पुणे शहराच्या महापालिकेत गणेश मंडळांची बैठक होती. महापौर भाजपच्या आणि सत्ताही भाजपचीच. सर्व नगरसेवक भाजपचेच.
अशा या वातावरणात बाप्पाचा उत्सव कसा करायचा यावर गंभीर चर्चा चालू असतानाच पुण्याचे एक नागरिक श्रीयुत बापट म्हणाले कि उत्सव करा पण डीजेमुक्त करा. कुठेच डीजेही नको किंवा स्पीकर्स नको.
यामुळे वातावरण तंग झालं. नगरसेवक, गणपती मंडळांचे कार्यकर्ते तापले. कोण आहे रे तो असे आवाज येऊ लागले. बाका प्रसंग उद्भवला.
बापटांना कुठे काय बोलायचं हे भान नसल्याचे दिसले.
https://www.youtube.com/watch?v=_5eE-0FDvhw
पुणे ही सांस्कृतिक राजधानी असल्याने संस्कृतीवरच बंदी आणण्याची मागणी केल्याने लोकप्रतिनिधी आणि समाजसेवक कार्यकर्ते यांचे भान सुटणे हे एकदम नॅचरल होतं. बापट किरकिरे असतील. पण जिवावर उदार होऊन अशा मागण्या करू नयेत हे कुणालाही कळते.
अशा वेळी बाप्पानेच महापौर मंजुषा नागपुरे यांना बुद्धी दिली आणि त्यांनी "कोण आहे हा, याला धक्के मारून बाहेर काढा" असे उद्गार काढले. यामुळे सभागृहात जीवहिंसा न होता बापट बचावले.
पण बापट सुधारले का?
https://www.youtube.com/watch?v=HsLNl-Gdzv0
उलट चर्चा सुरू झाल्या आहेत. बापटांनी पुण्याच्या सांस्कृतिक जीवनात मोठी खळबळ उडवून दिली आहे.
https://www.youtube.com/watch?v=siDYlYjsFgU
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=zecG-WRtsAw
बापटांचा फॅन झालो. त्यांना भेटायची इच्छा होतेय. पण समविचारी लोकांची भेट रंगत नाही. त्यामुळे एखाद्या कर्मठ मित्राला सोबत घेऊन जावे असे वाटतेय.
(No subject)
भरत >>>> कुंभमेळ्याच्या
भरत >>>> कुंभमेळ्याच्या निमित्ताने तुमच्या शहराचा छान विकास होतो आहे>>>> शहराचा we- kase-ass होत आहे... मी नाशिकचा..... आता संपू र्ण भारतात भ्रष्ह्टाचार आणि बकालपणाचे standardisation झाले आहे
https://www.loksatta.com
https://www.loksatta.com/nashik/nashik-trimbakeshwar-kumbh-mela-2027-bud...
मागील १२ वर्षांत देशात झालेल्या सहा कुंभमेळ्यांवर झालेल्या एकूण खर्चापेक्षा कित्येक पट अधिक खर्च यावेळी कुंभवर होणार आहे.
२०१३ मधील प्रयागराज कुंभमेळ्यासाठी शासनाने १,१४२ कोटी रुपये, नाशिक-त्र्यंबकेश्वर (२०१५) २,३७९ कोटी, उज्जैन (२०१६) २,८१० कोटी, प्रयागराज (अर्धकुंभ, २०१९) ३,६०० कोटी रुपयांहून अधिक, हरिद्वार (२०२१) १०५० कोटी आणि प्रयागराज (२०२५) कुंभमेळ्यासाठी ७,३०३ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला होता.
पुढील वर्षी नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी राज्य शासनाच्या अखत्यारीतील प्राधिकरणाने २२,४२५.३९ कोटी रुपयांच्या योजनांना मान्यता दिली आहे. या व्यतिरिक्त सार्वजनिक बांधकाम विभागाकडून २,२७०.६० कोटी रुपये, त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्र विकासासाठी (एमएसआयडीसी) २७५ कोटी, महापारेषण ९४६.८१ कोटी आणि नाशिक जिल्हा परिषदेच्या ३५.०८ कोटींच्या कामांना मान्यता देण्यात आली आहे. केंद्र सरकारकडून ८,७६१ कोटी ५४ लाख रुपयांची कामे केली जात आहेत. त्यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची २,७६३.२४ कोटी, राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाची ४,३५५.९२ कोटी, रेल्वे १,३२९.२४ कोटी, रामकाल पथासाठी (महापालिका) ९९.१४ कोटी रुपये आणि एमएसआयडीसीच्या (द्वारका चौक) २१४ कोटी रुपयांच्या कामांचा अंतर्भाव आहे. कुंभमेळा आराखड्यात आतापर्यंत ३४ हजार ७३२.४२ कोटी रुपयांच्या कामांचा समावेश झाला आहे.
मी तर मुंबई सोडून नाशकात राहायला जायचा विचार करत होतो. आणखी १२ वर्षांनी जिवंत असेन तर ते वर्षभर दुसरीकडे - पुण्यात
राहायला जायचं.
नाशिक सारखं सुंदर शहर नव्हतं
नाशिक सारखं सुंदर शहर नव्हतं.
चांगलं हवामान... शहरापासून जवळच निसर्गरम्य ठिकाणं... कुठून कुठेही अर्ध्या तासाच्या आत पोहोचता येणं...
पूर्ण वाट लागली आहे आता.
माझा सुद्धा नाशिकमध्ये शिफ्ट
माझा सुद्धा नाशिकमध्ये शिफ्ट होण्याचा विचार होता/आहे.
तिथे जाऊन कुठल्या भागात घ्यायचा वगैरे चौकशी करून भाग पहाणार होतो, एक दोन पाहिले. पण फार बदल होत असल्याने हे कुंभमेळा प्रकरण आटोपले की बघावे असा विचार केला त्यामुळे फेब्रुवारीत गेलो होतो तेव्हा काही बघितले नाही, आराम केला फक्त.
या सगळे नाशिकला. गटग इथेच.
या सगळे नाशिकला. गटग इथेच.
पूर्वी नाटक/कादंबरीचे
पूर्वी नाटक/कादंबरीचे परिक्षण लिहिताना 'हेच या नाटकाचे/कथेचे 'यश आणी अपयशही' हे वाक्य हटकून असे. मुंबईपासून तुलनेने जवळ असणे, कुंभमेळ्याचे स्थान असणे हे नाशिकचे यश आणी अपयशही असे म्हणायला हरकत नसावी.
मूळ विषयाकडे.
सार्वजनिक गणेशोत्सव टिळकांनी 'उदात्त' हेतूने सुरू केलेला असेलही पण आज त्याचे प्रयोजन व औचित्य संपले आहे. 'डीजेच्या तालावर तरुणाई थिरकली' हे पेपर मध्ये नेहेमी येणारे वाक्य 'प्रचंड आवाजाच्या डीजेवर अचकट विचकट गाणी लावून छपरी मुले नाचली' चे euphemism आहे.
>>> सार्वजनिक गणेशोत्सव
>>> सार्वजनिक गणेशोत्सव टिळकांनी 'उदात्त' हेतूने सुरू केलेला असेलही पण आज त्याचे प्रयोजन व औचित्य संपले आहे.
ह्या वाक्याचे वयही सुमारे चाळीस वर्षे आहे.
(Euphemism तर येथे पावलागणिक आढळतात)
स्वतःचं वय असं स्वतःचं वय वय
स्वतःचं वय असं स्वतःचं वय वय उलटून गेल्यावर कमी सांगू नये.
टिळकांनी सुरू केलेल्या गणेशोत्सवाचं प्रयोजन संपलं आहे हे वाक्य ७, ८, ९ दशकं तरी जुनं आहे. त्याआधीही वेगळ्या स्वरूपात आणि वेगळ्या प्रादेशिक आणि सांस्कृतिक संदर्भांत गणेशाचा उत्सव होत होता, तोही आऊटडेटेड झाल्याचं अनेक लोकांनी त्याच वेळी सांगितलं होतं, त्याला तर शतक झालं.
तीच ती आपली- शब्द, वाक्य आणि युक्तीवादांची बेकायदेशीर आणि बेमुर्वत्खोर तस्करी. शिक्षा झालीच पाहिजे.
या निमित्ताने बापटांच्या
या निमित्ताने बापटांच्या विविध विषयांवरचं बोलणं ऐका लोकहो. सगळं सगळ्यांना पटण्यासारखं नसतंच, कारण आपण माणसं आहोत, मेंढरं नाहीत. भारतीय, अनेरिकी, युरोपीय लोकशाहीबद्दल ते जे काय बोलतात, त्यातून तुमचे डोळे दिपले नाहीत समजा, तरी किकस्टार्ट नक्कीच मिळेल.
बथ्थड, ताल-सूर-अर्थ-संदर्भ सोडून हमालांसारखे ढोल बडवत सुटलेल्या आणि उंच आवाजात बेताल आणि समाजविघातक कृत्यांना भाग पाडणार्या नेत्यांच्या बेलगाम बोलण्याला-वागण्याला काहीतरी एक आणखी पर्याय मिळेल- असा विचार करून पाहू. त्याचे परिणाम नंतर पाहू. तसंही आजवर काहीही करताना परिणामांची पर्वा आपण कधी केलेली शेवटची?
गणपती/ गरबा यात तरुण
गणपती/ गरबा यात तरुण मुलामुलींना काय आकर्षण असते? ते शोधलं तर उत्तर मिळेल.
त्या तरुणांच्या उर्जेला वाट आणि परिमार्जन करुन द्यायला आपण पर्याय दिलेत का? ते पर्याय खुल्या मनाने आपण समाज म्हणून दिले तर बहुतेक तरुणांना गणपतीत आणि पूजाअर्चेत काडीचा रस नसल्याने विसर्जनाचा मुद्दा आपोआप निकालात निघेल. ना रहेगा बास ना बजेगी बासरी!
बापट फॅन क्लब मधे मीही
बापट फॅन क्लब मधे मीही
बोलायला तोंड उघडले की कोठेच न थांबणार्या एक्स्प्रेस सारखा सुटतो तो. मग बर्याच भाषांमधल्या वाक्प्रचार, म्हणी, घटनांमधले हक्क व स्वातंत्र्ये, त्याच्या स्वतःच्या विचारसरणीमधले मौलिक विचार - धाडधाड गोळीबार सुरू होतो.
एका मुलाखतीत नेहमीच्या सवयीने "या ठिकाणी", "अशा प्रकारचे" टाइप फिलर्स वापरून प्रश्न विचारणार्याला उत्तर द्यायच्या आधी याने प्रतिप्रश्नानेच सुरूवात केली "अशा प्रकारचे, म्हणजे कशा प्रकारचे"? आणि गंमत म्हणजे यात काहीही अॅरोगन्स किंवा तुच्छता नव्हती.
शेल्डन बापट ज्याने कोणी नाव ठेवले ते अगदी चपखल आहे. तो ही जसा I am not insulting you. I am describing you म्हणतो तसाच आविर्भाव असतो याचा. सगळी गंभीर चर्चा असली तरी बघायला धमाल येते.
त्याचे सगळे विचार पटणे शक्यच नाही. बहुतांश पटत नाहीतच. पण सध्याच्या डीजे वगैरे बद्दल टोटल सहमती आहे.
अगदी बरोबर अमित.
अगदी बरोबर अमित.
हे असलं काही बोललं की भावना दुखावल्या जातात. तेही गेलं खड्ड्यात, पण 'नाजूक' भावना दुखावल्या गेल्या की 'रानडुकरासारखे' हे अंगावर येतात. सामान्य माणूस जपून राहणारच. एखादाच सडाफटिंग बापट सार्या रेड्यांना शिंगावर घेतो.
परंपरेचं प्यादं मेलं की तरुणांच्या सृजनशक्तीचं, आणि वयसुलभ उत्साह-एनर्जीचं काय करायचं- हे प्रश्न येतात. हे एनर्जीचं चॅनेलायझेशन काय आहे? यांची एनर्जी इतकी हीन, आणि यांचं सृजन इतकं मुर्ख पातळीचं आहे?
दोन-दोन महिन्याचे डिझाईन, एआय, अॅनिमेशन आणि व्हॉट नॉट कोर्सेस करून लेकरं वीस हजार किमान पगारावर सुरुवात करतात. या बिचार्यांना दोन महिने ढोल बडवून कयामतच्या दिवशी धड तालात वाजवता येत नाही?
आणि गेले दोन महिने यांनी काहीही कानाला गोड वाटेल असं काहीही ऐकवलं नाहीच, वरून भयानक गदारोळ केला- हे वेगळंच!
वरती साजिर्याने मेंढरांचा
वरती साजिर्याने मेंढरांचा उल्लेख केला म्हणून आठवले. नरेंद्र दाभोळकरांनी लहान मुलांसाठी लिहिलेले एक पुस्तक लहान असतानाच हातात पडले होते. त्यातला पहिला लेख होता "मुकी बिचारी कुणी हाका".
तर ती मराठी कविता (मूळ इंग्रजी कवितेचे भाषांतर)
असार जीवित, केवळ माया! रडगाणे हे गाऊ नका । घेई झोपा तो नर 'मेला' संशय त्याचा धरू नका ॥ धृ ॥
वस्तुस्थिती ही असार भासे, परि अंतरि बहु सार असे । जाणुनिया हे निज कर्तव्ये मन लावुनिया करा कसे ॥
सुखांत मेलो म्हणजे झाले सार्थक न धरा मनी असे । माती अससी मातीत मिळसी आत्म्याला हे लागु नसे ॥
सुख दुःखाचे भोग भोगणे हा मुळि जीवित हेतु नसे । उद्या आजच्यापेक्षा काही पुढेचि जाऊ करा असे ॥
अपार विद्या काळ अल्प हा झरझर कैसा धावतसे । शूर छातिचे किती असाना हळुहळु मृत्यू गाठितसे ॥
अफाट ऐशा विश्व रणांगणि जीवित युद्धचि चालतसे । त्यात लढोनी बहु धीराने नाव गाजवा शूर असे ॥
मुकी बिचारी कुणी हाका! अशी मेंढरे बनू नका । गेल्या गोष्टी स्मरू नका, गत काळाचा शोक फुका ॥
पुढचा भासो किती सुखाचा काळ भरवसा धरू नका । घेई झोपा तो नर 'मेला' संशय त्याचा धरू नका ॥ १ ॥
जाते घडि ही अपुली साधा, करा काय ते आता करा । चित्तामध्ये धैर्य धरा रे, हरिवरि ठेवा भाव पुरा ॥
थोर महात्मे होऊनी गेले, चरित्र त्यांचे पहा जरा । आपण त्यांच्या समान व्हावे, हाच सापडे बोध खरा ॥
जग हे त्यजिता भव-सागरिच्या वाळवंटिवर तरि जरा । चार पाऊले उमटवु अपुली, ठेवु खुणेचा मार्ग बरा ॥
जीवित-सागर दुस्तर मोठा, त्यातुनि जाण्या पैले तिरा । खटपट करितो, गोते खातो, निराश होऊनि जाय पुरा ॥
अशा नराच्या दृष्टिस पडता, तीच पाऊले जरा जरा । कोणि म्हणावे नाही म्हणुनी? येइल त्याला धीर बरा ॥
उठा उठा तर, निजू नका, होइल कैसे म्हणू नका । कशाहि विघ्ना भिऊ नका, दीर्घोद्योगा सोडु नका ॥
असार जीवित केवळ माया, रडगाणे हे गाउ नका । घेई झोपा तो नर 'मेला' संशय त्याचा धरू नका ॥ २ ॥
मराठी अनुवादः हरी नारायण आपटे
मूळ इंग्रजी कविताः 'साम ऑफ लाईफ' - हेन्री वर्डस्वर्थ लाँगफेलो, मृत्यूः २४ मार्च १८८२
'मुकी बिचारी..' क्या बात है
'मुकी बिचारी..' क्या बात है टण्या!
इथं दस्तावेज करून ठेवल्य्ताबद्दल थँक्स..
आज फायनली पाहिले बापट व्हिडिओ
आज फायनली पाहिले बापट व्हिडिओ

अतरंगी कॅरेक्टर आहे.
यावर मीम सुद्धा एकेक भारी बनलेत..
शशी थरूर ऑफ मराठी मिडीयम
आमच्या इथे फक्त ५०० रुपयात बापट यांचे मराठी समजावले जाते
भारी माणुस आहे.
भारी माणुस आहे.
अरे काय माणुस आहे!!! शालजोडीतले कसे मारावे याचा नमुना आहे. मी पण एकदम फॅन!
एले़क्टोरिअल डेप्सॉटिझम याचा अर्थ जळीस्थळी दिसत असला तरी तो शब्द माहित न्हवता.
'उत्सव साजरे करण्याबद्दल मला कोणाच्य वैयक्तिक स्खलन स्वातंत्र्यावर गदा आणायची नाही'
सोलापूरसारख्या अर्धग्रामीण
सोलापूरसारख्या अर्धग्रामीण अर्थव्यवस्था असलेल्या शहराने वगैरे ज्या टेचात तो म्हणतो त्यामुळे सोलापूरकर म्हणतील ओ तुम्ही तारीफ करताय की टोमणे मारताय
पुढच्या वेळी तो अर्ध-शहरी
पुढच्या वेळी तो अर्ध-शहरी म्हणेल. किंवा पुण्यालाच अर्धशहरी म्हणेल की बोलतीच बंद!
मला ‘स्खलनस्वातंत्र्य’ शब्द
मला ‘स्खलनस्वातंत्र्य’ शब्द फार आवडला आहे!
स्खलनस्वातंत्र
Negative liberty तत्वज्ञानात फेमस आहे.
स्खलनस्वातंत्र
(ज्याला ते नंतर काउंसलिंग, म्हणजे समुपदेशनाने डील करणार आहेत)
घटनादत्त स्वातंत्र्य
लॉजिकल fellacy (तर्कदोष)
बळप्रयोग
विक्टिम ब्लेमिंग
ad hominem
red herring
आणि मला सर्वात आवडलेलं- “सैन्यबलप्रयोग
"मी शस्त्रसज्ज नसल्याने
"मी शस्त्रसज्ज नसल्याने माझ्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची आहे"
याच्याकडे गन असती तर सरकारने ती चिंता करायची गरज नव्हती का? 
>> लॉजिकल fellacy (तर्कदोष)
>> लॉजिकल fellacy (तर्कदोष)
fallacy
स्खलनस्वातंत्र्य मला पण कधी
स्खलनस्वातंत्र्य मला पण कधी एकदा वापरू असं झालंय!
ऑफिसमध्ये कोड रिव्ह्यूच्या
ऑफिसमध्ये कोड रिव्ह्यूच्या वेळी वापरू नका, एच आर कडून ईएमेल येइल !
आज तर पठ्ठ्याने द्वैत
आज तर पठ्ठ्याने द्वैत अद्वैताला इन्टलेक्स्चुअल मास्टरबेशन म्हटले. त्यावर मुलाखत घेणारा काय असे आश्चर्याने म्हणाला. शेल्डन बापटांना बहुतेक आश्चर्यचकित उद्गार न समजल्याने "बौद्धिक हस्तमैथुन" असे मराठी भाषांतर करून अर्थ सांगितला. थेट लाइव्ह टीव्हीवर
ऐहिक गोष्टींना याचा काही उपयोग नाही हे अजून वर.
वर हिंदूंनाच का झोडाल असे म्हणाल म्हणून फादर, सन आणि होली स्पिरिट हे ख्रिश्चन धर्मातले इन्टलेक्स्चुअल मास्टरबेशन म्हणजे केवळ शब्दच्छल आहेत हेही सांगून गेला
(No subject)
गणपतीच्या देखाव्यासाठी मला एक
गणपतीच्या देखाव्यासाठी मला एक नवीन कल्पना सुचली आहे.
विद्यानंद बापटवरतीच देखावा करायचा. "त्यात एक मुलाखतकार त्याची मुलाखत घेतोय, मग मंडळाचे कार्यकर्ते येऊन त्याला मारहाण, तरी तो आपल्या तत्वांना ठाम आहे आणि शेवटी त्याचा विजय होतो" अशी एक पूर्ण नाटिका करता येईल
मला वाटतंय कि बापट ओवरबोर्ड
मला वाटतंय कि बापट ओवरबोर्ड जातायत. ध्वनीप्रदुषण हा इशु आहेच, पण त्यावर बापटांनी घेतलेली टोकाची भूमिका (बलप्रयोग, रणगाड्यांनी चिरडा वगैरे) आश्चर्यजनक आहे. शिवाय या समस्येवर त्यांनी काहिहि मिडल ग्राउंड सुचवलेला नाहि. त्यांची मागणी एकच - डेसिबल आवाक्यात आणा, मिरवणुकिंवर बंदि घाला इ. जी प्रॅक्टिकेबल नाहि. आता एकवेळ डोल्बी भिंतीं कॅलब्रेट करता येतील पण ढोल-ताश्यांचं काय करणार? सरसकट ढोल-ताशांवर बंदि घालु शकत नाहि याचा विचार बापटांनी केलेला दिसत नाहि...
Pages