पुणे शहराच्या महापालिकेत गणेश मंडळांची बैठक होती. महापौर भाजपच्या आणि सत्ताही भाजपचीच. सर्व नगरसेवक भाजपचेच.
अशा या वातावरणात बाप्पाचा उत्सव कसा करायचा यावर गंभीर चर्चा चालू असतानाच पुण्याचे एक नागरिक श्रीयुत बापट म्हणाले कि उत्सव करा पण डीजेमुक्त करा. कुठेच डीजेही नको किंवा स्पीकर्स नको.
यामुळे वातावरण तंग झालं. नगरसेवक, गणपती मंडळांचे कार्यकर्ते तापले. कोण आहे रे तो असे आवाज येऊ लागले. बाका प्रसंग उद्भवला.
बापटांना कुठे काय बोलायचं हे भान नसल्याचे दिसले.
https://www.youtube.com/watch?v=_5eE-0FDvhw
पुणे ही सांस्कृतिक राजधानी असल्याने संस्कृतीवरच बंदी आणण्याची मागणी केल्याने लोकप्रतिनिधी आणि समाजसेवक कार्यकर्ते यांचे भान सुटणे हे एकदम नॅचरल होतं. बापट किरकिरे असतील. पण जिवावर उदार होऊन अशा मागण्या करू नयेत हे कुणालाही कळते.
अशा वेळी बाप्पानेच महापौर मंजुषा नागपुरे यांना बुद्धी दिली आणि त्यांनी "कोण आहे हा, याला धक्के मारून बाहेर काढा" असे उद्गार काढले. यामुळे सभागृहात जीवहिंसा न होता बापट बचावले.
पण बापट सुधारले का?
https://www.youtube.com/watch?v=HsLNl-Gdzv0
उलट चर्चा सुरू झाल्या आहेत. बापटांनी पुण्याच्या सांस्कृतिक जीवनात मोठी खळबळ उडवून दिली आहे.
https://www.youtube.com/watch?v=siDYlYjsFgU
>>>>>हेडफोन डीजेला कन्नेक्ट
>>>>>हेडफोन डीजेला कन्नेक्ट करून नाचावे. साप भी मरे और लाठी भी ना तुटे.
पण डी जे ला तर जोरातच वाजवावे लागणार ना? त्याने ध्वनिप्रदूषण कसे कमी होणार? अच्छा बारीक आवाजात वाजवायचे?
सेन्ट्रल डी जे ठेवा म्हणावं आख्खा देश त्या सेंट्रल डी जे वरती नाचू शकतो.
सामो ते सायलेंट डिस्को सारखे
सामो ते सायलेंट डिस्को सारखे म्हणत आहेत बहुतेक. ब्लू टूथ हेडफोन वापरायचे. त्यामुळे ज्यांना ऐकायचे त्यांनाच ऐकू येईल.
संदर्भ: ऐ दिल है मुश्किल - ब्रेक अप साँग ची सुरुवात
करोना काळात ठाकरेंनी
करोना काळात ठाकरेंनी गणेशउत्सवावर मर्यादा आणली होती.विसर्जन मिरवणूक रद्द होती. पण त्यांचे सरकार कोसळले आणि शिंदे सरकार आले . त्यांनी आल्यावरच हे हिंदू सरकार आहे आणि यापुढे सर्व सण जोरदार साजरे होणार असे सांगितल्याचे मला आठवते. त्याचवेळी मनात धोक्याची घंटा वाजली होती. कारण ही अशा मंडळांना खूली सूट होती. माझ्या शाळेच्या व्हाट्सअँप ग्रुपवरही हिंदुविरोधी सरकार गेल्याचा आनंद झाला होता पण शिंदेच्या बोलण्यावर फारसे काही चुकीचे नाही असेच मनात होते. आज हेच लोक डीजे नको असे लिहीत आहेत. आणि हे आपण निवडून दिलेले सरकार आपले म्हणजे का लक्षात घेत नाही याचे आश्चर्य वाटून घेत आहेत .
धनि धन्यवाद. तसेच असेल.
धनि धन्यवाद. तसेच असेल.
शेंडे, उधोबाचे कौतुक होतेय
शेंडे, उधोबाचे कौतुक होतेय पोटदुखीवरचे औषध घ्या
पुण्यात डीजे विरुद्ध प्रथमच
पुण्यात डीजे विरुद्ध प्रथमच एवढ्या तीव्रतेने सगळे बोलत, लिहीत आहेत हे पाहून फार फार आनंद झाला. १९८८ साली सार्वजनिक गणपती बघायला जाणे जे बंद केले ते बंदच!
त्याचप्रमाणे (थोडा वेगळा विषय) ज्या वर्षी रंगपंचमीमध्ये सिल्व्हर कलर घुसला त्यावर्षीपासून रंगपंचमीही बंद केली. तेव्हा पुण्यात रंगपंचमीला रंगपंचमी व होळीला होळीच साजरी होत असे. त्यानंतर दोन्ही दिवशी रंगही सुरू झाला. हे बहुधा साधारण ८० - ८२ साली झाले असावे, नीट आठवत नाही.
उत्सवाचा अविभाज्य भाग म्हणजे
उत्सवाचा अविभाज्य भाग म्हणजे प्रचंड आवाजात होणारे ध्वनी प्रदूषण हे समीकरण ज्या मूर्खाने गृहित धरले आहे त्याला दोन तास फुल्ल पॉवर असणार्या डी जे समोर काही फुटावर उभे राहून उत्सव साजरा करण्याची शिक्षा द्यावी!
उत्सव हा लाउड स्पीकर मुक्त असू शकतो. नियम पाळून केलेली पूजा, आरती हे धार्मिक कार्यक्रम आणि अनेक सामाजिक कार्यक्रम जसे स्पर्धा, रक्तदान, व्याख्याने, नाटक अन्य कला हे सगळे करणे शक्य आहे.
सार्वजनिक शांतता यावर धर्माइतकीच श्रद्धा ठेवणे आवश्यक आहे. गणपती, नवरात्राची देवी, शिवाजी राजे, डॉ आंबेडकर, अण्णा भाऊ साठे, यांना जेवढा आदर श्रद्धा दिली जाते तेव्हढाच आसपासच्या लोकांच्या आरोग्याला दिला जावा.
मीही कट्टर विरोधक आहे डीजे चा
मीही कट्टर विरोधक आहे डीजे चा
पण मंडळांचे एक बरोबर आहे
असा विरोध अण्णाभाऊ आणि आंबेडकर जयंतीला होत नाही
अर्थात अकखे शहर वेठीला धरणे फक्त गणेशोत्सव मध्ये होते हे धरले तरी या दोन जयंतीनिमित्त चाललेला धुडगूस याबाबतीत जपूनच बोलले जाते म्हणजे उघडपणे, तिथे जाऊन वगैरे
मनोमन सगळेच शिव्या देतात
वन स्टेप अॅट टाईम.
वन स्टेप अॅट टाईम.
हे नाही तर काहीच नाही कसं चालेल? सुरुवात तर व्हायला हवी ना?
आम्ही केले तुम्हीही करा, हे
आम्ही केले तुम्हीही करा, हे सुचविण्याची सुसंधी आहे.
शाळांची दुर्व्यवस्था,
शाळांची दुर्व्यवस्था, रस्त्यावरचे खड्डे, महागाई यावरून लक्ष हटवण्यासाठी भाजप ची डॉग व्हिसल वाटत आहे ही.
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=lHNg8M943Tg
मुंबई तक - मेधा कुलकर्णी - विद्यानंद बापट
२०-२५ कमेंट्स पैकी १ आता
२०-२५ कमेंट्स पैकी १ आता सार्वजनिक गणेशोत्सवा प्रयोजन काय अशी असते. हा मुद्दा खरा आहे.
आता उलट झालं आहे. रामनवमी, हनुमान जयंती , महाशिवरात्री अशा सगळ्या सणांसाठी मिरवणुका निघू लागल्यात. त्यांचा उद्दलिहिलं, त्यांत काय होतं ते इथे लिहिलं तर धागा भरकटेल म्हणून इतक्यात लिहीत नाही.
पण पुण्यातले माझे परिचित म्हणतात, त्यांच्या घरापासून हाकेच्या अंतरावर, तीन तीन गणेशोत्सव मंडळांचे मंडप असतात.
ही स्पर्धा आहे का? यात धार्मिक भाग किती आणि धंदा किती?
एकाने विचारलं पुण्यातल्या १००० मंडळांना ढोल ताशे कुठून मिळणार.
म्हटलं झांजा, टाळ, चिपळ्या , टाळ्या वाजवा. पायी हळू हळू चाला मुखाने गजानन बोला.
नाचायला निमित्त म्हणून गणेशोत्सव असेल तर डिस्कोथेक आणि तत्सम सोयींची मागणी करा.
ध्वनिप्रदूषणाचा मुद्दा फटाक्यांपर्यंत पोहोचो.
सार्वजनिक गणेशोत्सव
सार्वजनिक गणेशोत्सव पहिल्यांदा पुण्यात सुरू झाला. त्याचं ग्लोरिफिकेशन होत गेलं. सुरूवातीला ब्रिटीश सत्तेविरोधात लोकांना एकत्र आणणे हा उद्देशच नष्ट झाल्यानंतर जर सार्वजनिक गणेशोत्सवाचे प्रयोजन राहिलेले नाही हे मान्य करून घरगुती उत्सव झाला असता, किंवा फारतर मोकळ्या जागा भाड्याने घेऊन खासगी स्वरूपाचा सामूहिक उत्सव झाला असता तर आज ही पाळीच आली नसती.
आज इतर सण, जयंती यांनी गणेशोत्सवाचे हे मॉडेल कॉपी केल्यानंतर त्यांना आधी बंद करा असे म्हणणे म्हणजे आम्हाला हे चालूच ठेवायचे आहे असे आहे. आताही नागरिकांची सभा रद्द झाल्याचा मेसेज गेल्याने गोंधळ झाला. त्यात जे लोक पोलिसांकदे गेले त्यांनी आता उत्सव साजरा होऊ द्या, १ जानेवारीपासून २०२७ पासून एसओपी आणा असे म्हटलेय. म्हणजे धूर्तपणे त्यानंतर येणारे सण, उत्सव म्हणणार कि सुरूवात आमच्यापासून नको.
आता डीजेला बंदी केल्याने नेमके काय नियोजन चुकणार होते? उत्सव साजरा करू नका असे कुणाचेही म्हणणे नाही. आता डीजे लावू द्या, पुढे बघू असे म्हणणे ही पळवाट आहे.
सार्वजनिक उत्सवांची सुरूवात जिथून झाली तिथेच डीजे बंदीची सुरूवात झाली तर आपोआपच इतरांनाही तोंड दाबून बुक्क्यांचा मार बसणारच.
कुठल्याही सार्वजनिक उत्सवाची, जयंतीची, पुण्यतिथीची रस्त्यावर गरज नाही. मोकळ्या जागा ठरवून घ्या, मिरवणुकीसाठीही कमी रहदारीचे मार्ग ठरवा. काहीच चूक नाही या मागणीत. ज्यांनी सुरू केले त्यांनी आधी बंद केले तरच हे प्रत्यक्षात येऊ शकते. लबाड्या करून नाही.
सार्वजनिक गणेशोत्सवाचा उद्देश
सार्वजनिक गणेशोत्सवाचा उद्देश ब्रिटिश सत्तेविरोधात संघटन हे पूर्णपणे खरे नाही - म्हणजे अंशतः खरे आहे.
आमच्या कॉलनी ला दोन गेट आहेत.
आमच्या कॉलनी ला दोन गेट आहेत. त्यापैकी एक गेले तीस वर्षे बंद ठेवले होते (पण त्या शेजारचे लहान गेट दुचाकी आणि पायी जाणाऱ्यांना उघडे असते कायम).
आता कॉलनी च्या बाहेरच्या रस्त्यावर विकासकामांना सुरवात झाली कालपासून. त्यामुळे दोन्ही गेट उघडे ठेवायला लागले. बाहेरची सगळी रहदारी आता आतल्या रस्त्याचा वापर करतेय.
त्यामुळे कालपासून वाहनांचा / हॉर्न चा प्रचंड आवाज सुरू झाला कालपासून. त्यातच शेजारचा बंगला पाडायला सुरुवात झाली री डेव्हलपमेंट करता.
आता गणेशोत्सवाची वाट बघतोय म्हणजे निदान कालचा आवाज बरा होता म्हणता येईल.
शर्मिला, तुम्ही नाशकात का?
शर्मिला, तुम्ही नाशकात का? कुंभमेळ्याच्या निमित्ताने तुमच्या शहराचा छान विकास होतो आहे.
हो. मी नाशिकची.
हो. मी नाशिकची.
रस्त्ये नको पण विकास आवरा ची परिस्थिती आहे नाशिक मधे.
जयंती, दही हंडी ह्यांची तयारी
जयंती, दही हंडी ह्यांची तयारी रस्त्यावर आठ - आठ दिवस आधी सुरू असली तरी (वाहतुकीला होणारा त्रास एक मिनिट बाजूला ठेवला तर) प्रत्यक्ष आवाजाचा त्रास एकच दिवस होतो.
सार्वजनिक गणेशोत्सव म्हणजे एक महिना आधीपासून ढोल ताशे सराव, दहा दिवस सतत भयंकर आवाज आणि मिरवणुकीत पुण्याच्या कानाचे पडदे फाटणे!
आधी नवरात्र अगदी शांततेत असायचे. तेही गेल्या पंधरा वीस वर्षांत गणेशोत्सवाच्या स्पर्धेत आहे.
ह्या सगळ्यातील प्रचंड बेहिशेबी अर्थकारण हा मोठा घटक! शिवाय भावना दुखावणे वगैरेमुळे कायद्याचे सरंक्षण!
ईद ची मिरवणूक, आंबेडकर जयंती ह्या सर्वाआधी गणेशोत्सवाचे स्वरूप बदलणे आवश्यक आहे.
DJ लाऊडस्पिकर kinva कुठल्याही
DJ लाऊडस्पिकर kinva कुठल्याही मोठ्या आवाजाला सार्वजनिक ठिकाणी बंदीच असावी.
मोठ्या आवाजाच्या हॉर्न ना पण बंदी हवी.
दर वेळी Horn वाजवला की अकाउंट मधून ऑटोमॅटिक पैसे वळते व्हावे (टोल सारखं) असं माझं स्वप्न आहे.
मेधा कुलकर्णींनी डीजे, ध्वनी
मेधा कुलकर्णींनी डीजे, ध्वनी प्रदूषणा विरोधात स्पष्ट भूमिका घेतली. लाउड स्पीकरने त्रस्त लोक त्यांना फोन करून बोलवतात असं सांगितलं. हे त्यांनी पोलिस मुख्यालयाला, राज्याच्या गृहमंत्र्यांना सांगायला हवं.
बापटांनी एक सिक्सर मारली. ध्वनिप्रदूषण, वाहतुकीत अडथळा हा नियमभंगाचा, सार्वजनिक शांततेच्या आणि व्यवस्थेच्या भंगाचा प्रश्न आहे. म्हणजेच कायदा आणि सुव्यवस्थेचा. पोलिसांना तो हाताळता येत नसेल तर निमलष्करी दल , लष्कर, टँक इ. बोलवा
मेधा कुलकर्णींनी सार्वजनिक गणेशोत्सव अजूनही रेलेव्हंट आहेत असं म्हटलं. त्या व्यासपीठांवर लव्ह जिहादबद्दल जागृती करणारे कार्यक्रम करावेत. मग लगेच केरला फाइल्सची जाहिरात आली. थोड्या वेळाने त्यांना हुंडाबळी पण आठवला.
इतरही अनेक मुद्दे दोघांनी मांडले.
इथे आलेला आवाज करण्यासाठी आणि त्याची मजा घेण्यासाठी वेगळी मैदाने, सभागृह बांधा असा मुद्दा बापटांनी मांडला.
मिरवणुका रिंग रोडने काढा . मिरवणू़क की मिरवणूक और सिटी में ट्राफिक का ट्राफिक (हे खिचडी मधल्या प्रफुल , हंसा की जयश्री म्हणायच्या त्या चालीत वाचा.)
मेधा कुलकर्णींनी असीम सरोदेंना मोहर्रमच्या निव डणुकीकडे पण बघा, असं सांगितलं. दुसरा पक्ष दहीहंडीत नृत्यांगना पाटील (पहिलं नाव विसरलो) ला बोलवतोय हे सांगितलं.
एकंदर त्यांना सण मोठ्या प्रमाणात, भव्य रूपात , सार्वजनिक रीत्या व्हायला हवेत. पण ते सात्त्विक बित्त्विक असावेत असं वाटतं.
बापटांचा तत्त्वतः सणांच्या सार्वजनिक रूपालाच विरोध आहे. पण ते कॉम्प्रोमाइज म्हणून शांततेत करा, वाहतूक अडवू नका, तेवढे पुरेल असे म्हणाले.
एक प्रश्न - तुमच्याकडे
एक प्रश्न - तुमच्याकडे वर्गणी किंवा देणगी मागायला किती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे येतात.
आमच्याकडे एकच येते. दुसरे लोक एका देवळासमोर टेबल टाकून बसतात. ज्यांना देणगी द्यायची, त्यांनी द्यावी. हा दुसरा गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात होतो. मोठी मूर्ती.
पहिला शेजारच्या चाळीतल्या मुलांनी सुरू केलेला. पाच दिवस. लहान मूर्ती. पण वर्गणी न्यायला १०-१२ जण येतात. हल्ली १०० च्या खाली घेत नाहीत. कमी दिले, तर नको म्हणतात.
सार्वजनिक उत्सवांची सुरूवात
सार्वजनिक उत्सवांची सुरूवात जिथून झाली तिथेच डीजे बंदीची सुरूवात झाली पाहिजे
- हा पॉईंट चांगला आहे, अगदीच पटला
बेफिकीर यांनी लिहिलेला पॉईंट पण बरोबर आहे
आमच्याकडे तर पाचव्या आणि सातव्या दिवशी पण मिरवणूक निघते
घरातली भांडी, काचा, पार भिंती पण हादरतात इतका आवाज
मी वरती नमूद केल्याप्रमाणे या दोन जयंतीला विरोध होत नसल्याचे कारण म्हणजे एकाने सांगितले त्याप्रमाणे अट्रोसिटी लागण्याची भीती
त्यासाठी नुसती तक्रार केली तरी पोलिसांना ऍक्शन घ्यावी लागते
मग खरी का खोटी हे नंतर सिद्ध होईल पण उघडपणे विरोध न होण्याचे हे एक कारण असू शकते
बाकी शेल्डन बापट सोशल
बाकी शेल्डन बापट सोशल मीडियावर जोरदार फेमस झालेत
मीडियाने उचलून धरले आहे आणि तेही जो येईल त्याला मनमुराद मुलाखत देत आहेत
सोशल मीडियावर तर पेजेस निघाली आहेत
बापट उवाच नावाची त्यात बापटांनी वापरलेले अवघड शब्द आणि त्याचा अर्थ उलगडून सांगतात
फुल्ल धमाल
असावा गणेशोत्सव मायबोलीसारखा,
असावा गणेशोत्सव मायबोलीसारखा,
नसावा ध्वनी प्रदूषण तयात जरासा!
इथे गणपती बाप्पा येतात ऑनलाइन,
नाही कुठे DJ, नाही कानांचा फाईन!
नाही रात्री बारा वाजता ढणढणाट,
नाही स्पीकरचा कानावर प्रहार थाट!
कुणी म्हणे उखाणे, कुणी कोडी घाली,
कुणी सुंदर आरास फोटोमध्ये दाखवी!
नाही रस्त्यावर ट्रॅफिकचा गोंधळ,
नाही ढोल-ताशांचा कानठळ्या बसवणारा कल्लोळ!
आरती होते अगदी प्रेमाने,
मोबाईलच्या स्क्रीनसमोर भक्तिभावाने!
शेजारचा बाप्पा किती वाजता उठतो,
याचीही इथे कुणाला चिंता नसतो!
गणेशोत्सव असावा आनंदाचा,
नसावा कानाच्या परीक्षेचा!
म्हणून एकच मागणी बाप्पाच्या चरणी,
उत्सव साजरा करूया शांतपणे धरणीवरती!
असावा गणेशोत्सव मायबोलीसारखा,
नसावा ध्वनी प्रदूषण तयात जरासा!
आंबेडकर जयंतीमुळे कानाच्या
आंबेडकर जयंतीमुळे कानाच्या डॉक्टरांचा धंदा तेजीत चालतो. गणेशोत्सव महाराष्ट्राचा सांस्कृतिक सण आहे वगैरे वगैरे वाल्या किती जणांवर atrocity चे गुन्हे दाखल झाले?
काही मित्र सोयीचं बोलत असतात.
आमच्या सोसायटी मध्ये दर
आमच्या सोसायटी मध्ये दर गणपतीच्या एक ते दीड महिना आधी ढोल वाजवायला सुरु करतात. रोज तासभर असते. ह्याचा फार त्रास होतो. शिवाय बाजूला बांधकाम सुरु आहे ते तर सकाळी ६ पासून ठाकठोक सुरु करतात.
{दोन जयंतीला विरोध}
{दोन जयंतीला विरोध}
जय़ंतीला का विरोध आहे?
जयंतीला विरोध केला तर atrocity लागायलाच हवी.
आवाजाला विरोध करा.
मग तेही हेच म्हणतील. गणेशोत्सवाचं काय?
उत्सव अन् जयंत्या साजऱ्या
उत्सव अन् जयंत्या साजऱ्या करण्यात अन् त्या करताना डी.जे. वाजविणे बंद करा म्हणले लखनवी अंदाजात पहले आप म्हणायची रीत सुरू झाली आहे. पहिले गणेशोत्सव सुरू झाला त्यामुळे पहिले त्यांनी बंद करायला हवे हे बरोबरच आहे. आता बघू कागदावर असणारी आदर्श गणेश मंडळे किती पुढाकार घेतात. सार्वजनिक उत्सवांचे स्वरूप बदलत जाते/ जायला हवे. आधी गणपती बसले की दहा दिवस VCR वर 10 वेगवेगळे पिक्चर दाखवून सांस्कृतिक कार्यक्रमांना फाटा देण्याचे ट्रेंड होते, नंतर माहितीचा स्फोट झाला, पिक्चर डाउनलोड व्हायला लागले करमणूक लोकांच्या क्लिक अन् स्क्रीन टच वर आली तसे ते मागे पडले. आता पण काहीतरी असेच ट्रेंड येईल अन् हा डीजेचा कल्लोळ शांत होईल हा आशावाद तितका आहे.
पूर्वी जसे मेळे आणि
पूर्वी जसे मेळे आणि सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे तसे परत सुरू व्हायला हवे
मला आठवतंय की मी शाळेत असताना दगडूशेठ हलवाई गणपती व्याख्याने आयोजित करत असे
मी पहिल्यांदा तिकडे प्रा. शिवाजीराव भोसले यांचे वकृत्व ऐकलं, फार भारावून गेलो होतो
आता कितपत आशा व्याख्यानाला लोकांचा प्रतिसाद मिळेल माहिती नाही पण निदान काहीतरी अशा दिशेने व्हावं
Pages