वर्‍हाडी शब्दकोश

Submitted by हर्ट on 10 November, 2009 - 12:42

नमस्कार शब्दप्रेमी मित्रांनो.. इथे आपण वर्‍हाडी भाषेतील जमतील तेवढ शब्द अर्थासहीत लिहुयात. वर्‍हाडी भाषेचा शब्दकोश मी अजून तरी कुठे पाहिला नाही. मायबोली ही बहुतेक पहिली असेल. धन्यवाद!

१) आळोंग = उदा. आळोंग फिरणे अर्थात झोपताना या कडेवरुन त्या कडेवर होणे.
२) बात = अगदी लगेच उदा. मी बातन्या बात आलोच. अर्थात मी लगेच आलो.
३) टोंगळा = गुडघा
४) वज = काळजी उदा. वज घेणे
५) हिडगा = शिष्ट
६) गंज = पातेले
७) गुंडी = चरवी
८) कोपर = परात
९) सांभार = कोथिंबीर
१०) घोळाना = कोशिंबीर
११) पुदाना पाडणे = एखादी गोष्ट नष्ट करणे

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सराटा - म्हणजे उलथणं - माझी अकोल्याची मैत्रीण म्हणते.. पहिल्यांदा ऐकलं तेव्हा मी प्रश्नचिन्हांकित चेहर्‍यानं पहात राहिलेले! Happy

२) बात = अगदी लगेच उदा. मी बातन्या बात आलोच. अर्थात मी लगेच आलो.>>>
======================================
हिंदी तून वाक्प्रचारात आले| हिंदीत = बात की बात में, मराठीत = बघता बघता (लगेच)
प्र० बघता बघता रामाने शिव धनुष्य उचलले.
======================================

बीजी, चांगला उपक्रम..
आवश्यकता होतीच.
धव्यवाद..!

चांगला उपक्रम आहे. शुभेच्छा. बहुधा वर्ध्याच्या प्रा. देवीदास सोटे ह्यांनी असा शब्दकोश लिहिला असल्याचे आठवते. (वर्धा वऱ्हाडात येत नाही ही गोष्ट अलाहिदा)

बी, मस्त उपक्रम!!!
यानिमित्ताने तिकडचे शब्द माहीत होतील... बादवे, हे म्हणजे विदर्भातले शब्द का?

खुप शब्द आहेत. जागा अपुरी पडेल येथे. भटसाहेब तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. पण पूर्ण झाला नाही वाटतं तो शब्दकोष.

आजुन काही शब्द

ढेमसं= दिलपसंद
भेद्रं=टोमॅटो.
टरबुज्=कलिंगड ( मला थोडी शंका आहे.)
चारं= इकडे काय म्हणता माहीत नाही.
टेंबरं= इकडे काय म्हणतात माहीत नाही.
गधडीचं=एक सौम्य शिवी.
धान=ईकडे काय म्हणतात माहीत नाही. ( मला वाटतं इकडे भात आणी धान साठी "भात" हा एकच प्रतीशब्द आहे)

आंबिल= इकडे हा प्रकार आहे की नाही, माहीत नाही.

'चारं' हा प्रकार मी पुण्यात बघितलेला नाही. आंबटगोड चारोळ्याही कितीतरी दिवसांत खाल्ल्या नाहीत.

अवांतर
'भाषा आणि जीवन' त्रैमासिकात प्रकाशित झालेला वर्‍हाडी बोलीची उच्चार प्रवृत्ती हा रावसाहेब काळे ह्यांचा प्रतिसादपर लेख अवश्य वाचावा.

आंबटगोड चारोळ्याही कितीतरी दिवसांत खाल्ल्या नाहीत. >> मग उन्हाळयात या आमच्या कुडकेल्लीला. चारं-टेंबराचं पुर वाहतं. शेवटी शेवटी खायची ईच्छा होत नाही.

मी कथिल आणि आंबिल हे दोन पदार्थ फक्त गौरीपुजनाच्या प्रसादालाचं खाल्लेले आहे. छान लागतात एकदम. खरा मान यांचाचं असतो.

कलिंगड आणि टरबूज दोन्ही नावं सगळीकडे आहेत.

धानाला इकडं भात म्हनतात म्हणजे टरफलासह तान्दूळ. टरफल काढल्यावर भाताचा तान्दूळ होतो...

आम्बील इकडेही आहे. आचार्य अत्र्यांच्या 'शामलेस' या विडम्बन कवितेत हा शब्द आहे.

' घे गाडगे , घे माडगे
घे गुलचमन , घे वाडगे..."

ताम्बूल घे, आम्बील घे
घे भाकरी घे खापरी....

आणि 'गधडीचं ' ही त्याच अर्थाने आहे.

विदर्भ -------------------- पश्चीम महा.
--------------------------------
धान---------------------= भात
तांदुळ्-------------------= तांदुळ
भात (शिजल्यावर)--------= भात
बरं मग धानाच्या कोंड्याला काय म्हणातात.

झक्की नि भैत्ताड या शब्दांना दुसरे शब्द इतरत्र असतील का?

'घुटना' हाहि शब्द १९६० च्या द्शकात प्रचलित होता. जे एन सी सी त असतील, त्यांच्या बद्दल हा शब्द वापरत. त्यांचा मेंदू त्यांच्या गुड्घ्यात असतो असा अर्थ.

'बादवे' हा शब्द विदर्भातला नव्हे. तो पुण्या मुंबईच्या अतिहुषार लोकांनी केलेला शब्द आहे. त्याबद्दल 'रच्याकने' हा अस्सल मराठी शब्द, एका महाराष्ट्र शासनात काम करणार्‍या अति शहाण्याने, शोधून काढला आहे.

मनिला = शर्ट>> अगदी बरोबर.

आमच्या एक मित्राच्या गर्लफ्रेंडचं नाव मनी होतं.
आम्हि त्याला केंव्हाच शर्ट घाल असं नाहि म्हणायचो.
पुढे दोघानी लग्न केलं, मुलं झालित, आता मात्र आम्ही त्याला शर्ट घाल असं म्हणतो.

एंगला - चढला
खकाणा/ना - कचरा
काणा - चकणा
भोकणा - अंध
लमचा - बेअक्कल
पोटुशी - गर्भार
इच्चक - कारभारी (इच्चक पोर - नको ते उद्योग, कारभार करणारं पोर)

माझ्या नागपूरच्या आजीने 'सुतना घालून नीज' म्हंटल्यावर मला कळेना काय म्हणते आहे ते. मग आईने सांगितले पायजमा घालून झोप!

मग उन्हाळयात या आमच्या कुडकेल्लीला
>> खरच येऊ? का आमंत्रण लिमिटेड लोकांसाठी - लिमिटेड टाईम साठी आहे?(तसं असेल तर : :()

धान - हा शब्द पश्चिम महाराष्ट्रात पण आहे -असं मला वाटतं
तुसं - बरोबर
आणखीन पण काहितरी म्हणतात भाताला - आठवत नाहिये Sad
मनिला - मॅनिला हा शब्द पुर्वीच्या काळच्या लोकांकडून ऐकलाय ह्याच संदर्भात (पश्चिम महाराष्ट्रातच)
कथिल हा धातू असतो ना?

एंगला - चढला
खकाणा/ना - कचरा
काणा - चकणा
भोकणा - अंध
लमचा - बेअक्कल
पोटुशी - गर्भार
इच्चक - कारभारी

मूळ शब्द वेंघला असा असून प्राचीन पद्यात आढळतो.प. महाराष्ट्रात आहे. खकाणा आहे इकडेही. काना , भोकना आहेत. पोटुशी तर कॉमन आहे खेड्यात. लमचा , इच्चक नवीन वाटले.

कथील म्हणजे शिसे.

छान चर्चा चालू आहे/होऊन राहिली आहे.
झक्की, भैताडाने बह्याडाची आठवण करून दिली. मृण्मयी, इच्चकवरून इच्चकधंदा आठवला आणि नगित्तर हा शब्दही. लमचा हा शब्द माझे वडील अनेकदा वापरायचे. तसेच अमरावतीला लहान मुलीला 'का गं बाले', तर लहान मुलाला 'का रे बाल्या' असे संबोधतात. फार गोड!

जाता जाता
मनिल्यावरून गंजी बनियान आठवला.

तुम्हांला माडिया भाषा येते का? असेल तर इथे शिकवणार का?>> हो येते की, मातृभाषा व माडीया दोन्हि भाषा एकत्रच शिकलो.
शिकवायला नक्की आवडेल.
कोण कोण तयार आहात बोला, तसं सुरु करता येईल.
फार फार तर १ महिना लागेल शिकायला.

तुम्ही एक बाफ उघडा. शिकावसं वाटणारे येतील.

हो हो. त्या 'इच्चकधंद्या'वरूनच मला इच्चक शब्द आठवला. आमच्या घराजवळ राहणारं एक पोर सारखं कचरा गोळा करून रस्त्याच्या कडेला पेटवायचं. त्याची आजी, 'पोट्टं दिवसभर इच्चकधंदे करतं, शारेत जात न्हाई, पाट्या लिवंत न्हाई, आनं बापाले वाटते का बाबू होनार' असं म्हणायची.

Pages