पुणे शहराच्या महापालिकेत गणेश मंडळांची बैठक होती. महापौर भाजपच्या आणि सत्ताही भाजपचीच. सर्व नगरसेवक भाजपचेच.
अशा या वातावरणात बाप्पाचा उत्सव कसा करायचा यावर गंभीर चर्चा चालू असतानाच पुण्याचे एक नागरिक श्रीयुत बापट म्हणाले कि उत्सव करा पण डीजेमुक्त करा. कुठेच डीजेही नको किंवा स्पीकर्स नको.
यामुळे वातावरण तंग झालं. नगरसेवक, गणपती मंडळांचे कार्यकर्ते तापले. कोण आहे रे तो असे आवाज येऊ लागले. बाका प्रसंग उद्भवला.
बापटांना कुठे काय बोलायचं हे भान नसल्याचे दिसले.
https://www.youtube.com/watch?v=_5eE-0FDvhw
पुणे ही सांस्कृतिक राजधानी असल्याने संस्कृतीवरच बंदी आणण्याची मागणी केल्याने लोकप्रतिनिधी आणि समाजसेवक कार्यकर्ते यांचे भान सुटणे हे एकदम नॅचरल होतं. बापट किरकिरे असतील. पण जिवावर उदार होऊन अशा मागण्या करू नयेत हे कुणालाही कळते.
अशा वेळी बाप्पानेच महापौर मंजुषा नागपुरे यांना बुद्धी दिली आणि त्यांनी "कोण आहे हा, याला धक्के मारून बाहेर काढा" असे उद्गार काढले. यामुळे सभागृहात जीवहिंसा न होता बापट बचावले.
पण बापट सुधारले का?
https://www.youtube.com/watch?v=HsLNl-Gdzv0
उलट चर्चा सुरू झाल्या आहेत. बापटांनी पुण्याच्या सांस्कृतिक जीवनात मोठी खळबळ उडवून दिली आहे.
https://www.youtube.com/watch?v=siDYlYjsFgU
कायद्यांबद्दलही ते बरंच बोलले
कायद्यांबद्दलही ते बरंच बोलले आहेत. आर्टिकल ५१, तसंच ध्वनीप्र्दूषणाबाबतचा ८० च्या दशकात झालेला कायदा- असे अनेक. नुसतीच कायद्याची काटेकोर अंमलबजावणी नव्हे कायदे बदलण्याचीही गरज ते अधोरेखित करतात. उदाहरणार्थ डेसिबलचा कायदा सरसकट सगळ्या ठिकाणी सगळ्या यंत्रं किंवा यंत्रणांना लावून फायदा नाही. हा नियम रेल्वे इंजिन, जनरेटर, न्युमॅटिक यंत्रे, अर्थमुव्हिंग आणि इंडस्ट्रियल मशिनरी (ज्यांचं मूळ काम दुसरंच आहे, पण 'ओघाने किंवा अनुषंगाने' (याचा अर्थ 'consequentially or incidetally' असा लगेच सांगतात
) ते आवाज करतात, वाढवतात- त्यांनाच लावावा. 'ध्वनीवर्धन' हे एकमेव काम ज्या यंत्राचं आहे, आणि हे लोक ती यंत्रं चौकात रस्त्यांत लावून डेसिबलात्कार करून सक्तीचे श्रोते व्हायला भाग पाडतात, त्या यंत्राला सार्वजनिक ठिकाणी ''शून्य'' डेसिबलचा कायदा लावला पाहिजे, असं ते म्हणतात. (नाट्यगृहात जा, तिथं जागा आहे त्या यंत्राची). इंटरेस्टिंग. प्रॅक्टिकली हे होईल की नाही मला माहित नाही, मात्र धिस इज न्यू इनसाईट फॉर मी.
https://www.facebook.com
https://www.facebook.com/100002096964423/posts/28644133121906538/?app=fbl
ते बॅलंसिंग गणपतीचे खूळही
ते बॅलंसिंग गणपतीचे खूळही आता हाताबाहेर चालले आहे. सिंहासनावर बसलेला गणपती ठीक आहे पण हनुमानाच्या हातावर एक पाय देऊन हवेत उभा असलेला गणपती वगैरे भयंकर आहे. गणपतीला थोडेसे पोट आलेलेच छान दिसते, आजकाल सिक्स पॅक ही दाखवतात !
https://x.com/earlybird1210
https://x.com/earlybird1210/status/2095030750806687837?s=48
>>सिंहासनावर बसलेला गणपती ठीक
>>सिंहासनावर बसलेला गणपती ठीक आहे पण हनुमानाच्या हातावर एक पाय देऊन हवेत उभा असलेला गणपती वगैरे भयंकर आहे. गणपतीला थोडेसे पोट आलेलेच छान दिसते, आजकाल सिक्स पॅक ही दाखवतात !>>
अगदी हाच मुख्य प्रॉब्लेम आहे. विचारांचा गोंधळ असला की गोंधळ करणार्यांचे फावते.
गणपती कसा आहे किंवा कसा नसावा अशा वादात एकदा पडलं की तुम्ही हरण्याची लढाईच लढता आहात. त्यापेक्षा स्वच्छ निखळ मूल्ये पारदर्शीपणे बापटांसारखी मांडली की वैचारिक कोलांट्याउड्या मारायची गरजच रहात नाही. सार्वजनिक गणपती उत्सव रस्त्यावर करणे हेच खुळचट आणि मूर्खपणाचे आहे. पण स्खलनस्वातंत्र्य असल्याने तुम्ही काय वाटेल ते करा (लहान मोठा जाडा बारिक हेल्दी अनहेल्दी हु केअर्स! मी नास्तिक साम्यवादी आहे, पण तुम्हाला जो मूर्खपणा करायचा तो तुम्ही खुशाल करा) फक्त समाजाला, वाहतुकीला त्रास होता कामा नये. पिरिएड!
आणि याचसाठी काहीतरी खुळचट मध्यममार्ग बापटांनी सांगितला नाही, जे आहे ते असं आहे, इतक्या स्वच्छ प्रामाणिकपणे काही आडपडदा न ठेवता, काही हिडन अजेंडा वगैरे न ठेवता खुलेपणे सांगितले. उगा पुशिंग द ऑन्वलप खेळात रमले नाहीत. याचसाठी मला बापट फारच आवडले.
शेवटी मध्यममार्ग निघेल पण तो काढायची जबाबदारी जनतेची आणि प्रसासनाचीच असेल. आगरकर असेच असले असते असं काल वाटत होतं.
एक करोड बापटांचा फेसबुक
एक करोड बापटांचा फेसबुक ग्रुप
एक बापट लाख बापट
बापटांशी वाकडं मसनात लाकडं
बापटांची फाईट, वाटावरण टाईट
काही प्रतिष्टित गणपती मंडळे
काही प्रतिष्टित गणपती मंडळे आहेत ती या बाबतीत किंचित जागरुक आहेत. (दगडू शेठ, मंडई, केसरी वाडा) त्यांनी त्यांचा गोंगाट काही प्रमाणात कमी केला आहे.
पण हे अर्थातच पुरेसे नाही. आसपासच्या गल्लीबोळातील गणेश मंडळे ज्यांना प्रतिष्ठेबितिष्ठेची आजिबात फिकीर नाही आणि गल्लीच्या नेत्या गुंडांचे पाठबळ आहे ते विनासंकोच अफाट कानठळ्या बसवणारे ध्वनीवर्धक बसून आजूबाजूच्या लोकांचे कान बहिरे करत असतात.
एक मुखवटा म्हणून गणेश मंडळांचे प्रतिनिधी अशा काही सुधारित मंडळांकडे बोट दाखवून म्हणतात की बघा आम्हाला लोकांची किती काळजी आहे. आम्हीही आमच्यात सुधारणा करत आहोतच.
पण ते एक ढोंग आहे.
https://www.facebook.com
https://www.facebook.com/share/r/14rqrZkeBy4/
डीजे..... वगैरे..... हे नाही झाले पाहिजेत . लोकांना आवाजाचा त्रास होतो. पण (पण वर शक्य तितका जोर)..... जेव्हा पॉलिसी करताना, ही पॉलिसी प्रत्येकाला लागू झाली पाहिजे . नाहीतर फक्त गणपतीमध्येच आपण सगळे अॅलर्ट होतो. आणि बाकी सगळ्या जयंत्या, पुण्यतिथ्या , जे काही चालतं, ईदचे कार्यक्रम चालतात , त्या कुठेही आपण अॅलर्ट होत नाही .
तर जी पॉलिसी आज गणपतीच्यासाठी करेल ती सगळ्याला लागू झाली पाहिजे.
माधुरी मिसाळ - आमदार - पर्वती पुणे - नगरविकास राज्यमंत्री - पक्ष (सांगायला हवं का?)
१. पॉलिसी बनवायचं काम सरकारने विद्यानंद बापटांना दिले आहे का?
२. ध्वनीप्रदूषणा बाबत सध्या काही नियम आहेत की नाही?
२अ. ते लागू करायची जबाबदारी पोलिसांची आहे की खासदार मेधा कुलकर्णींची?
देवाभैयाच्या राज्यमंत्री शोभतात बाकी.
माझी एक शंका आहे. शंकर आणि
माझी एक शंका आहे. शंकर आणि पार्वती दोघेही हिमालयातील. त्यांचा मुलगा म्हणजे गणपती.
महाराष्ट्र शिवाय कुठेही एवढे प्रस्थ का नाही?
मी चार वर्षे हिमालयाच्या पायथ्याशी उत्तराखंड मध्ये राहिलो आहे.
गणेश मूर्ती मिळवणे ही कसरत असायची. कावड यात्रा वगैरे तुफान हिट पण गणेशोत्सव कधीच तिथे किंवा पंजाब, हरियाणा किंवा दिल्ली भागात नाही. कारण काय असावे?
https://www.facebook.com
https://www.facebook.com/share/v/1BgxeWepLx/
एसएनडिटी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य.
थिंक बँकचा ‘श्रवणीय’ - आणि
थिंक बँकचा ‘श्रवणीय’ - आणि मननीय एपिसोड!
काही प्रतिष्टित गणपती मंडळे
काही प्रतिष्टित गणपती मंडळे आहेत ती या बाबतीत किंचित जागरुक आहेत. (दगडू शेठ
>>
तुम्ही किती एस्टॅब्लिश्ड भुरटे आहात याचे पुरावे अख्ख्या मायबोलीभर पसरले आहेत. त्याचा हा फक्त ताजा पुरावा.
'किंचित' जागरूक म्हणजे काय? हे लोक कुठ्च्या बाबतीत जागरूक आहेत हे तुम्हाला ठाऊक आहे काय?
पुण्यातला सगळ्यात महत्वाचा रस्ता- शिवाजी रस्ता- कधी बंद व्हावा यावर दगडूशेट मंडळ सोडून कुणाचंही नियंत्रण राहिलेलं नाही. साध्या अंगारकीला अख्खा रस्ता बंद असतो, आणि पोलिस आणि प्रशासनासकट कुणीही काहीही करू शकत नाही, हे तुम्हाला माहिती आहे का?
तुम्हाला आवडतं, मान्य आहे, आणि हिंदूराष्ट्र स्थापन होणार आहे या आशेपायी किती वेळा आणि कसा जीभांचा व्यायाम करावा यालाही काही मर्यादा असतील ना?
की नाहीच??
बापट फॅन क्लब मधे सामील
बापट फॅन क्लब मधे सामील झालेल्यांनी बाप्टिज्मा घेतलाय असे म्हणायला हवे
शेवटी मध्यममार्ग निघेल पण तो काढायची जबाबदारी जनतेची आणि प्रसासनाचीच असेल. आगरकर असेच असले असते असं काल वाटत होतं >>> तो ही प्रश्न त्याने काल निकालात काढला. हो आगरकर सुधारक होते वगैरे मान्य केले पण त्यानंतर आम्ही बुद्धिवादी आहोत, व्यक्तीकेंद्रित नाही वगैरे काहीतरी फैर झोडली. त्यात आगरकरांना कमी लेखणे नव्हते पण त्यांचाही हीरो करण्यात इंटरेस्ट नव्हता
जोक्स अपार्ट, मध्यममार्गाच्या जबाबदारी बद्दल सहमत. तो निघायला आधी कोणीतरी लंबक दुसर्या बाजूला न्यायला हवा, तो हा नेतोय.
बापटांचे चाहते वाढत आहेत तसेच
बापटांचे चाहते वाढत आहेत तसेच दुर्दैवाने शत्रू वाढत आहेत. भीती वाटत आहे. एका साध्या माणसाने अचानक महाराष्ट्राला जाग आणली असावी असे काहीसे वाटते.
ध्वनियोजनेच्या व्यवसायाशी निगडित लोक चिडले आहेतच पण मूळ उत्सवातून इतर अनेक प्रकारची कमाई करणारेही भडकू लागले आहेत. ह्याचे कारण बापट मूलभूत प्रश्नच ऐरणीवर आणत सुटले आहेत. त्यांचे स्वच्छ विचार झेपत नाहीत काहींना. फेसबुकवर आत्तापर्यंत तीन असे व्हिडीओ दिसले ज्यात बापटांना सौम्य शैलीत धमकावले गेले आहे. सुदैवाने, बापटांना मानसिक बळ देणारे व्हिडीओ संख्येने चिक्कार जास्त आहेत.
बाप्टिज्मा
बाप्टिज्मा
हे शब्दक्रीडा म्हणून उच्च आहे फा.
मात्र सध्याच्या काँटेक्स्ट मध्ये ‘कंटेंट’ म्हणून फार वाईट.
>> तो निघायला आधी कोणीतरी
>> तो निघायला आधी कोणीतरी लंबक दुसर्या बाजूला न्यायला हवा >> +१००
ऐकुन घ्या!) टॅकल करायला फक्त चीन आणि कॅनडाला जमले आहे, आणि बाकी सगळे देश मध्यममार्ग काढायच्या नादात कसे फरफटले जात आहेत हे याची देही बापटांनी आणि आपणही पाहिलेच आहे. तेव्हा मध्यममार्ग बापटांनी काढला नाही, काढू ही नये. आगरकरांबद्दल अंतर ठेवले असेल तर त्यातही फोकस ढळू न देणे उद्देश असेल कदाचित.
तो लंबक दुसर्या बाजुला जायच्या आधीच बोटचेपे/ मांडवली धोरण स्वीकारणे म्हणजे बुली करणार्याला फीड करण्यासारखे आहे. टाकोला (हो!!
इतकं साधं सरळ बोलून शत्रू वाढून त्याने भिती वाटणार असेल तर काय कायदा सुव्यवस्थेत आपण रहातोय याचा विचार करुन भिती वाटत आणि वाढत नाही का? का?
आता एक कुलकर्णी उभे राहिलेत
आता एक कुलकर्णी उभे राहिलेत बापटांचा विरोधात
हे निवृत्त प्राचार्य आहेत ते पोलिसात तक्रार दाखल करणार आहेत
हिंदूंच्या भावना दुखावल्या प्रकरणी
मला जाम कुतूहल आहे की या तक्रारीचा मसुदा काय असेल याची आणि तो बापटाना दाखवला तर त्यावर ते काय बोलतील याचा
बापट! __/\__
बापट! __/\__
याबरोबरच प्लॅस्टर ऑफ पॅरीसच्या छोट्या/मध्यम ते अतिप्रचंड मूर्ती, त्यावर दिलेले सोनेरी चंदेरी आणि इतर भडक केमिकलयुक्त रंग, आणखी वर घातले जाणारे मेटल / प्लॅस्टीकचे दागदागिने/मुकुट, शेले/पीतांबरे इ. वस्त्रे आणि या सर्वांसकट नदीत केले जाणारे विसर्जन, याबाबत बापट कसे बोलले नाहीत अद्याप असे वाटले. तेही तितकेच गंभीर मुद्दे आहेत.
एखाद्याला योग्य मुद्द्यांवर
एखाद्याला योग्य मुद्द्यांवर योग्य प्रसिद्धी मिळण्यात गैर काहीही नाही. पण त्याला जर गोदी मीडीयाकडून अफाट प्रसिद्धी मिळू लागली आणि काल वेगळ्या सूरात गाणारे आज त्या सूरात सूर मिसळून गाऊ लागले कि मन साशंक होत जातं. नेमका काय खेळ चालू आहे असं वाटू लागतं.
https://www.instagram.com
https://www.instagram.com/reel/DcbFnc_ojQX/?igsi=aDhpbTN6dHBidDlo
गणपती मंडळांच्या मीटिंगमध्ये जे घडले त्याचा व्हिडिओ आता पाहिला. मानले या बापटला. एवढे डीजेवाले गावगुंड त्याला धमकी देत होते, अंगावर धावून जात होते, पण हा अगदी शांत बसून होता. आणि नंतर मात्र सुटलाच.
बापरे हे भयंकर आहे.
बापरे हे भयंकर आहे.
बापट भारी आहे. न घाबरता बसून राहिला.
संघटीत काम करणार का असं
संघटीत काम करणार का असं विचारल्यावर “तसा काही विचार नव्हता पण आता तुम्ही मिडियाने चांगला रोल बजावलात. म्हणजे ते तुमचे संवैधानिक कर्तव्यच आहे”.
मिडियालासुद्धा कौतुकाचे दोन शब्द काय पठ्ठ्या बोलत नाही.
यावर त्यांची प्रतिक्रिया महान
यावर त्यांची प्रतिक्रिया महान आहे
मी शस्त्रसज्ज नसल्याने पोलिसांनी मला संरक्षण देऊन बाहेर जायला सांगितले
म्हणजे समजा शस्त्रसज्ज असते तर
>>एसएनडिटी महाविद्यालयाचे
>>एसएनडिटी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य.<<
थँक्स फॉर शेअरिंग, मानव. माय फेथ इन कंन्वेन्श्नल विझ्डम (एकेए कॉमन सेंस) इज रिस्टोर्ड...
बापट यांना बाहेर काढल्याचे
बापट यांना बाहेर काढल्याचे व्हिडिओ बातम्यांत पाहिले होते.पण आता साऊंड सहित ऐकले.सगळंच भीतीदायक आहे.हिंदू सण, अमुक सण यापलीकडे जाऊन एक मुख्य संदेश सर्वच मुख्य बॉडीज कडून हा जातो आहे की 'we will keep meeting and pretend to listen concerns and opposite opinions but the main decision is already made'.
सर्व उच्च मंडळींना त्या 5 levels of listening या कल्पनेचा नीट अभ्यास करणं गरजेचं आहे.
ईंटेलिजन्स टू फेथ इन कॉमन
ईंटेलिजन्स टू फेथ इन कॉमन सेन्स -
बौद्धिक दिवाळखोरी हे तुमचे घटनादत्त स्वातंत्र्य स्खलनस्वातंत्र्य म्हणून आम्हाला मान्य आहे.
ते sndt वाले म्हणतात की अगदी
ते sndt वाले म्हणतात की अगदी 15 दिवस राहिले असताना बदल शक्य नाही. मग महापौरांनी चर्चेसाटी बोलवलेली मीटींग इतक्या उशीरा का ठेवली होती? "टाकणं टाकायला" ठेवली होती का मीटीन्ग?
PoP च्या मूर्ती नकोत याबाबत
PoP च्या मूर्ती नकोत याबाबत मूर्तीकार, मंडळं आणि सरकार कधीपासून चालढकल करताहेत?
सुनिती, केवळ तेवढंच नाही,
सुनिती, केवळ तेवढंच नाही, म्हणजे हे सगळं फार उशिरा सुरू झालं, आता यावर्षी बदल करणे कठीण एवढाच मुद्दा नाही त्यांचा. ही समाजात अस्थिरता निर्माण करण्याची चाल आहे, या विरुद्ध पोलीस तक्रार करू म्हणे!
मूर्ती कशा हव्या नकोत वगैरे - वर अमितवनी म्हटले तसे योग्य असला तरी वेगळा मुद्दा आहे. ध्वनीप्रदूषणाला विरोध करताना तो आलाच पाहिजे असे नाही आणि सगळे मुद्दे एकाने एकदम आणुही नयेत. एक एक करत सुधारणा होण्याची शक्यता वाढते.
ही समाजात अस्थिरता निर्माण
ही समाजात अस्थिरता निर्माण करण्याची चाल आहे, या विरुद्ध पोलीस तक्रार करू म्हणे! >> बापटला उघडपणे दिमागी नक्सल म्हणता येत नाहीये ना!
--- वरील पोस्ट लिहिली आणि ही बातमी वाचनात आली
विद्यानंद बापट नक्षली मानसिकतेचा, गुन्हा दाखल करा; सदाशिव पेठेतूनच मागणी, शिक्षणतज्ज्ञ कुलकर्णींनी दंड थोपटले
Pages