पुणे शहराच्या महापालिकेत गणेश मंडळांची बैठक होती. महापौर भाजपच्या आणि सत्ताही भाजपचीच. सर्व नगरसेवक भाजपचेच.
अशा या वातावरणात बाप्पाचा उत्सव कसा करायचा यावर गंभीर चर्चा चालू असतानाच पुण्याचे एक नागरिक श्रीयुत बापट म्हणाले कि उत्सव करा पण डीजेमुक्त करा. कुठेच डीजेही नको किंवा स्पीकर्स नको.
यामुळे वातावरण तंग झालं. नगरसेवक, गणपती मंडळांचे कार्यकर्ते तापले. कोण आहे रे तो असे आवाज येऊ लागले. बाका प्रसंग उद्भवला.
बापटांना कुठे काय बोलायचं हे भान नसल्याचे दिसले.
https://www.youtube.com/watch?v=_5eE-0FDvhw
पुणे ही सांस्कृतिक राजधानी असल्याने संस्कृतीवरच बंदी आणण्याची मागणी केल्याने लोकप्रतिनिधी आणि समाजसेवक कार्यकर्ते यांचे भान सुटणे हे एकदम नॅचरल होतं. बापट किरकिरे असतील. पण जिवावर उदार होऊन अशा मागण्या करू नयेत हे कुणालाही कळते.
अशा वेळी बाप्पानेच महापौर मंजुषा नागपुरे यांना बुद्धी दिली आणि त्यांनी "कोण आहे हा, याला धक्के मारून बाहेर काढा" असे उद्गार काढले. यामुळे सभागृहात जीवहिंसा न होता बापट बचावले.
पण बापट सुधारले का?
https://www.youtube.com/watch?v=HsLNl-Gdzv0
उलट चर्चा सुरू झाल्या आहेत. बापटांनी पुण्याच्या सांस्कृतिक जीवनात मोठी खळबळ उडवून दिली आहे.
https://www.youtube.com/watch?v=siDYlYjsFgU
बापट याना मारहाण
बापट याना मारहाण
Sunaina Holey
Sunaina Holey
@SunainaHoley
·
Sep 1
इथे @Vidyanand_Bapat ने भयंकर माती खाल्ली.
विरोध फक्त DJ चा आणि बॉलिवूडच्या अश्लील गाण्यांचा आहे आम्हाला. ढोलताशा, आरत्या, भजनांचा नाही.
तुम्ही नास्तिक असूच शकता पण जे आस्तिक आहे आणि ज्यांचं संस्कृती व परंपरांवर प्रेम आहे त्यांना ज्ञान पाजळणारे तुम्ही कोण लागून गेलेत?
तुम्ही ज्यावेळी ढोलताशाचा विरोध केला आणि दाभोळकरचा उल्लेख केला तिथेच तुमचा अजेंडा उघड झाला. आता निर्भय बनो गँग सोबत आपण दिसलात त्यामुळे आता तुम्हाला फाट्यावर मारायची वेळ आलीये.
तुमच्या शुद्ध मराठीला आम्ही भीक घालत नाही.. जो धर्माच्या विरोधात बोलेल त्याला आम्ही कोलणारच. शुद्ध मराठीची पुंगळी करून भरा ढुंगणात..
भाजप समर्थक Proud Hindu
बापटांना टिळक रोडवर गणेश
बापटांना टिळक रोडवर गणेश मंडळाच्या काही कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केल्याची बातमी आहे
https://www.instagram.com
https://www.instagram.com/reel/Dc0ONA2JQig/?igsi=cndmczVxZXRsdTU5
वरच्या इन्स्टाग्राम रीलवरच्या
वरच्या इन्स्टाग्राम रीलवरच्या बहुसंख्य कमेंट्स मारहाणीचं समर्थन, त्याबद्दल आनंद व्यक्त करणार्या आहेत.
निर्भय बनो वाल्यांवरही पुण्यात असाच हल्ला केला गेला होता. त्यातल्या कोणावर केसही झाली नसेल.
यांनाही पूर्ण खात्री आहे. खात्री देऊनच पाठवलं असेल.
गृहमंत्री देवाभैयांच्या मुकुटात आणखी एक शिरपेच.
आता नेहमीच्या पद्धतीप्रमाणे
आता नेहमीच्या पद्धतीप्रमाणे बापटांना अटक करण्यात येईल. हिंसाचाराला आमंत्रण निमंत्रण दिल्याबद्दल किंवा सनातन धर्मियांच्या भावना दुखवल्याबद्दल, किंवा सार्वजनिक शांततेचा भंग केल्या बद्दल....
थिंक बँकचा ‘श्रवणीय’ - आणि
थिंक बँकचा ‘श्रवणीय’ - आणि मननीय एपिसोड!>>>
यांनाही पूर्ण खात्री आहे.
यांनाही पूर्ण खात्री आहे. खात्री देऊनच पाठवलं असेल.>>
अगदी अगदी देवाभाऊ पुण्यात येऊन गेल्यावर लगेच त्या प्राचार्यांना जाणीव झाली की हे बापट हिंदू विरोधी आहेत
आता थेट मारहाण
फारच क्लिशे पवित्रे यांचे
बापट भारी आहे. त्याला
बापट भारी आहे. त्याला हाणामारी करून तो थंड होणार नाही हे समजलेच गावगुंडांना आज उद्या.
आज मिटिंगांचा रतीब असल्याने
आज मिटिंगांचा रतीब असल्याने मारहाणीचं वृत्त समजलं नव्हतं.
एका गोष्टीचं आश्चर्य वाटतंय. संघपरिवार आणि भाजप समर्थक हे डीजे बंदीच्या बाजूने, फसणवीस साहेब डीजे बंदीच्या विरोधात नाहीत (समर्थनात आहेत का हे ही माहिती नाही). गृहखाते भाजपकडे आहे. गोदी मीडीया बापटांना उचलून धरतोय, गुडलक चौकात उभे असलेले बहुतेक नागरीक भाजपसमर्थक. असे असताना पाचच मिनिटं लागली असती डीजे किंवा स्पीकर्सबंदी करायला. वाद चिघळण्याची का वाट पाहिली?
विश्वंभर चौधरींनी सुरूवातीला बापटांच्या बाबात सावध पवित्रा घेतला. त्यांच्या सोबत स्नेहभोजनानंतर ते बापटांचे फॅन झाले. पण बापटांनी चौधरींसोबत जाऊन चूक केली. यामुळं काही जणांना लेबल लावायची संधी मिळाली. त्यांना लेबल नव्हतं तेव्हां गोची झाली होती. ते इनोसन्ट आहेत हे माझं मत अद्याप आहे. ते दाभोळकरांशी संबंधित आहेत हे सांगून टाकतात, याचा अडव्हांटेज कोण कसा उचलेल हे गणित त्यांना समजत नाही. त्यांना ती फिकीरही नाही.
आता मारहाणीनंतर ही स्क्रीप्ट कशी जाते हे बघायचं. एक नक्की आहे कि आता काय चाललंय हे समजत नाहीये. स्क्रीप्ट आहे हे नक्की, पण सस्पेन्स गडद आहे. सध्या तरी स्प्रीप्ट रायटर अब्बास मस्तान च्या पुढे आहे.
जे जे लोक स्पीकर्सच्या त्रासासाठी अण्णाभाऊ साठे, आंबेडकर जयंती या तुलनेने तरूण त्रासाचं उदाहरण देत आहेत, त्यांच्या मुखातून, बोटातून शिवजयंतीचं नाव निघत नाहीये. हा कार्यक्रम शांततेत पार पडत असावा असं गृहीत धरूयात. कि या मंडळींची काही खास अडचण आहे?
तोड फोड गँग तयार करायला हवी.
तोड फोड गँग तयार करायला हवी.
जिथे जिथे डीजे लागेल तिथे जाऊन त्याची तोडफोड करायची.
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=3hxro1meChQ
विद्यानंद बापटांच्या पाठीशी भारतीय जनता पक्ष खंबीरपणे उभा - गणेश बीडकर, सभागृह नेते, भाजप.
हे म्हणतात कि गणेश मंडळ कार्यकर्ता आणि राजकीय कार्यकर्ता या दोन वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत. गणेश मंडळ कार्यकर्त्यांनी संयम पाळायला हवा. भाजप हा जबाबदार पक्ष आहे. तो कसा काय अशा घटनांचं समर्थन करू शकेल?
इथून पुढे अशा दुटप्पी भूमिकांच्या विरोधातच आंदोलन झालं पाहीजे. उघड भूमिका एक, उजव्या हाताने समर्थन, डाव्या हाताने राखीव खेळाडूंना छूं: करायचं हे पवारोगामी राजकारण कायमचं हद्दपार व्हायला हवं.
विद्यानंद बापट ह्यांच्यावर
विद्यानंद बापट ह्यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध!
लाजिरवाणी गोष्ट घडली.
बापटांनी डीजेबद्दल बोलता बोलता बहुधा काही पुढील पायऱ्या गाठल्या असतील. तसे जरी असले तरीही विचारांनीच उत्तर द्यायला हवे होते.
ह्याची परिणती आंदोलनात होईल व व्हावीही. गेल्या रविवारी गुडलक चौकात जाणे शक्य झाले नव्हते. ह्याही रविवारी पुण्याबाहेर असणार. वेळेत पुण्यात आलो व बापटांच्या बाजूने काही संघटना जमणार असतील तर नक्की जाणार.
ह्याची परिणती आंदोलनात होईल व
ह्याची परिणती आंदोलनात होईल व व्हावीही.>>>
सहमत, त्याला फक्त ज्यांनी मारलंय त्यांच्यावरच नाही तर त्याला जे ऑनलाईन शिव्या, धमक्या देतात त्यांच्यावर पण कारवाई करायला पाहिजे.
https://www.instagram.com
https://www.instagram.com/reel/Dc0c6nKM8Sj/?igsi=ZG1vaDA4eWVrbHE4
ज्याने मारलं तो मस्त व्हिडीओ बनवून टाकतोय आणि तोच प्रश्न विचारतो आहे एक झाड तरी लावलं का, नदी प्रदूषण वायू प्रदूषण वर काय काम केलं
100 टक्के याला वरून आदेश असणारेत आणि पाठिंबा आणि संरक्षण
हा स्पार्कल सारखा छपरी इसम
हा स्पार्कल सारखा छपरी इसम वाटतो. तिकडं त्याला सत्ताधार्यांचं संरक्षण, इथे अॅडमिनचं. प्रोसेस एकच
कोण कुणाचा ड्यू आयडी आहे हे
कोण कुणाचा ड्यू आयडी आहे हे चर्वितचर्वण थांबवूयात आता.
पुण्यात संतोष पंडीत यांच्यावर मध्यरात्री एफ आय दाखल केला गेला व अटक झाली !
https://x.com/RahulAsks/status/2095456649083515299
तरी नशीब, 'विवाहाचे आमीष दाखवून ...' चे कलम नाही लावले !
( बापट यांनी क्लासेस काढून 'आक्षेपार्ह' चा उच्चार सर्व वकिलांना शिकवावा)
जेव्हां हे आयडी गोंधळ घालतात
जेव्हां हे आयडी सातत्याने गोंधळ घालतात तेव्हा ही भूमिका एकदा तरी घेतली तर बरं होईल.
कदाचित तुमचाच आयडी असावा, छपरी हा शब्द ओरिजिनलला लागेल.
हे माझ्या बद्दल सुरुये का???
हे माझ्या बद्दल सुरुये का???
नसेल तर चालू द्या
खाई त्याला..
खाई त्याला..
बापट याना मारहाण>>
बापट याना मारहाण>>
गणेश मंडळ कार्यकुत्रे हा शब्दप्रयोग कालच वाचला. So apt...
माझ्या कॉमेंट खालोखाल होती
माझ्या कॉमेंट खालोखाल होती म्हणून फक्त शंका निरसन करून घेतलं।तू किती उपटसोभ्या आहेस ते माहितीये

फक्त माझ्यावर नसेल तर उगाच तुझ्यासारख्या टिनपाटावर कशाला बोलू म्हणून विचारून घेतलं
आता फारच काहीही चालू आहे
आता फारच काहीही चालू आहे.लाऊडस्पीकर बद्दल तक्रार करताय, आयुष्यात एक झाड लावून वायू प्रदूषण कमी केलं का, केलं असेल तर झाड लावल्याचे व्हिडिओ दाखवा
आता फक्त या आरोपात शेजारी देश यायचे तितके बाकी आहे.तो आला की सुडोमि.
तो गणेश मंडळाचा माजी अध्यक्ष
तो गणेश मंडळाचा माजी अध्यक्ष आहे. त्याला अजूनही गणेशोत्सवातून पैसे मिळत असावेत. सर्वत्र त्याचा तीव्र निषेध होत आहे. त्याचा व्हिडीओ बघून विचार समजत आहेतच.
दरम्यान, बोलण्याच्या भरात बापटही बरेच सुटले होते असे दिसते काही व्हिडीओ बघून.
ad hominem इतक्या वेळा बापट
ad hominem इतक्या वेळा बापट बोलले पण इकडून तिकडे गेले वारे!
डीजे आणि ट्रॅक्टर वाल्या
डीजे आणि ट्रॅक्टर वाल्या लोकांची घरं चालावी म्हणून त्यांनाच डीजे इतका ऍडव्हान्स देऊन त्या ऐवजी देखावे बनवा असं काही करता येईल का?(म्हणजे आमच्या ऑफिसात कालच नवा घेतलेला पण रिकामा बसलेला फ्रेशर डॉक्युमेंटेशन किंवा डिनर इव्हेंट ची सगळी जबाबदारी बघायला वापरतात तसं)
दुचाकीवर हेल्मेट्स घाला किंवा
दुचाकीवर हेल्मेट्स घाला किंवा ध्वनिप्रदूषण कमी करा म्हटलं तर खवळणार्या लोकांना काय म्हणणार! मरा मग!
या व्हीडिओमध्ये एक गृहस्थ हिरिरीने 'आम्ही वर्षभर समाजोपयोगी कामं करतो म्हणून आम्हाला एक दिवस एन्जॉय करायची मुभा असली पाहिजे' असं म्हणताना दिसले. यांचे स्वत:चे कान पोलादाचे असतील बहुतेक, पण लोकांना सेकन्ड हॅन्ड स्मोकसारखा त्या आवाजांचा त्रास का? यांच्या घरात म्हातारेकोतारे, मुलंबाळं नसतील का? यांच्या कोणा आप्ताची रुग्णवाहिका मिरवणुकीमुळे अडकून पडली तर त्याला यांची तयारी असते का?
वर कोणी ते कुलकर्णी म्हणतायत की उत्सवाच्या तोंडावर मुद्दाम अस्थिरता निर्माण केली जाते आहे. म्हणजे रस्ते अडवून होणारी अस्थिरता त्यांना आवडते. विरोध करणारे कोणीही 'यंदा जरा उशीर झाला, पण सूचना चांगल्या आहेत तेव्हा पुढल्या वर्षींपासून त्या ध्यानात घेऊन प्लॅनिंग करू' असं म्हणताना दिसलं का?
मारहाण करणं कित्ती सोप्पं!
येईल की! लाडके डीजे योजना आणा
येईल की! लाडके डीजे योजना आणा की झालं!
ज्याने मारलं तो मस्त व्हिडीओ
ज्याने मारलं तो मस्त व्हिडीओ बनवून टाकतोय आणि तोच प्रश्न विचारतो आहे एक झाड तरी लावलं का >> पूर्वी तळजाईवर एक सुविचार दिसायचा “कावळा करी काव काव, एक तरी झाड लाव“. त्यातला कावळा कोण हे आज कळलं.
हा व्हिडिओ बघणे शक्य नाही.
हा व्हिडिओ बघणे शक्य नाही. रानोमाळ हरवलेलं लॉजिक हा गणेश मंडळांचा युएसपी असेल आणि मोठमोठ्याने बोंबलून मुद्दा सिद्ध करायचा असेल तर ... जंतरमंतर सारखे जनआंदोलन होपफुली पुणेकर करतील तरच! आवाज बंदच करा नाहीतर जाऊच देणार नाही. कुणाला रोजगार मिळतो, किती अर्थकारण होतं, कोण मागास आहे, कोणाची काय भाषा आहे, मला काहीही पडलेली नाही. ते काय करायच़ं ते करा. आमच्या कानाला सोडवा. बास!
Pages