बृहनपुण्याचे बापट बाप्पामुळे बाल बाल बचावले

Submitted by Madan Hunkare on 27 August, 2026 - 12:47

पुणे शहराच्या महापालिकेत गणेश मंडळांची बैठक होती. महापौर भाजपच्या आणि सत्ताही भाजपचीच. सर्व नगरसेवक भाजपचेच.
अशा या वातावरणात बाप्पाचा उत्सव कसा करायचा यावर गंभीर चर्चा चालू असतानाच पुण्याचे एक नागरिक श्रीयुत बापट म्हणाले कि उत्सव करा पण डीजेमुक्त करा. कुठेच डीजेही नको किंवा स्पीकर्स नको.

यामुळे वातावरण तंग झालं. नगरसेवक, गणपती मंडळांचे कार्यकर्ते तापले. कोण आहे रे तो असे आवाज येऊ लागले. बाका प्रसंग उद्भवला.
बापटांना कुठे काय बोलायचं हे भान नसल्याचे दिसले.

https://www.youtube.com/watch?v=_5eE-0FDvhw

पुणे ही सांस्कृतिक राजधानी असल्याने संस्कृतीवरच बंदी आणण्याची मागणी केल्याने लोकप्रतिनिधी आणि समाजसेवक कार्यकर्ते यांचे भान सुटणे हे एकदम नॅचरल होतं. बापट किरकिरे असतील. पण जिवावर उदार होऊन अशा मागण्या करू नयेत हे कुणालाही कळते.

अशा वेळी बाप्पानेच महापौर मंजुषा नागपुरे यांना बुद्धी दिली आणि त्यांनी "कोण आहे हा, याला धक्के मारून बाहेर काढा" असे उद्गार काढले. यामुळे सभागृहात जीवहिंसा न होता बापट बचावले.

पण बापट सुधारले का?
https://www.youtube.com/watch?v=HsLNl-Gdzv0

उलट चर्चा सुरू झाल्या आहेत. बापटांनी पुण्याच्या सांस्कृतिक जीवनात मोठी खळबळ उडवून दिली आहे.
https://www.youtube.com/watch?v=siDYlYjsFgU

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल सोमि वर कमेन्ट्स वाचल्या होत्या " डिजे हे केवळ निमित्त, खरा अजेन्डा हिन्दूंना विरोध" "यांच्यासारखे दाभोळकराला आदर्श मानणारे ...." वगैरे तेव्हाच शंका आली होती की हे वायलन्स वर येणार Sad
कार्यकर्ते छाप छपरी लोक जाऊ दे, पण अनेक सुशिक्षित लोकांनाही असल्या अजेन्ड्याची भूल पडते आहे . ज्यांना आपल्यालाच दैनंदिन वाहतुकीला, जीवनावश्यक सेवेला अडथळा आणि रोजचे कानावर अत्याचार ही सांस्कृतिक अभिमानाची गोष्ट वाटते आहे अशांना लॉजिकल मुद्दा लक्षात घ्यायचाच नाहीये.

एक्सक्टतली
आताच फेसबुकवर एक काकांची कॉमेंट वाचली म्हणे डीजे ला विरोध इथपर्यंत ठीक होतं पण आमच्या देवाला विरोध करणार असेल तर बरे झाले याला मारलं

म्हणलं अहो काका त्याने कधी विरोध केलाय
तो म्हणतोय तो मानत नाही हा त्याचा वैयक्तिक निर्णय आहे
तुम्हाला सक्ती केलीये का तुम्ही पण मानू नका

उलट तुम्ही त्यावर सक्ती करताय तुमच्या आस्तिक पणाची
तीही मोठ्याने त्रास होईल असा पध्दतीने

पद्धतशीरपणे बापट हा कसा कम्युनिस्ट अर्बन नक्षली आणि हिंदूविरोधी म्हणून पसरवले जात आहे

पुण्यात ध्वनी प्रदूषणाचा मुद्दा घेऊन गणेशोत्सवात डीजेला बंदी घाला अशी मागणी करणारे विद्यानंद बापट यांच्यावर आज सकाळी पुण्यातील टिळक रस्त्यावर हल्ला करण्यात आला. हा हल्ला करणारा माथेफिरू रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती आता समोर आली आहे. विद्यानंद बापट यांना मारहाण केल्यानंतर पुणे क्राईम ब्रँचने अवघ्या तीन तासात संतोष चव्हाण याला अटक केली आहे. संतोष चव्हाण हा पुण्यातील राऊतवाडी भागातील रहिवासी आहे. #Pune #PuneNews

बापटांच्या हल्ल्यावरील देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया भेंडीच्या भा़जीपेक्षा बुळबुळीत वाटली. नाही तेव्हा शिरा ताणून बोलणार्या फडणविसांना इथे आवाज चढवून हल्लेखोराला जबरदस्त शिक्षा देऊ असे म्हणावेसे वाटले नाही.

हे तितकेसे योग्य नाही. प्रत्येकाला मतस्वातंत्र्य आहे वगैरे अगदीच गुळगुळीत मिळमिळित प्रतिक्रिया.
निदान त्यांना चांगले २४ तास पोलिस संरक्षण तरी द्या.

भाजपची काँग्रेस होत चालली आहे. संतोष पंडित ह्या व्हिडियो ब्लॉगरलाही काहीतरी खुसपट काढून अटक केली.

बापटांनी पहिलं पाऊल उचलले आहे. आता लोकांनी पाठिंबा दिला नाही तर हे राजकारणी आणि गुंड थंड पाणी ओतायला बसलेच आहेत. इथे वर नाही का मिडलग्राऊंड नाही वरुन रडगाणी चालू झालेली!

मला आलेली एक नोट खाली देत आहे. मी जॉईन झालो आहे.

*गणेश उत्सव व सर्वच मिरवणुकातील कर्णकर्कश्य आवाजाविरोधात पुणेकर*
*Citizens intiative against loudspeakers, DJ s* Group 2

पहिल्या व्हॉट्सॲप ग्रुप मध्ये 1025 सदस्य झाले असून त्यात आता नवीन सदस्य जॉइन होऊ शकत नाहीत. म्हणून हा दुसरा ग्रुप केला आहे.

https://chat.whatsapp.com/HPd0mp9WewY7OsBMwbboOm?s=cl&p=a&mlu=4&ilr=4

हा बिगर राजकीय ग्रुप/ मंच आहे. फक्त कर्णकर्कश्य स्पीकर विरोध करण्यासाठीचा आहे.

इतर समविचारी कुणाला ग्रुप मध्ये ऍड करायचे असेल तर जरूर त्यांना लिंक पाठवा.
आपल्या सोसायटी मधील मेंबर सुद्धा जोडू शकता.

आवाज प्रदूषण हा खरं तर पक्षीय प्रश्न नसून तो सामान्य माणसांच्या शांततेत जगण्याच्या मूलभूत अधिकाराचा आहे.

दुर्दैवाने मूलभूत अधिकारावर वाजवी नियंत्रण नक्की किती याचे निकष नाहीत. (fundamental rights and reasonable restriction).

बऱ्याच वेळेस न्यायालयांनी घालून दिलेले निर्बंध सर्रास पायदळी तुडवले जातात.

मतांसाठी राजकारण असल्यामुळे सर्वच पक्ष आणि त्यांचे अनुयायी याला पक्षीय दृष्टिकोनातूनच पाहतात.

याशिवाय यात विविध तर्हेचे आर्थिक संबंध गुंतलेले असतात यामुळे सामान्य माणसाची कुचंबणा होत राहते.

गणेशोत्सवाचा मूळ हेतू काय याचे चर्वित चर्वण सर्वत्र झालेले आहे.

जोवर सामान्य माणसे राजकीय पक्षांना स्पष्ट शब्दात सांगत नाहीत कि यावर्षी गणेशोत्सवात डी जे वाजले तर पुढची निवडणूक तुम्हाला महाग जाईल तोवर यात बदल होणार नाही.

आता श्री बापट याना पाठिंबा देणारे आणि विरोध करणारे याना सामान्य माणसांच्या त्रासाशी काहीही घेणेदेणे नाही.

त्यांना आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची आहे.

साधी सरळ सूचना- डी जे चा आवाज ८५ डेसिबलच्या पर गेला तर १०,००० रुपये दंड,

१०० डेसीबेलच्या वर गेला तर एक लाख रुपये दंड

आणि

१२० डेसीबेलच्या वर गेला तर डी जे चालवणाऱ्यांना सहा महिने तुरुंगवास आणि त्या मन्डळाला गणेशोत्सवासाठी कायमची बंदी.

हे ड्रोनच्या साहाय्याने पोलिसांना सहज पडताळता येईल. द्रुतगती मार्गावर असलेल्या कॅमेर्यांसारखे लक्ष ठेवून पोलिसाना असे करणे सहज शक्य आहे.

पण राजकीय इच्छाशक्ती असेल तर.

सहज संदर्भासाठीआवाजाची पातळी

60 dB: Normal conversation or a standard dishwasher.

70–80 dB: A running vacuum cleaner, busy city traffic, or a noisy restaurant (safe for continuous exposure under 70 dB).

85–90 dB: A power lawn mower, blender, or heavy traffic (prolonged exposure above 85 dB can harm hearing).100–110 dB: Motorcycle, nightclub, or sporting event.

120–140 dB: Thunder, a live rock concert, or a jet plane taking off (considered the threshold of pain and immediate risk)

राज अज्ञानी / आशुचॅम्प , आपली भाषा आवरा. पुन्हा असं लिहिलेलं दिसलं तर दोघांचेही सदस्यत्व रद्द करून टाकण्यात येतिल.

admin जे आयडी नियमित पणे माझ्यावर हल्ला करतात त्यांच्यावर कारवाई कधी करणार?

मायबोलीच्या अटी समजावून सांगितलेल्या एका धाग्यात सदस्यांनी परस्परांना आक्षेपार्ह भाषा वापरू नये, अ‍ॅडमिनला कळवावे असे लिहीलेले आहे. जे लोक यावर विश्वास ठेवून अ‍ॅडमिनला कळवतात त्यांची फजिती होते. अ‍ॅडमिन कधीही कारवाई करत नाही, उलट तक्रार करणार्‍यांना हाडहूडची भाषा केली जाते. अ‍ॅडमिनकडे तक्रार करणे हे विनोदी आहे असे सांगितले जाते.

या पार्श्वभूमीवर कारवाई हे प्रकरण अगम्य पक्षी विनोदी होत चालले आहे. नेमका नियम काय आहे हे स्पष्ट व्हावे.

काही आयड्यांना अजिबातच कारवाईचं भय नसल्यासारखे बिनधास्त असतात. काहींना जपून रहावं लागतं.
किती दिवस? ज्या कारवाईला काहीही अर्थ नाही त्याला किती दिवस भिणार? आता हेच अ‍ॅडमिन कपदे बदलून आलेत. स्वतःच स्वतःला सांगताहेत.

किमान आयडी उडवण्याआधी अपवाद कोण आणि का असतात ते तर सांगा.

नेकी और... करुन टाका बरं अ‍ॅडमिन कारवाई! कुठे वॉर्निंग देत आहात!>>> बच्चे की जान लेंगा क्या Happy

असो वॊर्निंग दिलेली असताना मस्ती करू नये जास्त त्यामुळे थांबतो Happy

साधी सरळ सूचना- डी जे चा आवाज ८५ डेसिबलच्या पर गेला तर १०,००० रुपये दंड,
१०० डेसीबेलच्या वर गेला तर एक लाख रुपये दंड >>
याने चुकीचा पायंडा पडण्याची शक्यता आहे. माज इतका वाढला आहे की हे कार्यकर्ते म्हणतील की ठीक आहे, देऊ दिवसाला १ लाख रुपये दंड.
स्वतः मुख्यमंत्री बांगड्या भरून, मूग गिळून बसले आहेत आणि सरकार या प्रकरणात लाऊड स्पीकर्सवर बंदी घालेल असे स्पष्ट शब्दात म्हणत नाहीयेत, त्यातूनच समजून जा की पुढे काय होणार आहे ते.

मंडळाचे कार्यकर्ते राजकीय कार्यकर्ते सुद्धा असतात जे सतरंज्या उचलायला लागतात. त्यांची गरज असते. त्यांना सरकार सपोर्ट करणारच. म्हणून बापट यांना मारहाण अपेक्षितच होती. आणि पुढेही होऊ शकते. समाज सुधारायला जे जातात त्यांना होतेच. म्हणून त्यांनी काळजी घ्यावी. आता एकट्याने फार पुढे करू नये. लोकांचे संघटन झाले तरच पुढे याला अर्थ आहे. नाहीतर मग झेला यांची अरेरावी आपण तेच डिसर्व करतो असे समजून.

सोशल मीडियावर बापट यांच्या समर्थनार्थ आणि विरोधी अशा संमिश्र प्रतिक्रिया येत असाव्यात. पण बहुधा माझ्या अल्गोरीदम मुळे असावे जे मला बापट यांच्या कौतुकाचेच व्हिडिओ आणि कॉमेंट जास्त दिसत आहेत.

पण त्यातही काही लोकांच्या कॉमेंट ढोंगी आहेत. म्हणजे बापट यांना मारहाण झाली ते वाईट झाले असे म्हणून पुढे म्हणायचे की त्यांनीही जरा अतीच केले, अमुक तमुक कश्याला बोलायचे..

बापट भाबडे आहेत असे म्हणणार नाही
वाहवत जातात असेही नाही पण काही वेळा मुलाखती दरम्यान इतकं मनातलं आणि स्पष्ट बोलायचं नसतं हे त्यांना बहुदा लक्षात येत नसावं
आणि मिडीयावाले मुद्दाम असे खोचक प्रश्न विचारतात
आणि त्याला उत्तर देताना बापट सरळ सांगून रिकामे होतात की हो मानाच्या गणपतीना जागा नसेल तर शहराबाहेर काढा
म्हणजे त्यांच्यालेखी हा असा काही प्रश्नच नाहीये
दोन अधिक दोन चार इतकं सोप्प उत्तर असल्यासारखे ते बोलतात

आणि बरोबर त्यांचे असेच व्हिडिओ बरोबर कट करून फिरवले जात आहेत आणि ते हिंदूविरोधी सण विरोधी असल्याचे नारेटिव्ह पसरवले जात आहे

भाबडे नसले तरी निरागस आहेत ते असं वाटतं. नाकासमोर चालणारे, पापभिरू आणि सरळमार्गी आहेत. उगा आत एक बाहेर एक छक्केपंजे नाहीत, धोरणी वगैरे अजिबात नाहीत असं वाटलं, त्यात उत्साही ही आहेत. काळजी म्हणुनच वाटते.

ऋन्मेष,

दोन बाबींमध्ये स्पष्ट फरक करणे हे ह्या विशिष्ट विषयात अत्यावश्यक आहे. उत्सव साजराच करू नका अश्या स्वरूपाचा काहीतरी विचार हा बापटांवर थेट हिंदूविरोधी शिक्का मारतो. (असा शिक्का बसणे हे खरे तर मलासुद्धा पटत नाही कारण सार्वजनिक गणेशोत्सवाचे प्रयोजन आता संदर्भहीन आहे. पैसे कमावणे, धिंगाणा करणे आणि व्यसनबाजी ह्या गोष्टी ज्यांना आकर्षित करतात ते हा उत्सव सार्वजनिक राहावा म्हणून सक्रिय असतात.) (मात्र, त्यांच्याशिवाय बाकीचे असे असंख्य लोक असतात जे फक्त देखावे, रोषणाई पाहायला, सोबतच दर्शन घ्यायला जातात. ह्या लोकांकडून किंवा ह्या लोकांचे नाव घेऊन बापटांवर हिंदूविरोधी हा शिक्का मारायला काहीजण सरसावतात. त्या गोष्टीचे एक थोडेसे उग्र स्वरूप आज दिसले. कदाचित पुढे हे स्वरूप अधिक उग्र होईल).

मात्र, DJ चा विरोध ह्या गोष्टीशी धर्माचा, जातीचा संबंध नसल्याने एक मोठा समूह बापटांना हिंदूविरोधी वगैरे न म्हणता नायक ठरवत आहे. जे माझ्यामते योग्य आहे. तो सामाजिक प्रश्न आहे.

त्यामुळे, "त्यांनीही जरा अतीच केले" हे काही प्रमाणात खरे आहे पण DJ चा विरोध ह्याबद्दल सामान्यांचे एकमत आहे.

बापट हे मुरब्बी राजकारणी नसल्याने जाहीररीत्या कोठपर्यंत मते मांडावीत ह्याबाबतीत ते थोडे गंडले आणि हेच काहींनी हेरले. (बाकी कोठपर्यंत मते मांडावीत हे हल्ली मुरब्बी राजकारणी लोकही विसरून जातात ते वेगळे).

बापट आणि ही अश्या प्रकारची समाजसुधारणेचा उद्देश ठेवणारी आंदोलने हे दोघेही येत्या काळात मोठे होणार व व्हावेत.

बरोबर बेफिकीर
आणि याच बरोबर नुसते बापट ना मोठे करून आणि मीडियाने मुलाखती मागे मुलाखती घेण्याच्या सपाटा लावल्यामुळे विरोधी गटाला टार्गेट आयतेच मिळाले
उद्या नवीन वेगळा विषय आला तर मीडिया आणि सोशल मीडिया बापटना विसरून दुसऱ्या कोणाला मोठे करण्यात मग्न होईल

याने बापट ना काही फरक पडेल असे वाटत नाही, आधीही ते तसेच होते आणि नंतरही तसेच राहतील

प्रश्न आपला आहे, केवळ बापट ना पुढे करून हा प्रश्न सुटणार नाही
जोवर राजकारणी लोकांचीच मंडळे आणि त्यांचेच कार्यकर्ते हे त्यात आहेत तोवर तरी हे काही होईल याची आज तरी खात्री वाटत नाही

सध्या काय आहे ना कि माणूस जितका चालूमाल तितका तो हुशार. असे लोक जननायक म्हणून समाजात मिरवतात, समाज त्याना फालो करत आहे. एखादा सत्यकाम तत्वाला घरून चालणारा असेल , तर त्याला "क्या च्युत्या है " म्हणून सडवतात!
हे सध्याचे "जीटझिस्ट" आहे. एव्हढे DJ लावले ताशे ढोल बडवले तरी बाप्पाला काही जाग येत नाही. कणव येत नाही.
सत्यं ब्रूयात् प्रियं ब्रूयात्
न ब्रूयात् सत्यम् अप्रियम्
प्रियं च नानृतम् ब्रूयात्
एष धर्मः सनातन:
व्वा! रे सनातन धर्म!

सब कुछ सीखा हमने ना सीखी होशियार
सच है दुनियावालों कि हम हैं अनाड़ी
दुनिया ने कितना समझाया
कौन है अपना कौन पराया
फिर भी दिल की चोट छुपा कर
हमने आपका दिल बहलाया
खुद पे मर मिटने की ये ज़िद थी हमारी
असली नकली चेहरे देखे
दिल पे सौ सौ पहरे देखे
सलाम बापट!!!!! झिंदाबाद! तुम जियो हजारो साल !

https://www.instagram.com/reel/Dc1D4YdCfBt/?igsi=NHhuYmFjeHRhdzh4

बापटचे आई बाबा त्याला झालेल्या मारहाणीनंतर त्याच्याशी फोनवर बोलताना.
सुसंस्कृत आणि कोकणची माणसे साधी भोळी कॅटेगरी

फडणवीस यांनी फारच बोटचेपी भूमिका घेतली ह्या प्रकरणात. निदान लोकमानस कुठं आहे हे बघून तरी बदलायला पाहिजे होते. बापाटाच्या समर्थनार्थ मोठं आंदोलन होईल असं वाटतंय.

रात्रीचे चांदणे
बापटाच्या समर्थनार्थ मोठं आंदोलन होईल असं वाटतंय.>>>
नाही असे काही होणे नाही. कारण आपण सगळे दातात हाडूक धरून बसलेलो आहोत!

बापटांचे वडील खूपच साधे वाटले. काळजी वाटत होती. आईने टोमणा मारताना "तू फोन उचललास हे आमचं भाग्य" असं म्हटलं.
बापट पुणेकर नाहीत. गेले सात आठ वर्षेच ते पुण्यात आहेत. त्यामुळं ते गणेशोत्सवाला युज्ड टू झालेले नाहीत.

रत्नागिरीने अनेक महान लोक दिले. यातल्या अनेकांची कर्मभूमी नंतर पुणे हीच राहिली. बाबासाहेब, सावरकर, टिळक, महर्षी धोंडे केशव कर्वे, आचार्य विनोबा भावे, गोपाळ कृष्ण गोखले, साने गुरूजी, दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर, बाळ गंगाधर खेर हे सर्व मूळचे रत्नागिरीचे आहेत. यांचे कार्य पाहिले तर आज महाराष्ट्रातले पुरोगामी विचार कुठे असायला हवे होते? ते आज डीजेच्या लढ्याला पुरोगामित्व समजणे इथवर येऊन थांबलेले आहेत.

गंमत म्हणजे नागपूर, सोलापूर महाराष्ट्रातच आहे. औरंगाबाद महाराष्ट्रात आहे. इथेही तेच फडणवीस आहेत. या शहरात डीजेबंदी झाली आहे. पुण्यात हा एव्हढा संघर्ष का?

कि मराठा आरक्षणावरून मराठा ओबीसी वाद पेटवला, हिंदू मुस्लीम रोजच चालू आहे, उपवर्गीकरणावरून दलितात भांडणे लावली. आता त्यांना थोडं जिंकण्याचं फिलिंग घेऊ द्यावं म्हणून हे लुटुपुटीचं भांडण सुरूय? सगळं आपल्याच नियंत्रणात. सीजेपीच्या आंदोलनासारखं. असं तर नाही ना?

१बापटांनी आपली मते स्पष्ट मांडली हे अतिच केले. त्याला मारलाय कुठे? आणखी मारायला हवे होते. हे सुद्धा स्पष्ट मत आहे.
सज्जनांचे बळ पायामध्ये लुळे अशी विंदा की आरती प्रभूंची ओळ आहे.
निर्भय बनो. डरो मत. जेन झी कडून शिकायची गरज आहे.

२. <फडणवीस यांनी फारच बोटचेपी भूमिका घेतली ह्या प्रकरणात. निदान लोकमानस कुठं आहे हे बघून तरी बदलायला पाहिजे होते. > भाजप लोकमताची कदर करतो हा भाबडा विश्वास आवडला. तसंच लोकमत बापटांच्या बाजूने किंवा किमान शांततापूर्ण गणेशोत्सवाच्या बाजूने आहे हाही.
मुळात भाजपने आपली भूमिका आशिष शेलारांच्या तोंडून कधीच स्पष्ट केली आहे. गेल्यावर्षी पी ओ पी ला विरोध करणार्‍यांना ते अर्बन नक्षल म्हणाले होते. यंदा गणेशोत्सवात आवाजावर, मूर्तीच्या उंचीवर, तिच्या विसर्जनावर , दहीहंडीच्या थरांवर मर्यादा आणा असे म्हणणार्‍यांचा हेतू हिंदूंचे हे सगळे सण बंद करावे असाच आहे आणि हे अर्बन नक्षल आहेत- इति वदले शेलार. त्यांनी त्यांचा शब्दकोश अद्यावत केला नसावा , नाहीतर दिमागी नक्षल म्हणाले असते.
डीजे बंदी आणि बापटांना मारहाण करणार्‍याबद्दल देवाभैयाची भूमिका तर त्यांचं फडणवीस हे आडनाव सार्थ करतात. इथे रोख नाना फडणवीसांकडे आहे. त्यांच्या जातीकडे नाही.

३ लहानपणापासून पुण्याची ओळख विद्येचे माहेरघर अशी वाचत आलोय. त्या पुण्यात मूलगामी विचार करणार्‍या व्यक्तींवर हल्ले होतात.
त्यामुळे पुण्याने स्वतःला यापुढे विद्येचे माहेरघर , महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असं न म्हणवता गुंडगिरी आणि गुन्ह्यांचे आगार म्हणवून घ्यावे.

४ <स्वतः मुख्यमंत्री बांगड्या भरून > तुमची पॅट्रिआर्की दिसतेय. हे - तुमची चड्डी किंवा नाडी दिसतेय या चालीवर वाचावे.

५. ही खरीखुरी शंका आहे. बापट जे म्हणताहेत, ते म्हणणारा कोणी चव्हाण किंवा घाटे असता आणि त्याची भाषा या चव्हाण आणि घाटेंसा रखी असती आणि चव्हाण आणि घाट्यांच्या जागी कोणी बापट असते तर लोकांचा पाठिंबा कोणाला असता?

पुरोगामित्वाचा लढा हा डीजेंच्या आवाजावर मर्यादित झाला. त्याला एखाद्या क्रांतीचे रूप दिले जात आहे. एखादाला वारेमाप प्रसिद्धी देण्यात येऊ लागली कि थांबावे आणि सावध व्हावे हा बाणा आहे.

Pages