उजळ कांती हवी

Submitted by webmaster on 3 June, 2008 - 00:45

"उजळ कांती हवी" या विषयावर पूर्वी झालेलं हितगुज इथे वाचा
http://www.maayboli.com/hitguj/messages/103387/107548.html

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

घरच्याघरी चेहेरा स्वच्छ करायला अगदी सोपी पध्दत : पळीभर निरश्या दुधात २ थेंब लिंबाचा रस घालून कापसाच्या बोळ्यानी चेहेरा स्वच्छ करायचा. गार पाण्यानी धुवून, कोरडा करून लाडवाच्या रवाळ बेसनाचा पॅक लावायचा. (बेसन, दूध, गुलाबजल). पॅक कोरडा होत आला की ओल्या कापसाच्या बोळ्यानी हलक्या हातानी काढून टाकायचा. (लाडू बेसन रवाळ असल्यामुळे अनायसा 'स्क्रब' चं पण काम होतं.) गार पाण्यानी पुन्हा चेहेरा धुवून, बर्फाचा खडा चेहेर्‍यावरून फिरवायचा. चेहेरा कोरडा करून सूट होणार्‍या मॉइस्चरायझरनी हलका मसाज करायचा.

मेधा,
संत्र्याची सालीची पुड करुन ती मध, चमचा दोन चमचा दुध / गुलाबजल यात मिसळुन फेस पॅक म्हणुन वापरता येईल. ती केसांना पण चांगली असते. शिकेकाई वापरत असाल तर त्यातही ती पुड टाकता येते.

मीही संत्र्याची साल वाळवून पावडर करुन ठेवलेली मोठ्या कौतुकाने. पण ती वायाच गेली शेवटी. कॉलेज नी नंतर लग्न होईपर्यंतचे दिवस हे सगळं करायचा फार उत्साह होता. हे फेसपॅक बनवा नी ते तोंडावर थापा. डाळीचं पीठ, आंबेहळद साबणाऐवजी मात्र न चुकता लावायचे. तसंच अंघोळीपूर्वी मध नी लिंबू ही नियमित लावायचे चेहर्‍याला.

घरच्या घरी फेशिअल करण्यासाठी

१. प्रथम क्लींजीग मिल्क ने चेहरा स्वच्छ करुन घ्यावा. क्लींजीग मिल्क त्वचेच्या प्रकारा नुसार वापरावे. ( ऑइली असेल तर लेमन बेस्ड असे, ब्युटीक चे लेमन क्लींजीग मिल्क चांगले आहे) ( बॉडी शॉप चे विटामिन ई क्लींजीग मिल्क चांगले आहे कोरड्या किंवा नॉरमल त्वचे साठी).

२. चेहर्‍याला वाफ द्या.

३. ब्लॅक हेड असतील तर ते काढुन टाका ( प्रेस करुन). सवय नसेल तर करु नये
* घरी बनवलेला ब्लॅक हेड रिमुव्हींग पॅक -
एक मोठा चमचा रवा, १/४ चमचा साखर, १ १/४ चमचा गुलाब पावडर
कृती - वरील गोष्टी दुधात किंवा सायीमध्ये मिक्स करुन भिजवुन पेस्ट चेहर्‍याला लावणे व वरील दिशेने चेहर्‍याला मसाज करत चोळणे ५ - १० मिनीटे. मग कोमट पाण्याने चेहरा धुणे.

४. स्क्रब लावुन घ्यावा ( घरच्या घरी केलेला असेल तरी चालतो नाहीतर बॉडी शॉपचा टी ट्री, हिमालयाचा अक्रोड पण छान आहे )
* थंडीच्या दिवसात त्वचा हायड्रेटेड ठेवण्यासाठी
ओट घ्या (घरातील साधे) त्यात थोडे पाणी टाकुन सोक करत ठेवा. मग त्यात मध घाला व चेहरा व हात पाय यांना लावा. थोडया वेळाने धुवुन टाका. याने त्वचा खुप मस्त मउ होते. हे मिश्रण बाथ टब मध्ये टाकले तरी चालते ( चेहर्‍याला लावणार असाल तर पॅक जास्त पातळ करु नका)
ब्लॅक हेड पॅक लावला असल्यास स्क्रब लावु नका.

५. आता आवडते क्रीम किंवा जेल घ्या व त्याने गोलाकार वरच्या दिशेने त्वचेला मसाज करा (मी रिचफिल्डच पीच क्रीम आणलय)

६. आता त्वचेच्या प्रकारा प्रमाणे फेस पॅक लावा. ( मला उर्जीता जैन चे बरे वाटतात, ब्युटीकचा कोमल पण चांगला आहे. युएस मध्ये अवेडाचे चांगले आहेत. )
मग कोमट पाण्याने धुवुन टाका.
अजुन ग्लो हवा असेल तर
चमचा भर मधात एक दोन थेंब लिंबाचा रस टाका थोडी तर असेल चंदन पावडर. व चेहर्‍याला लावा. वाळले की कोमट पाण्याने धुउन टाका.

हो हो टोनर पण वापरा.

अजुन एक घरच्या घरी फेशिअल करायचे असेल तर पंचामृत फेशिअल पण करता येत. मध्ये भारतात बरेच लोक करायचे. यामध्ये पंचामृतातले घटक वापरुन फेशिअल करायचे.

पंचामॄत फेशियल कसं करायचं ते जरा सविस्तर सांग ना स्वाती. आणि त्यातला कुठला घटक कोरड्या त्वचेला चांगला, कुठल्या तेलकट त्वचेला तेही सांग.

अगो,

पंचामृत फेशिअल -
१.प्रथम चेहरा स्वच्छ धुवुन कोरडा करुन घ्यावा. मग थोड्या निरश्या दुधात किंचीत लिंबाचे थेंब टाकावेत ते मिश्रण चेहर्‍याला वरील दिशेने गोलाकार चोळावे (क्लींजींग).

२. वाफ घ्यावी

३. आता स्क्रब- थोडी साखर हातावर घ्यावी (एक मोठा चमचा) त्यात ओलसर पणा साठी किंचीत लिंबाचा रस किंवा थोडे पाणी टाकावे. (साखर पुर्ण विरघळणार नाही याची काळजी घ्यावी) व ते चेहर्‍याला १० ते १२ मिनीटे गोलाकार वरील दिशेने गोलाकार चोळावे. चेहरा कोमट पाण्याने स्वच्छ करावा.

४. आपले आवडते फळ घ्यावे त्वचेला सुट करणारे. केळे, पपई, संत्र किंवा मोसंबीचा रस (तेलकट त्वचा असेल तर). त्याने छान मसाज करावा. मग तुप घ्यावे. (जास्त घेतले तर तुपकट होइल सगळे). त्याने थोडा मसाज करावा. मग कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवावा. थोडे दही चोळावे त्याने तुपकट पणा कमी होतो.

५. मग पॅक बनवा मध, थोडे केळे कुस्करुन, चंदन पावडर, केशर, बदाम उगाळुन ( वाटल्यास लिंबाचा रस दोन थेंब) मिक्स करावे व चेहर्‍याला लावुन ठेवावे. वाळल्यावर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवुन घ्यावा.

हे मी इकडे तिकडे वाचुन बदल करुन केले आहे. पार्लर मध्ये असेच करतात का ते माहीत नाही.

यात शक्यतो बाहेरचे कुठलेही केमीकल नाहीत . हे माझ्या माहीती प्रमाणे सगळ्या त्वचा प्रकाराला चालते. पण तेलकट त्वचा असेल त्यांनी लिंबाचा व दह्याचा वापर थोडा जास्त करावा. थंडीच्या दिवसात हे फेशिअल मस्त वाटते. कोरडी त्वचा असलेल्यांना छान आहे. त्यांनी तुपाचा मसाज जरा जास्त करावा.

ओह हे असे असत का पंचामृत फेशियल. मला वाटले पंचामृत तयार करायचे आणि ते तोंडाला लावुन मसाज करायचा - माझं अज्ञान. बर झाले तू स्टॅप बाय स्टेप लिहीलस स्वाती.

स्वाती, एकदम छान. वफ घेण्याआधी कुठलीही चांगली क्रीम लावावी. आणि वरच्या पंचामृत फेशियल मध्ये मी आवडत्या फळात कधी कधी केळ नाहीतर अवकडो वापरते. मस्त मऊ मुलायम त्वचा... एकदम is it love type? Happy
बाकी स्वाती एकदम सेम फेशियल हो.

हा पॅक करते कधी,

मध, लिंबू रस, चंदन पॉवडर, दूध पॉवडर व हळद.

चेहरा म्हणजे तेलाचा उत्पादन कारखाना होतो.

माझ्या मुलीच्या मते तिचे नाक म्हणजे तेल विहिरी आहेत. किती हवे तितके तेल काढा, कधीच आटत नाहीत.

फेशियलच्या माहितीबद्दल धन्यवाद. करुन पाहते आज. वेळ आहे.

मी सुद्दा कॉलेजात / लग्नाआधी चेह-यावर आणि केसांवर खुप वेळ घालवायचे. चेह-यावर तर कसलेकसले पॅक्स लावायचे.. आई वैतागायची, म्हणायची, थोडा वेळ स्वयंपाकघरातही घालव... Happy
कोडॅक फिल्मच्या काळ्या डबीत मी नेहमी बेसन्+आंबेहळद पावडर ठेवायचे आणि ऑफिसात, बाहेर कुठे गेले तर चेहरा त्यानेच धुवायचे. फक्त आंघोळीच्या वेळीच साबण वापरायचे. बे+आं गेल्या ४-५ वर्षांपासुन बंद केले (कंटाळा), आता परत करते सुरू.

लग्नानंतर १८०% मध्ये आयुष्य वळाले Sad पार्लरमधले फेशियल तर गेल्या १०-१५ वर्षात केलेच नाहीये.

आज रविवार असूनही हे फेशियल करण्यासाठी लवकर उठले . Happy
थँक्स स्वाती , पंचामृत फेशियलची कृती सांगितल्याबद्दल . पंचामृत फेशियलची मी सॉलिड फॅन झालेय . चेहरा इतका nourished & glowing दिसतोय . Happy आता हे नियमितपणे करणार . मी भारतात गेल्यावर आत्तापर्यंत दरवेळी २००० - २५०० रु. ची फेशियल करून घेतलीयेत . आता तिथल्या सरलाज ब्युटी वर्ल्ड मधल्या माझ्या कंन्सल्टंटला नक्कीच माझा चेहरा दाखवून येणार आहे . Happy

स्वाती धन्यवाद रिप्लाय दिल्याबद्दल. लोशन तर लावते ग नेहेमि. पण काय ना फक्त कोपरेच काळे पडत आहेत. अगदि वाईट दिसतात. करुन बघते तु सांगितलेला उपाय.

सहाण आहे का ? बदाम उगाळताना २ थेंब दूध आणि केशराची काडी सहाणेवर ठेवुन त्यावर बदाम उगाळायचा. सहाण नसेल तर वस्त्रगाळ पावडर करुन दूध घालुन १० मिन. ठेवावे. त्यात केशराची काडी घालावी.

स्वाती, मसाज कसा करायचा तेही लिही ना थोडक्यात.

मीही इकडेतिकडे वाचते त्यात बहुतेक वेळा पार्लरमध्ये मसाज जसा करतात तसा करा, माहित नसेल तर जाऊन पहा पण माहिती नसताना उगाच काहितरी उलटा प्रकार करू नका असा सल्ला दिलेला आढळलाय Happy

मला एक प्रकार माहिताय तो म्हणजे चेह-यावर वरच्या दिशेने हळूहळू स्ट्रोक्स देणे. जरा जास्त माहिती दे ना...

मंजूडी,
मध, चंदन पॉवडर व दूध पॉवडर हे ३ चमचे व लिंबू रस २ चमचे व हळद चिमटीभर.(तुमचा चेहरा मोठा असेल तर प्रमाण तसे घ्या , म्हणजे वरच्या ३ गोष्टी ४ चमचे घेतल्या तर लिंबू रस ३ चमचे वगैरे).

हे सर्व मस्त मसाज करत चेहर्‍याला व मानेला लावायचे (मानेला वगळू नका कधीच, नाहीतर मान काळी दिसेल) व डोळ्यावर रोझ वॉटरच्या पट्ट्या ठेवून झोपी जायचे अर्धा तास.
मग अर्धा तासाने एक ओला पेपर टॉवेल घेवून आधी लेप ओला करायचा मग अलगद घासून काढायचा स्पंजने(हा खास स्पंज असतो चेहर्‍यासाठी).
मग लगेच बर्फ फिरवून घेवून चेहरा अलगद फुसून घेवून चांगल्यातले Moisturizers cream लावयचे.

२)कधी कधी दही, स्ट्रॉबेरी पण नुसते लावले ना तरी चेहरा मस्त मऊ होतो.
३) नाहीतर केळं व मध.
खूप कंटाळा आला असेल हे सर्व पॅक बनवायला तर केळं व मध लावून ठेवून धुतला तरी स्वच्छ होतो चेहरा.

<< पंचामृत तयार करायचे आणि ते तोंडाला लावुन मसाज करायचा>> Proud

अरे वा संपदा छान वाटले वाचुन तुम्ही लगेच करुन बघीतले फेशिअल ते. Happy

सर्वांना धन्यवाद प्रतीक्रीयांबद्दल Happy

ते वरती लिहायचे राहीले की केळ किंवा पपइ पुर्ण/ जास्त पिकलेली असावी. वरती बदल केला आहे.

अवोकाडो टीप बद्द्ल धन्यवाद मःनस्विनी Happy वापरुन बघीतला पाहीजे आता.

मुलींनो ते ओट भिजत टाकायचे ते करुन बघा. खरच खुप मस्त मउ होते स्किन. या थंडीतले माझ फेवरेट आहे ते.

साधना, गेले ते कॉलेज मधले दिवस गेले. पण आता हे नवे दिवस आलेत आपण सुंदर नाही दिसणार तर अजुन कोण दिसणार बरे? सो परत सगळे रुटीन सुरु करा आता Happy .

मला ते फेशिअल मसाजचे स्ट्रोक कसे असतात ते नाही माहीती. मी फक्त वरच्या दिशेने गोल गोल असा मसाज करते.

प्रिया ७ ,
लिंबु अर्धे कापुन पिळल्यावर त्याची साल घे त्यात थोडी साखर टाक. मग ते लिंबाच्या सालीच्या आतल्या बाजुने कोपरांवर हळु हळु गोलाकारात घास. असे बरेच दिवस करायला लागते. त्याने डेड स्किन निघुन जाते.

स्वाती, मी अजुनही मला सुंदर दिसते आणि दिसायचा प्रयत्न करते, मग बाकीचे मेले काय हवे ते म्हणोत Proud

अगं, काल घरी जरा उपसाउपशी केली त्यात उर्जिता जैन चे अरोमाथेरपी पुस्तक सापडले, त्यात मसाजची माहिती दिलीय, मी करुन पाहते आधी, आणि जर जमले तर इथेही लिहिते.

हे मॉईश्चराइजर लावणे गरजेचे आहे का? घरच्या घरी दुसरा उपाय नाही?

मी मुलतानी माती+इतर गोष्टी मिसळून पॅक लावते आणि वाळल्यावर थंड पाण्याने धुते. (नो साबण), पण हे केल्यावर चेहरा बराच वेळ किंवा दिवसभर आतुन खेचल्यासारखा वाटतो, कधीकधी विको टर्मरिक लावते पण ते खेचलेपण जाणवतेच...

कोरफडीचा गर मॉईश्चराइजरचे काम चांगले करतो. मला त्याने स्किन थोडी खेचल्या सारखी वाटते म्हणुन मी त्यात दोन थेंब बदाम तेल टाकते. गर रोज ताजा काढुन लावणे शक्य नाही म्हणुन जेल आणावी. ग्रीन फार्मसी किंवा उर्जीता जैन ची चांगली आहे.

मुलतानी माती कमी वापर जर त्वचा कोरडी असेल तर. ती तेलकट त्वचा असणार्‍यांनी वापरावी माझ्या माहीती नुसार.

माझी तेलकटच आहे गं, मी कित्येक वर्षे वापरतेयम मुमा. उन्हाळ्यात तर खुप बरे वाटते लेप लावला की. उर्जिता जैनचा कोरफड जेल आणलाय, रात्री झोपताना लावते. आता पॅकनंतरही लावुन बघेन.. (तसेही चांगले वाटेलच, मी फ्रिजमध्ये ठेवते ना, त्यमुळे चेह-यावर लावल्यानंतर खुप छान गारेगार वाटते. Happy )

(तेलकट त्वचेचा एक फायदा म्हणजे ही त्वचा जास्त काळ तरूण राहते..... माझ्या तरुणपणी कोरड्या त्वचेच्या माझ्या मैत्रिणींकडे पाहुन मी स्वतःला हेच समजवायचे. Happy )

काल रात्री मी मुलतानी मातीत चंदन पावडर मिसळून त्यात लिंबू पिळले आणि चेह-यावर लावले.
आज अगदी छान वाटतंय. मला चेहरा खेचल्यासारखाच परीणाम हवा असतो.
आज मला संत्रासाल पावडर पण मिळणार आहे. ती पण त्या मिश्रणात घालून बघेन.

मि हिमालयाचा ग्रिन कलरचा निमचा एक फेसप्याक आहे तो लावते. मस्तच होते स्किन त्याने. एकदम फ्रेश.
वेळ असेल तेव्हा मुलतानि माति + आंबेहळद पावडर + चंदन पावडर + गुलाबपाणी एकत्र करुन लावते.

चेहरा कोरडा असेल तर वाफ अजिबात घेवु नये त्याने चेहरा अजुन कोरडा होतो आणि संत्रा साल्,चंदन पावडर पण जास्त वेळा लावु नये त्यानेही त्वचा कोरडि होते.

Pages