वर्‍हाडी शब्दकोश

Submitted by हर्ट on 10 November, 2009 - 12:42

नमस्कार शब्दप्रेमी मित्रांनो.. इथे आपण वर्‍हाडी भाषेतील जमतील तेवढ शब्द अर्थासहीत लिहुयात. वर्‍हाडी भाषेचा शब्दकोश मी अजून तरी कुठे पाहिला नाही. मायबोली ही बहुतेक पहिली असेल. धन्यवाद!

१) आळोंग = उदा. आळोंग फिरणे अर्थात झोपताना या कडेवरुन त्या कडेवर होणे.
२) बात = अगदी लगेच उदा. मी बातन्या बात आलोच. अर्थात मी लगेच आलो.
३) टोंगळा = गुडघा
४) वज = काळजी उदा. वज घेणे
५) हिडगा = शिष्ट
६) गंज = पातेले
७) गुंडी = चरवी
८) कोपर = परात
९) सांभार = कोथिंबीर
१०) घोळाना = कोशिंबीर
११) पुदाना पाडणे = एखादी गोष्ट नष्ट करणे

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

म्हण Biggrin

नताशा +१.

टीना, मी मराठवाड्यातला आहे त्यामुळे त्या शिव्या अगदी हेला सहीत माहिती आहेत. शिवाय माझ्या समोर एक अकोल्याच्या अन एक नागपूरचा राहतो. त्यातील अकोल्याचा शिव्या पण देतो अन सोन्याबापू जे बोलत आहेत तसाच बोलतो.

तुम्ही दोघांनीही एक मस्त शब्द लिहिला नाही अजून.

सोंड्या. - जा नं बे सोंड्या लै माजला का?

केदार , अरे व्वा.. तुमच्या कानांची मज्जा आहे म्हणजे Lol
सोंड्या हा शब्द मी यवतमाळात नै ऐकला अजुनतरी..कसय ना, गावागणिक भाषा थोडूशी का होईना पण बदलते..त्यामुळे सोन्याबापु जे शब्द लिहितात ते हरेक शब्द मीपन वापरत असेल अस नाही आणि मी लिहिते ते सर्व ते किंवा बी वापरत असतील असपण नै.. Happy पण छान झाल तुमच्यामुळे एक शब्द कळला मलापन Wink

व्याही = ईवाई
विहिन = ईन

टांग = पाय ( टांग मारणे = Ditch करणे.. उदा. तिकडं जाशीन त आठोणीन सांगजो मले नाई त मारशीन टांग. )

भोकनटिकला/ली = शिवी आहे..झाली असेल आधी पण लिहुन कदाचित

इत्तरफिसका/की = उगाच दात काढुन वेंगाडून हसणारा/री.

डच्च = full (उदा.. अवं नको वाडू आता..पोट डच्च भरल मायं..)

भो = जोरात .. हा शब्द सहसा पळण्याच्या क्रियेसाठी वापरला जातो. (उदा. अबे काल मांग कुत्रा लागला त भो पयालो म्या तिथुन. )

बांडी = कमी उंचीचे/ छोटे (उदा. केस काउन एवढे बांडे भादरले वं ? किंवा पाउन आणाचा न वं, किती बांडा झाला फराक(फ्रॉक) तिले )

बांडी वाचुन मनसोक्त हसलो आज!! आमच्या कॉलोनी मधे एक पोरगा होता त्याच्या ऊँची मुळे पोरे त्याला बांडा / डुमना गोप्या म्हणत , त्याचेच एक वर्शन म्हणजे गरज नसलेल्या चौकश्या करणाऱ्या माणसाला चेपताना "आपल्याले ज्याचे काई घेने नाइ त्या इषयाच्या बांड्या पंचायती कराव नाइ माणसाने" असे म्हणतात

ऊँची कमी असेल तर पर्यायी शब्द म्हणुन डुमना आहे म्हणतात (थो थोरात चा पश्या हाय न डुमना तो पयाला घर सोडून)

ऊँची कमी अन गुटगुटीत गोरे घारे बाळसेदार पोरगे डिफाइन करायला शब्द वापरतात "डुबर्या/ डुबरा" (अरे बा माया ताई च पोट्ट वह्य हे डूबरं लै मस्ती करते अये डुबर्या मामा ले डांस दखोजो त तुयाला"

दनकट माणूस दर्शवायला शब्द "रमसट" (तू लेका त्याले मारतं काय! तुवा लेका चिलमतोंडया तो पाय रमसट पैलान (पैलवान) लै रट्टे देऊ देऊ पादवन न बाबू तुले राय न उगामुगा"

चंद्रपुर, नागपुर, बुटीबोरी, वर्धा, पुलगाव, रसूलाबाद, वणी, यवतमाळ, अकोला, अमरावती अशा विदर्भ/वरहाड़ातील शेजारी-पाजारी/लहानपनीचे मित्र मैत्रिणी, इथले मित्र मैत्रिणी/परिचित यांच्यामुळे बरेच शब्द आणि हेल ऐकले आहेत.
तुम्ही लोकांनी ऑडियो क्लिपा टाकाच मनावर घ्या बाप्पा म्हणजे इथल्या लोकाइले ऐकाइले मजा यीन...

मस्तच सोन्याबापु Lol

अजुन एक शब्द..
डिकने = चिकटने (उदा. का बाप्पा नशिब..कर्ज काडू काडू गरिबी आयुष्यालेच डिकली. )

वर्हाड़ी भाषा , शब्दकोष डॉक्टर विठ्ठल वाघ सर काम पुर्णत्वाकड़े (संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ)

http://m.divyamarathi.bhaskar.com/news/referer/5483/MAG-article-on-varah...

Pages