महाराष्ट्रातील राजकारण

Submitted by भरत. on 14 July, 2025 - 03:03

इथे महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर चर्चा व करू.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुलायम सिंग यांनी 'बच्चे है, गलती हो जाती है' हे विधान अगदी वेगळ्या संदर्भात केले होते, त्याचा आय टी सेल ने केलेला विपर्यास आजही 'सुशिक्षित' लोकांना खरा वाटतो !

गोकुळचे ४५०० सभासद म्हणजे सहकारी संस्थाच आहेत, आणि त्यांचे सभासद गावकरी आहेत. म्हणजे जो गोकुळवर ताबा ठेवेल तो कोल्हापुरावर ताबा ठेवेल. राहूल कुलकर्णी यांच्या चानेलवर मुलाखती आहेत. १२ /१३ निवडलेले उमेदवार म्हणजे पूर्ण बहुमत नाही.

मला तर वाटतंय हळू हळू भाजपवाले हाउसिंग सोसायट्यांच्या आणि शाळेतल्या मॉनिटरच्या निवडणुकांत पण लक्ष घालतील. शत प्रतिशत भाजप.
तसंही भाजप आणि त्याच्या समर्थकांना निवडणुका जिंकणे हे एकच उद्दिष्ट आहे. राज्यकारभारावर बोलायचं नाही.
--
मुंबई उच्च न्यायालयाने राज्यशासनाला सांगितलं की फटाके वाजवण्याच्या वेळा इ. ठरवून द्या. तर सरकार म्हणे आता उशीर झाला. पुढल्या वर्षी. तातडीने निर्णय घ्यायला ते गोकुळ थोडंच आहे?
पी ओ पीच्या गणेशमूर्तींबद्दल पण अशीच चालढकल सुरू आहे.

भाजप समर्थकांच्या मुला नातवंडाना जे पर्यावरण मिळणार आहे, त्यासाठी ते आईबाप आजीआजोबांना नक्की श्रेय देतील.

शाळेत लक्ष कधी घालणार? माइनॉरटीवाल्यांनी शालेय पाठ्यपुस्तकांतून सुटका करून घेतली केव्हाच.

महाराष्ट्रातील सहकारी संस्थांमधील निवडणूका दुष्काळामुळे लांबणीवर टाकल्या आहेत, अगदी तशाच जश्या शिवसेना फुटी नंतर महानगरपालिकेच्या निवडणूक पुढे पुढे ढकलल्या गेल्या, काय आहे वास तर विरून जायला हवा ना गोकुळमधल्या शेण खाण्याचा!!

पुन्हा राका विलीनीकरण चर्चा आणि अध्यक्ष तटकरेंनी झटकलं. विलीनीकरणाची कोणतीही चर्चा नाही. (दोन चार नेते अजित पवार गटात जातील आणि मग रांगच लागेल. पहिला कोण जातो याची वाट पाहात आहेत. सुप्रिया सुळेंनीच पुढाकार घ्यायला हवा. याअगोदर शरद पवारांच्या जागेसाठी दिल्लीत किती खटपट केली होतीच. घाबरून कसं चालेल.

यांच्या ग्रहावर तटकरे राकॉचे अध्यक्ष आहेत का? बरं बरं.

तुम्हांला राज्याच्या कारभारापेक्षा पक्षांच्या फोडाफोडीत आणि दिसेल तिथे सत्ता मिळवण्यातच रस आहे ते दिसतंच आहे

प्रफुल पटेल आणि शरद पवारांतील संभाषणाची व्हिडियो क्लिप आली आहे. त्यांना वरचेवर हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट व्हायला लागतंय. तरी राज्यसभेवर जाणं, मग अशा अवस्थेतही राजकारणावर बोलणं (आधी मोदींशी, आता यांच्याशी) त्याच्या बातम्या होणं. हे फार हीन पातळीचं आहे किंवा आजार फार गंभीर नाही. पण बघून पार खंगलेले वाटले. एकदा काय ते ठरवून टाका म्हणजे इतर पक्ष आणि यांचे समर्थक , मतदार काय ते ठरवायला मोकळे.

शिवसेना दोनदा फोडून झाली. आता राकॉ गिळंकृत करतील. तृणमूल आणि आप फोडले.

आणि म्हणे मोदी अकेला इतने सारे लोगों से लड रहा है.

हसन मुश्रिफ यांच्यावरच्या सगळ्या केसेस चौकशी यंत्रणांनी मागे घेतल्याबद्दल चौकशी यंत्रणांचं अभिनंदन.

सोनिया गांधींच्या पुस्तकात सावरकरांबद्दल अपमानजनक काहीतरी आहे म्हणून ते फाडायचा कारेक्रम शिंदेसेनेने ठेवला होता. त्यात भाजपने शिंदेसेनेत पाठवलेल्या शायना एन सी यांनी ":चुकून " शिवसेना संस्थापक ठाकरेंचाच फोटो फाडला आणि हे लक्षात आल्यावर त्यांच्या चेहर्‍यावर जे संमिश्र भाव उठले त्यात एक हास्यही होते.

राजकारण आहे. फोडाफोडी होते आणि मोहरे पळवले जातात हे काय इतिहासाला नवीन नाही. आपला मित्रच शत्रूचा मित्र होऊन मोठा शत्रू होऊन उभा राहतो. एके काळी मावळे असलेले कावळे होतात. जातील ते कावळे राहतील ते मावळे.
उबाठांनी भाजपला झिडकारल्यावर शरद पवारांनी सत्तेत घुसण्याचा प्रयत्न केलाच होता. पण माघार घेतली कारण आपले वजीर होतील प्यादी आणि प्यादी वजीर. फोडाफोडी कुठे होती तेव्हा? अशा राजकारणात गोची होते सामान्य सभासद कार्यकर्त्यांची.
अजितदादांनंतर पवार घराण्याशी निष्ठा ठेवणारे तटकरे आपण मुख्य होऊ असा काही विचार करतील का?

भाजपच्या काळात आमच्याकडे दुर्लक्ष, काँग्रेससोबत असताना योग्य जागा मिळत होत्या, आठवलेंची महायुतीवर उघड नाराजी Rofl

मला देवाभैयांचं भविष्य खतरे में दिसतंय.
अदानीने नवी मुंबई विमानतळ बांधलं. हे त्यांनी बांधलेलं एकमेव विमानतळ आहे. बाकीची बळकावलेली आहेत.
पण हवाई वाहतूक कंपन्या आणि प्रवासीही तिथे जायला सुखासुखी तयार होईनात. मग मुंबई विमानतळाच्या आधुनिकीकर णाचा घाट घालून ते तात्पुरतं बंद करायचा बेत आखला. नवी मुंबई विमानतळावरून यायचं जायचं नसेल तर गेलात उडत असं विमान कंपन्यांना सांगितलं.
आखाती देशातल्या कंपन्यांनी याचे राजनैतिक परिणाम होतील असं सांगितलं. (त्यांच्या देशांत भारतीय विमान कंपन्यांना तशीच वागणूक).
मग देवा भैया म्हणाले मुंबई विमानतळ पूर्ण बंद करू नका. थोडा थोडा विकास करा.
अदानी से पंगा.

मुंबई विमानतळावर उतरायला गर्दी या सबबीखाली उतरणारी विमानं तिकडे नक्कीच उतरवतील. दक्षिण मुंबईतील प्रवासी आनंदाने अटलसेतूवरून शिवडी - मुंबई गाठतील.
कच्छचे मुंद्रा बंदरही अडानीचंच आहे.
कांग्रेसने तर या उद्योगपतींशी कट्टी अगोदरच घेतली आहे. तरीही काही त्यांच्या बाजूचे उद्योगपती नंतर डोकं वर काढतीलच. याच्याशिवाय पक्षांना निधी मिळणार कुठून?

तर तारळी प्रकल्पाची कॉस्ट अचानक कमी कशी झाली? त्या कॉस्टच्या काही टक्के रक्कम पर्यावरण रक्षणावर खर्च करावी लागते हे कळल्यावर अदानीने कॉस्ट कमी करून आधीच्या १% इतकी दाखवली.

याबद्दल तक्रार झाल्यावर चौकशी सुरू झाली. वनविभागाने बांधकाम थांबवायचे आदेश दिल्यावर अदानीचे अधिकारी मंत्रालयात वनखात्यात भेटून गेले.
आज तिथे पुन्हा काम सुरू झालं अश्या बातम्या आल्या. आता प्रदूषण नियंत्रण मंडळाने काम थांबवायचे आदेश दिलेत. ते कधीपर्यंत टिकतात पाहू.

दुसरीकडे मुंबई कोस्टल रोडसाठी अंधेरीच्या एका नानानानी पार्कमधली जुनी झाडं रात्री तोडण्यात आली. आठवा आरे मेट्रो शेड.

आता बुलेट ट्रेनची बातमी. बहुधा खर्च कमी करायला किंवा मेक इन इंडियाच्या नावाने जपानी बुलेट ट्रेनसोबतच भारतीय बुलेट ट्रेनही बनवायचं ठरलं आहे. जपान म्हणतंय दोन वेगवेगळ्या उत्पादकांनी बांधलेल्या ट्रेन्स आणि त्यांच्या सिग्नलिंग सिस्टम एकाच मार्गावर चालवण्याचा हा जगातला पहिलाच प्रकार असेल. त्याची क्षमता भारताने आधी सिद्ध करून दाखवली पाहिजे.

बुलेट ट्रेन प्रकल्पाचा खर्च ३९९ कोटी रुपये प्रति किमी इतका पडतोय. तर तिकिटाचे दर काय असतील? की मेट्रो , उडान विमाने यांसारखी यालाही सरकार सबसिडी देणार?

भाजपचे उरणचे आमदार महेश बालडी यांना तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली गेली आहे.

राहुल गांधी, सुनील केदार यांची अनुक्रमे खासदारकी आणि आमदारकी अशी शिक्षा सुनावल्याच्या २४ तासांत रद्द केली गेली होती. पण सत्ताधारी पक्षाच्या लोकप्रतिनिधींसाठी नियम वेगळे असतात. त्यांना अपीलासाठी पुरेसा वेळ दिला जातो.

कुर्ला इथे काही अल्पवयीन शांतिदूतांनी तिथल्या एका सार्वजनिक उद्यानात आलेल्या जोडप्याला बेदम मारहाण केली.
काफिर लोकांनी आपल्या इलाक्यात येऊन त्याला अपवित्र केल्याचा राग ठेवून त्यांनी ही कारवाई केली.
सुदैवाने ह्या शांतिदूतांच्या कार्यक्रमाचे चित्रमुद्रण झालेले असल्यामुळे त्यांचे जिहादी चेहरे सगळ्यांसमोर झळकले आहेत.
ह्या जिहादी मंडळींना आपण अल्पवयीन असल्यामुळे आपला केसही सरकार वाकडा करू शकत नाही ह्याची खात्री असल्यामुळेच हा मिनि गझवा-ए-हिंद पुकारला असावा.
सदर व्हिडियो चांगलाच व्हायरल झाल्यामुळे नाईलाजाने महाराष्ट्र सरकारला काहीतरी केल्याचे नाटक करावे लागेल.
कधी नव्हे ते राज ठाकरेंच्या पक्षाने आपापल्या जाळीदार टोप्या उतरवल्या आहेत आणि हिंदूंच्या बाजुने बोलताना दिसत आहेत.

बघू या काय होते ते.
https://www.youtube.com/watch?v=6cleEiUyr_E

माजलगाव येथे भाजप नगरसेवकाच्या अल्पवयीन मुलाने रेसच्या नादात घेतला कुटुंबाचा बळी. आपण अल्पवयीन असल्यामुळे आपला केसही सरकार वाकडा करू शकत नाही ह्याची खात्री असल्यामुळेच ??? की बाप सत्ताधारी पक्षाचा नगरसेवक आहे म्हणून ?? की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला कायदा सुव्यवस्थेचा धाक बसवण्यापेक्षा गोकुळात रंग खेळणे जास्त पसंत आहे म्हणून ?

धुळे शहराच्या महापौर मायादेवी परदेशी यांच्या विषयी गोरक्षक असलेल्या संजय शर्मा यांनी सोशल मिडीयावर एक आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यानंतर संजय शर्मा (Sanjay Sharma) यांचा निषेध करण्यासाठी तसेच त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी काल भाजपच्या वतीने धुळे शहरातून मोर्चा काढण्यात आला. या मोर्चा वेळी शहराचे आमदार अनुप अग्रवाल (Anup Agrawal) यांनी सातत्याने त्यांच्यावर होत असलेल्या टीकेमुळे अस्वस्थ झालेल्या महापौरांनी विष प्राशन केल्याचा दावा केल्यानंतर धुळे जिल्ह्याच्या (Dhule news) राजकारणात एकच खळबळ उडाली होती. महापौर मायादेवी परदेशी (Mayadevi pardeshi) विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा आमदार अनुप अग्रवाल यांनी केल्याने मोठी खळबळ उडाली होती. >> हिंदू खतरेमे

दामगुडे दादांचा मारहाण करतानावा व्हिडियो होता. त्यांचे केस तर आणखीन चापून चोपून बसवले.

गोकुळमध्ये संचालक नेमायच्या प्रकरणी महाराष्ट्र शासनाने न्यायालयात बाजू मांडायला मुकुल रोहतगींना नेमलंय आणि चक्क ८० लाख दक्षिणा दिली आहे.
गोकुळसारख्या स्थानिक प्रकरणात राहुल गांधींनी लक्ष घालायची गरज काय असं फडणवीस म्हणाले होते. मग स्थानिक प्रकरणात देशपातळीवरचा वकील कशाला लागतो?

शासनाचा महाधिवक्ता असतो ना ? >>> त्या पदावर डॉ मिलींद साठे आहेत सध्या...पण अशा महत्वाच्या प्रकरणात नसती हेळसांड करून कशी चालेल ??

१२ /१३ निवडलेले उमेदवार म्हणजे पूर्ण बहुमत नाही.

Submitted by Srd on 5 November, 2026 - 15: <<<<
नाही का? बरं बरं
12 = 13

डीलिमिटेशन बिलाला शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. अशा पद्धतीने संविधान बचाओ ही घोषणा ते पूर्ण करत आहेत. अर्थात भाजप अडचणीत येण्यासाठीच हे डावपेच असल्याने निर्लज्ज बानो व अन्य पाकिटवंत आनंदी असावेत. पाच वर्षे अशा पद्धतीने भाजपला अडचणीत आणण्यात कॉंग्रेस नेतेही मागे नाहीत. विरोधी पक्षनेते थेट भाजपमधे डेरेदाखल होऊन लोकशाही वाचवत राहतात. बिचारे ईडी के मारे.

पण मायावती सरेंडर असतात.

सुप्रिया सुळे यांनी सांगितलं की सरसकट ५०% टक्के जागा वाढवल्यातरच पाठिंब्याचा विचार करू.
सरसकट ५०% जागा वाढणार असतील तर विरोधाच काही कारण नाही.

भोळे राजकारणी, तेव्हढेच भाबडे प्रतिसादक पाहून गळा दाटून आला.

८१५ जागांच्या सभागृहात साध्या बहुमतासाठी ४०८ जागांची आवश्यकता असेल. गायपट्ट्यातल्या पाच प्रमुख राज्यांकडे ३१२ ते ३१३ जागा असतील, म्हणजेच बहुमताच्या आकड्याच्या ७६% पेक्षा जास्त वाटा एकट्या या पाच राज्यांचा असेल. मतदारसंघांची पुनर्रचनाही होणार. ते कुणाला अनुकूल असतील?

@ राज आणि @चांदणे
अगदी नेमका मुद्दा.
डिलिमिटेशनसाठी एवढी तडफड फक्त गोबरपट्ट्यातूच बहुमताची बेगमी करता यावी व भाजपचे अस्तित्व नसलेल्या दक्षिणेकडील राज्यांना बेदखल करता यावे यासाठीच आहे हे ताईंच्या लक्षात आले नसेल असे नाही. बाकी ताई आणि त्यांचे साहेब हे सतत सत्तेत कसे राहता येईल याचाच विचार करत असतात, त्यामुळे भरवसा नाही.

Pages