Submitted by शर्मिला फडके on 14 March, 2010 - 23:54
वेळ वाचवणारे, हेल्दी आणि चवदार असे काही 'वन डिश मील' मेनू इथे लिहूयात. नव्या व जुन्या मायबोलीवरील आहारशास्त्राच्या ग्रूपमधे अन्यत्र लिहिले गेलेले असे पदार्थ एकत्र रहावेत हाच उद्देश आहे. पदार्थ आधी लिहिला न गेलेला असेल तर पाककृती लिहूयात नाहीतर शक्य असेल तिथे लिन्क देऊयात.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी बर्याचदा "मेथीची फळे"
मी बर्याचदा "मेथीची फळे" करते...मस्त डीश आहे..पटकन आणि पोटभर होते !!
माझ्या कडे होणारे वन डिश
माझ्या कडे होणारे वन डिश मिल... वर लिहिल्याच आहेत ह्यातिल बर्याचशा .. तरी पण
आलू परोठे, मेथी परोठे
खिचडी, पापड
मउ भात, मेतकुट, तूप
इडली, चटणी, सांबार
डोसे, चटणी
वेज बिर्याणी
मिसळ
रगडा पॅटीस
पास्ता
नुडल्स बरोबर नॉरच सुप
निबंध ने सांगितलेले सॅलेड
अमृता, नॉरच्या सूप्समधे MSG
अमृता, नॉरच्या सूप्समधे MSG असतं म्हणून आम्ही खाणं बंद केलंय.
अरे, इथं अजून कोणी दाल शोरबा
अरे, इथं अजून कोणी दाल शोरबा लिहिलेला दिसत नाहीए.
किंवा किसलेले पनीर/ चीझ वगैरे आणि झाले!
मूग डाळ भिजवून, भाज्यांसमवेत शिजवून केलेलं दाटसर सूप. त्यात आपले नेहमीचे लवंग, मिरे, दालचिनी, आले किंवा हव्या त्या स्वादाचे मसाले घालायचे, मीठ, कोथिंबीर, हवा असल्यास लोण्याचा गोळा
१.ताकाची कढी. (ही मी
१.ताकाची कढी.
(ही मी सूपसारखी बोलभर पिते)
२. बिशीबेळे अन्ना
३. व्हेज पुलाव
४. वरण फळ.
५. मुगाची खिचडी/टोमॅटो सार
६. ऑम्लेट ब्रेड
७. रात्रीची उरलेली भाजीत पाव भाजी मसाला घालायचा आणि ब्रेडबरोबर खायची.
८. तवा पुलाव (माय्बोलीवरची रेसिपी झिंदाबाद)
९. तांदळाची उकड
१०. आयता पिझ्झा बेस आणला असेल तरच घरी केलेला अन्यथा फोनवर मागवलेला पिझ्झा
११. शेवयाची खीर
१२. टोमॅटो आम्लेट/ रवा डोसा (लई फास्ट होतात हे पदार्थ)
१३. थालिपीठ लोणी आणि लाल मिरचीचा ठेचा
भूक लागली आता मला!!!
नॉरच्या सूप्समधे MSG असतं
नॉरच्या सूप्समधे MSG असतं म्हणून आम्ही खाणं बंद केलंय.>> ओह... अरेरे नॉरच सूप आवडत आहे ग.. जुई पण अगदी आवडीने खाते.
मला पण फार आवडायचं गं अगदीच
मला पण फार आवडायचं गं
अगदीच कंटाळा आला तर मी सातुचं पीठ + गूळ + कोमट पाणी असं खाते. दूध आवडणार्यांनी दूध घालावं. कधी त्यात चमचाभर जवस किंवा थोडे आक्रोड घालते. आधी किंवा नंतर एखादे फळ अथवा ज्यूस. पोटभर होतं.
माझा आवडता शॉर्ट कटः Grilled
माझा आवडता शॉर्ट कटः Grilled veggies (multi colored bell peppers+zucchini+ white onion) with brown rice :).
Veggies ना आवडत्या सिझनिंग पावडर बरोबर ऑलिव्ह ऑयल/ऑलिव्ह ऑयल स्प्रे आणि कोथिंबीर लाऊन ठेवायचे, नंतर ग्रिल करायचे , Serve करताना लिंबु पिळून चिलि गार्लिक पावडर sprinkle करून garnish करायचं :).
Brown rice बरोबर काँबिनेशन छान लागतं.
सायो , हिरव्या मूग डाळीच्या
सायो , हिरव्या मूग डाळीच्या सूप ची रेसिपी देशील प्लीज?
गोड घावना विषयी कोणीच लिहिलेल
गोड घावना विषयी कोणीच लिहिलेल दिसत नाही. ते सुद्धा चविष्ट व पोटभरू असते. करायला वेळही कमी लागतो.
गरम गरम गोड घावन व त्यावर तुपाची धार!
वा क्या बात है!
ग्लेझ्ड कॅरट्स हा पण एक छान
ग्लेझ्ड कॅरट्स हा पण एक छान प्रकार आहे.
त्यासाठी गाजराचे सारख्या जाडीचे तूकडे वा चकत्या करुन घ्या. त्यात चवीप्रमाणे मीठ, साखर, तूप (वा तेल) आंइ मिरिपूड वा तिखट घाला. दोन मिनिटाने हे सगळे गॅसवर ठेवा. झाकण ठेवा. दोन मिनिटाने याला पाणी सुटेल. झाकण काढा व थोडे पाणी आटू द्या (इतपतच मूळ कृति आहे )
हे चवीला छान लागतात.
यातच कोरडी कणीक वा शिळा ब्रेड मिक्सरमधून काढून टाका. व तूकड्याना कोट होईपर्यंत परता. वरुन लिंबूरस पिळा व थोडी कोथिंबीर टाका.
ग्लेझड कॅरेट्स करताना
ग्लेझड कॅरेट्स करताना पांढर्या साखरे ऐवजी मध/ब्राऊन शुगर आणि तुपा ऐवजी बटर वापरुन बघा.... एकदम मस्त गुळचट चव येते....
उपासाचे थालिपीठ साबुदाणा
उपासाचे थालिपीठ
साबुदाणा खिचडी
बीट कटलेट / व्हेजिटेबल कट्लेट
बटाट्याचा / रताळ्याचा कीस
बटाटा/ मुळा / मेथी / पालक पराठे
कुळथाचे पिठले + भात
कुळथाचे पिठले + भात
सावनी, तुझी विपु पहा.
सावनी, तुझी विपु पहा.
सुनिता, गोड घावन कणिकेत गुळ
सुनिता, गोड घावन
कणिकेत गुळ विरघळवून किंचित पाणी आणि अगदी कणभर मीठ घालून नॉनस्टिकवर अंबोळीसारखं सोडून दोन्ही बाजूनी भाजून खायचं... यम्मी.... मस्तंच लागतं.
प्रिती , चिकन जस्ट लहान तुकदे
प्रिती , चिकन जस्ट लहान तुकदे करुन ठेवायचे कि आधि तेलावअर २ मिन. परतावयाचे?
चिकन जस्ट लहान तुकदे करुन
चिकन जस्ट लहान तुकदे करुन ठेवायचे कि आधि तेलावअर २ मिन. परतावयाचे>> अगदी तसचं, मोठे पिस पण चालतात, नवरा त्याचे तुकडे पण करत नाही(मी बोनलेस चिकनबद्दल बोलतेय)
अजुन काही डिश---
शेवयाची खिचडी,
एकत्र पिठलं भात शिजवणे,
भोपळ्याचा भात,
शेपू/मेथी फळं
एग रोल
ग्वाकोमोली ग्रील्ड सँडविच
गोड घावन तांदुळाच्या पिठीचे
गोड घावन
तांदुळाच्या पिठीचे (तांदुळ धुऊन सावलीत वाळवून बारीक दळलेले) घावण घालून त्यात गुळचूण भरून फोल्ड करणे (गुळचून्=गूळ+ओले खोबरे+वेलची पूड तुपावर शिजवलेले).पण हे वन डिश मील कसे होईल्.त्यात आहारातले सगळे घटक मिळायला हवेत ना? घावण , गूळ विरघवळलेल्या नारळाच्या रसाशीही (अहाहा) स्वर्गीय लागतात.
सुनिधी, पोळीचा कसेदिया - हा
सुनिधी, पोळीचा कसेदिया - हा कसा करायचा ?
कढीगोळे आणि भात.
कढीगोळे आणि भात.
गव्हाच्या पीठापासून बनवलेला
गव्हाच्या पीठापासून बनवलेला बनाना ब्रेड आणि ग्लासभर दूध. ब्रेड आधीच तयार असेल तर दूध गरम करण्याचे कष्ट (:फिदी:) करावे लागतात फक्त.
अजून एक प्रकार- बार्ली
अजून एक प्रकार- बार्ली सूप.
पर्ल बार्ली आधी शिजवून घ्यायची. मग त्यात व्हेज/चिकन स्टॉक, हव्या त्या भाज्या, चिकन किंवा श्रिंप, थाई करी पेस्ट घालून सूप बनवायचे. छान पोटभरीचे जेवण होते.
माझे आवडते वन डिश पदार्थ १.
माझे आवडते वन डिश पदार्थ
१. मिश्र पिठांची भाज्या घातलेली धिरडी
२. उरलेल्या भाज्या, उसळी, आमट्या घातलेला पास्ता, वरून किसलेलं चीझ किंवा सलाड ड्रेसिंग. त्यात चिकन करी उरली असेल तर बेष्ट, नाहीतर उकडून किंवा स्क्रॅम्बल्ड अंडं. चवीप्रमाणे कांदा, लसूण, तिखट, मसाले, लिंबाचा रस वगैरेतलं हवं ते घालते. फ्रीजमध्ये काय उरलंय त्याप्रमाणे दरवेळी वेगळी चव.:)
चिकन/ मट्न बिर्यानी. मायक्रोवेव मध्ये केलेली. बिर्यानी लावून कामे उरकता येतात. >>> मामी रेसिपि द्या ना
मलाही हवीय ही रेसिपी.
माझे काका हा पदार्थ करायचे
माझे काका हा पदार्थ करायचे -
नेहेमी प्रमाणे ऑम्लेट केले की पोटभरीचे.
उरलेल्या भाताला थोडे तिखट्मीठ लावायचे. तव्यावर पसरायचे. अंडे फेटून त्यात तिखट मीठ घालून ते पसरलेल्या भातावर एकसारखे ओतायचे
एग पाय पण मस्त होतो. ब्रेडबरोबर खाता येतो.
मोड आलेल्या हिरव्या मुगाचा
मोड आलेल्या हिरव्या मुगाचा डोसा/ धिरडे व कोणतीही दह्यातली चटणी - अत्यंत दमदमीत बसते पोटात.
तांदूळ व मूगडाळ एकत्र शिजवून जो भात होतो असा भात - तूप -मीठ - लिंबाचे लोणचे
किंवा भात - दूध - दही. अप्रतिम चव लागते.
व्हाईट सॉसमध्ये आपल्या आवडत्या भाज्या [ दुधी, गाजर, श्रावण घेवडा, स्वीट कॉर्न, बटाटा इ.] उकडून, तुकडे करून घालायच्या, वर मीठ, मिरपूड, हव्या तर मिक्स्ड हर्ब्ज, हिरवी मिरची गॅसवर भाजून घालणे. गरम/ गार मस्त लागते. ब्रेड/ पोळीबरोबर मस्त लागते. व्हाईट सॉस = प्रमाण १ कप दूध + १ टेबल्स्पून लोणी + १ टेबल्स्पून मैदा/ तांदळाचे पीठ.
कल्पा, विचारपुस मधे लिहिले
कल्पा, विचारपुस मधे लिहिले आहे.
मेथीची भाजी बाजरिचे दिवसे
मेथीची भाजी बाजरिचे दिवसे मेथीची पान तेल लसुन मिरची मीठ टाकुन करायची आणि
बाजरिच पीठ मळुन त्याचे छोटे गोल बजुनि कढइत लाउन वाफवायचे थोडे तेलात खर्पुस होतात
वन डिश मील-
वन डिश मील- पोटभरीचे..........
१. मिक्स व्हेज दलिया... म्हणजे गव्हाचा दलिया मिळतो बाहेर (जाड भरडलेला गहू) तो तुपावर भाजून त्यात आवडीच्या भाज्या घालून मस्त न्युट्रीशस पोटभरीचा आणि तरीही स्वादिष्ट पदार्थ तयार होतो. मेन म्हणजे मुलं पण आवडीने खातात. इन्डायरेक्टली, पोळी भाजी खाल्यासारखंच.
२. शिळ्या भाताचं थालिपीठ ........ फोडणीचा भात खाऊन बोअर झाल्यावर हे करायला हरकत नाही.
नोर चे सूप अजिबात पीऊ नये का?
नोर चे सूप अजिबात पीऊ नये का? की अधे मधे पीऊ शकतो?
Pages