डीसी जीटीजी १०,११ एप्रिल २०१० (वसंता आला!!)

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

ऐन वसंतात एका वेळी...

कार्यक्रमाची रुपरेषा साधारण अशी-

१. शनिवारी सकाळी ११ वाजेपर्यंत सगळे आमच्या घरी या. दुपारचे जेवण, गप्पा करुन मग डीसीमध्ये जाता येईल.
२. डीसीत भटकून झाल्यावर रात्रीची खादाडी restaurant मध्ये बुकिन्ग करुन करता येईल, तिथेही गप्पा मारता येतील. वेगळ्या हॉलची गरज नाही.
३. शनिवारी मुक्काम करणार्‍यांना हॉटेलमध्ये रहायचे असेल त्यांना मध्यवर्ती ठिकाण सुचवता येईल. ज्यायोगे त्यांना दुसर्‍या दिवशीही डीसीत जाता येईल. तसे कळवा.
४. ज्यांना शनिवारीच परत जायचे आहे त्यांना जाता येईल.
५. ज्यांना रविवारी सकाळी परत जायचे तर जाता येईल, किंवा ज्यांना पुन्हा डीसीला भेट द्यायची आहे त्यांना स्वतंत्रपणे डीसीत जाता येईल.

विनयचा वृत्तांत :
http://www.maayboli.com/node/15357

वसंता आणि त्याची सेना (स्वाती आंबोळे)
http://www.maayboli.com/node/15344

आवाज कुणाचा? (अटलांटाकरांचा!): (नानबा)
http://www.maayboli.com/node/15359

डिसी स्नेहसंमेलन - शिट्टीच्या चष्म्यातून (अमृता)
http://www.maayboli.com/node/15360

लाफींग बेडुक आणि ब्रँडी (विनायक)
http://www.maayboli.com/node/15363

डीसीत वसंत बहरला (स्वाती_दांडेकर)
http://maayboli.com/node/15365

वाढीव नंबराचा चष्मा (सिंडरेला)
http://www.maayboli.com/node/15406

डीसी महागटग वृत्तांत - नवीन अचूक किनार्‍यावरून (सशल)
http://www.maayboli.com/node/15435

कल्लोळातील उरलेसुरले (दीपांजली, लालू)
http://www.maayboli.com/node/15405

आणि..
डीसी गटग : धॄतराष्ट्राच्या पट्टीमागून (संतोष किल्लेदार)
http://www.maayboli.com/node/15665

विषय: 
प्रकार: 

सर्वात कौटुंबिक जिव्हाळा आयडी पुरस्कारः
नॉमिनेशस्न्सः
पूनम वहिनी
श्र माता
अश्विनीमामी
मिन्वाज्जी
अ‍ॅडमिन दादा
झारा वहिनी
दिनेशदा
वैद्यबुवा
घारुअण्णा

(नोंद: अनेक अक्का असल्यामुळे या 'अक्का' पुरस्कारा साठी सेपरेट कॅटेगरी आहे)

मिन्वाज्जी राहिल्या की Happy आणि आमच्या फचिनमामाला काय म्हणून वगळलं ? Wink अमृताला असामी मामी म्हणतो ना ? तिला पण घ्या.

चमन, मी कधी, कुठल्या गटगला टांग मारली सांग बरं.

सगळ्यात रडतराऊ आयडी
सगळ्यात ड्यँबीस आयडी
सगळ्यात कुच्चर आयडी (वेगवेगळी संयोजक मंडळे ह्याची नॉमिनेशन्स देऊ शकतात)

फ्रीजमधे ठेवून द्या ना!

शिवाय फॅन्सि ड्रेस साठी पण एक बक्षीस पाहिजे. नऊवारी साडी उत्तम रीतीने नेसून किमान अर्धा तास वावरणे, धोतर नेसून किमान अर्धा तास रहाणे इ.

अरे त्या तेरा मुलांपैकी तेराच्या तेरा जणांना पण काहीतरी बक्षिसे द्यायला पाहिजेत. इतका वेळ मोठ्या लोकांबरोबर रहाणे म्हणजे काही गंमत नाही!!

आणि मी आलो नाही तरी मला मिळालेली सर्व बक्षिसे कुणाकडे तरी देऊन ठेवा. नंतर कधी भेटू तेंव्हा घेईन मी ती.

कौटुंबिक जिव्हाळा? माझ्याच कुटुंबाविषयी ना ?
<<< हाहाहा, कौटुंबिक जिव्हाळा ना तुझ्या ऑफिशियाल ना तुझ्या इतर(!) कुठल्या कुटुंबा बद्दल.!! Proud
हा जिव्हाळा फक्त मायबोली वरचा म्हणजे मायबोलीवर आपली इमेज 'ताई /माई /अक्का,/ दादा /वहिनी/ अण्णा आज्जी आणि बुवा' अशी बनवणारर्‍या आयडी चा , कळलं ?:फिदी:

डिज्जे, कैतरी हां !बुवा हा आयडी कौटूंबिक जिव्हाळ्याचं प्रतिक? अरे बुवा लोकांना, बुवाबाजीला फसुन कित्येक कुटूंब उध्वस्त झाली आहेत. परवा मला खरं तर इथल्या बहुचर्चित आक्षेपार्ह आईच्या "त्या" ला बुवा बनवुन एकदम भन्नाट शेवट करायची आयड्या आली होती पण नेमका वेळ नाही मिळाला.

भावना पोहोचल्या बरका! Happy
बाकी पार्ल्यात दोन काकवांनी मल या कॅटेगरित नॉमिनेट केल्याची एकदम वेगळी कारणं सांगितली.

अरे हो आणखी एक राहीलच....सर्वात जास्त चिज केक आवडणारे मा बोलीकर....दोनच नॉमीनेशन्स आहेत....

झाले! आता शेपूत पण प्रकार का? मुख्य शेपू, दुय्यम शेपू!
सगळ्या पालेभाज्यांना खरे तर 'पालेभाज्या' हे एकच नाव असावे. भरपूर मसाला घालून भाजी केली की कसली भाजी आहे त्याचा पत्ता लागू नये.

>>>> ब्लड्प्रेशर म्हणजेच अर्धशिशी? लिंब्या, वैद्यकीय शास्त्रात पण ज्योतिषाचे सिद्धांत वापरायला लागलास की काय?
आय्ला, रात्र आमच्याकडे झालीये, तुमच्याकडे सकाळीसकाळीच? Biggrin
लेका मधली ऑर/किन्वा ची ही अशी "/" तिरकी रेषा दिसेनाशी झाली का येवढ्या सकाळीच? Wink

Pages