. त्यात दोन दिवसांनी पार्टी आहे. काय करु? परर्लरला जायला वेळ पण नाही.
घरच्या घरी काहि करता येइल का?

गेले आठवडाभर आऊटडोअर ला पळायला/चालायला जात होते संध्याकाळी..
काल उन जास्त होतं.. ओठांशेजारची हनुवटीकडे जाणारी त्वचा आणि दोन्ही हात सुजले आहेत, लाल पडले आहेत, आतून ओढल्यासारखे वाटताहेत, इरिटेबल झालेत.
गेल्या वर्षी ही असंच झालेलं - मी दुर्लक्ष केलं आणि त्याचं रुपांतर दोन्ही हातांना ठणक लागण्यात झालं.. काळे निळे पडलेले हात. त्यावर त्वचारोग तज्ञानं शेवटी स्टिरॉईड्स दिली.. आणि मग ते कमी झालं..
सनस्क्रीन लावणे आणि आवर्जून उन्हात न जाणे हे सोडून इतर काही उपाय माहित आहेत का?

अशाप्रकारे ऑलरेडी खराब झालेल्या त्वचेसाठी काय करू शकतो?
(डॉ कडे जाण्याची वेळ येऊ नये अशी इच्छा आहे! Sad )

नानबा ही यूव्ही रेजची अ‍ॅलर्जी वाटते आहे. हात, चेहरा निट झाकल्याशिवाय, सन्स्क्रीनशिवाय उन्हात अजिबात फिरू नकोस. अ‍ॅलोव्हेरा जेल घरी आल्यावर लावत जा न चुकता पण दुर्लक्ष खरच करु नकोस. आणि डॉक्टरकडे जायचे टाळू नकोस. अशा स्कीनवर काळजी घेतली नाही तर पांढरे पॅचेस पडतात आणि ते जायला खूप वेळ लागतो.

नानबा
शर्मिला यांनी लिहीलेलेच मी लिहायला आले होते. डॉक्टरकडे जायचे टाळू नकोस.
इथे तुला सगळ्या सुपरमार्केटमध्ये तसच फार्मसी मध्ये burns, cuts विभागात 100% Aloe Vera gel असे लिहीलेली बाटली मिळेल. ते लाव. बाहेर जातांना अगदी पातळ का होईना पण पूर्ण बाह्यांचा शर्ट घालून जा. तसच दुपारी १२-४ या वेळात उन्हात व्यायामाला जाणे टाळ. तेव्हा ऊन जास्त प्रखर असते.

नानबा, जेल विकत आणण्यापेक्षा जवळच्या नर्सरीतुन सरळ एक कोरफड घेउन ये. १००% ऑरगनीक लीहीले असले तरीही त्यात माझ्यामते प्रीझर्वेटीव्हज असतातच. त्याचा गर लावुन पाहा.

मला कांजिण्याचे डाग कसे घालवावेत यावर काहि उपाय सान्गेल का?
१० ते १२ year चे जुने डाग आहेत

लाजुर आणि फेशिया साबण पाहिजे असतिल तर एक करा..

सरळ कंपनीला फोन लावु विचारा...कुठे मिळतिल हे सावण म्हणुन्..मी तेच केले..व्यस्थित माहीति देतात..
फोन नं. : 66970977/26053568

लाजुरचि किंमत ७५/- आहे

हि वेबसाईट पहा..

http://sscpl.tradeindia.com/Exporters_Suppliers/Exporter23488.417913/Laz...

चेहर्यावरिल वांग घालवण्यासाठी काही उपाय आहे काय? नक्की माहित् नाहि कि वांग आहे कि पिग्मेंटेशन?
वांग ला english word काय आहे ?

मला कांजिण्याचे डाग कसे घालवावेत यावर काहि उपाय सान्गेल का?
१० ते १२ year चे जुने डाग आहेत

मी आत्ताच या पेजवर आले, सख्यांनो, आपली त्वचा कशीही असूदे त, पण तिला रोज किंवा एक दिवसाआड तरी
CTMP करणे जरुरीचे असते म्हणजे cleansing toning Moisturizing and protection हे मी माझ्या अनुभवावरुन सांगते.चांगल्य कंपनीचे वापरुन पहा नाहीतर मला विचारा

Pages