Submitted by भरत. on 14 July, 2025 - 03:03
इथे महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर चर्चा व करू.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
इथे महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर चर्चा व करू.
एकनाथ शिंदे नावाचा माणूस
एकनाथ शिंदे नावाचा माणूस नक्की कधी मोठा झाला यावर काही विचार केला, स्टोरी केली, निरीक्षणं केली, अनुमान काढलं- अस कधी केलं आहे काय तुम्ही?
तो टायगर निघून जातो आणि हा पांढरेधोप कपडे घातलेला शिंदे नावाचा सद्गृहस्थ हात बांधून बघत बसतो (मेडिया मध्ये जास्त वेळ दिसावं म्हणून)- हे बघितलं का तुम्ही?
भंपक लेकाचे. सगळ्या पांढरे काळे कपडे घातलेल्या न घातलेल्या सगळ्या टायगर आणि उंदरांना, सगळ्या मुर्खांना तुमच्यासारख्या भंपकांनीच मोठं केलंय. प्रश्न विचारू नका, उत्तरं द्या.
चाच्णी
चाच्णी
वरचे दोन प्रतिसाद एकदम
विधान परिषदेच्या निवडणुका
विधान परिषदेच्या निवडणुका बॅलोट पेपरवर का घेतल्या?
(ह्यावरूनचे जन आक्रोश आंदोलन किती तारखेला आहे?)
थांबा जरा. व्हिएतनामवरून
थांबा जरा. व्हिएतनामवरून आल्यावर तिथे सांगितला गेलेला नवा
बिनबुडाचामुद्दा कळवण्यात येईल.शिंदे सेना भाजप यांना
शिंदे सेना भाजप यांना आपापसात खून मारामार्या करून कंटाळा आला. मग ठाकरे सेनेचे ठाणे विभाग प्रमुख प्रदीप पूर्णेकर यांना संपवलं. कुटुंबीयांनी थेट ठाण्याच्या महापौर - शिंदेसेनेच्या मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्यावर आरोप केले. पण प्रदीप पूर्णेकर हे काही दिशा सालियन सारखी सुंदर तरुण स्त्री नसल्याने या प्रकरणाकडे विशेष लक्ष देण्याची गरज नाही.
दुसरीकडे मनोज जरांगे पाटलांनी ५०० करोड, ऑडियो क्लिप यांबद्दल काय काय सांगितलंय. पन्नास खोकेचे पाचशे खोके झाले. नॅरेटिव्ह सेट कसं करायचं त्याची चर्चा. म्हणजे इथे पुन्हा शिंदे सेना आणि भाजपमध्ये जुंपली.
अशा प्रकारे महाराष्ट्रात युतीचा कारभार अगदी छान चालला आहे.
मुंबईत भर गर्दीत रस्त्यावर गोळीबार होतो. उगाच कोयत्याने वार घालून पुलावर खून पडणारे पुणे आणि ठाणे, कल्याणच्या तुलनेत मुंबईकरांना मागे पडल्याचं वाटायला नको. गृहमंत्र्यांच्या शिरपेचात आणखी एक तुरा. या तुर्यांचं वजन देवाभैयाच पेलू जाणेत. पण भाजप समर्थकांना यात कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्ना ऐवजी टायगर श्रॉफ एवढा मोठा कधी झाला असा प्रश्न पडतो.
म्हणजे नक्की कोणकोणत्या प्रश्नांवरून लक्ष वळवण्यासाठी ही नाटुकली रचली असतील बरं?
पुणे विभागातल्या पदवीधरांनी
पुणे विभागातल्या पदवीधरांनी भाजपला नाकारले का?
आणि नागपुरातल्या?
हे महाराष्ट्रातलं नाही.
पण वाराणसीत पदवीधर आणि शिक्षक, दोघांनीही भाजपला नाकारलं.
<< मुंबईत भर गर्दीत रस्त्यावर
<< मुंबईत भर गर्दीत रस्त्यावर गोळीबार होतो. >>
——— केन्द्रात तसेच राज्यात भाजपा गृहमंत्री. गोळी बाराचे आदेश देणारा बिष्णोई साहेब देशातल्या ( भाजपा राज्यातल्या ) कडेकोट तुरुंगात बंदिस्त.
अशा परिस्थितीमध्ये नागरिकांवर हल्ला होणे हे कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल प्रश्न निर्माण करतात. टायगर छोटा आहे, मोठा आहे हे मुद्देच गैर आहेत. तो एक सामान्य नागरिक आहे हे कारण पुरेसे असावे.
DCP (?) दर्जाच्या अधिकाऱ्याने घाबरत घाबरत साहेबाचे नाव घेणे हे काय दर्शवते?
मुंबई मनपाने काही
मुंबई मनपाने काही सेलिब्रीटजकडून फटाक्यांमुळे होणार्या प्रदूषणाबद्दल जनतेला आवाहन रेकॉर्ड करून ट्वीट केले. फेसबुकवरही टाकले असेल. मला निशिगंधा वाड यांचे आवाहन दिसले. बाई मुद्द्यावर यायचं नावच घेईनात त्यामुळे मी अर्धात सोडून दिले. माधुरी दीक्षित, अजिंक्य राहणे यांनीही आवाहन केले. असंच आवाहन दिया मिर्झाकडून करून घेतलं होतं. ते पाहून मुंबई भाजपचे अध्यक्ष अमीत साटम यांना मस्तकशूळ झाला. दिवाळी कशी साजरी करायची याचे धडे तिच्याकडून नकोत. आमच्या प्रंप्रा आमच्या संस्कृतीत खोलवर रुजल्या आहेत, असं ट्वीट त्यांनी केलं.
मग महापौर रितू तावडे वदल्या की यापुढे मनपाने अशा सेलिब्रिटींची यादी माझ्याकडून पास करून घ्यावी.मुंबई मनपाने मला दाखवल्याशिवाय एकही पब्लिक स्टेटमेंट करू नये.
जे हिंदुत्वाला विरोध करतात, आम्ही त्यांना विरोध करतो.
आम्ही सगळे नगरसेवक अमीत साटम यांच्याशी सहमत आहोत.
राकॉ - अजित पवार गटाचे
राकॉ - अजित पवार गटाचे पवारेतर नेते अमित शहांच्या भेटीला.
एक गंमत तर लिहायचीच राहिली
एक गंमत तर लिहायचीच राहिली इथे. विधानपरिष दांच्या निवडणुकींची मतमोजणी सुरू असतानाच आदर्णीय मोदीजींनी काँग्रेसने किती जागा जिंकल्या असं काही तरी ट्वीट केलं. त्यानंतर अर्थातच भाजपच्या यच्चयावत नेत्यांनी ते रिट्वीट केलं. आपल्या देवा भैयांनी सुद्धा. त्यात त्यांनी अ बिग फॅट झिरो असे शब्द वापरले. मग नागपूर पदवीधरचा निकाल आला. आणि देवाभैयांनी आपलं ट्वीट डिलीट केलं.
महाराष्ट्रातल्या पदवीधर मतदारसंघांतल्या तिन्ही जागी युती पराभूत. यावरून शिंदे सेना आणि भाजपमध्ये नेहमीचा कलगीतुरा सुरू आहे.
शिंदे सेनेने २०२९ मध्ये एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री असतील ( पुढला मुख्यमंत्री सेनेचाच - काही आठवतंय का?) असं बोलायला सुरुवात केली.
शिंदेच हेच पुढील मुख्यमंत्री.
खरंय.
शिंदेच हेच पुढील मुख्यमंत्री.
शिंदेंसाठी एक विमान दिल्लीला जायला कायम तयार ठेवलेले असेल.
फडणवीस दिल्लीत.( यांनी कालच काँग्रेसवर घणाघाती हल्ला भाषण केले. राहुल, उद्धव , संविधान वाचवणारे सगळ्यांचाच उद्धार केला. मोदीजींना दंडवत घातला. क्वचित पंतप्रधानही होतील. पाऊले पडती दिल्लीची वाट. उप्रच्या मुख्यमंत्र्यांना योगी आदित्यनाथना तिकडेच फार कामं आहेत. बुलडोझर कमी पडताहेत. पर्यायी नेता नाही. शिवाय एक संसारी माणूस म्हणून फडणविसांची छाप पडेल. महाराष्ट्र संभाळायला शिंदे आहेतच.)
पण पोटदुखी उबाठात सुरू झाली आहे. फडणवीस जाणार पण शिंदे येणार. राष्ट्रवादीला( दोन्ही) अमित शहांनी गुंडाळून ठेवले आहे. त्यांचं त्यांनाच झालंय भारी. रोहित पवारांना मी जाऊ कुठे आणि कोणता फळा धरू मी हाती असे झाले आहे. माछेर प्रकरणावरही पावरपॉइंट पाट्या दाखवून बोलता येईना मतदार फिरतील ही भीती.
Sunil Wagadre (52) in
Sunil Wagadre (52) in Amravati district on October 8, 2026; Gajanan Devkatte (36) in Navi Mumbai on August 25, 2026; P V Verma (63) in Nagpur on September 1, 2025; Harshal Patil (35) in Sangli on July 23, 2025.
All four died by suicide, and their families say the common thread was severe financial stress over pending bills for work done for the Maharashtra government: Rs 2.5 crore for Wagadre, Rs 40 crore for Verma, Rs 60 lakh for Patil and Rs 2.5 crore for Devkatte.
किती छान!
देवा भैयांना दिल्लीत निर्मलाताईंचं खातं दिलं पाहिजे.
राहुलला आता म्हणे चीनकडून फंडिंग येतं इति देवाभैया. आणि देशाचा गृहमंत्री त्याबद्दल काही करू शकत नाही?
महारा ष्ट्राच्या इतिहासातले सर्वाधिक कर्तबगार गृहमंत्री म्हणून जगात डंका पिटल्यावर देवाभैयांची नजर दिल्लीतल्या गृहखात्यावर आहे का?
काल तिथे पोलिसांनीच आंदोलन केलं .
गोकुळ निवडणूक निकालाचा धसका घेऊन महाराष्ट्र शासनाने दुष्काळाचे निमित्त करून सहकारी संस्थांमधल्या निवडणुका पुढे ढकलण्याचा घणाघाती निर्णय घेतला आहे. दुष्काळात कुंभमेळा आणि झाडतोडी बरी चालते.
देवाभैया यातून काय मार्ग
देवाभैया यातून काय मार्ग काढणार? अगोदरच एवढे स्पीड ब्रेकर लागले आहेत.
भाजपकडे भरपूर पैसा आहे. पी एम
मेरा भाषणही मेरा शासन है
भाजपकडे भरपूर पैसा आहे. पी एम केअरमध्ये भर पूर पैसा आहे. पण राज्याच्या तिजोरीत घणाघाती ठणठणाठ आहे. असं कसं झालं असेल?
आणि यांना भव्यदिव्य प्रकल्प करायचे आहेत.
Bombay High Court slams BJP
Bombay High Court slams BJP leaders for criticising a videoclip wherein Bollywood Actor Dia Mirza had appealed citizens to avoid bursting firecrackers on public streets as ordered by the High Court.
She was roped in to create awareness on the issue by the BMC, however, after the opposition by BJP leaders, the video was pulled down from the BMC's social media handle.
Bench of Justice Girish Kulkarni & Justice Dr Neela Gokhale said "they are disturbed by the stray comments made by some politicians" and reminded them that "India is a Secular country."
Judges have ordered the BMC to restore the deleted video
दोघा न्यायाधीशांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना.
गोकुळवर सरकारकडून ५
गोकुळवर सरकारकडून ५ संचालकांची नियुक्ती, मतदानाचाही अधिकार दिला. राज्य मंत्रिमंडळामध्ये निर्णय.
विरोधी पक्ष जिंकला तरी देखील हे आडमार्गाने सत्ता काबीज करणार. काय अर्थ राहतो मग निवडणुकीला.
खरंय. आणि हे लोक संविधान आणि
खरंय. आणि हे लोक संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणार्थ मोर्चे काढतात.
---
भाजप आमदार राम कदम यांनी दिया मिर्झाला सनातन हिंदू धर्माबद्दल काय माहिती आहे? इतर धर्मांच्या विषयात हस्तक्षेप करण्याचे कारण काय? इ.इ. तारे तोडले आहेत.
दिया मिर्झा फक्त फटाक्यांबद्दल बोलली होती , तेही प्रदूषण करू नका एवढंच. तेही मनपाच्या सांगण्यावरून.
आता राम कदमांच्या सनातनी दिवाळीत फटाके अनिवार्य असतील, एखाद्या प्राचीन ग्रंथात लिहिले असतील, हे तिला माहीत नसेल. मुंबई मनपालाही माहीत नसेल.
कर्नाटकातही मराठी पॅनेल
कर्नाटकातही मराठी पॅनेल निवडून आल्यावर ते असेच बरखास्त करण्यात आले होते आठवतं का?
आता तर बेळगाव प्रश्नाची आठवणही येत नाही उबाठा गटाला. जाऊदे. कर्जतमध्ये झाडांची तोड हा नवा विषय मिळाला आहे.
______________
तसं पाहिलं तर मोदी दिल्लीत बोलले शरत्चंद्रजी पवारांना की सुप्रिया आणि आम्ही देश सांभाळू, काळजी करू नका. ( एकच वाक्य पण किती आश्वासक!)पण तो महाराष्ट्रातील राष्ट्रवादीसाठी टोला आहे.
सुनेत्रा पवार पार्थला वगळून इतर राष्ट्रवादींच्या नेत्यांना शहा भेटले यावरून रोहितरावांनी अनुमान काढलं की सुनेत्रा आणि पार्थला डावलण्यात येत आहे. पण खरा गर्भित अर्थ असा आहे की तुम्ही सुनेत्रा यांच्या पक्षात गेलात तर खुर्ची मिळेल. फडणीसांनी मागेच सांगितलंय की आमची दोन पक्षांक्षी युती झाली आहे, विषय संपला.
तुमने बाण मारा तो बोकलत का रथ
तुमने बाण मारा तो बोकलत का रथ नऊ कदम पिचे गया और बोकलत ने बाण मारा तो हमारा रथ दो कदम पीछे गया. लेकीन मे तुम्हारे रथ पे हू सब देव लोक तुम्हारे रथ पे है तुम्हारा रथ भगवान ने बनाया है. फिर भी बोकलत ने दो कदम पीछे ढकल दिया. बोकलत कोई साधारण योद्धा नही. भागो पला पळा ब्यागा भरा.
बोकलत का रथ कभी कभी हावर
बोकलत का रथ कभी कभी हावर क्राफ्ट की तरह जमीन और पानी के ऊपर से चलता है!
महाराष्ट्रातील आकाशातही हे
महाराष्ट्रातील आकाशातही हे होऊ शकते व महाराष्ट्रही भारतात आहे.
=====
■ घारी, गिधाडे आकाशात उडत आहेत कारण भारतात बेरोजगारी आहे
■ इथे प्रदूषण आहे कारण इथे व्होटचोरी होते
राजीवजी गांधी ह्यांची आठवण आली.
"हम देखते है इस साल बारिश कैसे नही आती"
अमेरिकेतही वोटचोरीचा दाट संशय
अमेरिकेतही वोटचोरीचा दाट संशय. बाहेरून एक्सपर्ट बोलावणार.
ट्रंपने यावेळी आपला पराभव
ट्रंपने यावेळी आपला पराभव मान्य केला. देवाभैया एका गोकुळ दूध महासंघातला पराभव मान्य करायला तयार नाहीत.
Nagpur | Maharashtra CM
Nagpur | Maharashtra CM Devendra Fadnavis says, "What a situation Rahul Gandhi has come to! There are merely 4,500 voters in Gokul, and for that, Rahul Gandhi has to sit in Delhi and tweet. Nobody had secured a majority in Gokul. One side had won 13 seats and the other 12 seats. Therefore, the quorum required for the meeting was not being met. The meeting had to be cancelled twice due to a lack of quorum. If the meeting had been cancelled for the third time due to a lack of quorum, the election itself would have been cancelled. That is why the government took the decision. Some people say this decision will not stand in court, while others say it will. The decision was taken only after obtaining the opinion of the Advocate General. But this is not a national issue. Rahul Gandhi is getting involved even in this matter"
कोरम का नाही भरला? तर महायुतीचे १२ जण मीटिंगला आले नाहीत.
आणि हा नॅशनल इश्यु नाही. पण तुमचे मोदी विधानपरिषदेच्या २८ जागांच्या निवडणुकांबद्दल ट्वीट करता , तुम्ही भाजपमधले सगळे पोपट ते रिट्वीट करता आणि तुम्हांला ते ट्वीट डिलीट करावं लागतं , हा नॅशनल इश्यु आहे.
आम्हाला गोकुळ वर डल्ला
आम्हाला गोकुळ वर डल्ला मारायचा होता हे सरळ सांगावे. कोरम ची सबब लन्गडी व खरे तर केविलवाणी आहे.
हो ना! यांच्यापुढे ट्रंप संत
हो ना! यांच्यापुढे ट्रंप संत वाटू लागला.
बेफिकीर ,
बेफिकीर ,
तुमचा हा रिप्लाय क्लासिक confirmation bias च उदाहरण आहे ,जे आलू सोनाच्या वेळी केलं तसच.हि क्लिप बघा आणि त्याच एडिटेड व्हर्जन बघा .एवढी वर्ष होऊन भाजपाईंच्या आय टी सेलच्या असल्या चाळ्याना सुशिक्षित लोक बळी पडतात म्हणजे आश्चर्य आहे किंवा दुसरी शक्यता अशी आहे कि समजून उमजून बदनामीच करायचीय .
https://www.instagram.com/reel/DfPBmgUzThx/?dlrf=Nzg0Y2piY3E1emto
https://www.instagram.com
https://www.instagram.com/reel/DfPBmgUzThx/?dlrf=Nzg0Y2piY3E1emto
एवढी वर्ष होऊन भाजपाईंच्या आय
एवढी वर्ष होऊन भाजपाईंच्या आय टी सेलच्या असल्या चाळ्याना सुशिक्षित लोक बळी पडतात म्हणजे आश्चर्य आहे किंवा दुसरी शक्यता अशी आहे कि समजून उमजून बदनामीच करायचीय .>>>
बारा वर्षात एक गोष्ट नक्की झालीय शिक्षित लोक सुशिक्षित असतीलच ह्याची काही खात्री नाही.
Pages