बृहनपुण्याचे बापट बाप्पामुळे बाल बाल बचावले

Submitted by Madan Hunkare on 27 August, 2026 - 12:47

पुणे शहराच्या महापालिकेत गणेश मंडळांची बैठक होती. महापौर भाजपच्या आणि सत्ताही भाजपचीच. सर्व नगरसेवक भाजपचेच.
अशा या वातावरणात बाप्पाचा उत्सव कसा करायचा यावर गंभीर चर्चा चालू असतानाच पुण्याचे एक नागरिक श्रीयुत बापट म्हणाले कि उत्सव करा पण डीजेमुक्त करा. कुठेच डीजेही नको किंवा स्पीकर्स नको.

यामुळे वातावरण तंग झालं. नगरसेवक, गणपती मंडळांचे कार्यकर्ते तापले. कोण आहे रे तो असे आवाज येऊ लागले. बाका प्रसंग उद्भवला.
बापटांना कुठे काय बोलायचं हे भान नसल्याचे दिसले.

https://www.youtube.com/watch?v=_5eE-0FDvhw

पुणे ही सांस्कृतिक राजधानी असल्याने संस्कृतीवरच बंदी आणण्याची मागणी केल्याने लोकप्रतिनिधी आणि समाजसेवक कार्यकर्ते यांचे भान सुटणे हे एकदम नॅचरल होतं. बापट किरकिरे असतील. पण जिवावर उदार होऊन अशा मागण्या करू नयेत हे कुणालाही कळते.

अशा वेळी बाप्पानेच महापौर मंजुषा नागपुरे यांना बुद्धी दिली आणि त्यांनी "कोण आहे हा, याला धक्के मारून बाहेर काढा" असे उद्गार काढले. यामुळे सभागृहात जीवहिंसा न होता बापट बचावले.

पण बापट सुधारले का?
https://www.youtube.com/watch?v=HsLNl-Gdzv0

उलट चर्चा सुरू झाल्या आहेत. बापटांनी पुण्याच्या सांस्कृतिक जीवनात मोठी खळबळ उडवून दिली आहे.
https://www.youtube.com/watch?v=siDYlYjsFgU

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ढोलताशाचा आवाज हा सुद्धा हानिकारक आहे.
या शिवाय ते वाजवणार्‍यांच्या शरीरावर कंपनांमुळे होणारे वाईट परिणाम हा आणखी एक मुद्दा.

स्वातीने लिंक दिलेल्या थिंक बँकवरच्या डॉ कल्याणी मांडकेंच्या मुलाखतीतून.

मालाड पश्चिमेकडील मालवणी परिसरात दहीहंडी फोडताना विटांचा कॉलम कोसळून 7 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची दुर्घटना आज शनिवारी दुपारी 3 वाजताच्या सुमारास घडली.

CET परीक्षेत महाघोटाळा
https://www.youtube.com/watch?v=P8WGmgW_Rck

ही लिंक इथे का दिली?
बापटांचे मुद्दे संपलेले आहेत. मुलाखतींमधून तेच ते ऐकू येतंय. आता मुंढेंप्रमाणे नॅशनल चॅनल्स त्यांच्या मुलाखती घेत आहे. हा पॅटर्न ओळखीचा आहे. उद्या बापट विसरले जातील. पण या महाएपिसोडमधे असे अनेक प्रश्न झाकोळले जात आहेत. जर भाजप समर्थकांना बापटांचे मुद्दे पटलेले आहेत, तर सरकारला सांगून अंमलबजावणी केव्हांच झाली असती. जनक्षोभाला भीत असते तर ट्रिपल तलाक, बुरखाबंदी, उपवर्गीकरण अशा मुद्द्यांवर निर्णय घेतलेच नसते.

काल डीजेमुक्त दहीहंडी झाली का?
मला डीजे समर्थकांच्या रील्स जास्त दिसल्या. त्यातले काही साउंड सिस्टम चालवणारे.

एके ठिकाणी बापटांचं माकड केलेलं दिसलं. डिजिटल मुव्हिंग इमेज.

https://www.instagram.com/reel/Dc6NYo7TOow/?stkn=MTkyaHdxNHBiOXU3Zg==

बापट यांची अश्या प्रकारे नाचतानाची इमेज पडद्यावर झळकावून त्याची खिल्ली उडवायचा प्रयत्न केला.
पण प्रतिसादात लोकांनी त्यालाच सपोर्ट केला.
अश्या प्रकाराने आता त्याचे विचार अजून घट्ट रुजतील.

निलेश खरे नामक पत्रकाराने - सध्या मुकाम साम टीव्ही - कार्यकारी संपादक म्हणे बापटांची मुलाखत घेतली
https://www.youtube.com/watch?v=qeICoQ8pDws

यांनी पहिल्या प्रश्नापासून बापटांची उलट तपासणी सुरू केली. बापटांनी प्रत्येक चेंडू सीमारेषेपलीकडे मारला. खरेंचा चेहरा स्टुअर्ट बोर्डसारखा होत गेला.
शेवटी ते तुम्ही मशिदींच्या भोंग्यांविरोधात रस्त्यावर का नाही उतरलात या प्रश्नावर आले. बापटींनी सांगितलं - यावर बाँबे हाय कोर्टाचा निर्णय आलेला आहे.त्यावर दोन महिन्यात अंमलबजावणी होऊन मुंबई लाउडरस्पीकरमुक्त झाली अशी घोषणा फडणवीसांनी केली. पोलिस कमिशनरांनीही केली.

यावर खरे म्हणे - आज तुम्हांला दाखवून दिले तर लाउडस्पीकर.

यावर बापटांनी त्यांनी गाय मारली म्हणून आपण वासरू मारायचं का? अशी म्हण आणली. त्यांनी फडणवीस खोटं बोलताहेत का, असं विचारायला हवं होतं. ( मशिदींवरच्या भोंग्यांना परवानगी आणि डेसिबलची मर्यादा असे नियम आहेत - असं वाचल्याचं आठवतं.)

बापटांचा पुन्हा एकदा काय अभ्यास ! काय अभ्यास!

खरेंनी त्या आधी एका दिवसाचा उत्सव, अ‍ॅम्ब्युलन्स च्या आवाजाचा त्रास असे त्यांच्या मते दूसरा आणि गुगली फेकले.

प्रत्येक प्रश्न ऐकल्यावर बापटांच्या चेहर्‍यावरचं हसू फार बोलकं होतं.

इतक्या शांतपणे इतक्या मूर्ख प्रश्नांना इतक्या वेळा तोंडी उत्तर द्यायचा त्यांचा पेशन्स जबरदस्त आहे.

दहीहंडीत बायका नाचवण्याचं लावणी ही महाराष्ट्राची परंपरा आहे , असं एक समर्थन वाचायला मिळालं. शिवाय त्या बायांचं पोट भरतं.

दहीहंडीला अश्लील नाच करणे ही परंपरा कधी चालू झाली? मला ठाणे डोंबिवलीत कधी पाहिलेले लक्षात नाही. काल शिवसेना आणि भाजप बोर्ड लावलेले नगरसेवक/ आमदार/ खासदार पुरस्कृत अनेक अश्लील नाचाचे कार्यक्रम व्हिडिओ दिसले. गंमतच वाटली. जॉब क्रियेशन अँगल लक्षात न्हवता आला!

मलाही तोच प्रश्न पडला. तमाशा वगैरे प्रकार पूर्वीही होते तरी भर वस्तीत बायका स्टेजवर असले डान्स करत आहेत हे मी कधी पाहिलेले नव्हते.

ती खरेंची मुलाखत पाहिली. उगाच कोंडीत पकडायचा प्रयत्न चालला होता. मधे मधे जरा लोकांच्या भावनेचा विचार करावा लागतो वगैरे मुद्दे आणत होते पण ते बापटला कशाला विचारायला हवेत. डीजे आणि लेझर/प्लाज्मा वगैरे वर बंदी आली की बाकी टोकाचे मुद्दे आपोआप मागे पडतील. कारण या दोन गोष्टींना जितका पब्लिक सपोर्ट मिळतोय तितका त्याच्या बाकीच्या मुद्द्यांना मिळणार नाही.

बाकी त्याच्या मुलाखतींमधे आता नवीन काही सापडत नाही हे खरे.

मा.ना. श्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या राजधानी सातारा येथील दहीहंडी महोत्सवातही नृत्य झाले.

एक दोन वेळा मिरवणुकीचा अगदी जवळून अनुभव घेतला आहे. आसपासच्या घरांच्या खिडक्या काचा हादरताना ऐकल्या आहेत. ह्या प्रकारात आवाज इतका मोठा होता की तिथे कुठले संगीत वाजते आहे हेच कळत नव्हते. अशक्य मोठा आवाज.
मला हे अनाकलनीय वाटते की इतका मोठा आवाज नक्की कुणाला आनंददायक वाटतो? आणि का? मानवी कान इतक्या पातळीवरील आवाज इतक्या दीर्घकाळ ऐकत राहण्याची क्षमता बाळगत नाहीत. तरी अट्टाहासाने हे चालवणारे कोण महाभाग आहेत? की भरपूर नशा केल्यावर हे भान राहत नाही?
की मिरवणुकीच्या मार्गावर राहणार्या सुखवस्तू मध्यमवर्गी लोकांना अद्दल घडवायचा आसुरी आनंद आहे यामागे?

तुमच्या डीजे मुळे आमचे कान दुखतात, डोकं दुखतं, छातीत दुखत लेझर लाईट मुळे डोळे दुखतात हे मी सांगू शकतो, मी डिजे नको म्हणतो तर तुमच्या भावना दुखावतात म्हणजे काय होतं हे मला शब्दात सांगा.. हे बापटच लॉजिक मला फार आवडलं आहे.

बाकी फटाके, वाजंत्री वरातीची गाणी ह्यातलं काहीच मला माझ्या लहानपणापासून आवडत नाहीये. असो.

मशिदीच्या भोंग्याना टक्कर द्यायला हिंदुत्ववाद्यांनी डीजे, लेजर, ढोल, लेजिम, फेटे बांधून बुलेट चालवणार्या बायकांच्या मिरवणुका हे प्रकार मुद्दाम अटीतटीने चालु केले. 1995-96 नंतर हे चालु झालं असं मला वाटतं. आता तो आवाजाचा भस्मासूर हिंदुंवरच उलटलाय तरी त्याला बाटलीबंद करणे साक्षात हिंदुत्ववाद्यांनाही शक्य होत नाहीये.
डीजे हा एकच वाह्यात प्रकार हिंदुत्ववाद्यांनी सपोर्ट केलाय का?
फटाके, नदीमधले विसर्जन करून जलप्रदुषण, अश्लिल नाच, बेकायदेशीर हाणामारी, बुलडोझरने मुसलमानाची घरे सपाट करणे, कुठलेही गुन्हे न नोंदवता विरोधकांना जेलमधे सडवणे, बलात्कारी बाबांचे समर्थन/हारतुरे ह्याला सपोर्ट करणारेही हिंदुत्ववादीच आहेत. आता हे सगळे भस्मासूर काय हिंदु लोकांवर उलटणार नाहीयेत का कधीच? आता डीजेविरोधात ओरडणारे पेठांमधले लोक खुमखुमीने मत हिंदुत्ववाद्यांनाच देतात ना? तेव्हा सारासारविवेकबुद्धी कुठे जाते?

लगेंगी आग तो आएंगे कई घर जद मे
यहाॅ पर सिर्फ हमारा मकान थोडी है!
-राहत इंदोरी

सतत इतर माणसाला, जातीला, धर्माला अद्दल घडवण्याची मनिषा असणे हेच विकृतपणाचे लक्षण आहे. आणि विकृती मनात शिरली की नाश करणारच. Karma is a hindu concept, isnt it? Care to learn?

नशीब महाआरतीचे फॅड 92 या दंगलीनंतर थांबले. नाहीतर मंगळवार गुरुवार शनिवार मुंबईभर संध्याकाळी रस्ते जाम झाले असते

>>> मला हे अनाकलनीय वाटते की इतका मोठा आवाज नक्की कुणाला आनंददायक वाटतो? आणि का?

शेंडेनक्षत्र, बरेचजण नशेत असतात. त्यांना तिसऱ्या दिवशी त्रास जाणवायला सुरुवात होते.
=====

>>> सतत इतर माणसाला, जातीला, धर्माला अद्दल घडवण्याची मनिषा असणे हेच विकृतपणाचे लक्षण आहे. आणि विकृती मनात शिरली की नाश करणारच. Karma is a hindu concept, isnt it? Care to learn?

मॅडम,

कर्म ही फक्त हिंदू संकल्पना आहे असे म्हणत आहात?

>>>>कर्म ही फक्त हिंदू संकल्पना आहे असे म्हणत आहात?
मला वाटतं होय कर्म ही हिंदू कन्सेप्ट आहे.

शाळेत असताना आम्ही वर्गणी काढायचो. चाराणे मिळायचे. एक रूपया दिला तर आनंद व्हायचा. गच्चीवर गणपती बसवायचा. डेकोरेशन घरगुती. ते कम महिला करायच्या. कॉलेजला गेल्यावर आता आपण मोठे झालो, म्हणजे मंडळा सारख गणपती बसवायचा, केसरी, सकाळ वाले येऊन फोटो घेतील असं वाटायचं. जी वर्गणी यायची त्यात एक मूर्ती, बैठक आणि साधा लाऊडस्पीकर इतकंच. कॅसेटस घराघरातून. ते ही लोक येऊन सांगत कि त्रास होतोय. तेव्हां लगेचच आवाज बारीक करायचो. नंतर लोकांना त्रास होतो हे लक्षात आल्यावर पुढाकार घेणं थांबवलं.

अगदी कोवळ्या वयात नशा असते, आपल्याला लोक सिरीयसली घेतात, सार्वजनिक काम केलं म्हणून शाबासकी मिळेल असं वाटतं. वय वाढल्यावर पण अक्कल येत नसेल तर कठीण आहे. या मुद्द्यावरून माझं कधीच कुणाशी जमत नाही.

कर्म हा हिंदु सिद्धांत आहे. त्याचा विसर हिंदुत्ववाद्यांना पडलाय. आमच्यासारख्या हिंदुंना तो नीट समजलाय. म्हणून आम्हीच खरे हिंदु आहोत. हिंदुत्ववादी भोंदु आहेत. त्याना स्वतःच्या धर्माविषयी काडीची माहिती नसते.. नुसत्या वरवरच्या प्रथा पाळणे आणि त्याच्या अस्मिता करणे समजते.

भारतात काही वर्षे सर्व कामधंदे थांबवून सर्व वयाच्या स्त्री पुरूषांना अरण्यात नेऊन धर्माचं शिक्षण द्यावं. त्यासाठी आश्रम बनवावेत.
सर्व प्रकरच्या अस्मिता मनातून पुसून टाकण्याचं लक्ष्य असावं.

> की मिरवणुकीच्या मार्गावर राहणार्या सुखवस्तू मध्यमवर्गी लोकांना अद्दल घडवायचा आसुरी आनंद आहे यामागे?
हो ! हेच उत्तरेत कावड यात्रेलाही लागू होते. एरवी अगदी wretched and miserable आयुष्य असणार्‍य छपरी लोकांना निदान काही दिवस तरी आपण आपला 'जलवा' दाखवतो, कलेक्टर आणी डी एस पी आपल्यावर पुष्पवृष्टी करतात, कावड ला एखाद्याचा धक्का लागला तरी आपण त्याला तुडवतो , मग ते पोलिस असो वा आर्मी वाला, चिकन च्या टपर्‍या आपण इशारा करताच उध्वस्त होतात, हायवी ची एक बाजू आपण बंद ठेवतो, डीजे च्या आवाजाने दुकानातल्या बाटल्या फुटतात याची झिंग असते.

> की मिरवणुकीच्या मार्गावर राहणार्या सुखवस्तू मध्यमवर्गी लोकांना अद्दल घडवायचा आसुरी आनंद आहे यामागे?>>

हे सुखवस्तु, मध्यमवर्गीयच ह्या डीजेमागे उभे असलेल्या पार्टीला "हिंदु" म्हणून सपोर्ट करतात ना? हे चुकीला चुक कधी म्हणले आजवर? जेव्हा स्वतःची शांतता भंग होऊ लागली, स्वतःच सुखवस्तुपण धोक्यात येऊ लागलं आणि त्याविरोधात बोलणारा "आपल्यातलाच" आहे अशी खात्री पटली तेव्हा कुठे हे विरोधाला उभे ठाकले.. जेव्हा इतर समाजघटकाला त्रास होतो व ते सरकारला विरोध करतात, तेव्हा हे सुखवस्तु ममव त्यांना डायरेकट देशद्रोही, धर्मद्रोही लेबले देत नाहीत का?

हे घा. हा नवीन मुद्दा दिसतोय.
https://www.facebook.com/reel/1430749485601530
पण समोरचा पुन्हा बोलू लागत नाही, तोवर ते बोलतच राहतात. तेचे तेच. आपलं सांगून संपलं की थांबावं .

>>> कर्म हा हिंदु सिद्धांत आहे. त्याचा विसर हिंदुत्ववाद्यांना पडलाय. आमच्यासारख्या हिंदुंना तो नीट समजलाय. म्हणून आम्हीच खरे हिंदु आहोत. हिंदुत्ववादी भोंदु आहेत. त्याना स्वतःच्या धर्माविषयी काडीची माहिती नसते.. नुसत्या वरवरच्या प्रथा पाळणे आणि त्याच्या अस्मिता करणे समजते.

नक्की माहीत नाही व माहीत व्हावे ह्या उद्देशाने विचारतो आहे. इस्लाममध्ये 'केलेल्या कृत्याची चांगली, वाईट फळे' अशी संकल्पना नाही का?

हिंदुत्ववाद्यांना विसर पडला आहे हे कसे निश्चित केले गेले असेल ह्याबद्दल थोडे कुतूहल आहे.

'आम्हीच खरे हिंदू आहोत' ह्यातील आम्ही म्हणजे कोण हे कृपया विशद व्हावे.

>>> हे सुखवस्तु, मध्यमवर्गीयच ह्या डीजेमागे उभे असलेल्या पार्टीला "हिंदु" म्हणून सपोर्ट करतात ना? हे चुकीला चुक कधी म्हणले आजवर? जेव्हा स्वतःची शांतता भंग होऊ लागली, स्वतःच सुखवस्तुपण धोक्यात येऊ लागलं आणि त्याविरोधात बोलणारा "आपल्यातलाच" आहे अशी खात्री पटली तेव्हा कुठे हे विरोधाला उभे ठाकले.. जेव्हा इतर समाजघटकाला त्रास होतो व ते सरकारला विरोध करतात, तेव्हा हे सुखवस्तु ममव त्यांना डायरेकट देशद्रोही, धर्मद्रोही लेबले देत नाहीत का?
=====

मॅडम,

डीजे (पक्षी sound system) प्रत्येक धर्माच्या मिरवणुकीत असू शकते. त्या धर्मांचे लोक त्या ध्वनियोजनेच्या पाठीशी असतात की नसतात हे कृपया विशद झाले तर बरे होईल. की फक्त हिंदुत्ववादी हे हिंदू सणांच्या ध्वनियोजनेच्या पाठीशी असतात असे म्हणत आहात, तेही कृपया कळावे.

मला जेव्हापासून आठवते तेव्हापासून चुकीला चूक म्हणणारेच भेटले आहेत मला. ह्या भयंकर ध्वनियोजना चुकीच्या आहेत हेच म्हणणारे भेटले. चुकीच्या नाहीत असे कदाचित म्हणू इच्छिणारे फक्त गलिच्छ अंगविक्षेप करत नाचताना पाहिले.

'आपल्यातलाच' = ?? आपल्यातलाच म्हणजे काय म्हणायचे आहे ते कळले तर बरे होईल. आशा आहे की मुद्यावरील भाष्य जातीवर गेले नसेल.

'इतर समाजघटक' व 'सुखवस्तू' हे नेमके कोणाला उद्देशून असेल हे माहीत नाही. प्रचंड ध्वनीचा त्रास हा समाजघटक वा सुखवस्तू ह्यांना बघून होत नाही, तर सर्वांनाच होतो.

उगीच भाजपला मते देणार्या लोकांना, हिंदुत्त्ववाद्यांना आरोपीच्या पिंजर्यात उभे का करता? असा काही डेटा आहे की भाजपला मत देणार्या समस्त मतदारांना डीजे, लेजर वगैरे राक्षसी प्रकार चालतात?
उलट मी रस्त्यावर डीजे विरोधी अनेक संघाच्या, भाजपच्या समर्थकांना डीजे बंदीची मागणी करताना ऐकले आहे.

बापट हे कॅटालिस्ट (सॉरी, उत्प्रेरक) आहेत ज्यांनी ह्या दबलेल्या असंतोषाला काहीशा संघटित पद्धतीने उघड करायला मदत केली. त्याबद्दल त्यांचे शतशः आभार. कधीतरी ह्यांना राज्य किंवा देश पातळीवर सन्मानित केलेले बघायला मिळेल अशी आशा!

शेंडेनक्षत्र,

लेटेस्ट अभिप्राय उत्तम

समाजकारण व राजकारण ह्यात गल्लत करण्याची हेतुपुरस्सर हातघाई चाललीच होती

नेमक्या वेळी तुम्ही ती दाखवून दिलीत

शेंडे +१. यात भाजपा, काँग्रेस, सेना, राष्ट्रवादी, मनसे, धर्म, जाती, शिक्षित, अशिक्षित कशकशाचा प्रबळ सहसंबंध नाही. मूर्ख, अकलेचे दिवाळे निघालेल्या मंडळींचे सांख्यिकीकदृष्ट्या समान वाटप झालेले आहे.
आज कुठले राजकारणी पाठिंबा वगैरे देत असतील तर त्याला काही अर्थ नाही, उद्या ते वेगळ्या पक्षात असतील आणि परवा आणखी वेगळ्या.
ही नागरिक सक्रियता आहे, तीच असू द्यावी. पक्षीय मुलामा देण्याच्या भानगडीत पडू नये.

Pages