हार्ड रॉक कॅफे

Submitted by अश्विनीमामी on 2 February, 2010 - 21:41

बरेच दिवस मनात होते आज इथे इन्ग्रजी सीरीअल्स वर धागा निघाला आहे म्हणून धाड्स केले आहे. हिन्दी व मराठी गाणी खूप आवड्त असली तरी कधी कधी असा मूड असतो की हार्ड रॉक, पॉप, सॉफ्ट, कंट्री वेस्टर्न संगीत फार परफेक्ट वाट्ते. मेट्ल/ ट्रान्स/ हाउस सुद्धा. कधी मस्तीत नाचायचा मूड असतो तर कधी अनप्लग्ड गाणी ऐकायचा.

मी स्वतः कायम बास बूस्टर चालू ठेवूनच गाणी ऐकते. त्यात ड्र्मस, गिटार वगैरे फार आवडीचे. शाळेत असताना आबा, बोनी एम झाले, अकरावीत स्टेयिन्ग अलाइव व इतर. वेळ व संधी मिळेल तसे हे पाश्चात्य
संगीत ऐकणे चालूच राहिले. आता तर घरात कायम ढुम टाक ढुम टाक चालूच असते. रोलिन्ग स्टोन्स मासिक जेव्हा परवडेल तेव्हा आणते. ब्रायन अडॅम्स, मडोना( जुन्या काळातील) एल्विस, रिकी मार्टिन
नंतर आपली जनरल पार्टी सॉन्गस पण खूप मजा आणतात. ब्रिट्नी, मायली, जोनास हे तरूण कलाकार कधी कधी मजा करून जातात. आफ्रिकन रिदम्स, ओरिजिनल मूवी साउंड ट्रॅक्स, आवड्ते ग्रूप्स बद्दल वाचायला खूप आवडेल. आपल्याला कोणती गाणी व का आवडतात ते लिहा. कॉन्सर्टस बद्दल लिहा. माझे ज्ञान व आपला आनंद द्विगुणित करा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वॉक लाईक अ‍ॅन इजिप्शीअन (बँगल्स),
आइस आइस बेबी (वॅनीला आइस) (की आईस? स्मित)
फंकी टाउन
लंबाडा>> आशिश, हे तीन मला माहिती व आवड्ते. आपण सगळे मिळून एक रोलिन्ग स्टोन मासिक घेउत की.
डोण्ट वरी बी हॅपी हे अगदी कायम प्ले लिस्ट वर.पुर्वी जुन्या एम्टीवी वर ( नोनी वगैरे असताना) खरेच बिल्बोर्ड काउंट डाउन वगैरे यायचे, अनप्लग्ड यायचे. आता औषधालाही परदेशी गाणी व वीजे दिसत नाहीत. अनुशा दांडेकर सार्खे हायब्रीड आता.

राज तू फार्फार फार्फार जळवतोहेस. काल बोस ५.१ म्हणाला. आज लाइफ स्टाईल ६. आणि झून का? आयपॉड आवड्त नाही का? आज सीएनएन.कॉम वर एका जाणत्या गोल्फर ने टायगर चे कान उपट्ले आहेत. वाच मजा वाटेल.

जस्ट अनदर डे इन प्यारेडाइज पण लै आवड्ते.
एनिग्मा पण. पूर्ण अंधारात ऐकायचे लै भारी वाट्ते.

काल झक्कींचे पहिले पोस्ट वाचल्यावर काय वाट्ले सांगू?
उप्स आय डिड इट अगेन! Happy

आम्हाला गती शून्य. चिरंजीव मात्र आयपॉड्वर पीसीवर, एम पी ३ प्लेअरवर काय काय ढॅण ढॅण ऐकत असतात देव जाणे. मला तर इंग्रजी गाण्याचे शब्दच कळत नाही. त्याला म्हणले अरे तुला काही कळते का यातले. ? नुसतं आपल. शायनिंग मारायला अन पाय हलवण्यापुरतं नाटकं करतो आहेस. गाण्याचे शब्द तरी कळताहेत का तुला?"
त्यावर त्याने चालू गान्याचे सर्व लिरिक्स ऐकवले. परत त्याच्या नादी लागलो नाही. Proud

मला पण आबा ( अ‍ॅबा?) चीगाणी किती सरळ व सोपी आहेत ते आत्ता ममामिया सिनेमा पाहुन व ऐकूनच कळले. एक गाणे आहे असेरेहे ...... त्याचे लिरिक्स तर त्यांना देखील कळतात की नाही असे वाट्ते पण गाणे लै झ्याक.

कुणाला ennio morricone आवडतो का?
मला the good, the bad the ugly आणि अ फ्यु मोर डॉलर्स दोन्हीच्या थिम्स आवडतात.
यू ट्युबवर - वाईल्ड हॉर्सेस म्हणून सर्च मारा.. फ्यु मोर डॉलर्स मधली थिम येईल.. जस्ट लव इट!

असेरेहे गाणं (केचप साँग) आम्ही मैत्रिणी पाठ करून एकत्र गायचो !! धमाल ! Happy आता नीट आठवणार नाही!
असेरेहे हा दे हे दे हेबे तु दे हेबेरे सेबीनोबा महाबि अनदे बुगिआना बुडिडिपी Proud Proud

सगळीच गाणी आवडतात ही.. मी काय वेगळी लिस्ट करू?
टेक माय ब्रेथ अवे -चांगले आहेचे, पण मला बहुतेक टॉम क्रुझमुळे इतके आवडायचे.
बॅक्स्ट्रबॉय्झ, जेलो, एन्रिक यांची ऑल्मोस्ट सगळी गाणी! एन्रिकचा इन्सॉम्निया अल्बम फार सही आहे !
माझ्या लिस्ट मध्ये एनिग्मा आणि मायकेल जॅक्सन टॉपला.. एम्जे ची गाणी भयंकर प्रिय आहेत!

रिहानाचे अम्ब्रेला, Christina Aguilera चे जिनी इन द बॉटल, सिंडी लोपरचे गर्ल्स जस्ट वॉना हॅव फन,
इत्यादी इत्यादी पण आवडतात..

अरे.. इथे हार्ड रॉक पेक्षा पॉप, सॉफ्ट रॉक यावर जास्त पोस्ट दिसताहेत.
माझेही २ पैसे (सगळ्याच पद्धतीची गाणी)
रॉक मध्ये पिंक फ्लॉईड, बॉन जोवी, एरोस्मिथ, डीप परपल, सॅवेज गार्डन, बीटल्स, एरिक क्लॅप्टन, यु २, निर्वाणा, एम एल टि आर इत्यादि
पॉप मध्ये अर्थात एमजे, मॅडोना, बॅकस्ट्रीट बॉईज, बॉय झोन वगैरे
जनरल मध्ये ब्रायन अ‍ॅडम्स, वेंगा बॉईज, शॅगी, ए बी बी ए, जॉन एल्टन अजूनही बरेच
आवडती गाणी (अनुक्रम आवडीप्रमाणे नाही)
१. समर ऑफ सिक्स्टी नाईन
२. डॉन्ट प्ले गेम्स विथ माय हार्ट
३. कॅन आय टच यु देअर
४. नथिंग्स गॉना चेंज माय लव्ह फॉर यु
५. स्मोक ऑन द वॉटर
६. द अर्थ
७. सॅक्रीफाईज
७. मिस्टिरियस गर्ल
८. हॅव यु एव्हर रिअली
९. हॉटेल कॅलिफोर्निआ
१०. एल अरबी
११. द डार्क साईड ऑफ द मून
अजूनही अनेक
अगदी डॉ. जोन्स, मारिया, सिमरिक आणि ब्राझिल सुद्धा..:)

.

रॉक संगीतातले अजुन काही आवडते कलाकार...

एरीक क्लॅप्टन - चेंज द वर्ल्ड, लेला, माय फादर्स आइज, टीअर्स इन हेवन आणि बरीच क्लॅप्टन क्रोनिकल्स या अल्बम मधली
फिल कॉलिन्स - सुसुडीओ, वन मोर नाइट, डोंट लुझ माय नंबर, टेक मी होम आणि इतर नो जॅकेट रि॑क्वायर्ड मधुन
ट्रु कलर्स, अनदर डे इन पॅराडाइज, ईझी लवर, यु कांट हरी लव, इन द एयर टुनाइट आणि इतर फिल कॉलिन्स हिट्स मधुन

एरीक क्लॅप्टन एक उत्तम गिटारीस्ट सुद्धा आहे.
एंजॉय: http://www.youtube.com/watch?v=aFwMvlPu4Qw&feature=related

काल इथे हॉटेल कॅलिफोर्निया बद्धल लिहील्यानंतर ते गाणं बोस वर दोनदा ऐकलं; आहाहा कांसर्ट मधे पुढच्या रांगेत असल्यासारखं वाटलं... Happy

मामी, माझ्या मते झुन आयपॉड पेक्षा चांगला आहे; फिचर्सच्या बाबतीत. व्हाय्-फाय, रेडीयो, सॉफ्टवेअर अपडेट ई. त्यात मी MSFT चा जुना भक्त आणि शेअरहोल्डर... Happy

झुनला गाणी आय ट्युनसारखी मिळत नाहीत. झुन मला मुम्बैत कुठे मिळाला नाही. एकाने तर मी मायक्रोसॉफ्टचं काही ठेवत नाही असं (पुणेरी) तुच्छतेने एफ सी रोडवर ऐकवलं. हीरा पन्ना तही नाही. तिथं तर ते आता जुनं झालं, बन्द झालं असं काय काय सांगितलं त्यामुळे आय पॉडला सध्या पर्याय नाही. बोस ५.१ , व लाइफ स्टाईल फार बरी नाही वाटली. हाऊ डू यु फील असं विचारून ते लोक सारखा कबुलीजबाब घेत आहेत असे वाटले. बोसचा दर्जा नाही उच्च वाटला. आणि किमती तर अवास्तवच आहेत. मामीना ते छोटे स्पीकर काय आवडतात कुणास ठाउ़क्.त्यासाठी बोस प्रकरण गळ्यात मारून घेणं वर्थ नाही असे मला वाटले. साले सुटे स्पीकरही विकत नाहीत. बोसच्या वूफरचा काही तरी लोच्या आहे असे वाटते...

आयपॉड्वर पीसीवर, एम पी ३ प्लेअरवर काय काय ढॅण ढॅण ऐकत असतात देव जाणे. मला तर इंग्रजी गाण्याचे शब्दच कळत नाही.>> ईअरफोनवर ऐका कळतील शब्द.

असाम्या सगळं करून झालय. नेटवरून लिरिक्स तपासून पाहिले तर शब्द एक अन उच्चार दुसराच हे नाटक तिथंही असल्याचं दिसलं.... बर्‍याच लोकाना लिरिक्स अजिबात कळत नाहीत असा माझा दावा आहे. (खरं तर आपल्याही रागदारी खयालाच्या चीजेचे शब्द गायक लोक कुठं कळू देतात आपल्याला. भीमसेन यांचे गुरु असावेत :फिदी:)

कार्पेन्टर चे जम्बला या तर कुठल्या कुठे आहे. मात्र चाल भन्नाट...

>>बोसचा दर्जा नाही उच्च वाटला <<
भारतात कल्पना नाही पण अमेरीकेत अजुन बोस ने आपला कंपॅटिटिव अ‍ॅडवँटेज टिकवुन ठेवला आहे. कंपनी अजुनपर्यंत अमर बोसच्या मालकीची आहे; पब्लीक लिमिटेड नाही. इतर कंपन्यांची सराउंड साउंड सिस्ट्मचे अवजड स्पीकर्स, वूफर्स आणि रीसीव्हर्स्/अ‍ॅम्प्लीफायर्स च्या तुलनेत बोसचं कॉम्पॅक्ट डीझाइन अत्युत्तम आहे. साउंड क्वालीटीचा तर प्रश्नच नाही. हो, किंमत जरा जास्त आहे पण इट्स वर्थ; मी वर म्हटल्याप्रमणे कांसर्ट क्वालिटीचं संगीत अनुभवता येतं. लताबाईंचं "अरे अरे ज्ञाना झालासी पावन" म्हणजे अगदी ब्रम्हानंदी टाळी लागल्याची अनुभुती. Happy

भारतात कल्पना नाही पण अमेरीकेत अजुन बोस ने आपला कंपॅटिटिव अ‍ॅडवँटेज टिकवुन ठेवला आहे>> अमेरिकेत बोसची सिस्टम मिडल टियर गणली जाते बहुतेक. म्हणजे सर्किट सिटी, किंवा बेस्ट बाय सारख्या दुकानातनं मिळणारे स्पीकर्स सोनी, पॅनॅसॉनिक वगैरे खालचा टियर. बोस, काही यामाहा हे मधले टियर अन पोल्क, क्लिप्श, के इ एफ वगैरे हे वरचे टियर.
हाय एंड होम थियेटर सेट अप विकणार्‍या दुकानात गेल्यास यातले बरेचसे कॉंपोनंट ऐकायला मिळतील. जोधा अकबर ची सी डी घेउन जावी व सगळ्या प्रकारच्या स्पीकर / रिसीव्हर काँबो वरती ऐकून पहावी.

बोसची सिस्टम घेतली तर सगळे काँपोनंटस त्यांचेच घ्यावे लागतात. स्पीकर्सचा आकार लहान अन दिसायला आकर्षक असला तरी मोठ्या खोल्यांमधे त्यांचा आवाज कर्कश्श वाटतो. आवाजाने रुम भरली असं वाटत नाही. माझं अनेक वर्षांचं स्वप्न होतं बोस सिस्टम घेण्याचं. पण इतर रिसीव्हर व स्पीकर्स वर जोधा अकबर ऐकल्यानंतर इट वॉज अ क्लीयर चॉइस नॉट ट गेट बोस !

>>स्पीकर्सचा आकार लहान अन दिसायला आकर्षक असला तरी मोठ्या खोल्यांमधे त्यांचा आवाज कर्कश्श वाटतो. <<
१००% असहमत. बोसच्या स्पीकर्सचं डिझाइन रीफ्लेक्टिव टेक्नॉलॉजी वर आधारीत आहे. घरी बसवल्यावर त्यांचं ट्युनींग आवश्यक आहे; सबवूफर कुठे ठेवायचा तेही महत्वाचं. ट्युनींग व्यवस्थीत केलं नाही तर हवा तसा इफेक्ट मिळणार नाही. मी जोधा अकबर अजुन पाहीला नाही पण इतर हॉलीवूड सिनेमे ज्यांत THX सराउंड साउंड आहे ते पाहीले आहेत. इतर होम थीएटर्सच्या थोबाडात मारेल असा परफॉर्मंस. Happy

मी बोसच्या लाइफस्टाइल सीरीज बाबत बोलत आहे; जस्ट टु मेक शुअर वी आर नॉट कंपेअरींग अ‍ॅपल्स टु ऑरेंजेस... Happy

लालु, इथे फरक कळतोय कोणाला? हुडाने म्हंटल्यप्रमाणे शब्दपण कळत नहीत. पण संगीत छान वाटते म्हणुन ऐकायचे (पुन्हा पुन्हा).

अजुन २ आवडती गाणी
मॅन मशीन
फ्लॅशलाईट ऑन अ डिस्को नाईट

मलादेखिल आवडते संगित.. पण काहि अतिकर्कश वाटते तर काही परत परत ऐकावेसे वाटते..
पण ह्या रॉक वाल्यांचा अवतार मात्र बघण्यासारखा असतो.. Proud
रॉक गाणी म्हणाल तर मला सॉफ्ट रॉक आवडते..
मग ते हॉटेल कॅलेफोर्निया असो कि वॉल्क लाइक इजिप्शन असो की आपला एलविस प्रिसले असो..
नव्या जमान्यातले
# ब्रायन अ‍ॅडम्स
-समर ऑफ सिक्स्टीनाईन,
-एवरीथिंग आय डु,
-प्लिज फरगिव मी,
- हॅव यु रियली लव वुमन
- हियर आय एम

# बॉन जोवी -:
- इटस माय लाइफ

# मायकल लर्न्स टु रॉक (माझा सर्वात आवडता रॉक बँड.. आवर्जुन ऐका.. )
- समडे समव्हेअर
- पेंट माय लव
- दॅट्स व्हाय यु गो अवे
- स्लिपींग चाइल्ड
- ब्ल्यु नाईट

# क्रिड - आय एम फ्रि

# रेड हॉट चिली पेपर्स - "स्नो , हे यो लिसन वॉट आय एम से हो" (हे गाणे तर धमाल आहे.. नि एकदम ताल धरणारे आहे.. नसेल ऐकले तर ऐकाच.. मोठ्या आवाजात :P)

# सेवेज गार्डन (आवाज मस्तच)- "टु द मुन एन्ड"

सध्याला एवढीच लिस्ट माझी.. Proud

तसे म्हणायला हिंदी रॉक संगित नि सध्या अवधुतचे मराठी रॉक संगित देखील चांगले आहे..
rockstar.gif

माझे रॉक आवडणारे मित्र तर गन्स अँड रोझेसला सुद्धा पॉपिश रॉक म्हणतात.. तुम्ही तर कुणाकुणाला आणायला लागलाय राव रॉक मध्ये.. ब्रायन अ‍ॅडम्सला वगैरे रॉक म्हणणे म्हणजे रॉक संगीताचा अपमान आहे Happy Light 1

मामी, मला आवडणार्‍या गाण्यांची एका पोस्टात यादी देण्यापेक्षा मी त्या गाण्यांवर थोडेथोडे लिहिले तर चालेल का ? तुमची परवानगी गृहित धरून कालानुक्रमाने सुरूवात करतो Happy रॉकची मुळे फोक, फोक रॉक, सदर्न, रॉकबिली अश्या संगीतात आहेत. तेव्हा त्यांच्यापासून सुरूवात केली तर चालेल अशी आशा आहे.

साठीचा काळ म्हणजे सार्या जगभरातला राजकीय चळवळींचा काळ होता. अमेरिकेत 'फ्लॉवर पॉवर' उदयाला येत होती. कृष्णवर्णीय त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी भांडत होते, शीतयुद्ध जोरात होते, तरूण पिढी प्रचंड अस्वस्थ होती, चळवळी होती. गिन्सबर्गसारखे बीट-कवी तरूणांना चेतवत होते. त्यातून 'काउंटरकल्चर' निर्माण झाले.

पीटर, पॉल अँड मेरी हा साठीच्या दशकातला एक खूप गाजलेला ग्रुप. या त्रिकूटाने इफ आय हॅड अ हॅमर' हे गाणे गायले. स्थळ होते वॉशिंग्टन डीसी आणि वेळ होती मार्टीन ल्युथर किंग ज्यु. यांच्या 'मार्च ऑन वॉशिंग्टन'ची. ('आय हॅव अ ड्रीम' हे भाषण तेव्हाच केले). अगदी कमीत कमी वाद्यरचना, एकमेकांत मिसळून जाणारे आवाज, लोकसंगीताचा बाज असलेले संगीत आणि समजायला अतिशय सोपी, साधी पण सामाजिक आशय असलेली गाणी हे तिघे गात होते. साहजिकच ही गाणी गुणगुणायला सोपी आहेत आणि मला फार आवडतात. मेरीची गाणी ऐकली की ती घायकुतीला आलेली वाटते आणि तेच तिच्या आवाजाचे वैशिष्ट्य होते. त्या काळच्या परिस्थितीला आणि गाण्यांना फिट बसेल असा तिचा आवाज होता. व्हेअर हॅव ऑल द फ्लॉवर्स गॉन ? या गाण्यातून साध्या शब्दांत मोठा आशय सांगितला आहे. मुख्य म्हणजे या क्लिपमध्ये दिसते तसे हे तिघेजण नेहमीच श्रोत्यांना सहभागी करून घ्यायचे. लोकांना व्यवस्थित पुढच्या ओळी सांगून वगैरे Happy
पफ द मॅजिक ड्रॅगन हे म्हणले तर बालगीत आणि म्हणले तर मोठ्यांसाठीचे गाणे. वाढत्या वयाबरोबर निरागसता निघून जाते, त्यावर हे सुंदरसे गाणे आहे. माझ्या भाचरांना ऐकवले तर त्यांनाही आवडले Happy पण लोकांना हे गाणे ड्रग घेण्याविषयी आहे असे वाटले. त्यावरून टीका वगैरे झाली. शेवटी पीटर यारोला स्पष्टीकरण द्यावे लागले.
पफ द मॅजिक ड्रॅगन
बाकी त्यांची बॉब डिलनची कव्हर्स आणि लिव्हिंग ऑन अ जेटप्लेन हे छान आहेत (जेटप्लेनचे मला आवडणारे कव्हर वेगळ्या बाईचे आहे, त्यावर नंतर :)) पण तरी मला हीच ३ सर्वात जास्त आवडतात.

याच काळात रॉकसंगीताच्या मुळांकडे वळायला लावणारा आणखी एक ग्रुप आला. त्याचे नाव होते क्रीडेन्स क्लिअरवॉटर रिवायव्हल. हे लोक मूळचे बे-एरिआतले (san francisco) होते, पण यांचे संगीत मात्र बेयू (bayou - louisiana) एरिआला जवळचे होते. बे-एरिआतले ट्रेन्ड्स, शेजारीच बर्कलीसारखा खदखदता ज्वालामुखी वगैरे गोष्टींचा परिणाम न होऊ देता त्यांनी लोकांना रूट्स-रॉककडे वळवले आणि धमाल केली.
प्राउड मेरी, बॅड मून रायजिंग, फॉर्च्युनेट सन आणि लूकिन आउट माय बॅकडोअर ही त्यांची मला आवडलेली गाणी. त्यातही लूकिन आउट जरा जास्त आवडते (बिग लेबोव्स्कीचा परिणाम Happy ) शिवाय त्यात शेवटी 'सॉरो'च्या लायनीला टेम्पो बदलतो तेही मस्त. फॉर्च्युनेट सनच्या सुरूवातीच्या कॉर्ड्स ओळखीच्या वाटतात. का ते कळत नाही. पण ठेका मस्त आहे आणि परत, साधी सोपी गाणी. टिपिकल सदर्न. त्यामुळे imagination sets in, pretty soon I'm singin' Happy बिग लेबोव्स्कीमधल्या ड्यूडची गाडी चोरीला जाते, तेव्हा तो पोलिसांकडे तक्रार नोंदवताना गाडीतल्या CCR च्या कॅसेटचा उल्लेख करतो. CCR त्याचा आवडता बँड असतो. यावरून CCR चे महत्त्व कळून येईल Happy

मुळात रॉक , जाझ, पॉप, कन्ट्री ,व इतर हे प्रकार म्हणजे काय ? त्याची वैशिष्ट्ये काय? हे आधी स्पष्ट करा कुणीतरी.(हा बीबी बन्द केला जाण्याच्या आत)

रॉबीनशी सहमत.. मी नुसते लोकांच्या तोंडून कवतिक ऐकलेय पाश्चात्य संगिताचे, पण त्याची माहिती मात्र काडीचीही नाही.. अरभाटने लिहिलेय तसे अजुन लिहुन आम्हाला सज्ञान केले तर उत्तम...

अरभाटा सुरेख माहिती रे.. बर्‍याच नवीन गोष्टी कळत आहेत (मला तर बॉब डिलनपासूनचाच इतिहास माहिती आहे फक्त Sad ).. लिही सविस्तर अजून.. बिग लेबोव्स्कीच्या त्या संदर्भाचा उलगडा आणि महत्व आत्ता कळले..

रॉक चे नाते guitar back sym. नि keyboard/drums शी अधिक असते. थोडे वरचढ अधिक beats असलेले संगीत. ह्याचेच पुढे soft, hard, punk असे बरेच फाटे फुटले. पॉप त्याचाच सौम्य प्रकार. हा सगळ्यात popular प्रकार.

जाझ हे इथल्या दक्षिणेकडील राज्यातून आले. मुळाच्या rock and Roll वर आफ्रिकी संस्कार होऊन उगम पावलेला प्रकार. पण आधी हा बर्‍यापैकी उपक्षित केला गेला होता. ह्याची आवड ऐकून निर्माण होते असे माझे मत.

Country हा प्रकार Us मधल्या अपालेचिअन mountains मधून सुरु झाला नि त्यात traditional folk style घुसून तयार झालेले मिश्रण. माझा एक मित्र म्हणतो तसा हा गोर्‍यांचा जाझ समजा Happy ह्यावर gospel प्रकाराचा पगडा पण जास्त जाणवतो. ह्यात western मिक्स झाले तेंवा Country and Western तयार झाले. म्हणजे काय ते मला पण कळत नाही.

बाकी कोणाला अधिक कळत असेल त्यांनी लिहावे.

शेवटी ऐकायला चांगले वाटते ते ऐकायचे Happy

ज्या खोलीत जाझचा जन्म झाला त्या खोलीत जाउन लाईव्ह जाझ ऐकायचे भाग्य मला काही वर्षांपुर्वी प्राप्त झाले. जाझ हे थोडे फार आपल्या क्लासीकल संगीताप्रमाणे असते (in terms of improvisations).

असामी आणि अरभाट यांची पोस्टे जरा बरी. पण पूर्ण समाधानकारक नाहीत. आण्खी डिटेल वार येऊ द्या प्र्त्येक 'स्कूल" चे ग्रूप्स कोणते. की डॅण ढॅन हेच पाश्चात्य संगीत का? यात मोझार्ट बिथोवॅन यांचा उल्लेख कधी का कारीत नाहीत? की तसे फॅशनेबल नाही? इन्डोनेशिया. कम्बोडिया, अझर्बैजान या देशात संगीत नाही का? त्याबद्दल कसे कुणाला काही माहीत नाही? की पाश्च्यात्यांचे तेवढेच 'ग्रेट' असते? यावर बोलणे अपेक्षित आहे. अन्यथा बाकी उल्लेख तर बालगंधर्वांचं 'युवती मना' ऐकलत का महाराजा? तोड नाही नाहीतर तिरकवांचा तबला लै ग्रेट अशा स्टाईलमद्झे चालल्य त्यातून काही कळेना...

Pages