मुंबई जीटीजी ३० जानेवारी २०१०- लालु

Submitted by रैना on 6 January, 2010 - 02:58

लालु (शर्मिला) मुंबईत येत आहे.
सर्वानुमते शनिवार ३० जानेवारी मुकरर करण्यात आली आहे. दुपारी ४ वाजता.
- भारतीय प्रमाणवेळेनुसार येऊ नका कृपया. लालुचे फ्लाईट त्याच रात्री आहे. Proud
- स्थळ- गणेश उद्यान शिवाजी पार्क.
- लालुनी विनंतीवजा (आज्ञा) केली आहे की खूप धावपळ करुन, सुट्ट्या वगैरे काढुन येऊ नका मंडळी. सहज जमत असेल तरच या. Happy

पान वाहून गेलय त्यामुळे आठवतय तशी यादी टाकते. प्लीज गैरसमज नको, तुमचं नाव यात नसलं तर तो माझ्या वयानुसार विस्मरणाचा दोष आहे असं समजा आणि कृपया नावं द्या. यातील कोणालाही मी कधीच पाहिलेलं नाही. कंपु वगैरे धोषा नको.

१) लालु
२) मंजू (शनिवर्कर त्यामुळे वेळ होईल)
३) साधना (शनिवर्कर त्यामुळे वेळ होईल)
४) असुदे
५) केदार १२३
५) आफ्रिकेहून आशुतोष
६) कविता नवरे
७) किरू
८) गजानन ?
९) विशाल कुलकर्णी
१०) रैना
११) असुदेची गाडी असेल तर मनीषा लिमये
१३) यो रॉक्स ?
१४) डुआय विथ सिग्नीफीकंट अदर
१५) भ्रमर
१६) नील वेद
१७) शर्मिला फडके
१८) विनय भिडे
१९) आनंदमैत्री
२०) घारूअण्णा
कोणा संयोजकांना इथुन पुढे चार्ज घ्यायचा असेल तर खुशाल घ्या. येणा-यांनी कृपया आपला सेल नंबर मला माबोसंपर्कातून मेल करा.

मंजूच्या मते शिवाजी पार्कात बरेच काही खायला मिळते. न मिळाल्यास तिला जवाबदार धरा. Proud

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माबोकर एका नजरेत ओळखता येतात >>> कसे काय श्यामले ? Happy
अश्विनी- मी येणारे बरोब्बर ४ वाजता.
अश्टरची फूलं आणि तिळगुळ >> पैठण्या हा ड्रेसकोड ठेवावा की कसे ? Happy
पूनम म्हणतेय त्याप्रमाणे माबोटीशर्ट घालून आले लोक्स तर ओळखणे शक्य होईल.

रैना गणेश मंदीरापाशी एखादा कावराबावरा (एकमेकांचे आयडी नकळल्यानी)तरीही खूप मोठ्या आवाजात बडबडणारा ग्रुप दिसला की समजावं माबोकर जमलेत

>>>>ड्रेस कोड-- माबोचे टी- शर्ट , आश्टरची फूलं तिळगुळ आणि हो ते अत्तराच बघा म्हणजे झांल
हो अण्णा.. एक घोडाही मागवलाय तुमच्याकरता पेशल.. घोडेवाल्यासकट.. Proud

>>>हो अण्णा.. एक घोडाही मागवलाय तुमच्याकरता पेशल.. घोडेवाल्यासकट..>>>
हेच हेच !!!!!! आम्ही जर चांगली वातावरणनिर्मीती करायला लागलो की सगळे आम्हालाच घोड्यावर बसवतात

मी सद्ध्या स्मायल्यांधळी झालेय (स्मायलींच्या जागी मोठे ग्रे चौकोन दिसताहेत) त्या मुळे सगळ्यांच्या प्रत्येक पोस्ट मधे राग, लोभ, हास्य, विकट हास्य यांचे समान ठोकळे दिसत आहेत (यालाच म्हणतात का वैराग्य? Biggrin ). त्यामुळे कुणी स्वतःच्या पोस्टीत माझ्यावर रागावले असेल तर तिथे स्मायली न टाकता शब्दात लिहावे म्हणजे मला कळेल Happy

राजमलाई आणणार्‍याला बरोब्बर ४ वाजता यायला सांग >> त्यापेक्षा जे चार वाजता येणार त्यांनीच राजमलाई आणली तर???

रैने, माबोकर बरोब्बर "ओळखुन" आहेत एकेमेकांना, हाका मारायची वेळ नाही यायची. Happy

अत्तराच बघा म्हणजे झांल >>> अत्तराचा फाया, तुम्ही आणा घारुराया!
अत्तर लावलं की आंद्या गजरा मागेल, त्याचं काय? Wink

कसे काय श्यामले ?>>>वो बोलनेकी णही अणुभवणेकी चीज है!
जीटीजी झाल्यावर सांग इथेच येऊन Happy

का?

अत्तर लावलं की आंद्या गजरा मागेल, त्याचं काय? Lol

माबोकरांचा ग्रुप कस्साही ओळ्खू येऊ शकतो. येणार्या जाणार्या प्रत्येकांकडे हा माबोकर तर नाहीना असे कावरेबावेरे होऊन बघत असतात. Happy मी पण येईन बहुतेक.
अम्या मुलुंड्वरुन पिकअपची काय सोय आहे का? Proud

मी येतोय ठाण्यावरुन गाडी घेउन. मी धरुन पाच सीटा (मला एकच पुरते) (अजूनतरी)

मनी आणि अश्विनी येतील. बायकोबुवांचे (हे बागुलबुवाच्या चालीत वाचावे) नक्की नाही कळले...

नीलू,मी,डुआय आणि ललिता-प्रीति ठाण्याहून गाडीने येतोय.तुला मुलुंडला पिकअप करु.
तु नक्की येणारेस तर सांग Happy

Pages